पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड
प्रकरण ३ रें;
हिंदुस्थानचा इतिहास
सामान्य विवेचन - हिंदुस्थानचा इतिहास या नांवाखालीं यापुढें जो इतिहास देण्यांत येत आहे तो बहृंशी खास हिंदुस्थानदेशाचा आहे; म्हणजे त्यांत ब्रह्मदेश, ब्रिटिश बलुचिस्तान, अफगाणिस्तान, सीलोन इत्यादि प्रांतांचा इतिहास नाहीं. कारण, त्यांचा समावेश खास हिंदुस्थानांत आगेंमागें झालेला आहे; त्यामुळें या ठिकाणीं त्यांचा इतिहास मुख्य इतिहासविषयाला जेवढा जरूर तेवढाच दिला आहे.