पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड
प्रकरण ४ थें
लोकसमाज
वंशविचार - हिंदुस्थान हें एक स्वतंत्र खंडच असल्यामुळें त्यांत भिन्नभिन्न वंशांचे व रक्ताचे लोक आढळल्यास नवल नाहीं. डॉ. कीन याच्या मताप्रमाणें कृष्णवामन (नेग्रिटो), कोलेरियन, द्राविड, आर्यन् व मंगोलियन अशा पांच प्रकारचें रक्त हिंदुजनतेंत आहे. (ज्ञानकोश विभाग १. पृ. ८१ पासून पुढें). पण हें मत पुष्कळांनां मान्य नाहीं. सेन्ससकार सर नेहरी रिस्लेनें येथील लोकांचे सात प्रादेशिक वर्ग पाडेल आहेत ते असेः-