प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ७ वें
सांपत्तिक स्थिती

व्यापार, दळणवळण व आर्थिक परिस्थिति.
प्रत्येक राष्ट्रांतील व्यापाराचा इतिहास त्या राष्ट्रांतील समाजाच्या इतिहासाइतकाच प्राचीन असणार. व्यापाराचे दोन प्रकार असतात: अंतर्गत व परराष्ट्रीय. अंतर्गत व्यापार हा नेहमीं चालतोच; तेव्हां त्यावर राष्ट्राची खरी प्रगति अवलंबून असत नाहीं. तर परदेश्य किंवा बहिर्गत व्यापाराच्या विस्तारावरून त्या राज्याची पूर्वी कितपत उन्नति झाली होती हें ठरविण्यांत येतें. हिंदुस्थानांत वेदकाली किंबहुना वेदपूर्वकालींहि नौकांच्या द्वारें मोठा बहिर्गत व्यापार चालत असे याबद्दल प्रत्यक्षाप्रत्यक्ष पुरावे उपलब्ध आहेत. व्यापारार्थ दूरदूरच्या देशांत पूर्वी जें नौकानयन होत असे त्याचा सुंदर व उद्बोधक इतिहास श्रीयुत राधाकुमुद मुकर्जीनीं आपल्या A History of Ancient Shipping and Maritime Activities from the Earliest Times. (प्राचीन नौकानयाचा व दर्यावर्दी चळवळींचा इतिहास) या ग्रंथांत दिला आहे, त्याचाच गोषवारा पुढें देत आहों.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .