प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

पुरवणी खंड : हिंदुस्थानखंड

प्रकरण ८ वें
बौद्धिक प्रगति

शिक्षण - हिंदुस्थानांतील सांप्रतच्या शिक्षणपद्धती संबंधी बरोबर ज्ञान होण्यास त्यासंबंधी इतिहास पाहिला पाहिजे. हल्लीं हिंदुस्थानच्या राज्यकारभारांत शिक्षण विषयाइतक्या भानगडी आणि मतभेद असलेला दुसरा विषय नाहीं. आतांपर्यंत सरकारनें स्थानिक संस्थांनीं व शिक्षणाभिमानी खासगी इसमांनीं आपल्या हातांतील मर्यादित द्रव्यनिधी, ज्यांनां शिक्षणाचे फायदे समजले आहेत अशा लोकांची शिक्षणविषयक मागणी पुरी करण्यांत खर्च केले आहेत. पण ज्या लोकांमध्यें शिक्षण मिळविण्यासंबंधी इच्छा मुळींच नाहीं अशा लोकांमध्यें ती इच्छा उत्पन्न करण्याकडे फारसें लक्ष देण्यांत आलेलें नाहीं, आणि असा समाज फार मोठा असल्यामुळें हल्लींच्या शिक्षणपद्धतीनें समाजांतील वरचा वर्ग चांगला सुशिक्षित व खालचे वर्ग अगदीं निरक्षर अशी दुरावस्था उत्पन्न झाली आहे. अशा या अस्वाभाविक शिक्षणवाढीमुळें समाजवस्थेंत मोठाले दोष उत्पन्न झाले आहेत. त्याविरुद्ध अगदीं अलीकडे जोराची चळवळ सुरू झाली असून खालच्या वर्गात शिक्षणप्रसार करण्याकरितां कित्येक प्रांतांत सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासंबंधानें कायदे पास करण्यांत आले आहेत.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .