प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
 
खैरपूर संस्थान- सिंधमधील एक संस्थांन. क्षेत्रफळ ६५० चौ. मै. याच्या उत्तरेस सक्कर जिल्हा, पूर्वेस जेसलमीर संस्थान, दक्षिणेस हैद्राबाद, थर व पारकर जिल्हे, व पश्चिमेस सिंधु नदी आहे. सिंधमधील इतर प्रदेशांप्रमाणेंच याहि संस्थानची जमीन सपाट व पुळणीची आहे. सिंधु नदीच्या कांठीं असलेली जमीन फार सुपीक आहे. पण नदीच्या कांठचा बहुतेक भाग जंगलाकरितां राखून ठेवलेला आहे. सिंधूनदीच्या कांठचा भाग सोडून दिल्यास बाकीचा सगळा भाग रेताड दगडांनीं भरलेला असून या भागांत पीक अजीबात येत नाहीं म्हटलें तरी चालेल. संस्थानच्या उत्तरभागांत चुन्याच्या दगडांची टेंकडी आहे. रोहरी येथून घार नांवाची एक डोंगराची रांग गेली आहे व त्या टेकडीवर पश्चिमभागीं दिजी नांवाची एक टेंकडी आहे. संस्थानच्या ईशान्य भागांतहि चुन्याच्या दगडांच्या टेंकडयांची रांग आहे. या टेंकडयांवर पुष्कळ शिंपा सांपडतात. संस्थानांतील जंगलांत कांडी व ताली हीं झाडें विशेष दृष्टीस पडतात. याशिवाय, इतर झाडा झुंडपांची ही समृद्धि आहे. तरस, लांडगा, कोल्हा, खेकडा, डुक्कर, हरिण, नीलगाय इत्यादि पंशूं व निरनिराळया प्रकारचे पक्षी या संस्थानांत आढळतात. खैरपूर संस्थानची हवा हिंवाळयाचे चार महिने चांगली असते; पण बाकीचे आठ महिने येथील हवा फार उष्ण असते. येथें पाऊस फार कमी पडतो.

इतिहास- १७८३ पूर्वींचा संस्थानचा इतिहास सिंधच्या इतिहासांत मिसळून गेला आहे. संस्थानच्या स्वतंत्र इतिहासाला यानंतर सुरुवात होते. १७८३ मध्यें कल्होरा राजघराणें संपुष्टांत आले व तालपुर घराणें उदयास आलें. या वर्षी मीर फते अलीखान तालपुर हा सिंधचा स्वामी झाला; व त्यानंतर थोडयाच दिवसांनीं अलीखानचा पुतण्या मीर शोरावखान यानें खैरपूर येथें आपली गादी स्थापन केली. नंतर त्यानें मुलुखगिरी करून आसपासचा बराच भाग जिंकून घेतला. १८११ मध्यें शोरावनें आपला मुलगा रस्तुम यास गादीवर बसविलें. पुढें रस्तुम व त्याचा भाऊ अली मुराद यांच्यामध्यें गादीसंबंधानें भांडणें उत्पन्न होऊन इंग्रजांनां आपला हात मध्यें घालण्यास चांगलीच संधि सांपडली. १८३२ मध्यें इंग्रजांनीं खैरपूर संस्थान स्वतंत्र असल्याचें कबूल केलें व संस्थानकडून सिंधूनदी व सिंधमधील रस्ते यांची वहिवाट त्यांनीं मिळविली. काबूलच्या मोहिमेंत अली मुरादनें ब्रिटिशांनां चांगलीच मदत केली. त्यामुळें काबूलच्या मोहिमेनंतर सिंधप्रांत इंग्रजांनीं खालसा केला असतां फक्त खैरपूरचें संस्था मात्र त्यांनी खालसांत काढलें नाहीं. १८८६ मध्यें इंग्रजांनी मीराला वारसाची सनद दिली. मीर अली हा १८९४ मध्यें मरण पावला व त्याच्या मागून मीर फैज महमदखान हा त्याचा मुलगा गादीवर बसला. याला स्वतःकरितां १७ तोफांचा व राजा या नात्यानें १५ तोफांचा मान आहे. संस्थानामध्यें १ शहर व १२६ खेडीं आहेत. लोकसंख्या १९११ सालीं २,२३,७८८ होती. मुसुलमान हे जवळजवळ हिंदूंच्या तिपटीनें आहेत. हिंदुंमध्यें लोहाणा जातीचे लोक फार आहेत. मुसुलमानांत अरब बलूची, जाट, मोहानो या जातीचे लोक विशेष आढळतात. संस्थानांतील बहुतेक लोकांचा शेतकी हा धंदा आहे. संस्थानांत मुख्यतः सिंधी, फारसी, सिरैकी व बलुची या भाषा प्रचलित आहेत.

१९०३-४ सालीं या संस्थानांतील लागवडीची जमीन १५५० चौ. मै. होती. ज्वारी, बाजरी, गहू, कडधान्य हीं मुख्य पिकें आहेत. निळीचें पीकहि बरेंच होतें. आंबा, तुती, नारिंगें, डाळिंब, खजूर हीं फळें विशेष आढळतात. नवीन नवीन कालवे काढण्यांत आल्यापासून लागवडीची जमीन वाढत चालली आहे. संस्थानांत, उंट, घोडे, म्हशी, बैल, गाढव, खेचर, मेंढी हीं पाळीव जनावरें आढळतात. संस्थानांत कालवे पुष्कळ आहेत. हे सर्व सिंधुनदीचे आहेत. सर्वांत मोठा कालवा 'मीरवाह' हा होय. मीर शोरावच्या कारकीर्दींत तो काढण्यांत आला. याशिवाय अली मुरादनें आपल्या कारकीर्दींत सथीयोवाह व अबदुलवाह हे दोन कालवे काढविले. हल्लींच्या मीरच्या कादकीर्दींत यासाठीं एक स्वतंत्र खातें निर्माण करण्यांत आलें असून त्या खात्यानें फैजवाह, फैजबक्ष, फैजगंज, फैजबहार, फैजमंज इत्यादि कालवे काढले आहेत. १९०३-४ सालीं २४६ चौ. मै. जमीनीला या कालव्यांमुळें पाणी मिळत होतें. संस्थानांत ३३१ चौरस मैल जंगल असून, त्यापैकीं २०० चौरस मैल मीरच्या शिकारीसाठीं राखून ठेवण्यांत आलें आहे. याच्यावर स्वतंत्र अधिकारी नेमण्यांत आला आहे. १९०४ मध्यें या जंगलाचें उत्पन्न २६००० रुपये झालें.

संस्थानांत सर्व प्रकारचें कापड, चांदीचें सामान, लांकूडकाम, बूट, जोडे, जीन, तलवारी, मातकाम वगैरे धंदे आहेत. गोंबट येथें 'खैस' उर्फ पलंगपोस उत्तम होतात. खैरपूरमध्यें गालिचाचा कारखाना आहे. शिवाय येथें रंगाचें काम उत्तम तर्‍हेनें होतें. संस्थानातूंन कापूस, लोंकर, धान्य, नीळ, कातडी, तंबाखू इत्यादि जिन्नस निर्गत होतात. खैरपूरमध्यें कार्बोनेट ऑफ सोडा उत्पन्न होतो व तो सगळा मुंबईचे व्यापारी विकत घेतात. एकंदर निर्गत वस्तूंचें अंदाजी उत्पन्न ६ लाखांचें व आयातीचें उत्पन्न सहा लाखांवर आहे. हैद्राबादहून रोहरीला जो रेल्वेचा फांटा जातो तो या संस्थानच्या हद्दींतून गेला आहे. याशिवाय किरकोळ रस्ते पुष्कळच आहेत. पोस्ट ऑफिसांची संख्या १० आहे. सिंधू नदींमध्यें संस्थानच्या मालकीच्या सहा बोटी आहेत.

संस्थानांतील राज्यपद्धति अनियंत्रित आहे. तरी पण हल्लीं तींत ब-याच सुधारणा झालेल्या आहेत. कारभारच्या सोईसाठीं संस्थानचे ५ तालुके पाडण्यांत आले आहेत. प्रत्येक तालुक्यावर एकेक नायब वझीर नेमण्यांत आला आहे. मीरचा मुख्य वझीर हा ब्रिटिश सरकारनें नेमलेला असतो. सक्करचा कलेक्टर संस्थानवर देखरेख करण्याचें काम करतो. मीरला न्यायाच्या बाबतींत पूर्ण अधिकार आहेत; पण ब्रिटिश प्रजाजनांनां पोलिटिकल एजंटच्या परवानगीशिवाय फांशी देण्याचा अधिकार नाहीं. वझीराला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट व सेशन्स जज्जाचे अधिकार आहेत. नायब वझीरांनां सबडिव्हिजनल मॅजिस्ट्रेटचे अधिकार आहे. ब्रिटिश राज्यांतील फौजदारी कायदाच येथें रूढ आहे. संस्थानामधील महसूल बटई नांवाच्या जुन्या पद्धतीनें गोळा केला जातो. उत्पन्नाच्या एकतृतीयांश भाग मीर स्वतःसाठीं घेतो. १९०३-४ सालीं संस्थानचें उत्पन्न १३ लाख झालें व खर्च ११.६ लाख रुपये झाला. १९०२ पर्यंत संस्थानचीं स्वतःचीं नाणीं प्रचारांत होतीं पण हल्लीं ब्रिटिश नाणें चालू असून हेंच राजमान्य नाणें होऊन बसलें आहे. मीरला सरकारास काहींहि खंडणी द्यावी लागत नाहीं. संस्थानचें लष्कर ३७७ शिपायांचें असून त्यांत १६३ स्वार आहेत. १९०३-४ सालीं पोलिसांची संख्या २२० होती. कोटदिजी येथें एक मोठा तुरुंग व खैरपूर येथें एक छोटा तुरुंग आहे. खैरपूर संस्थान शिक्षणाच्या बाबतींत फार मागासलेलें आहे. १९०३-४ सालीं संस्थानांत ९५ शाळा होत्या व ४५८६ विद्यार्थी शिकत होते. खैरपूर येथील सर अल्लिमुराद टेक्निकल शाळेंत, सूत व रेशीम विणकाम नुक्तेंच सुरू करण्यांत आलें आहे. त्या ठिकाणीं मुलांना सुतारकी, लोहारकी, कातकाम, कशिदाकाम व गालिचाकाम, तसेंच लाखरोगणाचें लांकूड करणें, चकचकीत भांडीं करणें व हातमागावर विणणें हीं सर्व कामें शिकविण्यांत येतात. १९०३-४ सालीं संस्थानांत ३ इस्पितळें व ३ दवाखाने होते.

खैरपूर शहराकरितां शुद्ध पिण्याच्या पाण्याची नुक्तीच सोय करण्यांत आली. ८६ फूट खोलींतून हें पाणी नळानें वर आणलें आहे. १९२० ते १९२३ च्या दरम्यान पाण्याच्या पाटाची बरीच दुरुस्ती व सुधारणा करण्यांत आली. अलीनवाझवाह नांवाचा एक नवीन कालवा सुरू करण्यांत आला. त्यास खर्च सुमारें १,००,००० रुपये झाला. १९२२ सालीं संस्थानांत एकच सामान्य कारखाना निघाला. धान्य दळणें, धान्य निवडणें, पाणी शुद्ध करणें, बर्फ करणें इत्यादि कामें या कारखान्यांत करण्यांत येतात.

जानेवारी १९२४ सालीं बर्मा ऑइल कंपनीला पेट्रोलियम तेलाकरितां धातूच्या खाणी शोधण्याचा परवाना देण्यांत आला. परंतु संस्थाननें इतर सांपडणा-या खनिज पदार्थांवरील आपला हक्क कायम ठेविला. पांच वर्षांत कंपनीला जर तेल सांपडलें तर तिला तीस वर्षांचा कौल मिळावा व या मुदतींत कंपनीनें कच्या तेलाच्या प्रत्येक ४० गॅलनास आठ आणे दरानें राजकीय कर द्यावा असें ठरलें. हा परवाना देणें म्हणजे संस्थानच्या उत्पन्नवाढीच्या बाबतींतं एक पाऊल पुढें टाकणेंच होय हें उघड आहे.

ब्रिटिश अधिकार्‍यांशीं सहकार्य करून कारबोनेट ऑफ सोडा या पदार्थाची मोठी वखार पुनः वाढवावी अशा सूचना करण्यांत आल्या आहेत.

श ह र- खैरपूर संस्थानची राजधानी. याची लोकसंख्या १९११ सालीं १४९८९ होती. बहुतेक वस्ती मुसुलमानांचीच आहे. शहरांतील घरें मातीचीं असून फार गचाळ आहेत. या शहरांत राजवाडयाची इमारत चांगली आहे. पण स्वतः मीर हा येथें क्वचितच रहातो. शहराच्या नजीक परिरुहन, झियाउदिन व हाजी जाफर सय्यद यांचीं थडगीं आहेत. शहरांत दोन इस्पितळें असून त्यांपैकीं एक खास स्त्रियांकरितां आहे. तालपुर घराण्याच्या भरभराटीच्या काळीं या शहराला फार महत्व होतें पण हल्लीं तें महत्व कमी होत चाललें आहे. शहरांत कपडे रंगविण्याचा धंदा मोठया प्रमाणावर आहे. हल्लीं ज्या जागीं हें शहर वसलेलें आहे त्या जागीं १८८७ पूर्वीं बोयरा नांवाचें एक खेडें होतें असें म्हणतात.

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .