प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे   

गझनी घराणें- इराणांत सामानी नांवाच्या राजवंशानें सुमारें दोनशें वर्षे राज्य केलें; पुढें त्याच्या पडत्या काळांत तुर्क लोकांनीं आपलें महत्व पूर्वेकडे वाढविलें; सामानाराज अबदुल मलीक याच्या पदरीं अल्पतेगीन नांवाचा एक तुर्क गुलाम होता, त्याच्यावर अबदुलची मर्जी बसून त्यानें त्याला ९६७ त खुरासानप्रांताची सुभेदारी दिली. अबदुल हा ९६७ त मेल्यावर त्याच्या मनसूर नांवाच्या मुलाला गादी मिळू नये म्हणून अल्प-तेगीननें खटपट केल्यावरून मनसूरनें त्याला सुभेदारीवरून काढून टाकलें, तेव्हां तोट पळून गज्नीकडे आला व तिकडे त्यानें फौज जमा करून गझनी येथें राज्य स्थापन केलें.  राज्याची पूर्व सरहद्द पंजाबास भिडली होती. पंजाबचा त्या वेळचा राजा जयपाळ म्हणून होता; त्या दोघांत अल्प-तेगीनच्या कारकीर्दीत मोठासा प्रसंग झाला नाहीं. सन ९७४ त हिंदूलोकांनीं गझनीवर स्वारी केलीं होती पण ती निष्फळ झाली. अल्प तेगीन हा ९७६ त मेला.

स ब  ते गी न.- हाहि एक तुर्क गुलाम असून अल्प तेगीनचा आवडता होता. त्यानें याला आपला जांवई करून आपल्या राज्याचा वारस नेमिलें होतें. माबेल डफ म्हणतो कीं अल्प तेगीन यानें गझनीस स्वतंत्र राज्य न स्थापतां तें सबक् तेगीननें स्थापिलें. शेवटचा सामानी राजा दुसरा नूह हा मेल्यावर सबक् तेगीन स्वतंत्र झाला (९७७). तावत्काल तो व अल्प तेगीन हे सामानीचे मांडलीकच होते. स्वतंत्र झाल्यावर त्याला फारशी स्वस्थता मिळाली नाहीं. पंजाबांतील हिंदूंनीं जयपाळाच्या हाताखालीं गझनीवर स्वारी केली (९७९). तेव्हां सबक् तेगीननें लघमान येथें हिंदूंनां तोंड दिलें. परंतु दोघांचा समेट होऊन जयपाळ परत फिरला. सबक्नें ९८० त बरत घेतलें. पुढें काबूल शाह गख्खर हा त्याच्या प्रजेनें बंड केल्यामुळें सबकच्या आश्रयास आला (९८३). सबक् तेगीनची हिंदुस्थानावरील पहिली स्वारी सन ९८६ त झाली. त्या वेळीं कुशघर (काश्गर) घेऊन त्यानें फक्त सरहद्दीवर किरकोळ मोहीम करून थोडीफार लूट नेली. पुढें स. ९८८ त त्यानें मोठी स्वारी करून जयपाळाचा लघमानच्या लढाईंत पराभव केला. तेव्हां जयपाळानें त्याला गझनीच्या बाजूचे चार किल्ले व शंभर हत्ती देण्याचें कबूल केलें. यानंतर सबक् तेगीन यानें सिंधूपर्यंतचा प्रदेश ताब्यांत घेऊन पेशावर येथें आपला सुभेदार ठेविला. तो परत देशीं गेल्यावर त्याचा मुलगा महमूद यानें कांही उचल केल्यामुळें सबक्नें त्याला गझनीस एक वर्ष कैदेंत ठेविलें (९९०) होतें. पुढें बघ्राखानानें बुखाऱ्यावर चाल केली असतां, सबक्नें त्याचा पराभव केला (९९३). सामानी राजा दुसरा नूह याला हिरात, खुरासान व बल्ख या प्रांतांतील वंडाळी मोडण्यास सबक्नें मदत केली होती. त्यामुळें या तीन प्रांतांवर नूह यानें सबक् याला व त्याचा मुलगा महमूद याला निशापुर येथें सुभेदार नेमिलें (९९४). पुढें स. ९९७ च्या आगस्टमध्यें बल्खजवळ सबक् तेगीन मेला. त्यानें आपला मार्ग आपला मुलगा इस्माईल याला वारस केलें; कारण महमूद हा दासीपुत्र होता.

म ह मू द.- याचा जन्म १३ नोव्हेंबर स. ९७० त झाला. यानें इस्माईल याला पकडून कालंजरच्या अरण्यांत कैदेंत ठेवून आपण गादी बळकाविली (जानेवारी ९९९). त्यानंतर लागलीच त्यानें सामानी संस्थानिकांवर स्वारी करून बल्ख व हिरात हे प्रांत आपल्या कबज्यांत घेतले व मर्व्ह आणि निशापुर हे त्यांना दिले (मे ९९९). खुरासानप्रांतहि त्याला थोडक्याच दिवसांत मिळाला; तेव्हां अल कादीर या खलीफानें त्याला त्या प्रांताचा सुभेदार केलें; त्याचवेळीं महमूदनें आपणास सुलतान म्हणवून घेतलें व बल्ख येथें आपली राजधानी केली (जुलै). पुढें त्यानें निशापूर हस्तगत करून सिजिस्तानवर चाल केली (१०००). प्रख्यात कवी फिर्दौसी व फरुखी हे महमूदचे चुलतभाऊ होते; त्यांचा बाप बुध्राखान याला सिजीखानच्या खलफ सरदारानें ठार मारल्यानें त्याचा सूड घेण्याकरितां महमुद तिकडे गेला होता. त्यानें आपलां भाऊ नस्त्रखान यास सेनापति व अहमद मैमंदी यास वजीर नेमिलें. मैमंदी हा अठरा वर्षे वजीर होता. पुढें त्याचा अपमान करून महमुदनें त्याला कैदेंत टाकिलें असतां महमुदचा मुलगा मसूदनें त्याची सुटका केली, महमुदच्या दरबारीं टूसी, अस्जुदी, अझ्युरी, फिर्दौसी वगैरे कवी होते. महमुदानें पश्चिमेकडील प्रांत घेतल्यावर हिंदुस्थानाकडे दृष्टी वळविली. हिंदुस्थानांत धर्मवृद्धि करावी, सपाटून संपत्ति मिळवावी व पदरच्या मोठया फौजेचा खर्च परस्पर भागवावा या हेतूनें त्यानें यापुढें हिंदुस्थानावर एकंदर सतरा स्वाऱ्या केल्या. हिंदुस्थानांत त्यावेळीं अनेक लहान लहान राज्यें होतीं व त्यांत एकी नव्हती. त्यामुळें महमुदला बहुतेक यश येत गेलें. त्यानें आपल्या राज्याची सुव्यवस्था लाविली होती व सैन्याचें त्याच्यावर प्रेम होतें. त्यामुळें इतक्या स्वाऱ्या करण्यास त्याला सवड मिळाली. त्यानें गझनीहून आगस्ट १००१ मध्यें निघून हिंदुस्थानावर पहिली स्वारी केली व पेशावर येथें काबूल व लाहोर येथील राजा जयपाळ शाहीय (काबूलच्या शाही घराण्यांतील?) याचा पराभव केला (२७ नोव्हेंबर १००१). याच सुमारास तिकडे निशापुर हें सामानी संस्थानिकाने काबीज केलें. परंतु महमुदानें तिकडे जाऊन तें परत घेतलें व त्यामुळें त्याला सिबिस्तानचा राजा म्हणून लोकांनी कबूल केलें. (१००३). त्याच वेळीं त्यानें टाक हा किल्लाहि घेतला. पुढें १००६ त त्यानें हिंदुस्थानावर दुसरी स्वारी केली. (माबेल डफ अनेक मुसुलमानी तवारीखांच्या आधारें दुसऱ्या स्वारीचा सन १००६ देतो व रा. सरदेसाई १००४ देतात.) तत्पूर्वी त्यानें आपल्या ईलकखान नांवाच्या चुलतभावाशीं तह करून ऑक्सस व ट्रान्सकाकेशिआ या प्रांतांची वांटणी केली. या दुसऱ्या स्वारींत त्यानें भिराराए भटिआह (भट्टीराजा विजयाय) याचा पराभव केला. अनंतपाळ खंडणी देई; परंतु त्याचा साथीदार विजयराज हा देईना म्हणून महमूद त्याचेवर चालून गेला. प्रथम रजपुतांनीं त्याचा पराभव कला. तेव्हां त्यानें सैन्यास धीर देऊन पुन्हां लढाई दिली, तींत मात्र विजयराज मुलतानजवळील भिटीच्या (भटिंडा?) किल्यांत गेला; तो किल्लाहि महमूदनें घेतल्यावर विजयराज सिंधमध्यें पळून गेला. इतक्यांत त्याचा मुलतानचा सुभेदार अबूलफत्ते यानें अनंगपालाशीं सख्य करून बंड उभारलें; तेव्हां महमूद पेशावरवर चालून येऊन त्यानें अबूलला काश्मीरकडे पिटाळून बंड मोडलें. (१००६). ही त्याची तिसरी स्वारी होय. इतक्यांत खुरासनांत बंड झाल्यानें महमूदानें तिकडे जाऊन तें मोडलें (१००७). इकडे महमूदचा पेशावरचा सुभेदार सुकपाल (हा मूळचा हिंदु असून पुढें मुसुलमान झाला होता) यानें धुमाकूळ सुरू केल्यानें महमूद तिकडून निघून पुन्हां इकडे आला व सुकपालाला पकडून त्यानें कैदेंत टाकिलें (१००७). ही चौथी स्वारी होय. पुढील सालीं त्यानें आपला चुलतभाऊ (ईलकखान) यास त्यानें बंडाळी केल्यावरून पकडून कैदेंत ठेविलें. या वेळीं अनंगपाळानें पुष्कळ हिंदुराजे जमवून लढाईची तयारी केली; स्त्रियांनीं आपले दागीनेसुद्धां युद्धकरितां देणगी म्हणून दिले होते. गख्खर वगैरे डोंगरीलोकहि हिंदूंच्या बाजूस होते; महंमूदची ही पांचवी स्वारी असून ती भटिंडा येथें आला. तेथें हिंदूमुसुलमानांचे युद्ध झालें. प्रथम हिंदूंचाच जय झाला, परंतु शेवटी अनंगपाळाच्या हत्तीस तीर लागून तो पळत सुटला; तेव्हां राजा ठिकाणावर नाहींसें पाहून हिंदू सैन्य पळालें व महमूद याला आपोआप जय मिळाला (१००९). त्यानें परत जातांना नगरकोटचें देऊळ भ्रष्ट करून अपार संपत्ति लुटली. फेरिस्ता म्हणतो की सात लाख सोन्याचे दीनार, सातशें मण दागिने, दोन हजार मण चांदी, दोनशे मण सोनें, वीस मण जवाहीर इतकी लूट त्याला मिळाली. अरबी मण दोन शेरांचा असे. तरी त्या मानांनेंहि ही संपत्ती पुष्कळ होती.  हमूदानें गझनीस मोठा समारंभ करून हीं संपत्ती सोन्याचांदीच्या मेजावर ठेवून लोकांस दाखविली. पुढें १०१० त त्यानें सहावी स्वारी करून (मत्स्यदेशची राजधानी) नारैन (नारायण) काबीज केलें. राव्हर्टीच्या मतें भीमनगरच्या भीमनारायणावरील जी स्वारी ती हीच होय. याच सालीं घूर प्रांत महमूदनें खालसा केला. लगेच मुलतानवर येऊन (सातवी स्वारी) अबुल लोदीस कैद करून गझनीस नेलें. तिकडे जशजानन प्रांत बिनवारस म्हणून (१०११) व जुर्जिस्तान (१०१२) प्रांतानें बंड केल्यावरून महंमुदानें ते दोन्ही खालसा केलें. नंतर १०१३ त त्यानें हिंदुस्थानावर (आठवी स्वारी) व १०१५ त आपला मुलगा मसाउद याच्यासह घुर प्रांतावर स्वारी केली. पुढें त्याच सालीं (नववीं स्वारी) त्यानें स्थानेश्वरवर येऊन तेथील देऊळ लुटून गझनीस प्रयाण केलें; त्याबरोबर देवालयांतील मुख्य मूर्ति नेली. पुनः थोड्या दिवसांनीं (दहावी स्वारी) तो काश्मीरवर चालून आला पण लोहकोट येथें हिंदूंनी त्याचा पराभव केला. पुढच्या सालीं (१०१६) ख्वारीझ्ज्ञम प्रांतांत बंड झालें. तें त्यानें मोडून तेथें आपला खोजा अल्तुन-ताश याला सुभेदार नेमलें. नंतर (१०१७) त्यानें आपल्या (मसउद) मुलाला आपल्या चुलत भावाची (ईलकखान) मुलगी करून त्याला खुरासानचा सुभेदार केलें व हिरात ही त्याची राजधानी केली व मसाउदला आपला वारस नेमलें. पुढें त्यानें हिंदुस्थानावर अकरावी स्वारी (१०१८) केली. इतके दिवस तो पंजाबच्या अलीकडे आला नव्हता; परंतु पंजाबच्या पुढें अनेक संपत्तिमान शहरें असल्याचें ऐकून बरोबर अफाट फौज घेऊन तो एकदम कानोजवर आला. तेथील राजा कुवरराय हा त्यास शरण गेला. तेथून त्यानें मशुरेस जाऊन तेथील व वाटेंतील मंज वगैरे गांवांतील श्रीमंत मंदिरें लुटलीं व प्रदेश बेचिराख करून गझनीस परत गेला. तिकडे मसाउद यानें घूर प्रांतांत झालेलें बंड मोडून बर्तर, झरात, झरूस हीं ठाणीं व घर्जिस्तानांतील सर्व किल्ले काबीज केले (१०२०). याच सालीं शाहनामा ग्रंथाचा कर्ता व तसूचा रहिवाशी आणि महमूदच्या दरबारचा प्रख्यात कवि फिदौंसी हा मेला (खल्फानें त्याचा मृत्यु १०२५ त दिला आहे). कानोजचा राजा महमूदचा मांडलिक बनल्यानें इतर सर्व हिंदूराजांनी कालंजरच्या नंदराजाच्या हाताखाली त्याच्यावर स्वरी केली, तेव्हां त्यानें महमुदास मदतीस पाचारण केलें; परंतु महमूद येण्यापूर्वीच नंदराजानें कनोजच्या राजास लढाईंत ठार केलें (१०२१). महमूदनें कालंजरवर चढाई केली (बारावी स्वारी) परंतु तेथें त्याचा पराभव झाला. तेव्हां तो परत निघाला. जातां जातां त्यानें अनंगपालाचा मुलगा त्रिलोचनपाल (लाहोरचा राजा) याचा राहिब येथें पराभव केला. त्या लढाईंत त्रिलोचन पडला व त्याचा मुलगा भीमपाल हा राजा झाला. लाहोर हें गांव महमूदनें खालसा करून हिंदुस्थानांत मुसुलमानी राज्याचा पाया घातला. पुढें (१०२२) महमूदनें नूर व किरात आणि लोहकोट यांवर स्वाऱ्या केल्या. पैकीं लोहकोट येथें त्याचा पराभव झाला (तेरावी स्वारी),दुसऱ्या वर्षी (१०२३ चौदावी स्वारी) त्यानें ग्वाल्हेर व कनोजवर स्वारी केली व तेथून खंडणी घेऊन तो परत गेला आणि (१०२४) अफगाण लोकांवर चालून त्यांनां लुटलें. पुन. त्यानें अफगाणावर स्वारी केली व ६ आक्टोबर १०२५ रोजीं सोमनाथाच्या प्रख्यात (पंधरावी) स्वारीवर तो निघून मुलतानाकडे वळला. गझनीहून हें १ हजार मैल दूर आहे. येथील देवळाइतकें विख्यात व श्रीमान देऊळ त्या काळी पश्चिम हिंदुस्थानांत नव्हतें. झकेरिया कझिनी या फारशी माणसानें (१२६३ त) सोमनाथाचें वर्णन ऐकीव माहितीवरून दिलें आहे (सोमनाथाची साग्र माहिती सोमनाथ या नांवाखालीं पहावी). या प्रवासांत उन्हानें व इतर आपत्तीनें त्याच्या सैन्याचा फार नाश झाला. वाटाडयांनी भलत्याच वाटा दाखवून त्याला फसवून सोमनाथाचा सूड उगविला. त्याच वेळीं हिंदू लोकांनीं केलेल्या हल्ल्यांनां मोठ्या कष्टानें तोंड देत देत तो सिंधु उतरून मुलतानास जाऊन तेथून गझनीस गेला.

पुढें गझनीस मसाउदचें लग्न करून महमूद पुनः (सोळावी स्वारी) जाट लोकांवर चालून आला (१०२७). कारण या लोकांनीं सोमनाथाच्या स्वारींतून परत जातांना त्याचा खरपूस समाचार घेतला होता. या वेळींहि जाटांनीं त्याचा पराभव केला; परत जातांना त्यानें भक्कर, ठठ्ठा व सीस्थान येथें स्वाऱ्या केल्या. पुढें (१०२८) त्यानें नहर प्रांताची वांटणी स्वतः व तुर्कस्तान (आशियांतील) चा राजा या दोघांत करून इराक प्रांतावर स्वारी करून तो खालसा केला व मसाउदच्या ताब्यांत दिला (१०२९). याच सालीं मसाउदची व धाकर रजपुतांची एक लढाई झाली (सतरावी स्वारी). यानंतर थोडक्याच दिवसांत (३० एप्रिल १०३०) महमूद हा मधुमेहाच्या विकारानें वयाच्या साठाव्या वर्षी मरण पावला. तो शूर, महत्वाकांक्षी, अत्यंत लोभी, चंचल, मद्यपि, साहसी, व्यवहारज्ञ व विद्याव्यासंगी होता. त्यानें जवळ जवळ पंचवीस वर्षे हिंदुस्थानावर स्वाऱ्या केल्यानें हिंदुस्थानांत येण्याची वाट मुसुलमानांच्या पायाखालची होऊन गेली. त्यानें पंजाब जिंकल्यानें पुढें आपल्याला हिंदुस्थानांत राज्य स्थापतां येईल असा मुसुलमानांनां भरंवसा वाटूं लागला. महमुदाच्या लोभीपणाची पुढील गोष्ट प्रख्यात आहे. मरणापूर्वी त्यानें आपली सारी संपत्ती एकत्र पाहिली व हिचा आता वियोग होणार हें पाहून तो रडला; पण त्यानें ती कोणास वाटली नाहीं. त्यानें गझनीस एक पाठशाळा व एक पदार्थसंग्रहालय स्थापिलें. काव्याचाहि हा भोक्ता होता. हिंदुस्थानांतले कारागीर नेऊन त्यानें गझनीस सुंदर इमारती बांधल्या. त्याची लष्करी शिस्त कडक असून तो स्वतःहि हुषार सेनापति होता. त्याची खडी फौज ५०।६० हजार असे. हिंदुस्थानांत कायमचें राज्य स्थापण्याची त्याची इच्छा नव्हती. फक्त लूट करण्याचा त्याचा परिपाठ असावा. लाहोर प्रांत त्याच्या ताब्यांत होता. बाकीच्या हिंदुस्थानचा व त्याचा कांही संबंध नसे. त्याच्यानें जसा हिंदुस्थानांत राज्यप्रसार झाला नाहीं, तसा धर्मप्रसारहि झाला नाहीं. याच्या दरबारीं अल्बेरुणी हा प्रख्यात संस्कृत शिकलेला ज्योतिषी होता. फराबी (विद्वान् साधु) उत्बी व बैहाकी (इतिहासकार) हेहि त्याचे नोकर होते. विद्येच्या प्रसाराप्रीत्यर्थ सालीना तो कांहीं लाख रुपये खर्च करी. गझनी शहरांत त्यानें कालवे, हौद व कारंजीं बांधली. तो राज्यावर बसला तेव्हां गझनीच्या  आसपासच्या थोडासा डोंगराळ प्रांत त्याच्या ताब्यांत होता; परंतु मरणसमयीं उत्तरेस आरल व कास्पियनसमुद्र, पश्चिमेस तैग्रीस नदी, पूर्वेस लाहोर इतका प्रदेश त्याच्या राज्यांत मोडे. त्यानें आपल्या पश्चात राज्य टिकविण्याचे उपाय योजले नाहींत. तो मुत्सद्दीहि नव्हता. त्याच्या मागें त्याचें राज्य विस्कळित झालें. याचीं कांही नाणीं ब्रिटिश म्युझियममध्यें आहेत.

म ह म्म द व म सू दः- महमूदच्या मागून झालेल्या गझनीच्या सुलतानाचा हिंदुस्थानाशीं फारसा संबंध येत नाहीं; ते फारसे पराक्रमीहि नसून त्यांनीं हिंदुस्थानांत नवीन प्रांतहि काबीज केला नाहीं; उलट कांहीं गमावला. महमूदास दोन जुळे पुत्र होते, त्यापैंकीं महम्मदनें आपल्या मार्गे गादीवर बसवावें असें त्यानें ठरविलें होतें. परंतु त्याचा भाऊ मसूद यानें त्याच्याशीं तंटा सुरू केला. दोघांची गांठ तेगीनाबाद येथें पडली व महम्मदास त्याचे फितुरी सरदार हानीब व युसूफ यांनीं विश्वासघातानें कैद करून (१०३० सप्टेंबर २) मसूदचे हवालीं केलें. मसूद हा इस्पाहान येथें सुभेदार होता. त्यानें प्रथम महम्मदला इराणचें राज्य आपल्याला तोडून देण्याबद्दल सांगितलें होतें; परंतु त्यानें ते कबूल केलें नव्हतें. शिवाय प्रजा व फौज यांची मसूदवर प्रीति होती त्यामुळें महम्मद शेवटीं मसूदच्या हातीं सांपडला. त्यानें त्याचे डोळे काढून तक्त वळकाविलें. मसूद हा आडदांड असून त्यानें हिंदुस्थानावर दोन स्वाऱ्या केल्या. पहिली स्वारी १०३३ त करून काश्मीरांतील सरस्वती किल्ला घेतला व दुसरी १०३९ त करून हंसी किलज (शिवालिक पहाडांतील) काबिज केला व लाहोरास मौदूद नांवच्या आपल्या पुत्रास सुभा नेमून परत गेला. तिकडे तुघ्रलबेग नांवाच्या खोरासानच्या एका सेल्जुक तुर्क सुभेदारानें बंड उभारलें (१०३९); त्यावर मसूद चालून गेला; मर्व्ह येथें लढाई होऊन मसूद पराभव पावून गझनीस परतला. तेथेंहि त्याच्या फौजेनें बंड उभारलें, तेव्हां तो लाहोरास आला; इकडेहि त्याची फौज त्याच्यावर उठली; तिनें त्याला कैद करून आंधळ्या महम्मदला गादीवर बसविलें. त्याचा कारभार त्याचा मुलगा अहंमद हा पाहूं लागला; त्यानें मसूदला १०४० त ठार मारिलें. मसूद भाग्यहीन होता; तो फार शूर, मद्यपि व शक्तिमान् होता; हत्तीसहि तो जेर करीत असे. विद्येचा व इमारतीचा तो शोकी होता. बैहाकी नांवाच्या त्याच्या एका समकालीन मुसुलमानानें त्याची हकीकत लिहून ठेविली आहे. पंजाबावर त्यानें शेवटीं तिलक नांवाचा एक विद्वान हिंदु सुभेदार नेमला होता.

मौ दू द व इ त र ग झ नी क र रा जेः- हा मसूदचा मुलगा; बाप मारला गेला तेव्हां हा बलक प्रांतांत होता. तेथून तो निघून सर्व अफगाणिस्थान काबीज करून लाहोरास आला. दंतूर येथें लढाई होऊन महम्मद त्याच्या हातीं लागला. त्यास त्यानें ठार मारून तो परत गझनीस गेला. पुढें (१०४३) हिंदुस्थानांतील (उत्तरेचे) सर्व रजपूत एक होऊन त्यांनीं हंसी, स्थानेश्वर, नगरकोट वगैरे ठिकाणें परत घेतलीं; फक्त लाहोर मुसुलमानांकडे राहिलें. मौदूद हा १०४९ त मेला. त्याच्या नंतर ५० वर्षे या घराण्यांत पुष्कळ घालमेली, तंटे व खून झाले. मौदूदनंतर त्याचा मुलगा मसूद व त्याचे मागून त्याचा चुलता अब्दल हसन हा गादीवर आला. पुढें अब्दल रशीद, फर्रुखजाद, इब्राहिम हे राजे झाले. इब्राहिम यानें ४० वर्षे (१०९८ पर्यंत) राज्य केलें; त्यानें १०७९ त पंजाबावर स्वारी केली होती. याला ४० मुलगे व ३६ मुली होत्या! यानंतर मसूद, अर्स्लान व बहराम हे राजे गादीवर आले. हे मधून मधून लाहोरास राहूं लागले; कारण गझनीचा बहुतेक प्रांत सेल्जुक तुर्कांनीं बळकाविला होता. बहरामनें १११८-५२ पर्यंत राज्य केलें. याच्या वेळीं तंटे सुरू होऊन त्यांत गझनी घराण्याचा शेवट झाला. पंजाबांतील रजपूतांनीं त्याला पुष्कळ त्रास दिला. त्यानें आपला जांवई कुत्बुद्दीन घोरी यास, उभयतांत वैर उत्पन्न झाल्यानें पकडून ठार मारिलें. तेव्हां त्याचा भाऊ सैफुद्दीन यानें गझनीवर चाल केली, त्यावेळीं बहराम हा कर्मानचे डोंगरांत पळून गेला. पुढें हिंवाळ्यांत बहरामनें स्वारी करून सैफुद्दीनचा पराभव केला व त्याला पकडूनठार मारिलें. त्यामुळें त्याचा भाऊ अल्लाउद्दीन यानें बहरामवर चढाई केली. लढाईंत बहरामाचा पराभव होऊन तो पळून हिंदुस्थानांत येऊं लत्गला; परंतु शेवटीं अर्ध्या वाटेंतच तो मरण पावला.  अल्लाउद्दीनानें गझनी घेऊन गांवांत तीन दिवस अग्नी व तलवार यांचा प्रळ्य माजविला. सुलतानांचें सारें वैभव, संपत्ति व इमारती वगैरे यांचा त्यावेळीं सर्वनाश झाला. विद्वान निरुपद्रवी लोकांची कत्तल झाली. माजी सुलतानांचीं थडगीं उकरून त्यांतील हाडें कुत्र्यांनां खावयास घातलीं. यामुळें अल्लाउद्दीनास 'जहान सोझ' (जग जाळणारा) असें नांव पडलें. बहरामचा मुलगा खुश्रू हा लाहोरास मरेपर्यंत (११६०) राहिला. त्याचा मुलगा मलीक हा गझनी घराण्यांतील शेवटचा राजा होय. महंमद घोरीनें त्याच्यावर ११७८ त स्वारी करून व त्याचा पराभव करून त्याच्या मुलास पकडून नेलें. पुढल्या वर्षीहि त्यानें मलीकवर स्वारी केली; या वेळी मलिक यास गक्कर लोक सहाय्य करीत होते. त्यावेळीं महंमद घोरीनें मलीकशीं तह करण्याचें मीष दाखवून व त्याचा मुलगा त्याच्याकडे पाठवून तो बेसावध असतां त्यास कपटानें सर्व कुटुंबासुद्धां पकडून गझनीस पाठविलें. तेथें कांही दिवस कैद भोगल्यावर मलीकचा वध केला गेला व महंमद घोरीनें गझनीवंशाचें सर्व राज्य खालसा केलें (११८६). [फेरिस्ता; शाहनामा; माबेल डफ; सरदेसाई- मुसुलमानी रियासत. स्मिथ- अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया].

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .