प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
    
गणसत्ताक राज्य- गणसत्ताक राज्यांत राज्याचा प्रमुख (अधिपति) लोकांनीं निवडलेला असून सर्वांच्या हिताचे प्रश्न सर्वांनीं मिळूनच सोडविले जातात. पण हा व्यापक अर्थ अगदीं अर्वाचीन आहे. प्राचीन ग्रीक व रोमन राष्ट्रांतून सुद्धां सनदी अधिकार अल्पसंख्याकांच्या हातीं असून स्वतंत्र पण राज्यकारभारांत भाग नसणाऱ्या लोकांनीं व गुलामांनीं मिळून बनलेल्या बहुसंख्याकांवर ते राज्य करीत. राज्याचा अधिपति राजा असूनहि जर तो लोकांनीं केलेल्या कायद्याप्रमाणें चालत असेल व त्याची राज्यावर स्थापना आणि उच्चाटण कायद्याबरहुकूम होत असेल तर तेंहि राज्य प्रजासत्ताक म्हणावें असें कांही अर्वाचीन ग्रंथकार प्रतिपादितात. उदाहरणार्थ १५७७ त जीन बोडिननें 'रिपब्लिक' चा असा अर्थ केला आहे (त्याचा 'डि रिपब्लिका लिब्री सेक्स' हा ग्रंथ पहा). मध्ययुगीन इंग्रज जरी इंग्लंडच्या 'कॉमनवेल्थ' (सामान्य मालकीचें राज्य) विषयीं बोलत तरी वंशपरंपरागत हक्क असलेल्या राजाखेरीज राज्य कसें चालवावयाचें याची त्यांनां मुळीच कल्पना नव्हती. प्रजेच्या संगतीनें राज्यारूढ झालेला अधिपति ज्यावर आहे तें राज्य प्रजासत्ताक (रिपब्लिक) असाच आजपर्यंत सामान्य अर्थ लोक करीत आलेले आहेत. पोलंड, व्हेनिस, युनायटेडस्टेट्स, नेदर्लंड्स हीं राज्यें याच अर्थानें रिपब्लिक होत. तेव्हां या प्रजासत्ताक राज्याचे अनेक निरनिराळे प्रकार होऊ शकतील. म्हणून कोणतें राष्ट्र गणसत्ताक किंवा प्रजासत्ताक नाहीं हें सांगणें सोपें जाईल. ज्याचा राज्यकर्ता खरोखरच असें सांगू शकेल कीं, सर्व राजसत्ता माझ्या ठिकाणीं असून मी ईश्वरकृपेनें पूर्ण व स्वतंत्र राजा आहे, तें राज्य प्रजासत्ताक नाहीं एवढेंच ठासून सांगतां येईल.

ग्रेटब्रिटनमध्यें राजा तात्विकदृष्टया ईश्वरकृपेनें राज्य करीत असला तरी पार्लमेंटच्या सनदेनें व अँक्ट ऑफ सेटलमेंटवरहुकूम राज्याधिष्ठित आहे; पण ग्रेटब्रिटनचें हें प्रजासक्ताक राज्य अद्वितीय असल्यानें त्याचें उदाहरण सर्वसामान्य होणार नाहीं. कॉमनवेल्थ व लोकमताहून श्रेष्ठ अशा एखाद्या हक्कावर उभारलेली शासनसंस्था यांना एकच मिलाफ करणें अगदीं अशक्य आहे. कारण एक तर राज्यकर्ताच प्रजेचे सर्व हक्क बळकावून बसेल किंवा प्रतिनिधीमार्फत राज्य चालविणारी प्रजा मुख्य शासनाधिपतीला अगदीं बांधून टाकील व तो ठराविक गोष्टींखेरीज कांहीच करूं शकणार नाहीं. पहिला प्रकार मध्ययुगाच्या अंतिमकाळीं बहुतेक यूरोपीयन राष्ट्रांतून घडून आला आहे.

ज्या प्रजासत्ताक राज्यांत असंस्कृत व रानटी जातीच्या लोकांखेरीज सर्व पुरुषांनां मताधिकार आहे असें राज्य प्राचीनांनीं किंवा मध्ययुगांत देखील कधींच पत्करिलें नसतें. कारण मनुष्याच्या राजकीय हक्कांची त्यांनां मुळींच कल्पना नव्हती. प्रख्यात स्कॉटिश सुधारणावादी जॉन नॉस्क यानें जेव्हां, आपण या राज्यांत जन्मलेला एक प्रजाजन आहों म्हणून राज्यकारभारावर बोलण्याचा आपणाला हक्क आहे असें प्रतिपादिलें, तेव्हां त्याच्या पिढींतील लोकांनां केवढें हें धाष्टर्य असें वाटूं लागलें. पण या धाष्टर्यालाच पुढें मोठें महत्व प्राप्त झालें. अमेरिकेचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा व १७८९ सालची फ्रेंच राज्यक्रांती यांतून केवळ समाजाचा घटक म्हणून व्यक्तीला समाजशासनाच्या कामीं असणारा जो अधिकार मानवी हक्कांत अंतर्भूत होतो तो मिळविण्याचा प्रयत्न दिसून येतो. अर्वाचीन यूरोप आणि अमेरिका यांतील प्रजासत्ताक राज्यांतून या तऱ्हेचे सर्व मानवी हक्क विचारांत घेतलेले आहेत. सर्व समाजाला लागूं असणाऱ्या बाबींत तत्त्वतः कां होईना, पण सर्व समाजाचा विचार घेण्यांत येतो.

आपल्या या हिंदुस्थान देशांमध्यें प्राचीनकालीं राजसत्ताक राज्यपद्धतीच अंमलांत होती; येथें लोकसत्ताक सत्ताक राज्यपद्धतीचा मागमूसहि नव्हता, अशीं विधानें पुष्कळांकडून करण्यांत येतात. ‘ना विष्णुः पृथिवीपतिः; राजा हा परमेश्वराचा अंश आहे, तो राज्य करील त्याप्रमाणें त्याच्या अंमलाखालीं प्रजेनें नांदलें पाहिजे’ अशी हिंदूंची भावना असे. या विद्वानांच्या म्हणण्यांत तथ्यांश बराच
आहे यांत वाद नाही. पण त्याच्या बरोबर हेंहि लक्ष्यांत ठेवलें पाहिजे कीं, हिंदुस्थानांत कांही भागांत तरी लोकसत्ताक राज्यपद्धति अंमलांत होती. पुराणवस्तुसंशोधनशास्त्राच्या सहाय्यानें, कोणत्या कोणत्या भागांत ही लोकसत्ताक शासनपद्धति अस्तित्वांत होती हें आपल्याला समजून येतें.

वैदिक काळी अशा प्रकारची गणसत्ताक शासनपद्धति अस्तित्वांत होती. ऐतरेय ब्राह्मणांत वैराज्यें उर्फ गणसत्ताक शासनपद्धतीचा उल्लेख आढळतो व महाभारत काळीं त्याचप्रमाणें अर्थशास्त्र रचिलें गेलें त्याकाळीं कांही कांही भागांत अशा प्रकारची शासनपद्धति होती हेंहि निर्विवाद आहे. पण त्यानंतरहि चवथ्या शतकापर्यंत कांहीं कांहीं भागांत अशाच प्रकारची राज्यघटना होती असें पुराणवस्तुसंशोधन शास्त्राच्या द्वारें सिद्ध करतां येतें.

चवथ्या शतकांत पंजाब, पूर्व रजपुताना व माळवा या देशांत गणसत्ताकशासनपद्धति अंमलांत होती असें दिसून येतें. पंजाबच्या मध्यभागांत मद्रकांचें वरील प्रकारचें गणसत्ताक राज्य होतें. सतलज नदीच्या दोन्ही तीरांवर यौधेयांचेंहि अशाच पद्धतीचें राज्य होतें. चंबळा व बटवा यांच्या दरम्यान आभीर आणि मालव लोकांमध्यें अशाच प्रकारची शासनपद्धति अमलांत होती. या वरील सर्व राष्ट्रांनां समुद्रगुप्ताच्या दिग्विजयापुढें हार खावी लागली व त्याच्या अंकित व्हावें लागलें. तरी पण त्यांनीं आपली शासनपद्धति टाकली नाहीं असें दिसून येतें.

पण ख्रि. पू. चौथ्या ते सहाव्या शतकच्या कालीं भारतवर्षांत पुष्कळच गणसत्ताक राष्ट्रें होतीं याबद्दल पुरावा मिळतो. डायोनिससपासून चंद्रगुप्ताच्या कालापर्यंत हिंदुस्थानांत तीन वेळ ही लोकसत्ताक शासनपद्धति प्रस्थापित झाल्याची अख्यायिका मेगॅस्थिनीसनें आपल्या पुस्तकांत नमूद केली आहे. माल्टेकोरो, सिंधो, मोरुनी, मरोहो, ररुंगी हीं वैराज्यें होतीं असें त्यानें म्हटलें आहे.

ख्रि. पू. चौथ्या शतकांतहि अशा प्रकारचीं वैराज्यें होती. शिकंदराच्या स्वारीच्या वेळचा भारत देश हा वैराज्याचा भोक्ता होता. हल्लींच्या पाश्चात्य देशांतील लोकप्रतिनिधियुक्त सभांसारख्याच त्या काळींहि सभा होत्या व अशा लोकांनां जबाबदार असणाऱ्या संस्थांमार्फत त्या त्या शहरांचा अगर राष्ट्रांचा राज्यकारभार चालविला जात असे असें तत्कालीन लेखकांच्या ग्रंथावरून नजरेस येतें. अराष्ट्रकांचें अशा प्रकारचें राष्ट्र होतें व जस्टिन नांवाच्या ग्रंथकारानें या लोकांनां लुटारूं असें हीन नांव दिलें असलें तरी याच लोकांचा चंद्रगुप्ताला त्याच्या स्वारींत पुष्कळ उपयोग झाला ही गोष्ट निर्विवाद आहे. अशाच प्रकारचीं दुसरीं वैराज्यें म्हटलीं म्हणजे मालाव व क्षुद्रक या लोकांचीं होत. क्षुद्रकांनां आपल्या वैराज्याचा फार अभिमान वाटत असे असें अरिअननें म्हटलें आहे. मालव व क्षुद्रक या दोन्ही जाती फार बलिष्ठ होत्या. पण त्या दोघांतहि नेहमी शत्रुत्व असे. अशा स्थितींतहि शिंकदराच्या स्वारीच्या वेळीं दोन्ही जातींनीं आपापसांतील वैमनस्य विसरून जाऊन शिकंदराच्या हल्ल्याला तोंड दिलें असें डायोडोरसनें- शिकंदराच्या स्वारीच्या इतिहासकारानें लिहिलें आहे.

याशिवाय शिकंदराच्या स्वारीच्या इतिहासकारांनीं वैराज्यें या नांवानें उल्लेख केलेलीं राष्ट्रें म्हणजे, संबस्तै, गेद्रोशी, ओरीटै, अबस्तनोइ, क्षत्रिय, अर्वितई या लोकांचीं होत. गेद्रोशी लोकांनीं राज्यकारभाराचा गाडा हांकण्यासाठीं एक मंडळ नेमलेलें असे असें डायोडोरस म्हणतो. संबस्तै लोक आपल्यापैकीं तिघांनां लोकनायक नेमीत व त्यांच्या
मार्फत कारभार चालविला जात असे असें कर्टियस म्हणतो. वर उल्लेखिलेल्या इतर लोकांत आपापले नायक निवडण्याची पद्धत असे, असें अरिअनच्या हकीकतीवरून समजतें.

पण शिकंदराच्या सैन्याशीं ज्यांचा निकट संबंध आला ती राष्ट्रें म्हणजे अगलसोई व नीशियन या लोकांचीं राष्ट्रें होत. अगलसोई लोक हाडाचे खरे क्षत्रिय होते. शिकंदराच्या सैन्यानें ज्यावेळीं त्यांचा पराजय केला त्यावेळीं शत्रूंकडून अपमान सोसण्याचें संकट टाळण्यासाठीं आपल्या गांवाला आग लावून सर्वांनीं आपल्या पोरांबाळांसह आपल्याला जाळून घेतलें ही गोष्ट संस्मरणीय आहे. नीशियन लोकांचें राष्ट्र हेंहि लोकसत्ताकच होतें. त्यांचा कारभार तीनशें शहाण्या माणसांकडून चालविला जाई. यांच्यावर एक अध्यक्ष नेमला जाई. वरील हकीकतीवरून पाहतां ख्रि. पू. चौथ्या ते सहाव्या शतकाच्या दरम्यान, भारतवर्षांत वैराज्यांची पद्धति दृढमूल झाली होती असें आपल्याला आढळून येईल. ख्रि. पू. पांचव्या व सहाव्या शतकांत कुलसंघशासितपद्धति अस्तित्वांत होती व हाहि एक वैराज्याचा जुना व अपरिणत प्रकार होता. अशा प्रकारचीं राष्ट्रें म्हणजे भग्ग, बूलि, कलम, मौर्य, कोलिय, भल्ल या लोकांचीं होत. पण या सर्वांत महत्वाचीं राष्ट्रें म्हटलीं म्हणजे शाक्य, विदेह व लिच्छवी या लोकांचीं होत. विदेह व लिच्छवी या दोन्ही लोकांचें पुढें वज्जि हें साधारण नांव पडलें.

शाक्य लोकांमध्येंहि लोकसत्ताकराज्यपद्धति प्रचलित होती. शाक्य लोक आपल्यामधीलच एकाला नायक म्हणून निवडीत असत. कांही गुंतागुंतीच्या प्रश्नांचा निकाल लावावयाचा असल्यास सर्व लोक एकत्र जमून त्या प्रश्नाचा विचार करीत असत. लोकनायकाला ‘राज’ ही पदवी लावली जात असे.

वज्जि लोकांचे राष्ट्र, आठ जातींच्या लोकांचे संयुक्त राष्ट्र होतें. वैशाली ही या राष्ट्राची राजधानी होती. या आठ जातींमध्यें विदेह व लिच्छवी या दोन जाती विशेष प्रमुख होत्या. या वज्जि लोकांचा कारभार लोकसत्ताकपद्धतीच्या अनुरोधानें चालत असें. प्रत्येक जातींतील एक एक असें आठ जणांचें मंडळ व त्यावर सर्व जातींनीं मिळून निवडलेला एक नायक अशा नऊ लोकांचें मंडळ असे व न्यायदानाचें काम त्यांच्याकडे असे. ग्रामव्यवस्थेच्या बाबतींत पुरुषाप्रमाणेंच बायकाहि भाग घेत असत. उद्यानांची व्यवस्था पहाणें, धर्मशाळा बांधणें इत्यादि कामावर बायकाच देखरेख करीत असत. अशा रीतीनें हिंदुस्थानामध्यें राजसत्ताकशासनपद्धतीप्रमाणेंच गणसत्ताकपद्धतिहि अस्तित्वांत होती हें वरील हकीकतीवरून आढळून येईल. लोकसत्ताकपद्धतीचा हिंदुस्थानांत अभावच होता हें म्हणणें सत्यांलां धरून नाहीं. उलट फार प्राचीन काळापासूनहि गणसत्ताकशानपद्धतीचें मूळ हिंदू लोकांत नजरेस येतें व या प्रजासत्ताक राष्ट्रांत मोठमोठे पुरुष निर्माण झाले, व नवीन नवीन शास्त्रेंहि उदयास आलीं. याची ग्वाही हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास देतो. [बिनॉय कुमार सरकार व मुकुंदलाल यांचे ‘मॉडर्न रिव्ह्यू’ तील लेख (जानेवारी व मार्च १९२०); कौटिलीय अर्थशास्त्र; महाभारत; वेदसंहिता; ब्राह्मणें; स्मिथ; ऱ्हीस डेव्हिडस् बुद्धिस्टिक इंडिया.].

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .