प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे    
   
गुजराथी वाड्.मय- गुजराथी वाड्.मयाचे विहंगम द्दष्टया परीक्षण केले असता जी एक गोष्ट प्रामुख्याने वाचकांच्या नजरेंस आल्यावाचून रहात नाही ती म्हणजे या वाड्.मयात कालिदास, शेक्सपीयर, मिल्टन, गोएटे यांसारखी कवि रत्नें आढळून येत नाहीत. गुजराथी वाड्.मयांतील नरसीमेथा, प्रेमानंद, दयाराम इत्यादी कवींच्या काव्यांचे अवलोकन केल्यास जगप्रसिध्द कवीच्या मालिकेत यांना स्थान देण्याइतके उच्च प्रतीचे हे कवी नाहीत असेच वाचकांचे मत पडेल. अशी जरी स्थिति असली तरी वर सांगितलेले गुर्जर कवी हे गुजराथी वाड्.मयाच्या इतिहासांत श्रेष्ठ होऊन गेले व यांची काव्ये गुजराथी ग्रंथामध्ये अद्यापीही सर्वतोमुखी आहेत, ही गोष्ट नाकबूल करून चालावयाचें नाही. हे कवी आपापल्या काळामध्यें प्रसिध्दीस आले व त्यांनी आपलें नांव गुजराथी वाडयमयाच्या इतिहासात अजरामर करून ठेविले. या द्दष्टीनें त्यांच्या काव्यांचे व त्याबरोबरच गुजराथी वाड्.मयाचें आलोचन करणे आवश्यक आहे.

गुजराथमध्यें नामांकित व पहिल्या दर्जाचा एखादा कवि सुद्धां कां निर्माण होऊ नये असा प्रश्न सकृदर्शनी वाचकांच्या पुढें उभा रहाणें स्वाभाविक आहे. या प्रश्नाचे उत्तर द्यावयाचें असल्यास आपणाला गुजराथच्या ऐतिहासिक, सामाजिक व धार्मिक परिस्थितीचें अवलोकन करणें भाग आहे. कितीहि श्रेष्ठ दर्जाचा माणूस घेतला तरी परिस्थितीच्या चक्रातून जाण्याशिवाय त्याला गत्यंतरच नसतें. ज्याकाळी तो जन्माला येतो, त्या काळच्या परिस्थितीची बंधने त्याला जखडून टाकण्याचा प्रयत्न करीत असतात. शेक्सपीयर, वर्डस्वर्थ, गोएटे यांसारखे शककर्ते कवी, परिस्थितीची बंधने तोडून टाकण्याचा शक्य तितका प्रयत्न करीत असतात. पण त्यांच्या हातूनहि ती गोष्ट साध्य होत नाही. मग सामान्य माणसाची गोष्ट दूर राहिली. गुजराथी कवींच्या बाबतीत हीच गोष्ट आढळून येते. राजकीय घडामोडीत गुजराथवर अनेक दुर्धर प्रसंग ओढवले होते. रजपूत, मुसुलमान, मराठे या लोकांनी अनुक्रमें गुजराथवर अंमल बसविला होता. स्वतः गुजराथनें आपलें स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाच नाही म्हटलें तरी चालेल. गुजराथी लोक जात्या, शांत वृत्तीचे शेतकी व व्यापार यांवर आपला चरितार्थ चालविणारे, व धार्मिक वृत्तीचे लोक होते. रजपूत अगर मराठ्यांप्रमाणें स्वातंत्र्याची हौस व पराक्रमाची आवड त्यांच्यात नव्हती. त्यामुळें पारतंत्र्यात देखील ज्याप्रमाणें रजपुतांमध्ये वीररसपूर्ण काव्यें झाली तशी गुजराथी लोकांत झाली नाहीत. स्वातंत्र्यलालासा ही काव्याची जननी होय. पण गुजराथी लोकांत स्वातंत्र्यलालसा द्दष्टोत्पत्तीस आली नाही व स्वातंत्र्याची तुतारी वाजवून लोकांत स्वातंत्र्यरवीची ज्योत पाजळत ठेवणारे शाहीर कवीहि गुजराथेमध्यें झाले नाहीत. पण राजकीय घडामोडी चालूं असतां गुजराथमध्यें कवीच निर्माण झाले नाहीत असे मात्र नाही. या अशा उलाढालीच्या काळांत मोठमोठे कवी निर्माण झाले पण त्यांची काव्यें स्वातंत्र्योद्दीपक व चित्ताची खळबळ उडविणारी नव्हती. मुसुलमानी सुलतानांनी गुजराथवर व त्याच्या आसपास ज्यावेळी मुलुखगिरीचा धूमधडाका चालू ठेवला होता त्यावेळी नरसी मेथा राधाकृष्णाच्या शृंगारविलासावर आपली कवनें रचीत होता. गुजराथी समाज हा जात्या धार्मिक असल्यानें  गुजराथी कवीचा धर्म हा आवडता विषय होऊन बसला होता. गुजराथमध्यें धर्माचे पीक पुष्कळ येतें असे म्हणतात. पावसाळ्यातील छत्र्याप्रमाणे गुजराथेंत धर्मसंप्रदाय निर्माण होता. (व नष्ट होतात. न्नेहती परकीयांच्या अंमलाखाली असणा-या कमकुवत लोकांना धर्माशिवाय दुसरा विसावा कोठून मिळणार? गुजराथी कवीच्या काव्यांत हीच स्थिति नजरेस येते. धर्म, शृंगार, शांति इत्यादी विषयांच्या बाहेर या कवीची द्दष्टि गेली नाही. अशा रीतीनें गुजराथी काव्याचें क्षेत्र मर्यादित होतें. पण या क्षेत्रातच आपल्या प्रतिभेने लोकांना स्तिमित करणारे कवी गुजराथेंत निर्माण झाले. गुजराथी वाड्.मयाचे मुख्यतः तीन भाग पाडतां येतात (१) दहाव्या ते चौदाव्या शतकापर्यंतच्या काळांतील वाड्.मय (२) पंधराव्या शतकापासून ते सतराव्या शतकाच्या अगदी अखेरीपर्यंतचें वाड्.मय व (३) अठराव्या शतकानंतरच्या अर्वाचीन काळांतील वाड्.मय.

दहावें ते चौदावें शतक- या काळास जुन्या गुजराथीचा काळ असे म्हणता येईल. या काळांत हल्लीच्या शुध्द गुजराथी भाषेची बीजें पेरली गेली. या काळांतील गुजराथी वाड्.मय फारच थोडे व तें सुद्धा अशुध्द स्वरूपाचें आहे. इ.स.७४६ पासून १२९८ पर्यंत रजपूत लोकांची सत्ता गुजराथवर स्थापित झालेली होती. ब्राह्मण व जैन हे आपापले ग्रंथ संस्कृत भाषेंत लिहीत असत. पण सुमारें दहाव्या शतकाच्या सुमारास भाट आणि चारण यांनी रजपूत राजांच्या स्तुतिपर रासा आपल्या देशी उर्फ अपभ्रंश भाषते रचिण्यास सुरूवात केली. या रासांमधील भाषा म्हणजे व्रज, मारवाडी व इतर देशी भाषांची खिचडीच होती. प्रथम प्रथम ब्राह्मण व श्रेष्ठ वर्णाचे लोक या भाषांकडे दुर्लक्ष करीत. पण पुढें दहाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळांत देशी भाषांना व त्यांच्याबरोबर गुजराथीलाहि बरीच मान्यता मिळू लागली. पण मान्यता मिळाली तरी पुढे दोनतीन शतके गुजराथी भाषेंत फारसें वाड्.मय झाले नाही.

पंधराव्या शतकाच्या आरंभापासून गुजराथी वाड्.मयाला खराखुरा प्रारंभ झाला असे म्हणावयास हरकत नाही. या वाड्.मयाचे यथार्थ स्वरूप काय होते हे समजण्याला तत्कालीन परिस्थितीचे ज्ञान असणें अत्यावश्यक आहे. मीराबाई व नरसी मेथा हे ज्यावेळी आपल्या मधुर कवनांनी गुजराथी समाजाला वेड लावीत होते त्यावेळी गुजराथवर एका नवीन धर्ममताची लाट येऊन आदळली होती. दक्षिण हिंदुस्थानांत उत्पन्न झालेली भक्तिमार्गाची चळवळ या सुमारास गुजराथपर्यंत येऊन पोंहोचली होती. बौध्द धर्मातील तत्वज्ञानाचा आद्य शंकराचार्यानी धुव्वा उडवून वैदिक धर्माची स्थापना केली होती. शंकराचार्यानी स्थापन केलेल्या या वैदिक धर्मांत पुढें बौध्दधर्मातील चांगली तत्वें घुसडण्यांत आली. बुध्दलाहि हिंदु धर्माच्या अवतारी पुरुषांच्या मालिकेंत स्थान मिळालें होते. अशा रीतीनें हिंदु धर्म व वैदिक धर्म यांची सांगड जमली असता, दक्षिण हिंदुस्थानात रामानुजाचार्य, मध्याचार्य इत्यादि महान् धर्माचार्यांनी, भक्तिमार्गाचा प्रसार करण्यास सुरवात केली होती. गुजराथनेहि या मार्गाचा स्वीकार करण्यास विलंब लावला नाही. थोडक्याच काळांत सर्व गुजराथभर ही भक्तिमार्गाची चळवळ फैलाविली.

भक्ति याचा अर्थ परमेश्वराचें भजन करणे असा आहे. पण निर्गुण, निराकार अशा परमेश्वराचें भजन तरी कसें करावयाचे? अशी स्थिति उत्पन्न झाल्यामुळें परमेश्वराला सगुण स्वरूप देऊन त्याला सगुण स्वरूपांत भजावयाचें सगुण स्वरूप देऊन त्याला सगुण स्वरूपांत भजावयाचें, त्याचें गुण गावयाचें अशी भक्तीची व्याख्या करण्यांत येऊ लागली. आपल्या मनाला आवडेल त्या स्वरूपांत परमेश्वराला भजलें असता आपल्याला मोक्ष मिळू शकतो. ही भावना प्रत्येक स्त्रीपुरूषाच्या मनांत या नूतन भक्तिमार्गानें उत्पन्न केली. हा मार्ग ब्राह्मणांप्रमाणेच शूद्र, पतित, स्त्रिया इत्यादिकांना सररास खुला होता. भक्तीच्या साम्राज्यांत स्त्रीपुरुष, उच्चनीच असा भेद नव्हता. कीर्तनाच्या प्रसंगी उच्च जातीचा ब्राह्मण व हलक्या जातीचा महार अगर धेड यांच्यात स्पृश्यास्पृश्यतेची अडचण येत नसे. अशा प्रकारच्या भक्तिमार्गाची लाट गुजराथभर १५ व्या शतकाच्या आरंभी पसरली होती. दक्षिण हिंदुस्थानात रामभक्ति प्रचारात होती तर महाराष्ट्रांत विठ्ठल भक्तीचें प्रस्थ माजले होतें. उत्तर हिंदुस्थान-बंगालमध्ये कृष्ण भक्तीचा फैलाव झाला. अगोदरच कृष्णाचे चारित्र म्हणजे अनेकांगी; ज्याला ज्या अंगाची गोडी वाटत असेल त्याला तें आवडतें अंग कृष्णामध्यें द्दष्टीस पडे. मग काय! गुजराथ मधील स्त्रीपुरुषांनी आपल्याला रूचेल अशा स्वरूपांत कृष्ण भक्ति करण्यांस सुरवात केली. कुणी कृष्णाला कन्हय्याच्या स्वरूपांत भजू लागला तर कुणी राधारमणाच्या स्वरूपांत श्रीकृष्णाचें चरित्र गाऊ लागला. कृष्णभक्तीचा पंथ स्थापन करणारा वल्लभाचार्य हा गुजराथेतच जन्मास आला व त्यानें या कृष्णभक्तीचा प्रसार गुजराथमध्यें झपाट्यानें केला.

मीराबाई (इ.स.१४०३-१४७०)- गुजराथमध्ये मीराबाई व नरसी मेथा हे कवी उदयास येण्याच्या वेळची परिस्थिती वर वर्णन केल्याप्रमाणे होती. मीराबाई ही १४०३ मध्यें जन्मास आली. हिचा मेवाडचा राणा कुंभ याच्याशी विवाह झाला. विवाह होण्यापूर्वीच हिला कृष्णभक्तीचें वेड लागलेले होतें. तिनें मनानें कृष्णाला वरलें होते पण तिच्या इच्छेविरूध्द तिचा कुंभाशी विवाह लावण्यांत आला. कुंभ हा शिवभक्त होता. लग्नानंतर ज्यावेळी कुलदेवतेला नमस्कार करण्याचा प्रसंग आला त्यावेळी मीराबाईने शिवाला नमस्कार करण्याचे साफ नाकारलें. एका कृष्णाशिवाय दुस-या कोणापुढेंहि मी माझें डोके नमविणार नाही असे तिने आपल्या सासरच्या मंडळीना बजावून सांगितले. कुंभानें मीराबाईचे मन कृष्णभक्तीपासून वळविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण व्यर्थ. उलट मीराबाईनेहि कुंभाचे मन कृष्णभक्तीकडे वळविण्याचा प्रयत्न केला पण त्यांत तिलाहि यश आलें नाही. ती नेहमी कृष्णभक्तींत तल्लीन असे. कुंभाचे व तिचें अशा रीतीनें पटत नसल्यामुळे ती द्वारकेला जाऊन साधूंच्या संगतीने आपला काळ घालवूं लागली. अर्थातच तिच्याविषयी नाना प्रकारच्या कंड्या पिकल्या. तेव्हा कुंभाला फार राग येऊन त्यानें तिला विषाचा पेला पाठवून दिला. मिराबाई त्या पेल्यांतील विष प्याली पण तिला कांहिहि झाले नाही. राण्यानें तिचें मन वळविण्याचें कसे कसे प्रयत्न केले हे तिनें एका पद्यांत सांगितले आहे. मिराबाई ही जातीने गुजराथी नव्हती. द्वारकेस आल्यानंतर तिनें गुजराथीचें ज्ञान संपादन केले असावें. तिने पुष्कळ गाणी हिंदीभाषेंत रचलेली आहेत. खास तिची अशी २५० गाणी असावीत. बाकीची कांही जरी तिच्या नांवावर विकली जातात तरी ती गाणी दुसर्‍यांची असून ती त्यांनी लोकप्रिय व्हावीत या हेतूनें मिराच्या नावांखाली दडपून दिली असावीत असे दिसते. कारण कांही कांही घुसडून दिलेल्या गाण्यांत अर्वाचीन गुजराथी शब्दप्रयोग आढळतात. हिचे गाणे ऐकावयास अकबर आला अशी एक कथा प्रचलित आहे. ती चुकीची असावी किंवा ही मीराबाई कुंभ राण्याची बायको नसावी.

पर्शियन शफीला ज्याप्रमाणें परमेश्वर हाच आपली बायको, आपली आई, आपला बाप किंबहुना आपलें प्रेमसर्वस्व वाटतो, त्याचप्रमाणे मिराबाईला कृष्णाशिवाय दुसरें काहिहि सुचत नसे. तिने आपले तन व मन परमेश्वराला अर्पण केले होते. खालील ओळीमध्ये तिने आपलें अंतःकरण उघड केलेलें आहेः-

प्रेमनी प्रेमनी प्रेमनी रे मने लागी कटारी प्रेमनी
जळ जमुनामा भरवा गयांतां हती गागर माथे हेमनीरे। मने
काचे ते तांतणे हरिजी ए बांधी, जेम खेंचे तेम
तेमनी रे मने।
मीरा कहे प्रभु गीरिधर नागर, शाभळी सुरत शुभ
एमनी रे मने।

दुस-या एका कवनांत 'गोविंदो प्राण अमारो रे, मने जग लाग्यो खारो रे, मने मारो रामजी भावे रे, बीजो मारी नजरे न आवे रे' असे तिनें म्हटले आहे.

वरवर विचार करणा-याला मिराबाईच्या कवनांत उत्तान शृंगाराशिवाय कांही दिसावयाचे नाही. पण वस्तुस्थिति तशा प्रकारची नाही. मिराबाईला श्रीकृष्णाचें वेड लागलेले होते व त्याच्याशी एकरूप होण्याकरतां तळमळणा-या जीवाचे मानवी प्रेमाच्या स्वरूपांत व्यक्त केलेले बोल म्हणजे तिची कवनें होत. ती कवनें गायली जात असताना श्रोत्याचें मन तात्पुरतें तरी तल्लीन झाल्याशिवाय रहात नाही. ही शृंगारपूर्ण कवनें राजरोस गांताना गुजराथी बायकांना कोणत्याहि प्रकारची लाज वाटत नाही. अद्यापिहि गुजराथमध्यें, गर्भ्यामध्ये ही कवनें तरूणी गात असतात. गुजराथमध्ये ज्या ज्या कवीची अगर कवयित्रीची कवनें गुजराथी आबालवृद्धांच्या तोंडी बसलेली आहेत अशा कवीमध्ये व कवयित्रीमध्ये मिरांबाईची प्रामुख्यानें गणना करण्यास हरकत नाही.

नरसी मेथा (१४१५-१४८१)- मीराच्या समकालीन व मीरापेक्षाहि श्रेष्ठ दर्जाचा कवि नरसीमेथा होय. हा जुनागड येथील नागर ब्राह्मण होता. लहानपणीच त्याचे आईबाप वारल्यामुळें त्याच्या चुलतभावानें त्याचें लालनपालन केलें होते. नरसीची जात शिवोपासक होती. पण नरसीचा ओढा बालपणापासून कृष्णभक्तीकडे असे. साधूंच्या संगतीत भजन करण्यांत त्याचा वेळ जात असे. कांही वेळी तो स्वतः स्त्रियांच्या वेषात स्त्रियांबरोबर गर्भ्याचा नाच करीत असे. त्यामुळे त्याच्या जातीतील लोक त्याच्यावर व त्याच्या कुटुंबाबर रूष्ट झाले व त्याच्या कुटुंबीयांना वाळीत घालण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्याचें लग्न एका मुलीशी ठरलें होते पण वरील वार्ता त्याच्या भावी श्वशुराला कळतांच त्यानें आपली मुलगी नरसीला देण्याचें नाकरले. पण पुढे त्याचे दुस-या एका गृहस्थाच्या मुलीशी लग्न झालें. याचा व याच्या बायकोचा खर्च याच्या भावावरच पडत असे. एक दिवस त्याची बायकोचा खर्च याच्या भावावरच पडत असे. एक दिवस त्याची भावजय त्याला टाकून बोलली. त्यामुळें त्याला राग येऊन त्यानें आपल्या घराला रामराम ठोकला व समुद्रकाठच्या महादेवाच्या देवळात जाऊन तपश्चर्या करण्यास सुरवात केली. शिव संतृष्ट झाला व त्यानें नरसीला द्वारकेस नेलें आणि कृष्णाची सोळासहस्र गोपींशी झालेली रासक्रीडा त्याला दाखविली. त्यामुळे नरसीला अपरिमित आनंद झाला; व त्यानें कृष्णभक्ति हें आपलें अंतिम ध्येय ठरविलें. तो घरी परत आला व आपल्या भावजयीच्या दुरूत्तरांमुळे कृष्णाचें दर्शन झाल्याबद्दल त्यानें तिचें आभार मानिले. (कालिदासाच्या संबंधी अशीच आख्यायिका प्रसिध्द आहे). घरी आल्यावर त्यानें आपलें वेगळे बिर्‍हाड केलें. दिवसभर कृष्णभक्तीतच त्याचा वेळ जात असल्यामुळे त्याला अतिशय हालांत व दारिद्रयांत दिवस काढावे लागले. त्याला एक मुलगा व मुलगी झाली. पुढे कांही दिवसांनंतर त्यांची बायको व त्याचा मुलगा काळाच्या भक्ष्यस्थानी पडली. मुलीचा विवाह झाला होता. त्यामुळे त्याला जो आनंद झाला, तो 'एवा रे अमें एवा रे एवा, तमे कहोछे बळी तेवा रे । भलू थयुं भांगी जंजाळ, सुखे भजीशुं श्रीगोपाळ।' या सर्वमान्य पद्यांत वर्णन केला आहे.

भक्तीच्या साम्राज्यांत जातिभेद आडवे येत नाहीत याची नरसीला पक्की जाणीव झाली होती. धेड लोकांच्या पंक्तीला त्यांच्या आमंत्रणावरून तो गेला व त्यांच्याबरोबर त्यानें जेवण केलें. यामुळें त्याच्या ज्ञातिबांधवानी त्याला वाळीत टाकिले. पण पुढे नरसीच्या ज्ञातीच्या लोकांना ज्यावेळी भोजनसमारंभ केला त्यावेळी श्रीकृष्णानें आपल्या मायेनें त्या ज्ञातीच्या गृहस्थांमध्ये धेड जेवायला बसले आहेत असा देखावा ज्ञातीतील गृहस्थांना दाखविला व पुढे नरसी मेथा तेथे येतांच तो देखावा नाहीसा झाला. त्यामुळे त्याच्या ज्ञातीचे गृहस्थ खजील झाले व त्यांनी नरसीला पुन्हा आपल्या जातीत घेतलें.

अशा प्रकारच्या वीस तरी अध्दुत गोष्टी कै. इच्छाराम देसाई यांनी दिल्या आहेत. त्यांपैकी कुंवरबाईनी मामेंरू, नरसिंह मेथांना बापनूं श्राध्द, शामळदासनो विवाह, नरसिंह मेहेतानी हुंडी हे चार चमत्कार प्रसिध्द आहेत. नरसिंह मेहेतानी हुंडी या गोष्टीवर स्वतः नरसीनें एक काव्य रचले आहे.

नरसी मेथाच्या ग्रंथाचे दोन भाग पाडता येतात. (१) शृंगारपर काव्यें व (२) भक्तीपर काव्यें याच्या शृंगारपर काव्याचें पर्यवसान भक्तीतच झालेले आहे. तथापि शुध्द शृंगाराचीहि कांही कवनें आपल्याला आढळून येतात. उदाहरणार्थ, ललिता नांवाच्या एका दूतीला कृष्णानें राधेचे मन आपल्याकडे वळविण्याकरिता पाठवले असतां ललितेने राधेला कृष्णाकडे आणिलें व त्यानंतरची राधाकृष्णाची प्रणयलीला कवीनें पुढील पद्यांत वर्णिली आहेः-

कुंजसमीपे आवीया कुंवरीने तेडी कुमार
एकान्तस्थाने रची शय्या मळी करी रे विहार।
भूधरे भीडी ह्मदेशुं चुंबन लीधुं गाल
रसीओ ते रस प्रीति पीडा कंद्रप रस रसाळ॥

अशाच प्रकारची शृंगारपर कवनें आणखीहि उद्धृत करून देतां येतील. पण या शृंगारपर कवनांत देखील आचरट शृंगार आढळून येणार नाही. राधाकृष्णांची रास म्हणजे जीवात्म्याची परमात्मस्वरूपांत विचित्र पावण्याची अनावर लालसा होय. स्वतः श्रीकृष्णाला सोळा सहस्त्र बायका असून तो ब्रह्मचारीच होता. नरसीचें कृष्णांच्या तोंडात एके ठिकाणी असे शब्द घातलें आहेत.

'सुणो तमे नारी, अमे ब्रह्मचारीअमने ते कोई एक जाणे रे।
वैद भेद लहे नहि मारो सनकादिक नारद व खाणे रे ।
एक जाणे छे व्रजनी गोपी, फेरस जयदेवे पीधोरे॥
            (शृंगारमाला.)

हीं कवनें करूनच तो राहिला नाही तर त्यानें आपल्या स्त्रीपुरुष भक्तांकडून रासामध्यें ही पदें गावविली. पुष्कळ निंदकांनी या त्याच्या कृत्याबद्दल त्याला नांवे ठेविली पण त्याला त्याची पर्वा वाटली नाही. मीरा व नरसी यांच्या शृंगारपर काव्यांची तुलना केली असता, मीराबाईची पदें नरसीपेक्षा मधुर व अधिक उच्च भावनापूर्ण वाटतात व त्यामुळें मीराची पदें गुजराथी समाजांत सर्वतोमुखी झालेली आहेत.

पण भक्तिपर काव्यांत नरसी हा मीरापेक्षा अधिक श्रेष्ठ कवि आहे. तत्कालीन कृष्णभक्तीचें परमोच्च स्वरूप या भक्तिपर काव्यांत द्दृष्टीस पडतें. शिवाय काव्यांत, तत्वज्ञान देखील जागोजागी भरलेले आढळतें. शंकराचार्यांच्या चर्पटपंजरीतील विचारांप्रमाणे 'सुमरने श्रीहरी मेल्य ममतापरी, जीने विचारीनो मूळ तारुं। तूं अल्या कोण ने कोने वळगीर ह्मो, बगर समजे कहे महारू महारू ।' या पद्यांतील विचार आहेत. प्रभातकाली म्हणतां येतील अशीं तात्विक व भक्तिपर गाणीहि याने केलेली आहेत. ही तुकारामाच्या अभंगासारखीच व भक्तिरसपूर्ण आहेत.

नरसीची भाषा पुराणी नाही व हल्लींच्या कवींच्या पध्दतीप्रमाणें बोजड व कृत्रिम नाही. तात्विक विवेचन देखील तो सोप्या भाषते करतो. शृंगारपरकाव्यांत त्याच्यापेक्षा दयाराम हा श्रेष्ठ आहे व अंतःकरणातील भावना व्यक्त करण्याच्या बाबतीत मीराबाईइतका त्याचा हातखंडा नाही. तथापि त्यांच्या काव्याचें सामुदायिक पर्यालोचन केल्यास तो सर्व कवींत श्रेष्ठ होता, असे म्हणण्यास हरकत नाही.

भालन- मीरा व नरसी मेथा हे पंधराव्या शतकांतील दोन महान कवी होते. दुय्यम दर्जाच्या कवीत भालन, भीम व पद्यनाभ यांची गणना करता येईल. भालन हा पाटणचा राहणारा असून जातीचा श्रीमाली ब्राह्मण होता. त्यानें बाणाच्या कादंबरीचे गुजराथीत भाषांतर केले. याशिवाय राम, कृष्ण, शिव इत्यादिकांच्या चरित्रांतील प्रसंगांवर त्यानें काव्यें रचली. रामकृष्ण अगर शिव यांपैकी कोणाचेंहि भजन केलें असता परमेश्वराचें भजन केल्याप्रमाणेंच आहे हा त्याच्या काव्यांतील उपदेशांचा भाग आहे. चंडी-आख्यान व नलाख्यान ही काव्यें त्यानें लिहिली पण त्यांत विशेष वर्णनीय असे काही नाही. 'सांभळ रे तुं सजनी मारी रजनी क्या रमी आबीजी' हें त्याचें गाणें फार प्रसिध्द आहे. दशमस्कंध, सप्तशती, रामायण, शिवभिलडीसंवाद ही त्याची इतर काव्यें आहेत.

भीम- भीम हा सिध्दपूर पाटणचा मोघ ब्राह्मण होता. त्यानें बोपदेगाचें भागवत गुजराथीत भाषांतरिले आहे.
    
पद्यनाभ- पद्यनाभचें नाव त्यानें लिहिलेल्या 'कहानद दे प्रबंध' या ऐतिहासिक काव्यामुळें प्रसिध्द आहे. हा विशाळनगरचा नागर ब्राह्मण होता. त्यानें १४५६ मध्ये झालोर येथें हे काव्य लिहिलें. या काव्यातील कथाभाग अल्लाउद्दीन खिलजींचा सरदार अलफखान यानें केलेल्या गुजराथवरील स्वारीसंबंधींचा आहे. अनहिलवाडपट्टणाची राखरांगोळी कशी झाली, सोमनाथ पाटण कसे लुटले गेले, हिंदू राजांनी तीनचारदा अलफखानाच्या सैन्याचा कसा पराभव केला, शेवटी एका रजपूत राजाच्या विश्वासघातामुळे गुजराथ परतंत्र कसे झालें, यासंबधीचें वर्णने यांत आलेली आहेत. हे काव्य वाचीत असतांना, मधून मधून वीररसपूर्ण पद्यें आढळतात व गुजराथी वाड्.मयात एक तरी कवि स्वातंत्र्यमहिमा गाणारा झाला याबद्दल आगंद वाटतो. हे पद्मनाभाचें काव्य डॉ.बुल्हरनें १८७५-७६ साली शोधून काढलें. काव्याच्या नांवातील प्रबंध या शब्दावरून हे काव्य जैन कवींचे असावे अशी लोकांची कल्पना होती, पण ती हल्ली नाहीशी झाली आहे. पद्यनाभाचें हे काव्य त्यानी जसें लिहिलें तशा भाषेंतच उपलब्ध आहे. मीरा व नरसीमेहताच्या काव्याची भाषा त्यांनी लिहिल्यासारखी राहिली नसून त्यांत फेरफार झालेले आहेत, व त्यामुळे त्यांची भाषा कशी होती हे आपल्याला कळून येत नाही.

पंधराव्या शतकांतील जे मुख्य कवी झाले त्यांचे वर वर्णन केले. या कवीच्या काव्यांत मुख्यतः कृष्णभक्तीचे रतोम आढळून येतें. या काळातील भक्तीचें स्वरूप मिराबाई व नरसिंह मेहेता यांच्या काव्यांत आपणाला द्दष्टोत्पतीस येतें. पुढील शतकांत ज्या ज्या कवींनी कृष्णभक्तिपर काव्यें लिहिली त्यांमधील मुख्य कल्पना यांच्या काव्यांतूनच घेतलेली आढळून येते. या कवीच्या काव्यांचा परिणाम तत्कालीन समाजावर फार झाला व अद्यापिहि त्यांच्या काव्यानें गुजराथी समाजाला वेड लावले आहे. या कवींच्या काव्यांत अप्रत्यक्ष रीतीनें जागजागी, तत्कालीन समाजाचें स्वरूप काय होतें याची अस्फुट कल्पना आपल्याला करतां येते. पण एकंदरीनें या काव्यांतील कवीचे काव्यक्षेत्र बरेंच संकुचित होते असे म्हणावयास हरकत नाही.

सोळाव्या शतकांतील कवी- या शतकात वाड्.मयाला ओहोटी लागली. चांगल्या प्रकारचें वाडयय उत्पन्न होण्याला जी परिस्थिती लागते ती या शतकाला लाभली नाही. या काळांत नांव घेण्यासारखे कवी म्हणजे वस्तो, वच्छराज व तुळशी हे होत.

वस्तो- वस्तो हा खेडा जिल्ह्मांतील बोरसद गांवचा पातीदार होता. त्यानें सर्वसंगपरित्याग करून साधू व संन्यासी यांचा सहवास पत्करला. यानें नरसीमेथांच्या धर्तीवर शुक्रदेवाख्यान व सुभद्राहरण ही काव्यें रचिली आहेत.

वच्छराज- हा भडोचजवळील जंबुसारचा राहणारा. हा कबीरपंथी होता. त्याचें मुख्य काव्य म्हणजे रसमंजरी होय. यांत त्यांने पुष्कळ गोष्टी एकत्र केल्या आहेत.

तुळशी- हा जुनागडनजीकच्या कुटियन गावांत राहणारा सारस्वत ब्राह्मण. यानें ध्रुवाच्या कथेवर एक काव्य रचिलें.

सतराव्या शतकांतील कवी.- सोळावें शतक वाड्.मयाच्या दृष्टीनें जवळजवळ वांझ होते असे म्हटले असता चालेल. पण सतराव्या शतकातल्या वाड्.मयाचा या शतकानें पाया घातला होता असें म्हणण्यास हरकत नाही. या सतराव्या शतकांत ज्याला खरे काव्य म्हणता येईल असे वाड्.मय निर्माण होऊ लागलें. या काळापर्यंत काव्य म्हणजे धार्मिक काव्य अशी स्थिती होती. काव्यामध्यें देखील धर्माचा वर्चष्मा होता. पण सतराव्या शतकातील कवींच्या काव्यांत काव्य हे धर्माच्या तावडीतून सुटले व काव्याचें क्षेत्र विस्तृत झालें अशा प्रकारचें काव्य निर्माण करण्यांत ज्या ज्या कवींनी पुढाकार घेतला त्यांत आखोभगत हा अग्रेसर होय.

आखो- हा जातीचा सोनार होता. लहानपणापासूनच त्याला जगाचा वीट आला होता. त्याचा पहिला गुरू वल्लभपंथी होता. तो फार लुच्चा आहे असे आखोला आढळून आलें म्हणून तो दुस-या गरुंच्या शोधार्थ निघाला व काशीस त्यांच्या मनाप्रमाणे त्याला एक गुरू मिळाला. त्याच्याजवळ त्यानें वेदान्ताचें अध्ययन केलें. शंकराचार्याचें अद्वैत तत्वज्ञान हेच खरे तत्वज्ञान होय अशी त्याची खात्री झाली होती. त्याचें प्रसिध्द ग्रंथ म्हणजे आखोगीता, चित्त विचारसंवाद, गुरूशिष्यसंवाद, पंचीकरण, अनुभवबिंदु, कैवल्यगीता, ब्रह्मलीला, परमपदप्राप्ति व पंचदशीतात्पर्य हे होते. आखोच्या काव्यांत वेदान्त भरलेला आहे. त्याच्या काळी जे नानाप्रकारचे पोटपंथ  निर्माण झाले होते त्या सर्वांचा त्यानें परामर्ष घेऊन ते सर्व झूट आहेत म्हणून ठरविले. 'ब्रह्म सत्यं जगन्मिथा' हेंच तत्व त्यानें आपल्या ग्रंथात प्रतिपादन केलेले आहे. आखो हा मोठासा सुशिक्षित माणूस नव्हता. त्याची भाषा ओबडधोबड आहे. समर्पक कोट्या करणें, एखाद्या मतावर टीका करणें, समाजातील अनाचारावर झणझणीत वाकप्रहार करणे या बाबतीत त्याचा हातखंडा होता. आपल्या पहिल्या गुरूच्या ढोंगावर टीका करतांना तो म्हणतो ' गुरूकीधा मे गोकुलनाथ, घरडा वळदने घाली नाथ, धन हरे धो को नव हरे, ए गुरू कल्याण शूं करे'. यात्रा करण्याच्या धार्मिक समजुतीवर त्याचा विश्वास नव्हता. 'तीर्थ कोडी, हरिजनने चरण' असे त्यानें म्हटले आहे. संस्कृत काय अगर प्राकृत काय, दोन्ही भाषा विचार व्यक्त करण्याच्या दृष्टीनें सारख्याच योग्यतेच्या होतं असें तो म्हणत असे. आपले विचार व्यक्त करण्यासाठी त्यानें योजलेल्या उपमा व परिचित गोष्टी फारच समपर्क असतात. तो स्वतः आपल्याला कवि म्हणून घेत नसे. तत्वज्ञ अगर ज्ञानी म्हणून घेण्यांत त्याला फार आनंद वाटत असे. काव्य लिहितांना त्यानें वृत्तांकडे फारसे लक्ष दिलें नाही. त्यानें काव्याच्या योगानें समाजांतील वाईट चालीचा विध्वसं करण्याचें स्तोम माजलें होते. ते यानें नाहीसे केले व काव्याला एकप्रकारचें नवे वळण लाविले.

प्रेमानंद (१६३६-१७३४)- तथापि गुजराथी भाषेला व वाड्.मयाला जर कोणी उच्च दर्जाचे स्थान प्राप्त करून दिलें असेल व संस्कृतइतकीच प्राकृत भाषा गहन विचार व्यक्त करण्याला समर्थ आहे अशी जर कोणी लोकांची खात्री पटवून दिली असेल तर तो कवि म्हणजे प्रेमानंद होय. गुजराथीत चांगले वाड्.मय निर्माण केल्याशिवाय पागोटे न वापरण्याची त्यानें प्रतिज्ञा केली होती. प्रेमानंदाने संस्कृत भाषेचा व पुरांणाचा चांगला अभ्यास केला होता. तो स्वतः कवी होता. एवढेंच नाही तर त्यानें काव्याचा स्वतंत्र पंथ निर्माण केला. जॉन्सनप्रमाणें त्याच्याभोवती नेहमी कविवृंद जमत असे, व प्रेमानंद हा आपल्या स्फूर्तीने त्यांना निरनिराळी काव्यें लिहिण्याला उत्तेजन देत असें. त्याचे जवळ जवळ ३७ शिष्य होते. त्यांपैकी एकाला तात्विक कविता तर दुस-याला ऐतिहासिक काव्यें रचण्यास तो सांगत असे. स्वतः प्रेमानंदाने पुष्कळ काव्यें व नाटकें लिहिली. त्याच्या नाटकांमध्ये एकप्रकारचें वैशिष्ट्य दिसून येतें.  त्याचें काव्यभांडार फार मोठे आहे. त्यांने एकदंर ३२/३३ काव्यें लिहिली. संस्कृतमधून गुजराथीमध्यें पुराण सांगणा-या पंडितांची त्याला फार चीड येत असे. याकरिता प्रेमानंदानें गुजराथीतच पौराणिक प्रसंगावर काव्यें लिहिण्यास आरंभ केला व रामायण, महाभारत यांमधील प्रसंगावर त्यानें काव्यें रचिली. पण 'केवळ पुराणांचे भाषांतर करणारा माणूस हा कसला कवि' अशी त्याचा प्रतिस्पर्धी सामळ यानें त्याची चेष्टा केल्यानें त्यानें सामाजिक विषयांवरहि काव्यें लिहिण्याचा निश्चय केला. नरसीमेथाच्या चरित्रांतील तीन चार प्रसंग घेऊन त्यानें त्यावर इतकी उत्कृष्ट काव्यें रचिली की, ती आजतागायत गुजराथमधील आवालावृद्धांच्या तोंडी आहेत. 'सामळदासनी विवाह' व 'कुंबरबाईनुं मामेरू' या काव्यांत नरसीमेथाच्या दारिद्याचें वर्णन, मेथाच्या घराचें वर्णन ही हुबेहुब साधली आहेत. तसेंच 'नरसिंह मेहेतानी हुंडी' या काव्यांत श्रीकृष्ण हा मेथाची हुंडी पटवण्याकरितां वाण्याच्या रूपांत हिंडत असतानां द्वारकेच्या बाजाराचें जे वर्णन दिलें आहे तेहि फारच सुंदर आहे. ही मेहतावरील काव्ये दर रविवारी पुष्कळ गुजराथी भक्तिभावानें वाचतात. त्याचप्रमाणे दर शनिवारी प्रेमानंदाचे सुदामचरित्र वाचतात. उखाहरण, दशमस्कंध, नलाख्यान हीहि काव्यें नेहमी म्हटली जात असतात.

दशमस्कंधामध्ये कृष्णाच्या बाललीलांचें वर्णन आलें आहे तें फारच वाचनीय झालें आहे. नलाख्यानांत दमयंतीविलापाचें वर्णन फार बहारीचें साधले आहे. हे वर्णन वाचलें असता मनुष्यस्वभावाची पारख प्रेमानंदाला फार मार्मिक होती असे द्दष्टोत्पत्तीस आल्याविना रहात नाही. उखाहरणात प्रेमानंदाची कल्पनाशक्ति किती अनिवार होती हे प्रत्ययास येतें. रणयज्ञ हें काव्य रावणासंबंधीचे आहे. सुदामचरित्रांत सुदाम्याचें भक्तिपूर्ण चरित्र पहावयास सापडतें; पण प्रेमानंदाच्या सुदामचरित्रांत काव्यप्रतिभा द्दग्गोचर होते.

प्रेमानंदाला छंदःशास्त्राची विशेष माहिती नव्हती व यामुळें त्याच्या काव्यांत वृत्ताचे नियम पाळले जात नाहीत असा एक आक्षेप घेण्यांत येतो. पण तो खरा नाही. द्रौपदीहरणांत त्याने वृत्तांचा उपयोग केला आहे. त्यावरून वरील आक्षेप निर्मूलक ठरतो. प्रेमानंदाच्या काव्यांत मानवी स्वभाव अलंकाराच्या साहाय्याने उत्तम रीतीनें रेखाटलेला आढळतो. कित्येक ठिकाणी त्याच्या काव्यांत उपमा, रूपक, उत्पेक्षा यांचा घोटाळा झालेला आढळून येतो व हा एक प्रेमानंदाच्या काव्यांत दोष आहे असें त्याचे टीकाकार म्हणतात. प्रेमानंदाने एकंदर ११ नाटकें लिहिली असें रावबहादुर हरगोंविदास कांतावाला यांनी म्हटलें आहे. त्यापैकी रसदर्शिका सत्यभामाख्रान, पांचालीप्रश्नाख्यान, तपात्याख्यान ही तीनच सध्यां उपलब्ध आहेत. या तीन्ही नाटकांमध्यें अगदी अलीकडचे शब्दप्रयोग आढळतात व त्यावरून ही नाटकें प्रेमानंदाची नव्हेत असें पुष्कळ विद्वानांचे म्हणणे आहे. सत्यभामा नाटकाच्या शेंवटी जे भरतवाक्य आहे त्यावरून गुजराथी भाषेची प्रेमानंदाला किती आवड होती हें दिसून येते. हें भारतवाक्य असें आहे. 'सांगोपांग सुरंग व्यंग अतिशे, घारो गिरी गुर्जरी। पादेपाद रसाळभूषणवती थाओ सखी ऊपरी। जे गिर्वाण गिरा गणाय गणता, ते स्थान एल्योवरी। धाये श्रेष्ठ सहु सखी जन थकी, ए आश पुरो हरि'

सामळभट- प्रेमानंदाचा प्रतिस्पर्धी सामळभट हा इ.स. १६४० मध्यें जन्मला. हा श्रीगोडमालवी ब्राह्मण जातीचा होता. त्याला संस्कृत, हिंदी, फारसी इत्यादी भाषा उत्तम अवगत होत्या. व्रजभाषेतील वृत्तांचा याच्या काव्यांत फार उपयोग केलेला आढळतो. प्रसंगविशेषी दोहरा, चौपाई, छप्पा ही गुजराथी वृत्ते देखील त्यानें उपयोगात आणलेली आहेत. सामळ हा प्रथमतः पुराणांतल्या प्रसंगांवर कवनें करीत असे पण त्याकाळी गुजराथमध्यें धर्मासंबंधी लोकांची आस्था नव्हती. त्यामुळे सामळलहि आपल्या कवनांचे विषय तत्कालीन समाजाला पटतील असे निवडावे लागले. त्याच्या काव्यांची गोडी प्रथम समाजाला समजली नाही. पण रखीदास नांवाच्या एका कुणबी पाटलाला त्याच्याबद्दल फार आवड असे. त्यानें सामळला आपल्याकडे बोलावून त्याला काव्यें करण्यास उत्तेजन दिलें. तसेंच गमानजी नांवांच्या एका भाटाच्या संगतीचा सामळला फार फायदा झाला. सामळनें एकंदरीत २६ काव्यें रचिली. त्यांपैकी पद्मावती, रावणमंदोदरी संवाद, उद्यमकर्मसंवाद, सामळरत्नमाला, मदनमोहना, रखीदासनी चरित्र इत्यादि काव्यें फार प्रसिध्द आहेत. सामळच्या काव्याचें वर्णनात्मक व नैतिक असे दोन भाग पडतात. नैतिक काव्यांमध्ये जागजागी उत्कृष्ट प्रकारची नीतिवचने आढळून येतात. उदाहरणार्थ पोटामुळे आपल्यावर काय काय अनर्थ घडून येतात ते वर्णन करतांना कवि म्हणतों. पेट करावे बेट, पेट वाजा वडवावे, पेट उपडावे भार, पेट गुण सौनागावे, पेट भमे परदेश; पेटथी पाप करे छे पेट करे छे जार पेटथी सत्य हरे छे'इ. अशाच प्रकारची सत्यप्रमेयें जागजागी सामळच्या काव्यांत आढळून येतात. मदनमोहना हे अतिसुंदर, विनोदप्रचुर व शृंगारिक असें वर्णनात्मक काव्य आहे.

कथाभागांत निरनिराळ्या प्रकारचे प्रसंग फारच बहारीनें सामळनें वर्णिले आहेत. या काव्यांतील प्रत्येक श्लोक सुंदर आहे असे स्वतः सामळनें म्हटले आहे. या काव्याची भाषा फार सोपी व मनोहर आहे. जागजागी कूट श्लोक घालण्याची सामळला फार खोड असे. त्यामुळें त्याच्या काव्याला एकप्रकारचे क्लिष्ट स्वरूप प्राप्त झालें आहे. सौदर्यवर्णनात प्रेमानंद सामळाहून वरचढ आहे. सामळाच्या काव्यांतील नायिका, नायकापेक्षा अधिक सुंदर तर्‍हेने रेखाटलेल्या आढळतात. सामळच्या नायिकांमध्ये साहस, पातिव्रत्य, सुशिक्षिण, इत्यादी गुण आढळून येतात. सामळच्या काव्यावरून त्याची स्त्रियांबद्दलची काय कल्पना होती हे नीटसे समजत नाही. कांही प्रसंगी तो स्त्रियांची फार प्रशंसा करतो तर काही ठिकाणी तो स्त्रियांबद्दल अनुदारपणाचें उद्गार काढतो. 'ए जीवती जात छे जक्षणी, जोर जोरावरना हर्या' अगर 'घडी एकमां कहे वीर, कंथ घडीमा करी थापे' असें त्यानें स्त्रियांबद्दल वाईट उद्गार काढले आहेत. तर अन्यत्र 'जोबनमां दे रंग, संगमुख टाटक तननी, व्हालपणें करी बात, मटाडे पीडा मननी... चतुरा चित्र हरनार, सार उरमा मदभाती...छेनीच कोइजो नारियो, स्वभावे सहुं नहि सरखी' असे प्रशंसापर उद्गार काढले आहेत.

सामळ हा उत्कृष्ट कवि होता व त्याचे विचार तत्कालीन समाजाच्या फार पुढे गेले होते. त्याचें अनुकरण करणारा दुसरा कोणीहि कवि गुजराथी वाड्.मयांत आढळत नाही. त्याच्या काव्यांत फारसी भाषेतील शब्द वारंवार येतात.

या प्रमुख तीन कवींशिवाय १७ व्या शतकांत नाकर, मुकुंद, देवीदास, शिवदास, विष्णुदास, विश्वनाथज्ञानी, मुरारि, श्रीधर स्वामी, नरहरी, वल्लभ, वृज, रत्नेश्वर, हरिदास, द्वारकादास, धनदास, गोपाळदास, रत्नाजी आनंदघन, नेमिविजय इत्यादी अनेक कवी होऊन गेले व त्यांनी गुजराथी वाड्.मयात पुष्कळ चांगल्या काव्यग्रंथाची भर घातली.

१७ व्या शतकांतील काव्याचें संकुचित क्षेत्र नाहीसे करून काव्याचे क्षेत्र व्यापक केलें. आखो, प्रेमानंद व सामळ यांनी गुजराथी भाषा लोकप्रिय केली. या तिन्ही कवींचे मार्ग निरनिराळे होते. आखोच्या काव्यांत तत्वज्ञानावर भर दिलेला आढळतो तर प्रेमानंदाच्या काव्यांत मानवी स्वभावाचें उत्कृष्ट चित्र रेखाटलेले पहावयास सांपडते. सामळच्या काव्यांत, कथानिवेदनाची अप्रतीम हातोटी दिसून येते. पण अशा रीतीनें या तिघांचे मार्ग जरी निरनिराळे असले तरी या तिघांच्या काव्यामुळे गुजराथी भाषेला उच्च दर्जाचें स्थान मिळालें यांत संशस नाही.

अठराव्या शतकांतील कवी- अठराव्या शतकाच्या उदयाच्या वेळी गुजराथच्या राजकीय परिस्थितींत स्थित्यंतर घडून आलें होते. मुसुलमानी सत्तेला उतार लागून मराठी साम्राज्याचा रवि तळपू लागला होता. मराठ्यांनी आपली सत्ता चोहोंकडे प्रस्थापित करण्याचा खटाटोप मांडला होता. गुजराथवर त्यांनी स्वा-या करण्यास सुरवात केली होती. अर्थात अशा मुलुखगिरीच्या धामधुमीच्या काळांत गुजराथी समाजांत एकप्रकारची चलविचल व्हावी यांत आश्चर्य नाही. याचा परिणाम गुजराथी वाड्.मयावर घडून आला. सतराव्या शतकांत ज्या गुजराथमध्ये आखो, प्रेमानंद, सामळप्रभृति कवी निर्माण झाले त्याच गुजराथेंत अठराव्या शतकांतील वरील कवीच्या जोडींचा एकहि कवि निर्माण झाला नाही. उत्कृष्ट प्रकारच्या काव्याचा या शतकांत जन्म झाला नाही. सतराव्या शतकांत काव्याला स्वैर संचार करण्याकरिता जे क्षेत्र मिळालें होते. ते नाहीसें होऊन धर्माचें जूं काव्याच्या मानगुटीवर बसू पहात होतें. कृष्णभक्तीच्या संप्रदायाने वर डोके काढण्यास सुरवात केली होती. वल्लभपंथाचे उपदेशक खेड्यापाड्यातून आपल्या धर्माचा उपदेश करीत होते. अशा परिस्थितीत, गुजराथमधील कवीहि या धर्माच्या खड्या सुरांशी आपल्या काव्यांच्या तुतारीचा आवाज मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. काव्याचे क्षेत्र पुन्हा संकुचित हूऊं लागलें होतें. काव्याला संप्रदायिक स्वरूप येत चाललें होतें. या शतकांत प्रसिध्दीस आलेल्या कवीपैकी सुमारें बारा कवींनी या संप्रदायाची तत्वें काव्यद्वारें जनतेपुढे मांडण्यास सुरूवात केली पण या कवीच्या काव्यांत नरसीमेथाच्या अगर मीराबाईच्या काव्यांत असलेला भक्तीचा उमाळा व उदात प्रेमाची जागती ज्योत आढळत नाही. यांच्या काव्यांत द्दग्गोचर होणारें भक्तीचें स्वरूप हिणकस आहे.

वल्लभभाट कवीची काव्यें अंबादेवीच्या भक्तीपर आहेत. वल्लभाचा भाऊ यानेंहि अंबामातेच्या स्तुतिपर कवनें रचिली आहेत. या दोघांहि कवीची काव्यें फार लोकप्रिय आहेत. वल्लभानें इतरहि गर्भे लिहिले आहेत. 'कजोंडू' म्हणजे जरठ तरुणी जोडप्यावर त्यानें एक सुंदर गर्भा लिहिलेला आहे. यांतील प्रत्येक शब्द ह्रदयाला पाझर फोडणारा आहे. द्वारकेची (जन्म १७१०) कविता कृष्णचरित्रावर आहे. त्यांत जागजागी सुंदर नीतिवचनें आहेत. भानदास (जन्म १७२१) कवीनें शंकराचार्य व हस्तामलकाचार्य यांमधील संवाद रचिला असून त्यांत हस्तामलकाचार्यांनी शंकराचार्याना अद्वैत, द्वैत यांतील तत्वें विशद करून सांगितलेली आहेत. कालिदास (जन्म १७२५) या नागर ब्राह्मण कवीची त्याच्या प्रल्हादाख्यान काव्यामुळें फार प्रसिध्दि आहे. याशिवाय सीतास्वयंवर, ध्रुवाख्यान ईश्वर विवाह इत्यादी त्याची काव्यें आहेत. त्रिकमदास (जन्म १७३४) या नागरब्राह्मणाने रूक्मिणीविवाह व डाकोरनाथ या विषयांवर काव्य रचिले आहे. प्रीतमदास (जन्म १७३०) हा संदेहार येथे राहणारा भाट जातीचा कवि होता. त्याचा गुरू गोंविदराम नांवाचा होता. सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय मोक्षाचा मार्ग सुलभ होत नाही असें याचें ठाम मत झालें होते व गुरूच्या महतीबद्दल त्यानें पुष्कळ कविता लिहिल्या आहेत. याशिवाय सारस गीता, ज्ञानकक्को, गुरूमहिमा, ज्ञानमास इत्यादी त्याची प्रसिध्द काव्यें आहेत. याशिवाय कृष्णाच्या लीलांवर त्यानें पुष्कळ पदें रचिली आहेत. त्यापैकी हे 'जसोदाजी आवडो लाडकवायो लालन कीजे', हे वासंलडी वेरणथई लागी रे व्रजनी नारने', मनमोहनलाल मारगडो मूको तो मथुरा जइए,' व 'हरिभजन थको छोटा होए, ते सौथी मोटा थाए' ही पद्यें नेहमी लोकांच्या तोंडी असतात. शिवानंद (१७४४ जन्म) हा सुरतेचा नागर ब्राह्मण यानें शिवपार्वतीच्या स्तुतिपर काव्यें रचिली आहेत. नभेंराम (जन्म १७५२) हा पिहिजी येथे राहणारा मोढ ब्राह्मण होता. त्यानें कृष्णभक्तीपर वीस पंचवीस पद्यें रचिली आहेत. हरिदास (जन्म १७७४) हा कुंतलपूर येथें राहणारा क्षत्रिय जातीचा कवि होता. यानें 'शिवविवाह' नावाचें काव्य व वेदान्तपर पद्यें रचिली आहेत. याच्या भाषेंत उर्दू शब्दाचा भरणा पुष्कळ आहे. गोंविदराम (१७८१-१८१४) या कवीनें कलीयुगात मनुष्यजातीचा कसा अधःपात होत चालला आहे यांसंबंधी सुंदर व परिणामकारक कविता लिहिली आहे. उद्यतरत्न (जन्म १७१३) हा जैनधर्मी कवि होता. त्यानें स्त्रियांच्या संगतीपासून होणारे दृष्ट परिणाम काय होतात ते आपल्या काव्यांत वर्णन केलेले आहेत. रत्नो (१७३९) हा जातीचा रंगारी होता. याने कृष्णवियोगामुळें गोपींना जे दुःख झाले त्यावर काव्य रचिलें आहे. जीवराज नांवाच्या कवीने 'जीवराज सेठ या प्रवासवर्णनात्मक काव्यांत प्रेमानंदाच्या विवेकवंझारा या कवितेचे अनुकरण केले आहे. बन्यनच्या ‘पिलग्रिम्स प्रोग्रेस’च्या धर्तीवर हे काव्य आहे. माधवदास नांवाच्या कवीनें (जन्म १७२१) दशमस्कंध, रूक्मिणीहरण इत्यादी विषयांवर कविता लिहिली आहे पण त्याची कविता अगदीच साधारण प्रतीची आहे.

एकोणीसाव्या शतकांतील कवी.- १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात जे कवी उदयास आले त्यापैकी बहुतेक कवींचा जन्म १८ व्या शतकांतच झाला होता. त्यामुळे त्यांची गणना कांही विद्वान अठराव्या शतकांतच करतात. या कवींनी आपली काव्यें एकोणीसाव्या शतकांत लिहिली. या दृष्टीने त्याची गणना १९ व्या शतकांतच करणें अधिक इष्ट आहे असे कांही विद्वानांचे मत आहे. पण तें कसेहि असो १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात अठराव्या शतकामधील परिस्थितीच कायम होती असे म्हटलें तरी चालेल. १८ व्या शतकांत जे धर्मसंप्रदाय निर्माण झाले त्यांतच या शतकाच्या पूर्वार्धात सहजानंदस्वामींच्या संप्रदायाची नवीन भर पडली. या संप्रदायामध्यें पुष्कळ कवयित्री निर्माण झाल्या व त्यांनी मीराबाईच्या भक्तिमार्गाची विझती ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्यास सुरवात केली. एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जे कवी झाले त्यांमध्ये कालानुक्रमानें धीरो भगत हा पहिला होय. हा बडोदे संस्थानातील गोधडा गांवचा राहणारा होता. हा ब्रह्मभाट जातीचा होता. त्यानें एका संन्याशाला आपला गुरू केले होते. गुरूभक्तीवर त्यानें पुष्कळ गीतें केली आहेत. आत्मज्ञानावर त्याची फार मदार होती व आत्मज्ञानाच्या महतीवर त्याने पुष्कळ पद्यें रचली आहेत. आपली कविता लोकप्रिय व्हावी या हेतूनें त्याने एक नवीनच युक्ति लढविली. नदीवर स्नानाला जाण्याच्या वेळेस तो एका वेळूच्या नळकांड्यामध्ये आपली काव्यें कागदावर लिहून ती ठेवीत असे त्या नळकांड्याचे तोंड बंद करून ते नळकांडे नदीत सोडून देत असे व ते नळकांडे ज्याला सांपडेल तो ती पदें वाचीत असे. धीरोची रणयज्ञ, स्वरूपनी काफीओ, मतवादी, आत्मबोध, ज्ञानकक्को, योगमार्ग, प्रश्नोत्तरमालिका, अवगतवाणी छटकपदी, गरीबओधोळ, ही काव्ये मोठी आहेत. ही काव्यें त्यानें काफीवृत्तांत लिहिली आहेत. या वृत्तांत त्याचा हात धरणारा अद्यापि कोणीही झाला नाही. ओखाप्रमाणेंच जनतेच्या डोळ्यांत तो झणझणीत अंजन घालतो पण ते कठोर शब्दांनी न घालता आपल्या पदललित्यांनी तिला खूष करीत करीत घालतो. धीराचें पुष्कळ शिष्य होते. त्यांत बापूसाहेब गायकवाड हे एकच काय ते शिष्य कवि या संज्ञेला पात्र आहेत.

बापूसाहेब गायकवाड (इसवीसन १७७९-१८४३)- हे सरदार घराण्यांतील गृहस्थ होते. लहानपणापासून धर्माकडे त्यांचा ओढा असे. बापूसाहेंबाना भजन करण्याचा फार नाद असे. गुजराथी लोकांत अशी चाल आहे की, एखादा घरचा मुख्य माणूस मेला की, शोकगीते म्हणण्यासाठी भाडोत्री बाया आणावयाच्या व मग या बायांनी ऊर पिटून रडण्यास सुरवात करावयाची. एकदा बापूसाहेबांनी अशा प्रकारच्या भाडोत्री बाया शोकगीतें म्हणताना पहिल्या तेव्हा त्या शोकगीतांमध्ये राम नाहीसें वाटून त्यांनी स्वतः एक 'रामराजिओ' नावांचे शोकगीत तयार केले. त्यांत कामक्रोधादि षडविकाराचें त्यांनी वर्णन केलेले असून त्यांपासून मनुष्यानें अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे असें त्यात सांगितलेले आहे. हे शोकगीत हल्ली पुष्कळ ठिकाणी पूर्वीच्या शोकगीतांऐवजी म्हणण्यांत येतें. बापूसाहेबांच्या काव्यांत मानवी स्वभावाचें यथार्थ स्वरूप वर्णन केलेले दृष्टीस पडतें. रामरहिम एकत्र आहेत. तेव्हा हिंदू व मुसुलमान यानी परस्परास भांडत बसणें गैर आहे अशा प्रकारची शिकवण त्यांच्या काव्यांत द्दष्टीस पडते.

प्रेमानंद स्वामी- (इ.स.१७७९-१८४५)- हा काठेवाडांतील गधडा येथील राहणारा. त्याने कृष्णलीलाचें वर्णन काव्यांत केले आहे स्वतःला राधा समजून व कृष्णाला आपला वल्लभ समजून त्यानें हें काव्य लिहिलें आहे व यावरून त्याला प्रेमानंद सखी हें नाव पडलें आहे. सहजानंद स्वामींच्या समाधीनंतर त्यांच्यावर यानें कांही कविता केल्या आहेत व त्या फार उत्कृष्ट साधल्या आहेत. याशिवाय 'थल' नावांची त्याची कविता प्रसिध्द आहे.

भोज भगत (इ.स.१७८५-१८५०)- भोजभगत हा काठेवाडचा राहणारा असून जातीनें कुणबी होता. लहानपणीच एका तपस्वानें त्याला भक्तीचें महत्व समजून दिले होते. व त्याच्या मनावर त्याचा फार परिणाम होऊन तो विरक्त बनला. पुढें फत्तेहपूर येथें १२ वर्षे त्यानें तपश्चर्या केली. तो खरा साधु आहे किंवा नाही याची परीक्षा करण्याकरता विठोबा दिवाणजी नांवाच्या एका मराठा अधिका-यानें त्याचा फार छळ केला. भोजाच्या काव्येमध्यें त्याचें 'चावख' उर्फ फटके हे फार प्रसिध्द आहेत. हे फटके उपदेशपर आहेत. दयारामाची ज्याप्रमाणे गर्भ्याबद्दल प्रसिध्दि आहे. अगर सामळची त्याच्या 'छप्पा'बद्दल ख्याति आहे. त्याचप्रमाणे भोजाचें नांव त्याच्या 'चाबखा'बद्दल प्रसिध्द आहे. याशिवाय त्यानें इतर काव्येंहि लिहिली आहेत. पण ती संपूर्ण नाहीत. त्याचें 'सलैय्याख्यान' काव्य प्रसिध्द आहे. याशिवास त्यानें कांही होरी लिहिल्या आहेत. त्यांपैकी 'कृष्णप्रार्थना' ही होरी फार लोकप्रिय आहे. 'चाबखा' मध्यें त्यानें ढोंगी साधूवर फार टीका केला आहे. या ढोंगी बाबांचे लक्ष्य परमेश्वराकडे नसून त्याना नमस्कार करण्यास येणा-या बायकांकडे असते असे त्यानें म्हटले आहे. भोज भगताची भाषा असंस्कृत कर्णकठोर आहे तरी त्यामध्यें ओज व मनाची तळमळ द्दष्टीस पडते. त्याची भाषा फार मर्मभेदक आहे.

मनोहरस्वामीः- (१७८८-१८४५) हा जुनागड येथील रहाणारा. हा संस्कृत व पर्शियन भाषेचा पंडित होता. वैष्णव व शैव पंथांमध्ये जे वरचेवर कलह माजत असत त्यामुळे त्याचे मन विटून जाऊन त्यानें आपणास नूतन नांव सच्चिदानंद असे धारण केले. वल्लभाचार्याच्या तत्वांविरूध्द त्यानें कविता रचिल्या होत्या. मूर्तिपूजा, तीर्थाटण, इत्यादिकांचा त्याला फार तिटकारा असे. गुरूकृपेशिवाय खरें ज्ञान होणे शक्य नाही असें त्याचे मत होतें. 'द्दढ विश्वास धरीनें कोई सद्गुरू शरणे जाया तेना संशय, विपर्यय ह्मदय ग्रंथी भेदाया, मनोहर जन्ममरण भय भांगे संशस पलाया’ असे त्यानें एका कवितेंत म्हटले आहे. त्याच्या काव्याची भाषा सुसंस्कृत व जोरदार असते. तात्विक विषयावर लिहिताना त्याची भाषा गंभीर व दुर्बोध असते.

गिरिधर कवि हा गुजराथीमधील छंदोबध्द रामायणाबद्दल प्रसिध्द आहे. त्याशिवाय त्याचे इतर ग्रंथ तुळशीविवाह राजसूय यज्ञ, गोकुळलीला, राधाविरह, अश्वमेध, कृष्णलीला हे होत. गिरिधरानंतरचा कवि रणछोड याची, रामायण, राधाविरह, रणछोडजीनी गवों इत्यादी काव्यें प्रसिध्द आहेत. रणछोडजी दिवाण (१७६८-१८४१) हा कवि काठेवाडात फार प्रसिध्द आहे. हा मूळचा नागरब्राह्मण आहे. तरी पण त्याला युध्दकला चांगली अवगत होती व आपला पराक्रम त्यानें पुष्कळ ठिकाणी गाजविला होता. पुढें १८०५ त कर्नल वॉकरनें काठेवाडमधील बंडाळी मोडल्यानंतर रणछोडजीने आपला शिपाई बाणा सोडून देऊन लेखनाचा व्यवसाय पत्करला. हा अतिशय बुध्दिवान व विद्वानांचा आधार होता. उर्दू भाषेंत त्यानें 'तारीख ए सोरठ’ व रूकात ए गुणागुण' हे दोन ग्रंथ लिहिले आहेत. शिवरहस्याचें व्रजभाषते त्यानें भाषांतर केले आहे. 'शिवगीता’, 'चंडीपाथना न गर्भा’ इत्यादी त्याची गुजराथी भाषेंतील काव्यें प्रसिध्द आहेत. हरीराम कवीची सीतास्वयंवर इत्यादी काव्यें बरीच लोकप्रिय आहेत. हरिभट (१८२९) हाहि ब-यापैकी कवि होऊन गेला. त्याचें कृष्णचरित्रावरील काव्य बरें आहे. वीरविजय हा जैन यति त्याच्या बोधप्रद, कवितांबद्दल प्रसिध्द आहे. त्यानें एकदंर ३६ उपदेशपर कडवी रचिली. ती फार सुंदर आहेत.

या वर वर्णन केलेल्या कवींशिवाय या कालांत पुरूषोत्तम, मिथो, मुकुंद, दयाळ, रत्नदास, रघुनंदन, हरगोवन, रघुनाथदास, कृष्णरायंदेवसाहेब दुंगर बारोट, शांतीदास, भवानभक्त दुर्गादास, नाथास्वामी, धनविजय इत्यादी दुय्यम दर्जाचे कवी होऊन गेले. या काळांतच स्वामी नारायण पंथाची भरभराट झाली होती. या पंथाच्या अनुयायांतहि ब्रह्मानंद, मुक्तानंद, चिरकुलनंद, केशानंद, देवानंद, मुलजीभट इत्यादी कवी प्रसिध्द आहेत.

पण या काळांमध्ये पुष्कळ कवीच तेवढें निर्माण झाले असें नाही तर पुष्कळ कवयित्रीहि निर्माण झाल्या. मीराबाईप्रमाणे जरी या कवयित्रीची ख्याति नसली तरी त्या आपल्या काळी ब-याच लोकप्रिय होत्या यांत शंका नाही. दिवाणीबाई, राधाबाई, कृष्णाबाई, पुरीबाई, गौरीबाई या कवयित्री या काळांतीन मुख्य होत. दिवाळीबाईची रामचरित्रावरील कविता रसाळ व सुंदर आहे. राधाबाई हा दक्षिणी बाई असून तिनें गुजराथीतं कृष्णचरित्रांतील कित्येक प्रसंगावर कविता लिहिली आहे. कृष्णाबाईची 'कृष्णना हालरडा व 'सीताजीनी कांचळी' या कविता प्रसिध्द पुरीबाईचें सीतामंगल काव्य लोकप्रिय आहे. गौरीबाईनें जवळ जवळ ६५० पदें रचिली असून त्यांत वेदांत ओतप्रात भरलेला आढळतो.

दयाराम- गुजराथी भाषेचे जे तीन मुकुटमणी म्हणून मानले जातात त्यामध्यें नरसीमेहेता, प्रेमानंद यांच्याच बरोबर दयारामाची गणना केली जाते. या तीन कवींच्या काव्यांत गुजराथी भाषेचे परमोच्च स्वरूप द्दष्टीस पडते. अभिजात काव्याचें मेहेता. प्रेमानंद व दयाराम हे तीन प्रमुख कवी होते असे म्हणावयास हरकत नाही. दयाराम यांचे मूळचे नांव दयाशंकर असे होते. पुढे वल्लभाचार्याच्या संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर त्यानें दयाराम असें आपले नांव जाहीर केले. हा चांडोदचा राहाणारा हाता. चांडोद येथील बायकांची सौदर्याबद्दल व नखरेपणाबद्दल  फार प्रसिध्दि आहे. लहानपणी आपल्या इतर संवगड्यांसह, बायकांच्या खोड्या करण्याची दयारामाला फार खोड असे. एकदा दयारामानें एक सोनारीण बाई नर्मदेच्या घाटावरून घागर भरून घेऊन जात असतां, खडा मारून फोडली. तेव्हा या बाईच्या नव-यापासून आपलें रक्षण करून घेण्यासाठी तो चांडोर पासून एका हाकेंच्या अंतरावर असलेल्या एका खेड्यात दडून बसला. तेथे त्याची व एका साधूची भेट झाली. दयारामनें आपल्याला उपदेश देण्यास त्या गुरूला सांगितलें. पण तू तरूण आहेस असें सांगून त्याला उपदेश देण्याचें त्या साधूने नाकारलें पण पुढें काही दिवसांनी त्या साधूनें त्याला एकांतांत नेऊन कृष्णांचे प्रत्यक्ष दर्शन करविलें व तेव्हापासून दयाराम हा कृष्णभक्त बनला. पुढे काही प्रसंगानी त्याची व बडोद्याच्या राणीची ओळख झाली व त्याला दरबारकडून आमंत्रण आलें. दयाराम हा फार रंगेल असे. त्याचा पोशाख ऐटबाज असे. तो दिसण्यांत फार देखणा असल्यामुळें बायका त्याच्यावर झटकन भाळत असत. वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत, त्यानें आपला काल चैनीत घालविला. लहानपणापासून त्याची व सोनार जातीच्या बालविधवेची मैत्री होती. हा जरी ब्राह्मण होता तरी त्यानें तिला आपल्या घरी ठेवून तिचें पालन केले होतें. तिच्याशी त्याचा वाईट संबंध होता असें लोक म्हणत व तें खरेंहि होतें. तरीपण लोकाच्या निंदेची पर्वा न करता ती दोघेहि शेवटपर्यंत एकत्रच राहिली. दयारामच्या शेवटच्या दुखण्यांत तर या बाईनें त्याची अतिशय काळजीपूर्वक शुश्रुषा केली.

दयारामाची स्त्रियांच्याबरोबर अतिशय सलगी असल्यामुळें त्याच्याविषयी लोक वाईट उद्गार काढीत पण त्याचें दयारामाला कांही वाटत नसे. त्याच्या इच्छेविरूध्द बायका त्याला देवासमान मानून त्याचे पाय चोळीत व त्याची अन्य प्रकारे सेवा करीत. एका काव्यांत त्यानें आपण कृष्णाशी व्याभिचारी आहों असें म्हटलें आहेः-''दयानी प्यारी कृष्णजी कहावे, कृष्णजी प्यारी आदासी । रमुं, रमांडूं, प्रेमे पोटुं, जारी कृष्ण सूं, नहि तो उदासी। ए व्याभिचार नित्य मरीए रे, एथी भवसागर तरी ए रें.'' चाळीसाव्या वर्षोपर्यंत नेहमी तीर्थाटणें, यात्रा वगैरे करण्यांत दयारामनें आपला काळ घालविला. डाकोर येथें गोमती नदीच्या काठी तो गाणें गात असता इच्छाराम भट या गृहस्थानें तें ऐकले व दयारामावर तो प्रसन्न झाला व त्याने त्याला तूं उत्तम कवि होशील असा आशीर्वाद दिला असें म्हणतात. दयाराम हा नरसीमेहेतोचा अवतार आहे असे तो म्हणत असे. वल्लभाचार्य पंथाच्या महाराजांवर दयाराम हा नेहमी चिडत असे. या महाराजांची वाईट कृत्यें त्याच्या दृष्टीस पडल्यामुळे त्यांच्या तोंडावर त्यांची नालस्ती करण्याला तो मागेंपुढें पहात नसें. पण या महाराजांवर जरी त्याचा राग असे तरी वल्लभाचार्याच्या संप्रदायाची तत्वें त्याला पूर्णपणे मान्य होती. त्याच्या काव्यातून या वल्लभ सांप्रदायासंबधीचे चांगले उध्दर आपल्याला आढळून येतात.

दयारामाचा आवाज फार मिठ्ठा असे. त्यामुळें त्याच्या भक्तिपर गाण्यावर लोक फार खूष असत. दरवर्षी दयारामाला त्याच्या गाण्यावर दोनशें रूपयें तरी मिळत असत, पण तो उधळ्या असल्याकारणानें ते पैसा तो थोडक्याच दिवसांत खर्च करून टाकीत असे. त्याच्या मनांत आलें असतें तर त्याला सहज राजाश्रय मिळविता आला असता पण राजाच्यापुढें सुद्धा शिर नमविण्याचें त्याच्या जिवावर येत असे. कृष्णाशिवाय दुस-या कोणापुढेंहि मी डोके नमविणार नाही असें तो मोठ्या अभिमानाने म्हणत असे. दयारामाचा शिष्यवर्ग फार मोठा असे. गुजराथच्या निरनिराळ्या भागांतून सर्व दर्जाच्या लोंकामधून त्याचे शिष्य पसरले होते. अमृतराम पांड्या व दयाभाई साभेद्रा नागर हे त्याचे दोन आवडते शिष्य होते. पुढे रणछोड नांवाच्या एका १५ वर्षीय मुलाला त्यानें त्याच्या गोड आवाजावरून आपला शिष्य करून घेतले; व या शिष्याचीही गुरूजीवर अलोट भक्ति असे.

दयारामाचा काव्यसंग्रह फार मोठा आहे; पण त्यापैकी उत्कृट असें काव्य फार थोडे आहे. त्यानें कृष्णभक्तिपर जे गर्भे लिहिले ते फारच सुंदर आहेत. गुजराथीमध्यें त्यानें ४८ काव्यें व व्रजभाषेंत ४१ काव्यें लिहिली. याशिवाय गुजराथीमध्ये त्यानें ७००० पदें; व्रजभाषते १२००० पदें, मराठीत २००, पंजाबीमध्ये ४० व संस्कृतमध्यें व उर्दूमध्यें अनुक्रमे १५ व ७५ पदें रचिली. यांपैकी फार थोडी पैदें उपलब्ध आहेत. काहीच्या मतें त्याच्या ग्रंथाची संख्या फारच आहे. ही सर्व पद्यें अद्यापि एकत्र करण्यांत आलेली नाहीत. त्याचे गुजराथी ग्रंथ म्हणजे, गीतामाहात्म्य, रसिकवल्लभ, अजामिळाख्यान, वृत्त्रासुराख्यान, प्रेमरसगीता, प्रबोधनबावनी, कालज्ञानसागर, प्रश्नोत्तमालिका, श्रीकृष्णनाममाहात्ममंजरी, श्रीकृष्णनाममाहात्म्यमाधुरी, श्रीकृष्णस्तवनचंद्रिका, श्रीहरिनामवेली, श्रीगुरूदेव चंद्रिका, प्रेमप्रशंसा, शिक्षा तथा परीक्षा, भक्तिपोषण, भक्तिदृढत्व, स्तवनमाधुरी, सत्यभामाविवाह, रूक्मिणीविवाह, दशमलीला, रासपंचाध्यायी, भ्रांतिभंजन, अन्यायमर्दन, मोहमर्दन, ईश्वरनिरीक्षण, चिंताचूर्णीका, नरसिंह मेहेतानी हुंडी उखाहरण इत्यादि होत.

शतशैया या त्याच्या हिंदी ग्रंथात त्याचे संस्कृतग्रंथासंबंधीचे अगाध ज्ञान प्रगट होते. वल्लभसंप्रदायाच्या तत्वाचा त्यांनें पुरा अभ्यास केला होता हें या ग्रंथावरून दिसून येते. या ग्रंथावर स्थानें स्वतःच गुजराथी भाषेंत टीका लिहिली आहे.

त्याच्या काव्यग्रंथाचे (१) धार्मिक (२) नैतिक, (३) शृंगारिक असे तीन भाग पडतात. धार्मिक ग्रंथाची संख्या त्याच्या इतर ग्रंथापेक्षा मोठी आहे. हरिभक्ति हें या ग्र्रंथातील मुख्य तत्व आहे. हाफीज अगर रूमी या शफी पंथाच्या कवीच्या काव्यामध्यें ज्याप्रमाणें ईश्वरविषयक शुध्द प्रेमाचें स्वरूप द्दष्टीस पडतें त्याचप्रमाणे दयारामाच्या काव्यांतहि द्दष्टीस पडते. हरीशी पूर्णपणे एक होणें हे सर्व धर्मांचे सार आहे असे तो म्हणतो. 'दयारामनो अक्षरदेह' या ग्रंथात त्रिपाथी या विद्वान पंडिताने दयारामाच्या धार्मिक तत्वांचा विस्तारपूर्वक विचार केला आहे. दयारामाच्या नीतिविषयक कल्पना फारच साध्या आहेत. हरिभक्ति करणे व शुद्धाचरणानें रहाणें हा उपदेश त्यानें आपल्या काव्यांत केलेला आढळतो. ही काव्यें सुंदर विचारांनी भरलेली आहेत. ही पदे अद्यापिहि कित्येक भक्तांच्या तोंडून ऐकावयास मिळतात. (१) ''वैष्णव नथी थयो तुंरे, शीद गुमानिया घूमे हरिजन, नथी थयो तुरे;(२) फूल्यो शूं करे छेरं, भूल्यो भवकूपमां पड्यो; मनुष्य देह मोंघी रे, खोयीपणि हाथे बढय'' इत्यादि पदे फार बहारीची आहेत.

त्याच्या शृंगारिक काव्यांनी त्याचे नांव अजरामर केले आहे. त्याची शृंगारिक पदे गर्भी चालीवर आहेत. भावना गीतांप्रमाणें ही पदें चित्ताची खळबळ करून टाकणारी आहेत. 'व्रज व्हालु रे वैकुंठ नहि आलूं । मने न गमे चतुर्भुज थावुं। जे कोई प्रेम अंश अवतरे प्रेमरस तेनाउरमा ठरें;'' इत्यादि गीते फार सुंदर आहेत. शारीरिक प्रेमाची त्यानें फार स्तुति केलेली आढळते. पण त्याच्यामध्यें गूढ अर्थ भरलेला आहे असें त्याचे भक्त म्हणतात. स्त्रीरूपांत त्यानें आपल्या प्रिय देवाचीच स्तुति केली आहे. असे त्याचे भक्त सांगतात. कृष्ण व राधा यांच्या शृंगारांचे त्यानें मनोहर वर्णन केले आहे. त्याच्या शृंगारिक कविताचे मासले खालीलप्रमाणे आहेत.

''आवोनी मारे घेर माणवा होजी, राज आवोनीः मारे घेर माणवा.
प्रेमरस प्यालो पीवा ने पावा, जीवन तुरीने पलाणया होजी
पडती राते पधारजे प्रीतम कोई नथी वेठु जाणवा .''

'हे राजपुत्रा तूं माझ्याकडे ये. प्रेमरसाचा आस्वाद घेण्याकरता तूं माझ्या दाराकडे ये. मला देखील तो प्रेमरस पिऊं दे; तूं माझ्याकडे रात्रीच्या वेळी ये म्हणजे तुला कोणी ओळखूं शकणार नाही.'

''रमीशुं रातडी रे, आवनो अलवेलाजी घेर
कहे जोमातनेर गाय एक खोवाणी छे आज'
जाऊ शुं शोधवारे बांध जो पाणी पहेली पाज,
सासरीओ थकी रे मारी आवास छे एकांत
रांखीश दीवडो रे माणांशु मनमानी मौज.''

''प्रियकरा तूं माझ्या घराकडे ये, म्हणजे आम्ही रात्री प्रेमांत तल्लीन होऊं. तू तुझ्या आईला सांग की, गाय चुकली आहे व तिच्या शोधाला मी जातो व अशा रीतीने थाप मारून तू माझ्याकडे ये. माझी निजावयाची खोली अगदी एकीकडे व स्वतंत्र आहे. मी तुला मार्ग कळावा म्हणून दिवा जळत ठेवते. तूं अलास म्हणते मग मानेल तशी आपण मजा मांरू.''

अशी कित्येक शृंगारिक पदें येथें उद्धृत करतां येण्यासारखी आहेत. या पदांची भाषा शुध्द, सुंदर व मधुर आहे. पदलालित्यांच्या बाबतीत त्याचा हात धरणारा कोणी नाही. ती पदें ऐकल्याशिवाय त्यांच्यामधील गोडी कळत नाही. ही पदें ऐकताना क्षणभर तरी मन तल्लीन झाल्याशिवाय रहात नाही.

दयारामाच्या काव्यांचें परीक्षण पुष्कळांनी केले आहे. त्या सगळ्यात नवलरामनें केलेलें परीक्षण फार मार्मिक आहे. दयारामची कविता भावप्रधान व प्रेमपूर्ण असते. पण त्यांच्या काव्यांत मानवी स्वभावाचे सत्यस्वरूप रंगविले गेलेले आढळत नाही. शृंगारिकाच्या बाबतीत प्रेमानंद दयारामापेक्षा श्रेष्ठ आहे. नवलरामाच्या मतें दयाराम याची जितकी स्तुति केली जाते तितकी त्याची योग्यता नाही पण गोवर्धनराम त्रिपार्थींचे मत याच्या उलट आहे. यांच्या मतें दयारामाची भाषा फार सुंदर व परिणामकारक असून त्याचें काव्य फार श्रेष्ठ प्रतीचें आहे. कांही विद्वानानी दयारामाला हफीझच्या जोडीला तर काहीनी वायरनच्या जोडीला नेऊन बसविलें आहे. कांहीनी तर त्याची सूरदासाशी तुलना केली आहे. अभिजात वाड्ःमय लोकप्रिय करणा-या कवींमध्ये दयारामाची योग्यता फार मोठी आहे. दयारामच्या काळी अभिजात काव्याला उतरती कळा लागली होती. पण ही दुःस्थिती नाहीशी करून दयारामानें अभिजात काव्याला नरसीमेहेता व प्रेमानंदाच्या वेळेप्रमाणे लोकप्रिय करून टाकले. दुर्दैवाने दयारामाच्यानंतर ही स्थिति टिकली नाही ही गोष्ट निराळी.

एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गुजराथी काव्याला एक प्रकारचें नवील वळण लागले असे म्हणावयास हरकत नाही. एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वभागातील काव्यांवर १८ व्या शतकांमधील काव्यांच्या स्वरूपाचीच छाप पडलेली होती पण उत्तरार्धात ज्या वेळी वर्डस्वर्थ, शेले, टेनिसन इत्यादी कवींच्या काव्यांचा अभ्यास सुरू झाला त्यावेळी काव्याचें स्वरूप हळूहळू पालटू लागलें.

१९ व्या शतकाच्या उत्तरार्धामधील दोन प्रसिध्द कवी म्हणजे दलपतराम (१८१७-१८९८) व नर्मदाशंकर (१८३३-१८६६) हे होत. इंग्लिश शिक्षणामुळें हिंदू लोकांच्या आचारविचारांत हळूहळू क्रांती घडून येत चालली होती. हिंदु समाजातील व्यंगे लोकांच्या नजरेस येत चालली होती. महाराष्ट्राप्रमाणेच गुजराथेंत सामाजिक सुधारणेचें कंकण बाधणारे, समाजवीर निर्माण झाले होते. या समाजसुधारणेच्या चळवळीचा परिणाम वाड्ःमयावरहि झाल्यावाचून राहिला नाही. दलपतराव व नर्मदाशंकर या कवींनी याच विषयावर काव्यें लिहिण्यांस सुरूवात केली. दलपतराम हा धीरे धीरे सुधारणा व्हावी या मताचा होता, तर त्याच्या उलट नर्मदाशंकर हा आगरकरी बाण्याचा म्हणजे ताबडतोब सामाजिक सुधारणा झाली पाहिजे असे म्हणणारा होता. वेनचरित्र नामक आपल्या काव्याच्या दुस-या भागांत 'सज्जन सांभाळावा जी रे धीरे धीरे सुधारानी सार, लाखो कीडीभर लाडवी, आखो मेलीये तो मेरी जाय, भूको करी भभरावीये, तो ते खासी रीतथी जाय,'' अशा रीतीने धीरे धीरे समाजसुधारणा घडवून आणण्याची लोकांना दलपतराम कवीनें इशारत दिली आहे. पण उलटपक्षी नर्मदा शंकरनें ''या होम करीने पडो फतेह छे आगे'' अशा गंभीर शब्दांत एकदम समाजसुधारणा करण्याचा संदेश त्यानें लोकांना पाठविला आहे. दलपतराम हा श्रीमाळी ब्राह्मण होता त्यानें व्रज व संस्कृत भाषेचा चांगला अभ्यास केला होता. तो सद्रा येथील पोलिटिकल एजंटच्या कचेरीत दफ्तरदार होता. पुढें फोर्ब्सने आपल्याला ग्रंथ लिहिण्याच्या बाबतीत सहाय्य करण्याविषयी दलपतरामाला लिहिले. तेव्हा त्यानें आपल्या नोकरीला रामराम ठोकला व आपलें आवडतें कार्य पार पाडण्यासाठी तो फोर्ब्सच्या हाताखाली राहिला. गुजराथ व्हर्नाक्युलर सोसायटीमध्यें त्याने आपलें नांव दाखल केलें. त्या ठिकाणी काम करीत असता त्यानें पुष्कळ ठिकाणी हिंडून गुजराथी वाड्ःमय एकत्र केलें. पुढें त्याची द्दष्टि क्षीण झाल्यामुळें त्यानें ही सोसायटी सोडली व सरकारनें त्याला शेवटपर्यंत २० रूपयांचे पेन्शन दिले.

दलपतरामचा काव्यसंग्रह मोठा आहे. याशिवाय बुध्दिप्रकाश नांवाचे एक मासिक त्यानें चालविले होतें. यानें काही नाटकेंहि लिहिली आहेत. सामाजिक विषयावर त्यानें पुष्कळ काव्यें लिहिली आहेत. त्यांच्या ग्रंथांत भुतावरील निबंध, जातीवरील निबंध, लक्ष्मीनाटक, कथनसप्तशती, पुनर्विवाह; स्त्रीसंवाद, बालविवाहनिबंध, गुरूशिष्यांची परस्परकर्तव्यें, शहरसुधारणेंवरील निबंध, विजयक्षम, काव्यदोहन, हंस काव्यशतक श्रावणाख्यान, हुन्नरखाननी चढाई, यंत्रखान, मिथ्याभिमान नाटक इत्यादि ग्रंथ प्रमुख होत.

दलपतरामाच्या काव्यांत (१) आस्ते सुधारणा व्हावी या मताचा पुरस्कार (२) स्वातंत्र्यलालसा व (३) देशाभिमान हे तीन गुण दिसून येतात. सुधारणेसंबंधीचें त्याचें मत वर दिलेल्या उता-यावरून दिसून येते. स्वातंत्र्यलालसादर्शक उतारा खालीलप्रमाणे आहे. 'आ शाणी सरकारनो निर्मळ छे शुभ न्याय। पण बोल्यावीण कोईना बार नेहि बेचाय, मागे तेने तो मळे अदल रूडो इन्साफ, ए अंतरजामी नथी केप करे दरयाफ' या उतार्‍यांत सरकारशी सनदशीर रीतीनें भांडून, स्वातंत्र्य मिळविण्याचें तत्व त्यानें प्रतिपादन केले आहे. 'स्वदेशनुं सर्व प्रकार सारुं, तमे करो ते गणिनेतमांरू जरूर एमा जन धर्मा जाणो अरे स्वदेशी अभिमान आणो' या कवितेत त्याची स्वदेशभक्ति दिसून येते.

काव्यद्दष्ट्या विचार केल्यास दलपतराम हा श्रेष्ठ दर्जाचा कवी होता. असें म्हणता येत नाही. त्याच्या वर्णनांत नाविन्य अगर प्रतिभा दिसून येत नाही. त्याच्या काव्यांत आढळून येणारें सृष्टिवर्णन अगदी साधें आहे. फोर्ब्सचें गुजराथी कवीवर फार प्रेम असे. त्यामुळे दलपरामनें 'फोर्ब्सविलास' नांवाचें एक काव्य लिहिलें. हें काव्यहि अगदी सामान्य आहे. दलपतरामचें वेनचरित्रपर काव्य मात्र फार बहारीचें आहे. वेनचरित्राच्या प्रसंगानें त्यानें सामाजिक सुधारणेंवर आपले विचार प्रगट केलेले आहेत. दलपतरामची भाषा सामान्य माणसांनाहि कळण्यासारखी असतें. तो व्रज व संस्कृत भाषेंत निपुण होता. तरी त्याच्या काव्यांत संस्कृत भाषेंतील शब्द फार आढळून येतं नाहीत. त्यामुळे त्याचें काव्य सुबोध व लोकप्रिय झालें आहे. नवलरामनें त्याच्या संबंधी असे उद्गार काढले आहेत की, दलपतरामची कविता गंभीर, अर्थपूर्ण, चतुराईयुक्त व 'सभारंजनी' अशी आहे. त्याच्या काव्यांत सर्व प्रकारचे रस आढळतात. पण त्यांत अतिशयोक्ति बिलकूल दिसून येत नाही. निःपक्षपातीपणानें जगांतील व्यवहाराचें निरीक्षण करून नंतर व्यवहारातील प्रसंग वर्णन करण्याची त्याची पध्दत आहे. त्यामुळें त्याच्या काव्यांत भावनेची उत्कटता दिसून येत नाही. त्याची लेखनशैली सूक्ष्मविनोदप्रचुर, मधुर व खुसखुशीत असते. याच्या अनुयायांत बुलाखीराम, चकुभाई, रणछोड गलुराम, नन मियन हे प्रमुख होत. बुलाखीरामाचें काव्यकौस्तुभ प्रसिध्द आहे. रणछोड गलुरामचें रणछोडकाव्यसुधा हे काव्यहि ब-या प्रकारचें आहे. याशिवाय हरजीवन कुबेर कवि भवानी शंकर, दलपतराम दुर्लभराम, गणपतराम, राजाराम हे कवीहि याच्याच शिष्यवर्गोत मोडतात.

नर्मदाशंकर- हा गुजराथी लोकांचा आवडता कवि होय. याने गुजराथी गद्यंग्रंथहि पुष्कळ लिहिले. गुजराथी वाड्ःमयांत त्यानें स्थित्यंतर घडविलें. हा नागरब्राह्मण जातीचा होता. यांचे शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झालें. त्यांने इंग्लिश भाषेंतील बहुतेक कवी वाचून काढले होते. याशिवाय मराठी, हिंदी, संस्कृत इत्यादि भाषांचाहि त्यानें अभ्यास केला होता. लहानपणी तो मोठा रंगेल व चैनी असे. स्वच्छंदी आचारविचार हे काव्याला पोषक आहेत असे त्याचें मत होते. पुढें आयुष्याच्या उत्तरार्धात मात्र त्याचे मत बदललें व तो नियमितपणानें राहूं लागला. त्याचे शेवटचे दिवस दारिद्र्याशी झगडण्यांत गेले.

नर्मदा शंकरमधील मोठा गुण म्हणजे त्याचा स्वच्छंदी स्वभाव होय. परंपरागत आचारविचारप्रमाणें वागणें त्याला कधीच पसंत पडलें नाही. आपल्याविषयी त्यानें जी हकीकत लिहून ठेवली आहे तीवरून तो चैनी व गर्विष्ट मनुष्य असावा असें दिसते. बायकांच्या बाबतीतील त्याची वागणूक आक्षेपार्हच होती. उत्तरवयात मात्र नर्मदाशंकरमध्यें मोठी क्रांती घडून आली. जुनें ते सारे कुचकामाचें अशी त्याची पूर्वीची समजूत उत्तरोत्तर पालटत चालली. धर्माकडे त्याचें लक्ष हळूहळू वेधूं लागले. धर्मविचार नावांच्या त्याच्या ग्रंथात त्याचे धर्मासंबंधीचे विचार आढळून येतात.

वाड्.मयसेवा पत्करावयाचा त्यानें निश्चित केल्यापासून त्यानें संस्कृत, हिंदी, इंग्लिश भाषेंतील ग्रंथाचें सूक्ष्म अध्ययन केले. अलंकारशास्त्राचा व छंदःशास्त्राचा त्यानें चांगला अभ्यास केला. त्यानें काव्यापेक्षा गद्यग्रंथच अधिक निर्माण केले. नवलरामनें त्याचे चरित्र लिहिले असून त्यांमध्ये नर्मदाशंकरानें कोणकोणते ग्रंथ लिहिले याची साग्र माहिती त्याने दिली आहे. १८५८-१८६५ च्या दरम्यान नर्मदाशंकरानें पुष्कळच ग्रंथ लिहिले. आपल्या कवितेचे खंड जसजसे त्यानें प्रसिध्द करण्यास सुरूवात केली तसतशी त्याची लोकप्रियता शुक्लेंदूप्रमाणे वाढत चालली. १८६६ मध्यें त्यानें 'नर्मकविता' या नावांखाली आपलें काव्य प्रसिध्द केले. आपल्या काव्यांतील चमत्कृतीची लोकांना कल्पना येत नाही असें त्यानें म्हटले आहे. त्यानें स्वतःच आपल्या काव्याचें वर्गीकरण केलेले आहे व त्यांतील गुणांचे वर्णन केले आहे.

त्याच्या काव्याचें क्षेत्र फार विस्तृत आहे. सामाजिक सुधारणाविषयक निरनिराळ्या विषयांवर व धार्मिक, नैतिक, ऐतिहासिक अशा सर्व विषयांवर त्यानें काव्यें रचिली आहेत. याशिवाय अलंकारप्रवेश, रसप्रवेश, नायिकाप्रवेश, इत्यादि काव्यें त्यानें लिहिलेली आहेत. भावगीते लिहिणारा हा पहिलाच कवि होय असे म्हणावयास हरकत नाही. त्याची काव्याची कल्पना वर्डस्वर्थच्या व्याख्येप्रमाणेंच होती. ॠतवर्णन काव्यांत भावनेच्या उत्कंटतेमुळे आपोआप बाहेर पडलेल्या कविता पुष्कळ आढळून येतात.

बालविधवांची दुर्दशा अवलोकन करून त्याचे मन अतिशय कष्टी होत असे. वैधव्यचरित्रांत त्याला वाटत असलेली विधवा विषयीची चिंता उत्तम रीतीनें निदर्शनास येते. विधवाव्रेह ही कविता लिहिताना स्वतः रडल्याचें त्यानें लिहिले आहे. पण कांही काही ठिकाणी त्यानें अतिशयोक्तींचे वर्णन केले आहे. हाच दुर्गुण त्याच्या इतर काव्यांतहि आढळतो. ॠतुवर्णनपर काव्यांत अश्लील शब्दांची रेलचेल आढळते. आपल्या प्रत्येक कवितेवर त्यानें टीका लिहिलेली आहे व त्यांत तर अश्लील वाक्यांना नुसता ऊत आलेला दिसतो. लोकांच्या पापी अचरणाची पूर्ण फोड करून त्यांना नीतिमान बनविण्यासाठी आपण मुद्दाम इतक्या स्पष्ट शब्दांत टीका लिहिलेली आहे असे त्यानें म्हटले आहे. पण त्याचा इष्ट परिणाम होण्याऐवजी अनिष्टच परिणाम होण्याचा संभव आहे.

निसर्गाचे वर्णन करण्यांत मात्र त्याचा हातखंडा आहे. लहानपणापासून त्याला निसर्ग-निरीक्षणाची फार आवड होती. निसर्गामध्यें गूढतत्व भरलेलें आहे असे तो म्हणत असे. 'जेने बीजा पथरा कहे तेने कविजन हीरा लेहे, बलीहारी छे कुदरत तणी, कवि जुए छे खुबी धणी, बीजापण संस्कारी गेहू, पीए ए प्रेमामृत तेह' असें त्यानें निसर्गाचे वर्णन केलें आहे. प्रवासवर्णन नामक आपलें काव्य शुध्द शांतरसपूर्ण आहे असे त्यांने म्हटलें आहे. निसर्गवर्णनाचे कांही मासले खाली दिले आहेतः त्यावरून तें किती उत्कृष्ट साधलें आहे याची कल्पना येईल. नर्मदा नदीचें वर्णन त्याने केले आहे. ते असें-'नर्मदा शु गाढ शोभा सांजनी । हारे पवन पाणी वादळ रंगना सुसाजनी । होजीरे ॥ ...  हरि गुलाबी घेरो तेवंग आसमानने हीरे गुलाबी फुलांना पाणीनो मेदाननो। होजिरे॥

अर्थ- नर्मदे सायंकाळच्या तुझ्या शोभेचे मी किती वर्णन करू? वारा, वादळाचा रंग व पाणी, यांची शोभा यासमयी एकवटली आहे आकाशाचा रंग गुलाबी असून तुझ्या पाण्याचा रंग गुलाबाच्या फुलासारखा आहे. पर्जन्यासंबंधी वर्णन करतांना नर्मदाशंकर म्हणतो 'पर्जन्यराजाचे भाट कावळे हे पर्जन्यराजाची स्वारी आली. चूप बसा चूप बसा अशी ललकारी ठोकीत आहेत, वारा हा अगदी शांत आहे. व सर्वत्र गंभीर शांतता पसरली आहे. या देखाव्याचें यथार्थ वर्णन मी कसें करूं. ही पहा मेघराजाची स्वारी आली. वृक्षराजीनी आपलें डोकें त्याच्यापुढे लवविलें आहे. व अशा रीतीने त्याचें स्वागत केले आहे. अशा प्रकारचे सुंदर उतारे आणखीहि देता येतील.

निसर्गवर्णनापेक्षाहि ऐतिहासिक विषयीचें वर्णन करण्यात त्याचे कौशल्य अधिक नजरेस येतें. विद्या, धर्म, वहेम, देशीराज, परदेशीराज, नीति इत्यादि बाबतीत हिंदुसमाजाची अधोगति चाललेली होती. तिचें वर्णन 'हिंदुओनी पडती' काव्यातं केले आहे. त्याचप्रमाणे उत्तरेकडील व दक्षिणेकडील हिंदु राज्यामधील प्रसिध्द व्यक्तीची वर्णनेंहि त्यानें बहारीची दिली आहेत. गुजराथीमध्यें एक महाकाव्य लिहिण्याचा त्याचा विचार होता. हिंदुस्थानची स्थिती वर्णन करतांना तो म्हणतो 'हिंदु देशनो हाल थया छे थंडी आजे सत्ता मोटी खोइ नीचुं ते जोडा लाजे'. आज हिंदुस्थानची स्थिति फार वाईट झाली आहे, त्याचें पूर्व वैभव आज नष्ट झाले आहे व लज्जेने त्यानें मान खाली घातली आहे. 'पुराणमतवादीपणा, ब्राह्मणांचे वर्चस्व, देशी राजांचा अदूरदर्शीपणा जातिद्वेष इत्यादी कारणांमुळे हिंदुस्थानला वाईट दिवस प्राप्त झाले असें तो म्हणतोः-''विना देश अभियान, देश उत्कर्ष न धाये । देशी रान समसान जे हवो खावा घाये । राज समंधी ऐक्य नथी अहिना लोकोमा । जाति बंधनो खुब जनी वाघोना मोमा'' पोरसची शिकंदराविरूध्द लढाई, महंमद गझनीच्या विरूध्द भीमदेवाची लढाई पानपत येथे पृथ्वीराजानें घोरांशी केलेंल युध्द अशा प्रकारचे सहा प्रसंग त्यांने बहारीत वर्णने केले आहेत व सरतेशेवटी 'कोनुं मोढुं मे जोयुं, अंगमा रंगरमे छे उछळी उछळी लोही ऐकिया खूब करे ले अर्थ, याचा 'आज सकाळी मी  कोणाचे शुभ मुख पाहिले आहे नकळेः माझ्या नसानसातून आज अपूर्व उत्साह दाटला आहे. माझें रक्त ताज्या दमानें उसळी मारीत आहे.' असे उत्साहपूर्ण शब्द त्यानें काढले आहेत. गुजरातसंबंधीचें त्याचें राष्ट्रगीत तर आज प्रत्येकाच्या तोंडी आहे. व ते अत्यंत स्फूर्तिदायक आहे. 'जय जय गरबी गुजराथ। जय जय गरबी गुजराथ। दापे आणुं प्रभात । ध्वज प्रकाशे झळझळ कुसुंबी प्रेमशौर्य अकीता। तू भणव भणव निज संतति सडने प्रेम भक्तिनी रीत'' अशा स्फूर्तिदायक रीतीनें या गीताचा प्रारंभ झालेला आहे. सुरतेच्या प्राचीन वैभवावरील त्याची कविता अशीच स्फूर्तीने नटलेली आहे. धर्मविषयांवरील त्याची काव्येंहि भक्तिपूर्ण अशीच आहेत.

वर्डस्वर्थचे 'वुइ आर सेव्हन' ल्यूसी ग्रे' व राबर्ट सौदेचे 'लार्ड नेल्सन, ही तीन काव्यें त्यानें भाषांतरिली आहेत. याशिवाय प्रेमसंबंधी त्यानें कांही कविता लिहिण्याचाहि प्रयत्न केला. सामाजिक सुधारणेसंबंधी त्याची काव्येंहि फार बोधपर आहेत. त्याच्या प्रीतिसंबंधीच्या काव्यांत दिव्य प्रेमापेक्षा शारीरिक प्रेमासंबंधीचेंच वर्णन केलेले जास्त आढळतें.

नर्मदाशंकराच्या भाषेंत प्रसाद आढळून येत नाही दलपतरामच्या काव्यात जो स्वाभाविकपणा आढळतो तो याच्यांत आढळून येत नाही. अश्लील भाषा याच्या काव्यात पदोपदी आढळून येते. नवलरामानें त्याच्या काव्याची फार स्तुति केलेली आहे पण त्यांत अतिशयोक्ति आहे. रावबहादूर रमणाभाईनी त्याच्या काव्याविषयी हे उद्वार काढले आहेत. ते अधिक समर्पक आहेत. ते म्हणतात. ''नर्मदाशंकराची कविता भावप्रधान आहे. कांही प्रसंगी त्याची कल्पनागति अप्रतिहत आहे तर कांही ठिकाणी फारच मर्यादित आहे. त्याच्या भावनांमध्ये नाविन्याची छटा फारशी आढळत नाही.''

याशिवाय नर्मदाशंकरानें लिहिलेला नर्मकोश व नर्मकथासंग्रह हे ग्रंथ फारच महत्वाचे आहेत व त्यामुळे त्यानें आपलें नाव गुजराथी वाड्.मयात अजरामर करून ठेवलें आहे. त्यांचा कोश १८३७ मध्यें प्रसिध्द झाला.

नर्मदाशंकराच्या अनुयायांत सवितानारायण हा मुख्य होय. त्याचा 'सविताकृत कविता' हा काव्यसंग्रह ब-यापैकी आहे. पण त्याहिपेक्षा त्यानें व्रजभाषेंत ज्या कविता केल्या आहेत त्या अधिक चांगल्या आहेत. याशिवाय अलंकार चंद्रिका व नीतिसुधातरंगिणी हे त्याचे ग्रंथहि बरे आहेत. विजयाशंकर त्रिवेदी यांचे 'विजयवाणी' हें काव्य त्याच काळी प्रसिध्द पावले पण हल्ली तें मागें पडलें आहे. कवि हिराचंद कांजी हा नर्मदाशंकराच्या काळचा कवि होता. नर्मदाशंकरापेक्षा आपला दर्जा श्रेष्ठ आहे असे यांचे मत होते. त्याचें मिथ्याभिमानमतखंडन हे काव्य ब-यापैकी आहे. नर्मदाशंकराच्या काव्याचें ह्मदत कळलेंच नाही असे तो म्हणत असे व नर्मदाशंकराच्या पिंगलप्रवेश, अलंकार प्रवेश, रसप्रवेश इत्यादि ग्रंथांवर त्यानें फार टीका केली आहे. स्वतः यानें, 'गुजराथी अनेकार्थकोश, ' 'सुधरेलशास्त्र,’ 'गुजरातनी गांगई', 'भाषाभूषण', 'मानमंजरी, ' 'वैराग्यबोध, ' इत्यादि काव्यें लिहिली आहेत.

भोलानाथ सारभाई- रायबहादूर भोलानाथ सारभाई या कवींचे नाव त्याच्या भक्तिपर काव्याबद्दल फार प्रसिध्द आहे. हे प्रार्थनासमाजिष्ट होते. गुजराथमध्यें जे सगुणोपासनेंचे प्रस्थ माजलें होतें ते कमी करण्याचा व एकेश्वरी पंथाचा प्रसार करण्याचा यांनी प्रयत्न केला. यांचे ईश्वरप्रार्थनामाला हें काव्य फारच उत्कृष्ट आहे. त्यामध्ये भोलानाथांचा भोळाभाव व परमेश्वरासंबधी अनन्य भक्ति हे गुण दिसून येतात. ईश्वरप्रार्थनामालेंतील त्यांची गीते गाताना अंत:करण भक्तिमय व ताल्लिन होतें. त्यांची पदें अर्थगंभीर व रसपूर्ण असतात. त्यांच्या पदांचे एकदोन मासले पुढें दिलेले आहेत-

'दिननो दयाल छोडी कोने शरण जाऊ। मात तात जाणी प्रभुचरण प्रते धाऊ' तसेच ‘विधाता धन्य छे तारी रचना जगतनी अनंत। अतर्क्य अगोचर रूपे तमारुं।व्यापी रझा सत्ता थको भगवंत ॥' ही ईश्वरीप्रार्थनामाला गुजराथमध्यें अतिशय लोकप्रिय आहे.

कलापी (१८७४-१९००)- कलापी या टोपण नांवाखाली प्रसिध्द असलेले कवी हे काठेवाडमधील लाठी देशाचे ठाकोरसाहेब श्री सूरसिंहजी तख्तनसिंहजी गोहेल हे होत. यांचें शिक्षण राजकुमार कॉलेजमध्ये झालें. नंतर त्यांनी हिंदुस्थान व काश्मीर येथे प्रवास केला. १८९५ मध्यें ते गादीवर बसले. त्यांना १६ व्या वर्षी दोन बायका होत्या. त्यापैकी रमा ही आवडती बायको होती. हिच्या दासीजनांत एक सहासात वर्षाची दासी होती. हिनें कलापीचे मन आकर्षण करून घेत होते. हिचे शोभना असे नांव त्यांनी ठेवले होते. ही वयांत आल्यावर तिचे त्यांनी लग्न करून दिले. पण शोभनेचे आपल्या नव-यावर प्रेम नव्हते. कलापीचें तर हिच्यावर अलोट प्रेम होतें. तेव्हा प्रेमाच्या पाशांत सांपडून जनापवादाला न भिता त्यांनी तिच्याशी उघडपणे विवाह केला. या कृत्याचा फार वाईट परिणाम होणार ही गोष्ट ते जाणून होते. ह्मदयत्रिपुटी नामक आपल्या प्रणयकाव्यांत त्यांनी आपला व शोभना व रमा यांचा संबंध कशा प्रकारचा होता हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या काव्यांतील प्रेम उल्लू तरूणांच्या प्रेमाच्या स्वरूपाचें आहे.

लहानपणापासून इंग्लिश, संस्कृत, उर्दू व गुजराथी वाड्.मयाचा त्यांनी अभ्यास चालू ठेवला होता. काव्य व तत्वज्ञान यांच्याकडे त्यांचा फार ओढा असे. शेले, वर्डस्वर्थ, इमर्सन, स्वीडनबर्ग हे त्यांचे आवडते ग्रंथकार होते व त्यांच्या काव्यांत या ग्रंथकारांच्या ग्रंथातील कल्पना जागोजागी आढळतात. संस्थानातील कारस्थानाची त्यांना फार चीड असल्यामुळें ते या कारस्थानापासून नेहमी अलिप्त रहात. गोवर्धनराम त्रिपाथी, मणिलाल द्विवेदी, मणिशंकरभट यांच्यासारख्या विद्वानांशी सहवास वाढविण्यांत त्यांना नेहमी आनंद वाटे. ते या विद्वानांशी नेहमी पत्रव्यवहार करीत. मोठेपणी त्यांना संसाराचा अगदी वीट आला होता व आणखी कांही काल ते जगले असते तर त्यांनी गादीचा त्याग करून वानप्रस्थाश्रम पत्कारिला असता असें पुष्कळांचें म्हणणे आहे.

कलापीच्या प्रणयकवितांना 'प्रणयगीता' असे एका ग्रंथकारानें नांव दिले आहे. यांच्या प्रणयसंबंधी कविता, उर्दू कवींच्या गझल वृतांत रचिलेल्या आहेत व या उर्दू कवीची प्रेमगीतांची छटा यांच्या काव्यांत दिसून येते. 'कमलिनी' हें काव्य शेलेच्या 'मेघ' या कवितेच्या धर्तीवर आहे. उर्दू कवींच्या विशेषतः शफी कवीच्या कविता कलापीनें भाषांतर केल्या आहेत व त्या ब-या साधल्या आहेत. काश्मीरच्या प्रवासाच्या वर्णनपर काव्य फारच उत्कृष्ट साधलें आहे. यांचे हमीरकाव्य हे ऐतिहासिक प्रसंगावरील काव्यहि सुंदर आहे. शुद्ध गुजराथीतील कलापीचें काव्य, मिश्र गुजराथी भाषेंतील त्यांच्या कवितांपेक्षा सरस आहे. यांची प्रेमसंबंधीची कांही कडवी गुजराथी लोकांत फार लोकप्रिय झाली आहेत. यांची कीट्स कवीशी नेहमी तुलना करण्यात येते. कांही विद्वान यांची शेले कवीशीहि तुलना करताना आढळतात पण ह्मांत बरीच अतिशयोक्ति आहे. कलापींच्या गझलाप्रमाणेंच पुष्कळच गुजराथी कवींनी गझलें रचण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांत त्यांना जितकें यश यावें तितकें आलें नाही.

प्रो. मणिलाल द्विवेदी- यांनी काव्यापेक्षा गद्यवाड्मयांत आपलें नांव गाजविले. तरी पण त्याचें काव्याहि श्रेष्ठ दर्जाचे आहे. त्यांच्या कवितेंत वेदांत भरलेला आहे. आत्मनिमज्जन, अभेदोर्मि, प्रेमजीवन इत्यादि त्याच्या तत्वज्ञानात्मक कविता प्रसिध्द आहेत. याशिवाय 'कही लाखो निराशामा अमर आशा छुपाई छे' हें त्यांचे गझल फार लोकप्रिय आहे.

बलशंकर- मणिलाल द्विवेदी यांच्यापेक्षा बलशंकर यांचें काव्य अधिक सरस आहे. त्यांतल्या त्यांत त्याची गझलकाव्यें उत्कृष्ट आहेत. यानें हाफीजची कांही गझल भाषांतरे केलेली आहेत.

गोवर्धनराम त्रिपाथी- हा सुप्रसिध्द विद्वान असून त्याची काव्यापेक्षा गद्य बद्दलच अधिक प्रसिध्द आहे. त्याचें स्नेहमुद्रा हें काव्य चांगलें आहे. याशिवाय इतर पुष्कळ कविता त्यानें लिहिल्या आहेत. आपल्या गद्यकादंबर्‍यांत मधून मधून त्यानें कविता घुसडून दिली आहे व ती कविताहि फार सुंदर आहे.

देरसारी या कवीचे 'बुलबुल' नामक गझल अतिशय प्रसिध्द आहे. हरिलाल ध्रुव या कवींची, आर्योत्कर्ष, पूर्वामेघ, कौमोदिमाधव इत्यादी काव्यें लोकप्रिय आहेत. यांच्या काव्यात ज्वलद्देशाभिमान दिसून येतो. याच्या काव्यानें गुजराथी भाषेंत बरेंच वरचें स्थान पटकावलेलें आहे.

या शतकांत पारशी कवीहि पुष्कळच उदयास आले. मंचरजी शापूरजी या कवीचा कवितासंग्रह फारच मोठा आहे. शोराव आणि रूस्तुम यांच्यामधील युद्धावरील काव्य, फार सुंदर असून ते वाचले असता डोळ्यातून अश्रू न येणारा वाचक विरळाच सांपडेल. याच्या काव्यावर दलपतरामाच्या काव्याची छाप पडलेली दिसते. फरदुमजी मर्झबाजी यांचाहि काव्यसंग्रह मोठा आहे. यांनी सादीच्या गुलिस्थानचें 'फुलेस्थान पोथी' या काव्यांत भाषांतर केलेले आहे. जमशेटजी पोटेट हे विशेषतः त्यांच्या निर्यामक कवितांबद्दल प्रसिध्द आहेत. 'मोहरी मडोह तथा बीजी कविताओ' या त्याच्या काव्यसंग्रहात पुष्कळ चांगल्या कविता आढळतात. बहिरामजी मलबारी यांचें 'नीतिविनोद' हें काव्य उत्तम आहे. यांत तरुण विधवांच्या स्थितीवर, व जरठतरूणी विवाहावर पुष्कळ कविता लिहिलेल्या आढळतात. याशिवाय विल्सनविरह, अनुभविक, संसारिक इत्यादी त्यांची काव्यें फारच लोकप्रिय झाली आहेत. खबरदार या कवीची, काव्यरसिका, विलासिका, प्रकाशिका, भारतानो टंकार ही काव्यें प्रसिध्द आहेत. यानें 'गुणंवती गुजराथ' नामक एक राष्ट्रगीत लिहिलें असून तें 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताच्या तोडीचें आहे असे म्हणावयास हरकत नाही. याचें काव्य मुख्यतः भावनाप्रधान असल्याचें आढळते. शम्मनजी फरोज (१८४८-१९२०) याची कविता फार थोडी आहे पण याच्या काव्यांतील प्रत्येंक ओळीत त्याचें फारशी काव्यांवरील प्रभुत्व दिसून येते. त्याचें 'सखूनें राहत' हे काव्य प्रसिध्द आहे.

नरसिंहराव दिवेटिया यांनी गुजराथी कवितेला नवीन प्रकारचें स्वरूप प्राप्त करून दिलें म्हटलें तरी चालेल. हे गुजराथी भाषेंतील एक जाडे विद्वान होत. कुसुममाला हें त्याचें पहिले काव्य होय. यांत निरनिराळ्या विषयांवरील भावगीतांचा संग्रह आहे. या गीतांतील निसर्गवर्णन फारच बहारीचें आहे. 'ह्मदयवीणा' या कवितासंग्रहात त्याची विशाल कल्पना व ह्मदयाची तळमळ हे गुण प्रामुख्यानें दिसून येतात. यांच्या काव्यावर पाश्चिमात्य कवीची छाप फार पडली आहे. असा आक्षेप घेण्यांत येतो पण तो खरा नाही. नूपूरझंकार, स्मरणगीता ही त्याची काव्यें फारच उत्कृष्ट आहेत. रावबहादूर कांतवाला यांचे पानिपत काव्य काव्यद्दष्टया विशेष श्रेष्ठ दर्जाचे नसले तरी त्यांतील भाषा जोरदार व भारदस्त आहे. मणिशंकरभट्ट याची 'वसंत विजय' व 'चक्रवाकमिथुन' ही काव्यें विशेष प्रसिध्द आहेत.

पण हल्लीचे सर्वात उत्कृष्ट कवि म्हणजे नानालाल दलपतराम हे होत. यांचें 'जय व जयंत' हें नाटक फारच उत्कृष्ट आहे. त्यांच्या काव्यांत नवीनच तत्वें प्रतिपादन केलेली आढळतात. काव्यद्दष्टया यांची काव्यें उच्च दर्जाची आहेत. यांची भावगीते वाद्यांच्या साहाय्यानें गातां येण्यासारखी आहेत. दिल्लीदरबारच्या वेळी बादशहा येथें आलें असताना त्याच्यावर एक सुंदर स्वागतपर पद्य यांनी रचलें आहे. याशिवाय त्यांची 'ग्राम गीतें' कल्पनाप्रचुर, रसपूर्ण व प्रासादिक आहेत. यांनी भगवद्वीतेचें कविताबध्द भाषांतर केलें आहे.

नानालालशिवाय हल्ली दौलतराम पांड्या, भीमराव, जयशंकर वच, रमणबाई निलकंठ हेहि नांवाजलेले कवी आहेत. कवयित्रेमध्यें सुमतीबाई ही लल्लूभाई सामळदास यांची कन्या प्रसिध्द आहे. हिचें 'दिव्यमपणालबालक' हें काव्य फार ह्मदयस्पर्शी आहे. ही कवयित्री अधिक वर्षे जगली असती तर तिनें आपलें नाव केलें असते; पण ती तरूणपणींच मृत्युमुखी पडली. विजयालक्ष्मी हिचें 'प्रेमयाचना' नांवाचे एक काव्य आहे. यांत स्त्रियांच्या पतिव्रताधर्मावर तिनें आपले विचार प्रगट केलेले आहेत.

सारांश, दयारामानंतरच्या काळांतील काव्यसृष्टीस दलपतराम व त्याचा संप्रदाय व नर्मदाशंकर व त्यांचा संप्रदाय हे प्रमुख संप्रदाय होते. याशिवाय नरसिंहराव दिवेठिया व नानालाल या कवीनी निर्माण केलेला तिसरा संप्रदाय होय. हे तिन्ही संप्रदाय आपालल्या परीनें श्रेष्ठ असून त्यांनी गुजराथी काव्याला श्रेष्ठ प्रकारचे स्वरूप आणून दिलें आहे यांत शंका नाही.

काठेवाडमध्यें एक स्वतंत्र प्रकारचें वाड्.मय आपल्याला द्दष्टीस पडतें. तशा प्रकारचें वाड्.मय, गुजराथी वाड्.मयामध्यें आढळून येत नाही. या वाड्.मयाचें नांव दुहावाड्मय असे आहे. या दुहावाड.मयाची भाषा गुजराथीहून निराळी आहे. या वाड्.मयात तत्कालीन काठेवाडी समाजाचे प्रतिबिंब फार उत्तम तर्‍हेने द्दष्टीस पडतें. हें दुहावाड्.मय संकलित करण्याचा अद्यापि व्हावा तसा प्रयत्न झाला नाही. ही मोठ्या दुःखाची गोष्ट होय. दुहा याचा अर्थ कडवें. कडव्यामध्यें ही काव्यें लिहिली गेल्यामुळे त्यांना दुहावाड्.मय हे नांव पडले. या दुहावाड्ःमयामध्यें लिहिलेल्या काव्यांत हलामन डोथवा; उजली व मेहा, राणकदंबी, सिध्दराज, इत्यादी विषयांवर लिहिलेली काव्ये फार प्रसिध्द आहेत. ही काव्यें फार सुंदर असून ती तेजस्वी भाषेंत लिहिलेली आहेत.

गुजराथी गद्य वाड्.मय- ब्रिटिशांनी हिंदुस्थानांत शिक्षणाचा प्रसार करण्यापूर्वी गुजराथी भाषेंत गद्यवाड्ःमयाचा जवळ जवळ अभावच होता असें म्हटले तरी चालेल. गुजराथमधील शिलालेख, ताम्रपट, सनदा, गहाणखतें इत्यादीमध्यें जें काही गद्य भाग सांपडतील तेवढेच. याशिवाय नाही म्हणायला मंत्रतंत्र अगर हितोपदेश यांमधील कांही भागाचें भाषांतर झालेले द्दष्टीस पडते. बाणाची कादंबरी मूळ संस्कृतात गद्यांमध्ये असून तिचे गुजराथीमधील भाषांतरे पहावे तो कवितेमध्यें झालेले आढळते. अशी स्थिति १८५० च्या पूर्वी होती. पुढें १८५० नंतर रणछोडदास, गिरिधरभाईसारख्या कांही गुजराथी गृहस्थांनी व काही पारशी गृहस्थांनी शालोपयोगी अशी पुस्तकें लिहिण्यास सुरवात केली. अर्थातच ही पुस्तके गद्य होती. व त्यामधील भाषा अगदी सोपी असे. ही पुस्तके गुजराथी भाषेंत गद्यवाड्ःमय तयार करण्याच्या हेतूने झालेली नसून शाळेंतील विद्यार्थ्यांसाठी म्हणून ती लिहिली गेली होती. काही मिशनर्‍यांनीहि गुजराथीमध्यें बायबल वगैरे ग्रंथाचें भाषांतर केलें होतें.

गुजराथीमध्ये गद्य लिहिण्यास खरी सुरूवात नर्मदाशंकर याने केली असे म्हणण्यास हरकत नाही. नर्मदाशंकर हा ज्याप्रमाणे चांगला कवि होता, त्याचप्रमाणे तो उत्तम गद्यलेखक होता. त्यानें इतिहास, तत्वज्ञान, धर्म इत्यादि विषयांवर गद्य ग्रंथ लिहिले. त्याची भाषा साधी पण मुद्देसूद व जोरदार असे; त्याच्या भाषेंत क्लिष्ट शब्दरचना व अलंकार आढळून येत नाही. संस्कृत भाषेचा त्यानें जरी खोल अभ्यास केला होता तरी त्यानें गुजराथी गद्यांत संस्कृत शब्द न कोंबण्याची शक्य तितकी खबरदारी घेतली होती. त्याचा सर्वात प्रसिध्द ग्रंथ म्हणजे 'राज्यरंग' हा होय. हा ग्रंथ ऐतिहासिक आहे. या राज्यरंग ग्रंथात त्यानें जगांतील प्रमुख राष्ट्राचे इतिहास लिहिले आहेत. या ग्रंथात त्यानें प्राचीन ग्रीसमधील महान पुरूषांनी केलेली पराक्रमाचीं कृत्यें त्याचप्रमाणें बाबिलोनिया, ईजिप्त, रोम, ग्रीस, पर्शिया या राष्ट्रातील विभूतीची चरित्रें वर्णने केली आहेत. आपल्या इकडील राम, लक्ष्मण, संग, प्रताप इत्यादि महापुरूषांचीहि चरित्रें या ग्रंथात आलेली आहेत. या ग्रंथाची भाषा भारदस्त सोपी पण सुंदर आहे. नर्मदाशंकरनें या राज्यरंगानंतर जो धर्मविचार नांवाचा ग्रंथ लिहिला त्यामधील भाषा खोचदार, गंभीर व मर्मभेदक आहे. त्यानें आपल्या ग्रंथाला 'नर्मगद्य' असें नांव दिले आहे.

पण नर्मदाशंकरपेक्षाहि गुजराथीमधील गद्यभाषेला ओजस्वी वळण लावण्याचे श्रेय, नवलराम यांसच आहे. किंबहुना नवलरामाच्या तोडीचा खंदा गद्यलेखक अद्यापीही झाला नाही. असे ह्मणण्यास फारसा प्रत्यवाय नाही. यानें नर्मदाशंकरचें चरित्र लिहिले आहे. नर्मदाशंकर या कवीच्या चरित्रांतील भाषेमध्यें यत्किंचितहि कृत्रिमपणा आढळून येत नाही. त्याचा दुसरा ग्रंथ म्हणजे 'इंग्लिश लोकांचा इतिहास' हा होय. गुजराथी भाषते इंग्लिश लोकांचे इतिहास पुष्कळांनी लिहिले आहेत. पण त्या सर्वांत नवलरामाने लिहिलेला इतिहास उत्कृष्ट आहे.

पण नवलरामाची प्रसिद्धि त्याने केलेल्या निरनिराळ्या ग्रंथाच्या परिक्षणामुळे झालेली आहे. त्यापूर्वी गुजराथमध्यें वाड्ःमयासंबंधीचे मार्मिक परिक्षण करणारे विद्वान् नव्हते म्हटले तरी चालेल. नवलरामाच्या नंतर मणिलाल द्विवेदी, मनसूखराम त्रिपाथी, नृसिंहराव द्विबेटिया व प्रो.ध्रुव इत्यादी प्रसिध्द परीक्षणकार झाले. तथापि या सर्वांहूनहि परीक्षणाच्या बाबतीत नवलराम हा श्रेष्ठ आहे. करण घेलो, कांता इत्यादी ग्रंथाचें त्यानें केलेले परीक्षण फारच मार्मिक व मुद्देसूद आहे. इंग्लिश काव्याचा खोल अभ्यास त्यानें केलेला नव्हता. तथापि त्यानें केलेले काव्यग्रंथाचे परीक्षण नेहमी मार्मिक असे. नवलरामाची भाषा व लेखनपध्दती स्फूर्तिदायक व परिणामकारक आहे. पण ज्याप्रमाणे नर्मदाशंकर, दलपतराम व नवलराम यांची भाषा शास्त्रशुध्द व सुलभ अशी आढळून येते तशी नवलरामाच्या नंतरच्या परीक्षणकारांची आढळून येत नाही. याच्यानंतरच्या टीकाकाराची भाषा क्लिष्ट असून तीमध्ये संस्कृत शब्दाचा भरणा फार असे. त्यामुळे ही परीक्षणे खालच्या वर्गांतील लोकांना समजण्याला अवघड जाऊ लागली याचा परिणाम असा झाला की, नवलरामानंतरच्या टीकाकारांनी गुजराथी भाषेला जे बोजड वळण लावलें ते वळण पारशी लोकांना अनुसरण्यांस जड जाऊ लागले त्यामुळें साहजिकच पारशांच्या गुजराथी भाषासरणीत व या नूतन भाषासरणीत बरीच तफावत पडूं लागली. या नूतन भाषासरणीला 'हिंदूगुजराथी' व पारशांच्या भाषासरणीला 'पारशीगुजराथी' असें संबोधण्यात येऊ लागले या नवीन भाषा पध्दतीचे प्रमुख पुरस्कर्ते गोवर्धनराम त्रिपाथी, मणिलाल मनसुखराम त्रिपाथी व छगनलाल पंड्या हे होत. यांच्या भाषेंत संस्कृत शब्दांचाच अधिक भरणा आढळतो.

नवलरामानें आपल्या 'संस्कृतमय गुजराथी' या निबंधांत अशा प्रकारच्या संस्कृतप्रचुर भाषापध्दतीवर बरेच कोरडे ओढले आहेत. संस्कृतभाषेंतील शब्द मुळीच गुजराथीमध्यें येऊ नयेत असें त्याचे म्हणणे नव्हतें पण नेहमी व्यवहारात लागणा-या वस्तूंना गुजराथीत सोपा शब्द असतांना मग तो दुस-या भाषेंतून का आलेला असेना मुद्दाम संस्कृतांतील अगडबंब वापरण्याच्या तो अगदी विरूध्द असे. गुजराथीमध्यें रूढ झालेले संस्कृत शब्द वापरले असतांना देखील ज्यांची लेखनपध्दती अगदी सुलभ असते असे ग्रंथकार म्हणजे रावबहादूर भोलानाथ सारभाई हे होत.

या संस्कृतमय गुजराथी भाषासरणीविरूध्द बंड म्हणून रावबहादूर हरगोवनदास कांतवाला यांनी प्राकृत गुजराथी भाषा वापरण्यांत सुरवात केली. 'अंधेरी नगरींनो गंर्धवसेन' या कांदबरीत लिहिलेल्या प्रस्तावनेंत ग्राम्य गुजराथी भाषा वाड्.मयांत प्रचारात आणणें अत्यावश्यक आहे;  तसेच गुजराथी भाषेची श्रीमंती वाढविण्यात गुजरातमधील निरनिराळ्या प्रांतांतील रूढ झालेल्या शब्दांचा वाड्.मयांत उपयोग करण्यांत येणे जरूर आहे असें त्यांनी म्हटलेलें आहे.

रावसाहेब महीपतराम रूपराम यांची भाषा दलपतराम प्रमाणेच सुबोध व शुध्द असते. पण ती अभिजात नसते. त्यांच्या ग्रंथात सुंदर कल्पनांचा व समर्पक अलंकारांचा पूर्णपणें अभाव दिसून येतो. उत्तम ग्रंथकाराला लागणारी प्रतिभा यांच्या ग्रंथात दिसून येत नाही.

वृत्तपत्रें व गद्य वाड्.मय- वर ज्या दोन भिन्न भाषासरणींचा उल्लेख करण्यांत आलेला आहे त्याचें प्रतिबिंब गुजराथी वृत्तपत्रें व मासिके यांमध्येही द्दग्योचर होतें. मुंबईमध्ये फारशी लोकांनी जी वृत्तपत्रे व साप्ताहिके चालविलेली आहेत त्यामधील भाषापध्दती ही गुजराथी लोकांनी चालवलेल्या वृत्तपत्रातील भाषापद्धतीहून निराळ्या स्वरूपाची आहे. पहिल्या प्रकारच्या भाषापध्दतीला 'मुम्बाइगिरी गुजराथी' असें विशिष्ट नांव रूढ झाले आहे. मुम्बाइगिरी गुजराथी ही साधी व जुन्या गुजराथी भाषेच्या वळणावर असलेली आढळते. त्याच्या उलट 'हिंदगुजराथी' ही संस्कृतप्रचुर व बोजड अशा प्रकारची आहे. शिवाय इंग्लिश भाषेच्या शिक्षणाचा प्रसार झाल्यापासून एक तिसरीच भाषापध्दति प्रचारांत येऊ लागली आहे. पण अलीकडे कांही वर्षात इंग्लिश तर्‍हेने विचार करण्याची जी अनिष्ट पध्दत आढळते तिच्या विरूध्द चळवळ द्दष्टीस पडूं लागली आहे. पण इंग्लिश भाषेच्या ऐवजी गुजराथी भाषाशिक्षण माध्यम होईपावेतो वरील अनिष्ट पध्दतीत ताबाडतोब फरक करणें शक्य नाही असें वाटतें. अलीकडील ग्रंथकारांमध्ये संस्कृतप्रचुर गुजराथी भाषा लिहिण्याची जी पध्दत रूढ झालेली आहे तिला महात्मा गांधी व त्यांच्या कक्षेंत असणा-या त्यांच्या अनुयायांनी पहिला धक्का दिला असें म्हणावयास हरकत दिसत नाही. गांधीच्या साध्या, स्पष्ट व परिणामकारक भाषापध्दतीची छाप तरूण लेखकांच्या मनावर बसली. साधा विचार सुद्धा अगडबंब भाषेंत व्यक्त करण्याची पूर्वीची अनिष्ट पध्दत या नवीन लेखकांनी टाकून देण्यास सुरवात केली व गांधींच्या भाषापद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली. गांधीनी अशा प्रकारे गुजराथी भाषेला नवीन वळण लावलें म्हटले तरी चालेल. नवजीवन कार्यालयातर्फे राष्ट्रीय विषयासंबंधी बरीच पुस्तके प्रसिध्द झाली. म.गांधीच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील कामगिरीचें विवेंचन करणारी पुस्तके लिहिली गेली. गांधीचे प्रसिध्द पट्टशिष्य महादेव भाई देसाई काका कालेलकर यांनी असहकारितेच्या चळवळीत हे निरनिराळे लेख लिहिले ते एकत्र करून छापण्यांत आले आहेत.

कादंबरी वाड्.मय.- गुजराथीमध्यें कांदबरी वाड्.मय इंग्लिश शिक्षण अंमलांत आल्यानंतर निर्माण होऊ लागले. कांदबरीला गुजराथींत नवलकथा हें नाव आहे. या वाड्.मयाचा जनक नंदशंकर मूळजीशंकर हा होय. १८६८ मध्यें यांची 'करणधेली' ही ऐतिहासिक कादंबरी प्रथम प्रसिध्द झाली. तीत तत्कालीन समाजस्थितीचे वर्णन, दसरा वगैरे सण कसे पाळले जात होते याचें वर्णन, माधवाच्या राजवाड्याचें वर्णन इत्यादि वर्णने सुंदर आहेत. करणघेलो ही कादंबरी अद्यापिही लोकप्रिय आहे. गुजराथ व काठेवाड या राष्ट्रांत पुष्कळ वीर पुरुष निर्माण झालें. त्यांनी केलेली पराक्रमाची कृत्येहि स्फूर्तिदायक आहेत. या सर्व कथांचें एकीकरण करून प्रिमजी वोमनजी नावाच्या पारशी कादंबरीकारानें 'गुजराथ अने काठीवाड देशानी वार्ताओ' नावांचा एक ग्रंथ १८७५ त प्रसिध्द केला. यांतील गुजराथी भाषा शुध्द व सुबोध आहे. अशाच प्रकारचा 'गुजराथी वात्तोओ' हा ग्रंथ मणिलालभट याने लिहिला. यांत पृथ्वीराज चव्हाण, झाशीची लक्ष्मीबाई इत्यादी पुरूषांची व स्त्रियाची चरित्रे आली आहेत. रावसाहेब महिपतराव यांच्या 'वनराज चवढो' व 'सिद्धार्थ जयसिंग' या कांदब-याहि फार प्रसिध्द आहेत. यांतील भाषा उत्तम नसली तरी सुबोध आहे. अनंतप्रसाद वैष्णव यांची 'राणकदेवी' ही कादंबरीहि चांगली आहे. रावबहादूर कांतवाला याची 'अंबेरी नगरीनो गर्भवसेन, एक उटंग वार्ता' हिला कादंबरीपेक्षा कथासंग्रह हेच नांव अधिक शोभेल. यांत प्रांतिक शब्दांचा भरणा पुष्कळ असून ग्राम्य शब्दांची भरती आहे. तलेयारखान नांवाच्या पारशी ग्रंथकाराच्या रत्नलक्ष्मी व मुद्रा आणि कुलिन या कांदब-या फार लोकप्रिय आहेत. यांतील पात्रे उत्कृष्ट रंगविली गेली असून भाषाहि शुध्द व जोरदार आहे. इच्छाराम देसाई यांच्या 'गंगा' कादंबरीत शिवाजीनें केलेल्या सुरतेच्या लुटालुटीचें वर्णन आले आहे. इच्छाराम देसाई यांनी स्वतः लिहिलेल्या कादंब-यापेक्षा त्यांनी गुजराथी प्रिंटिग प्रेस काढून, आपल्या छापखान्यातर्फे कांदबरीकारांच्याकडून कांदब-या लिहून घेऊन त्या दरवर्षी आपल्या ग्राहकांना बक्षीस देण्याच्या निमित्तानें छापून काढल्या व कादंबरीकारानां उत्तेजन दिलें यामुळें त्याचें नांव कांदब-याच्या इतिहासात अजरामर राहील. त्यांच्या छापखान्यातर्फे हिंदु अने ब्रिटिनिया, दिल्लीपर हल्लो, चाणक्य नंदीनी, नूरजहान, चक्रवर्ती हमीर इत्यादी लोकप्रिय कादंब-या प्रसिध्द झाल्या आहेत. इच्छारामाचें अनुकरण अहमदाबादेच्या प्रजाबंधु व गुजराथी ऐतिहासिक भाषेतील कादंबरीवाड्.मयामध्ये पहिल्या प्रतीचा कादंबरीकार या नात्यानें ज्याला संबोधिता येईल असा कादंबरीकार कन्हयालाल मुनशी हा होय. हा प्रथम घनश्याम या टोपण नांवाखाली पुष्कळ कथा लिहित असे. त्याची 'पाटणनी प्रभुता' ही पहिली ऐतिहासिक कादंबरी प्रथम टोपणनांवाखलीच एका साप्ताहिकांत प्रसिध्द झाली. ही कादंबरी फारच लोकप्रिय झाली. लगेच ‘गुजराथनो नाथ’ ही त्याची दुसरी कादंबरीहि प्रसिध्द झाली. थोडक्याच कालानंतर वाचकांच्या आग्रहावरून ‘पृथ्वीवल्लभ’ ही तिसरी कादंबरीहि त्यानें लिहिली. याच्यापूर्वी
गोवर्धनराय त्रिफथी यांची सरस्वतीचंद्र ही कांदबरी फार लोकप्रिय होती. पण मुनशीनें आपल्या कादंब-या प्रसिध्द केल्यापासून सरस्वतीचंद्र ही कांदबरी मागें पडली. मुनशीच्या कादंबर्‍यांतील पात्रांची स्वभाववर्णनें हूबेहूब साधली असून त्यांतील कथानकाचा विकास, स्वाभाविकरीतीनें झालेला आहे. निरनिराळ्या प्रसंगांची अनुरूप वर्णनें करण्यात याचा हातखंडा आहे. त्याची भाषा जोरदार भेदक व वस्तुस्थितिनिदर्शक अशी आहे.

गोवर्धनराय त्रिपाथीची सरस्वतीचंद्र ही कादंबरी म्हणजे एक ज्ञानकोशच आहे म्हटले तरी चालेल. हिचे ४ भाग असून त्यांत राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक व तात्विक विषयांची खूप वर्णने आली आहेत. ही कादंबरी आदर्श असून ओजस्वी व प्रतिभासंपन्न आहे. गुजराथचा बंकिमचंद्र चतर्जी असें याला संबोधण्यात येते.

याशिवाय भोगींद्रलाल दिवेटिया यांच्या अलक्ष्यज्योति (१९०७), मधुकर, पद्यनाभ (१९०८), ज्योतिपुंज (१९०९), प्रियकांता इत्यादि कांदब-या, तसेंच गिरिधरलाल कोठारी यांची 'नवी प्रजा' कृष्णराव दिवेटियारचित मुकुलमर्दन, राजेंद्रलालरचित विपिन आणि मोगल संध्या, चंद्रशेखर पंड्यारचित 'पांच प्रेमकथा' या कादंब-या प्रसिध्द आहेत. गुजराथी कादंबरीवाड्.मयांत भाषांतरित कांदबर्‍यांचा भरणच अधिक आहे.

गुजराथी नाट्य वाड्.मय- गुजराथी वाड्.मयांत नाट्यवाड्.मयाची स्थिती फार शोचनीय आहे म्हटलें तरी चालेल. अलीकडे गुजराथीमध्ये जरी थोडीफार चांगली नाटके प्रसिध्द झाली आहेत. तरी त्याची संख्या अल्प आहे. एकंदर गुजराथी नाटकांतील संख्या शंभरसवाशें आहे. पण त्यांत उत्कृष्ट नाटकें हातावर मोजण्याइतकीदेखील मिळण्याची मारामारच पडेल. गुजराथी भाषेंत इतर प्रकारचें वाड्.मय उच्च दर्जाचें व नांव घेण्याजोगे निर्माण झालें असता नाटकांच्या बाबतीतच गुजराथ पाठीमागे कां असावा याची कारणे समजणे कठिण आहे. तथापि नाट्यवाड्.मयाची अशी स्थिति असणें ही मात्र लाजिरवाणी गोष्ट आहे. गुजराथी नाट्यवाड्.मयाचा आरंभ मराठी नाट्यवाड्.मयाच्या आरंभाबरोबरच झाला, असे असता मराठीत ज्याप्रमाणें नाट्यवाड्.मयात चांगली चांगली नाटके बरीच सापडतात तशी गुजराथी भाषते सापडत नाहीत. मुंबई हे गुजराथी भाषेचं एक केंद्र आहे असें मानण्यांत येतें व या ठिकाणी पुष्कळसे गुजराथी विद्वान सांपडतात. पण अशा गुजराथीच्या केंद्रस्थानी देखील मराठी नाटकमंडळ्यांच्या व मराठी नाटकांचीच चलती दिसून येते. मराठी नाटकावर महाराष्ट्रीय प्रेक्षकांच्याच उड्या पडतात असे नाही तर गुजराथी लोकांच्या झुंडीच्या झुंडी या नाटकांना जात असताना व गुजराथी नाटकांच्यापेक्षा या मराठी नाटकांचि स्तुति करंताना आढळतात. ही स्थिती मराठी नाटकमंडळ्यानी जितकी भूषणावह तितकीच गुजराथी नाटकमंडळ्यांना लाजिरवाणी आहे. असें म्हटल्याशिवाय रहावत नाही.

गुजराथी भाषेंत नाट्यवाड्.मयाची उत्पत्ति अगदी अर्वाचीन आहे. गेल्या ५० वर्षांपूर्वी गुजराथी भाषेंत या नाट्यवाड्.मयाचा पूर्ण अभाव होता असे म्हटले तरी चालेल. यापूर्वी गुजराथेत नाटकमंडळ्याची जागा भवाई, रासाधरी व मानभट हे भरून काढीत असत. महाराष्ट्रांतील हरिदास संस्थेप्रमाणें गुजराथेतं मानभटांची संस्था असे. शेक्सपीयरच्या पूर्वी जी आंग्लनाट्यवाड्.ययाची व रंगभूमीची स्थिति होती तीच गुजराथेंत एका शतकापूर्वी होती म्हटले तरी चालेल. गुजराथेंतील मानभट अगर रासधरी संस्थापेक्षाहि अधिक प्राचीन संस्था म्हणजे 'भवाई' संस्था ही होय. भवाई संस्थेच्या सदृश अशी आपल्याकडील लळिताची संस्था होय. या भवाईमध्यें अश्लीलपणाची चंगळ दिसून येते. शाक्तसंस्थेपासून ही संस्था उदयास आली असावी असा कित्येकांचा तर्क आहे. या भवाई अनेक प्रकारच्या असतात. भवाई करणा-या लोकांना भवय असे नाव आहे. हे भवय लोक, खालच्या वर्गांतील असल्याकारणानें त्यांच्या खेळात अश्लील शब्द व हावभाव याची रेलचेल असे. हे लोक गाणारे चांगले असत व त्यामुळे प्रेक्षकाची चांगली करमणूक होत असे. यांच्या खेळात रंगलो उर्फ विदूषक हा प्रमुख असे व त्यांचे मुख्य काम म्हणजे असंबध्द भाषणे करून प्रेक्षकांना पोट दुखेतों हंसविणे हे असे. अशाप्रकारें या भवयाची निकृट स्थिती होती. ही स्थिती घालवण्याकरता रावसाहेब महिपतराम यांनी फार खटपट केली.

इंग्लिश वाड्.मयाचा प्रसार गुजराथेत झाल्यापासून मात्र ही स्थिती बदलू लागली. भवाई संस्थेला उतरती कळा लागून रंगभूमी संस्था उदयास येत चालली. गुजराथेतील रंगभूमी संस्थेला चलन देण्याच्या बाबतीत दक्षिणी नाटक मंडळ्यांना अग्रपूजेचा मान दिला पहिजे. किर्लोस्कर नाटक मंडळी, सांगलीकर नाटक मंडळी, रामभाऊ नाटक मंडळी या नाटक मंडळ्यांनी गुजराथमध्यें आपली नाटके करून दाखविण्यास सुरवात केल्यापासून गुजराथी लोकांनी हे त्याचें अनुकरण करण्यास सुरवात केली; व गुजराथी लोकांचें लक्ष्य गुजराथी रंगभूमीची सुधारणा करण्याकडे वेधू लागलें. गुजराथी लोकांप्रमाणेंच पारशी लोकांनीहि गुजराथी रंगभूमि सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला. कुबरझी नाझर मंडळी, नाटक उत्तेजक मंडळी इत्यादी पारशी नाटकमंडळ्या गुजराथी खेळ करू लागल्या. कवराजीसारख्या पारशी नाटककरांनी व रणछोडभाईसारख्या गुजराथी नाटककारांनी या कंपन्यासाठी नाटकें लिहून देण्यास सुरवात केली. या कंपन्या आपलें बरचेसें खेळ उर्दूमध्ये करीत असत, कारण गुजराथी पेक्षा उर्दू भाषाच त्यांना सुलभ जात असे. थोडक्याच काळांत या पारशी कंपन्याप्रमाणेंच गुजराथी कंपन्या स्थापन झाल्या व त्यांनी गुजराथी नाटकाचे प्रयोग करून दाखविण्यास सुरवात केली. या कंपन्यामध्ये मोवी आर्य सुबोध नाटक मंडळी, देशी समाज नाटक मंडळी, बीकानेर नाटक मंडळी वगैरे कंपन्या नांवाजलेल्या आहेत. गुजराथीतील सर्वांत पहिले नाटक कवि दलपतराम यांचे लक्ष्मी नाटक (१८५१) हें होय. ऑरिस्टोफॅनीस या ग्रीक विनोदी कवीच्या 'प्लूट्स्' हे इंग्लिश भाषांतर आहें. हे गद्य नाटक आहे. गुजराथी नाट्यवाड्.मयाचा जनक ज्याला म्हणतां येईल असा नाटककार म्हणजे रणछोडभाई उदयराम हा होय. पण याला गुजराथी लोक वाड्.मयाचा पितामह असे संबोधतात. गुजराथी भवाईचा त्याला वीट आल्यामुळें त्यांने नवीन तर्‍हेची गुजराथी नाटक कंपनी स्थापून या भवाई संस्थेचा नाश करण्याचा विचार केला. खालच्या वर्गातील लोकांच्या रूचीप्रमाणे नाटक लिहिणे हे नाटककाराचे वास्तविक ध्येय नसून, खालच्या वर्गाची उन्नति करण्याचें ध्येय नाटककारानें आपल्या डोळ्यांपुढे ठेवले पाहिजे असे रणछोडभाईचें मत होते. व ते तत्व नाटकें लिहिताना त्यानें आपल्या डोळ्यांपुढे ठेवलें. त्याने एकंदर ११/१२ नाटकें लिहिली. याच्या नाटकांत, कथानकाचा सहज विकास आढळून येत नाही. विचारसौष्ठवाचा व कविकल्पनेच्या भरार्‍यांचा याच्या नाटकात बराच अभाव आहे. पण रणछोडभाईची नाटककार या नात्यानें लोकप्रियता जर कोणत्या नाटकांमुळे झाली असेल तर ती त्याच्या 'ललितादुःख' दर्शक नाटक (१८६६) या नाटकामुळेंच होय. हे नाटक शोकपर्यवसायी आहे. हिंदूसमजामध्ये वधूची संमति न घेता, व वरांच्या अंगच्या गुणाकडे लक्ष न देता, केवळ त्याच्या पैशाकडे बघून मुलगी वराच्या गळ्यांत बांधवयाची ही जी दुष्ट चाल आहे त्या चालीला अनुसरून ललिता नांवाच्या एक मुलीला एका श्रीमंत पण दुर्गुणी तरूणांच्या गळ्यात तिच्या आईबापानी अडकविली व पुढे सासरच्या जाचामुळें तिनें आत्महत्या करून घेतली असा या नाटकांतील कथानकाचा सारांश आहे. हें नाटक फार लोकप्रिय झालें व या नाटकाचा इष्ट तो परिणाम गुजराथी समाजावर झाल्याशिवाय राहिला नाही. वाड्.मयद्दष्टया या नाटकात बरेच दोष आहेत. पण नाटकांतील भाषा साधी व मनोहर आहे. रणछोडभाईला नाट्यवाड्.मयाच्या उपयुक्ततेची खात्री पटली होती व आपलें सर्व आयुष्य चांगली नाटके लिहिण्याच्या कामी त्यानें  खर्च केलें.

रणछोडभाईनंतरचे नाटककार प्रो.मणिलाल ननुभाई द्विवेदी हे होत. यांचे 'कान्ता' (१८८४) नांवाचे नाटक प्रसिध्द आहे. गुजराथी नाट्यवाड्. यामध्ये चांगल्या नाटकांची भर घालून रंगभूमीला तेजस्वी वळण देण्याचें कार्य जर कोणी केले असेल तर ते मोवी आर्य सुबोध नाटक मंडळीचे मालक व्हागजी आशाराम, देशी समाज कंपनीचे मालक दयाभाई घोळशाजी, मूळशंकर नंदराम व बॅरिस्टर विभाकर यांनी होय. व्हागजी आशाराम हे या चतुष्टयांतील पहिले नाटककार होत. यांनी मोवी आर्य सुबोध नाटक मंडळीच्याकडून आपले धार्मिक व पौराणिक खेळ रंगभूमीवर आणविले. दयाभाई घोळशाजी यांची नाटकें सामाजिक व काल्पनिक आहेत. दयाभाईनें पुष्कळ नाटके लिहिली. त्यांमध्ये पवित्रलीलावती, अश्रुमति, उमादेवडी, रामवियोग इत्यादी नाटकें महत्वाची आहेत. दयाभाईचें सर्वात उत्कृष्ट नाट्यच अश्रूमति हें होय.

मोवीं कंपनी व देशी समाज कंपनी यांच्या तोडीची तिसरी नाटक मंडळी म्हणजे वाकांनेर कंपनी ही होय. या कंपनीचे मालक त्र्यंबकलाल नांवाचे दोघे बंधू होते. हे दोघेही उत्कृष्ट प्रकारचे नट असल्याकारणानें त्यांनी उत्तम नाटके रंगभूमीवर आणून ती यशस्वी करून दाखविली. नरसीमेथा व शिवाजी ही नाटकें तर या बंधूनी आपल्या उत्कृष्ट अभिनयानें अतिशय लोकप्रिय केली.

नथूराम सुंदरजी नांवाचा एक नाटककार याच सुमारास झाला. हा शृंगारिक नाटकें लिहिण्यात तरबेज होता. त्याची कंपनी काठेवाडात फार लोकप्रिय होती. त्याच्या नाटकापैकी कुमुदचंद्र, माधवोनल व सौभाग्यसुंदरी ही नाटकें फार प्रसिध्द आहेत.

मुंबईमधील गुजराथी नाटककारांतील पहिला नाटककार म्हणजे मूळशंकर नंदराम हा होय. मूळशंकरची अतिशय प्रसिध्द अशी नाटकें म्हणजे, अजबकुमारी व जुगुलजुगारी ही होत. शांतरस व शृंगाररस रेखाटण्यांत मूळशंकराचा हातखंडा आहे. गुजराथी नाट्यवाड्ःमयाला उच्च दर्जा प्राप्त करून देण्या-या चार नाटकाकारांपैकी शेवटचे नाटककार बॅ. विभाकर होत. यांचे पहिलें नाटक ''सिद्धार्थकुमार'' हे होय. हें गुजराथी नाट्यवाड्ःमयांतील एक उत्कृष्ट प्रकारचें नाटक आहे असे म्हटलें असता वावगें होणार नाही. या नाटकाशिवाय स्नेहसरिता, सुभाषचंद्र, मधुबंसरी, मेघमालिनी अब्जोनो बंधन, हीहि विभाकरांची नाटकें फार प्रसिध्द आहेत. या निरनिराळ्या नाटकांमध्ये विभाकरांनी मानवी आयुष्याचें व समाजाच्या निरनिराळ्या चळवळीचें चित्र रेखाटले आहे. विशेषतः हल्लीच्या राजकीय व सामाजिक चळवळीचें चित्र नाटकांमधून पुढें मांडण्याचें कार्य विभाकरांशिवाय दुस-या कोणीहि केले नाही; व या दृष्टीनें यांच्या नाटकांचे विशेष महत्व आहेः गुजराथी नाट्यवाड्ःमयात विभाकरांच्या नाटकांना उच्च दर्जाचें स्थान दिलें पाहिजे.

कवि नानालाल यानें लिहिलेली जयजयन्त व इंदुकुमार ही नाटकें वाड्.मयाच्या दृष्टीनें उच्च दर्जाची आहेत. ही नाटकें रंगभूमीवर आलेली नाहीत व येण्यासाखीहि नाहीत. या नाटकांतील मुख्य गुण म्हणजे, नाटककाराची संपन्न प्रतिभा होय. नानालाल हा उत्कृष्ट कवि असल्यामुळें त्याच्या या नाटकांत काव्यकल्पनांची रेलचेल आहे.

मणिशंकर रत्नजी भट यांनी 'कांत या नावांखाली 'असलिया तुलिया' नांवाचे एक नाटक लिहिले आहे. रावसाहेब रमणभाई महिपतराम यांचे 'राईनो पर्वत' हें नाटकहि नांव घेण्याजोगे झाले आहे.

गुजराथी भाषा- गुजराथी भाषा ही पश्चिम हिंदुस्थानांतील जवळ जवळ एक कोट लोकांची भाषा आहे. हिंदी, पंजाबी, बंगाली व मराठी याच्या खालोखाल संख्येच्या दृष्टीनें गुजराथीचाच नंबर लागतो. ही भाषा केवळ हिंदूच वापरीत नसून पारशी व मुसुलमानहि ही भाषा वापरतात.

भूगोलदृष्ट्या गुजराथ व काठेवाड हे परस्परांपासून अलग असले तथापि या दोन्ही प्रदेशांतील भाषा थोड्या फार प्रांतिक भेदांखेरीज एकच आहे. अर्वाचीन गुजराथी भाषेचे दोन पोटभेद आहेत. एक कच्छी-गुजराती व दुसरी मारवाडी-गुजराती. कच्छी लोक कच्छी-गुजराथी वापरतात. व मारवाडी लोक दुसरी भाषा बोलतात. या मारवाडी-गुजराथीत व्रज भाषेंतील शब्दांचा फार भरणा आढळतो.

गुजराथी भाषा ही फार सोपी भाषा आहे. ही बोलण्याला फारसे सायास पडत नाहीत. या भाषेंत शब्दांचा भरणा पुष्कळ नाही. तथापि ती जोरदार व तेजस्वी भाषा आहे. गहन विचार व्यक्त करण्यासाठी जितके शब्द योजितात तितके शब्द या भाषेत आढळत नाहीत. त्यामुळें या भाषेला संस्कृतमधून पुष्कळच शब्द उसनें घ्यावे लागतात. गुजराथी भाषेचें व्याकरण सोपे आहे. या भाषेंत उपसर्ग, उपपदें, साहाय्यक क्रियापदे, प्रत्यय यांचा फारसा घोटाळा नाही. गुजराथी अक्षरें संस्कृत अक्षरांपासून घेतली आहेत व कांही ठिकाणी त्यांत फेरफार झालेला आहे. प्रत्येक अक्षरावर संस्कृतमध्ये अगर मराठीमध्ये जी रेघ मारण्याची पध्दत आहे तिचा गुजराथीत पूर्ण लोप झालेला आहे.

हल्लीची गुजराथी भाषा लिहिण्याची पध्दत दोन अवस्थांमधून उत्क्रांत झाली आहे. प्रथम गुजराथी भाषा देवनागरी उर्फ बालबोध लिपींतून लिहिण्यांत येत असे. पुढें प्रत्येक अक्षरावर रेघ देण्याऐवजी एकदम एक लांब रेघ मारून नंतर मग त्या रेघेखाली अक्षरें लिहावयाची मोडी पध्दत अंमलांत आली. यानंतरची अवस्था म्हणजे, अजीबाद रेघ न काढता लिहिणे ही होय.

संस्कृत भाषेपासूनच गुजराथी भाषा निघाली आहे. काहींच्या मते गुजराती भाषा ही शौरसेन भाषेपासून निघाली. पण काहीच्या मतें ती महाराष्ट्रीचा एक प्रकार आहे. पुष्कळदा तिचा ‘अपभ्रंश’ म्हणून उल्लेख करण्यांत येतो. चंदाने आपल्या 'प्राकृति लक्षण' ग्रंथात या भाषेसंबंधी नियम दिलेले आहेत. हेमचंद्राचार्यानें अपभ्रष्ट गुजराथीचा आपल्या ग्रंथात समावेश केला आहे. गुजराथी भाषेंत संस्कृत, प्राकृत इत्यादि भाषांतून बरेच शब्द आले आहेत. संस्कृतांतून जे शब्द गुजराथीत आले आहेत अशा शब्दापैकी विजोग, धीरज, करय हे उदाहरणादाखल देता येतील. प्राकृतामधून गुजराथीत जे शब्द आले त्यामध्यें हुईडु सुडो, घेलो, आप, घऊ, मेलुं इत्यादी शब्द येतात. याशिवाय पोर्तुगीज, फ्रेंच, मराठी, पारशी, अरबी इत्यादी भाषांमधून थोडेफार शब्द आलेले आहेत.

[संदर्भग्रंथ.-कृष्णलाल मोहनलाल जव्हेरी-माइल स्टोन्स इन गुजराथी लिटरेचर (गुजराथी प्रिंटीग प्रेस); 'फरदर माइलस्टोन्स इन गुजराथी लिटरेचर (ब्रिटिश इंडिया प्रेस १९००); गोवर्धनराम त्रिपाथी-क्लासिक पोएटूस ऑफ गुजराथ. दिवेटिया-गुजराथी लँग्वेज ऍंड लिटरेचर (वुइल्सन फायला लॉजिकल लेक्चार्स); साठीनां साहित्यनुं दिद्वर्शन दलपतकाव्य, नर्मगद्य, नर्मकविता; रावबहाद्दूर रमणभाई-कविता असे साहित्य; इंदूलालदेव-पेपर ऑन कलपी; गुजराथी दिवाळी इशू(१९१०)].

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .