प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे  
     
गुप्त घराणें- गुप्त घराण्यांची बरीचशी माहिती बुद्धोत्तर जग (विभाग ४ था) या विभागांत (पृ.३२०-३२५) दिलीच आहे व तेथे गुप्तकालीन हिंदुस्थानाची माहिती देणारा नकाशाहि दिला आहे. हें घराणे कुशानानंतर उदयास आलें. याचा वंश पुढे दिल्याप्रमाणें आहे. गुप्त हा मूळपुरुष त्याचा पुत्र घटोत्कच, त्याचा पहिला चंद्रगुप्त, त्याचा समुद्रगुप्त, त्याचा दुसरा चंद्रगुप्त, त्याचा कुमारगुप्त व त्याचा स्कंधगुप्त होय. या राजाचे अलाहबाद, एरण, उदयगिरी, मथुरा, गढवा, सांची, भिलसार, मानकुवर, मंदसारे, जुनागड, कहौन, इंदोर व भितारी या ठिकाणी असलेल्या शिलालेखांवरून यांची साग्र माहिती उपलब्ध झाली आहे. पहिला चंद्रगुप्त हा मगधचा राजा होता. त्याची राणी लिच्छवीवंशीय असून, तिच्या संबंधामुळे चंद्रगुप्ताची सत्ता अयोध्या मगध प्रयाग वगैरेकडे पसरली. (चवथे शतक प्रारंभ). या उपकारास जाणून चंद्रगुप्तानें आपल्या नाण्यांच्या बाबतींत लिच्छवीवंश व राणी कुमारदेवी यांचा संबंध आणला. यानें आपल्या नांवाचा शक सुरू केला (२६ फेब्रुवारी सन ३२०) होता. चंद्रगुप्त ३३० मध्यें मेल्यानंतर त्याचा पुत्र समुद्रगुप्त गादीवर आला. तत्कालीन सर्व हिंदुराजांत हा अत्यंत बलाढ्य व आदर्शभूत होता. त्यानें गंगानदीकाठचे राजे, मध्यदेशांतील राजे, कांचीचा राजा, पश्चिमेकडील राजे यांना जिंकून साम्राज्य स्थापलें; याचा दिग्विजय २१३ वर्षे चालला होता. त्यानें ही राज्यें खालसा न करिता त्यांच्या राजांना नुसतें मांडलिक बनविलें होते. नंतर त्यानें अश्वमेध करून सोन्याचें नाणें पाडिलें. याचें साम्राज्य उत्तरेस हिमालय, दक्षिणेस नर्मदा, पश्चिमेस चंबळ, पंजाब, माळवा आणि पूर्वेस कामरूप आसामपर्यंत पसरलें होते. सिंहलद्वीपच्या राजानें याच्या परवानगीनें बुध्दगयेच्या जवळ एक विहार बांधविला होता. समुद्रगुप्त हा अलौकिक कर्तबगार, विद्वान, कवी व कलामंडित होता. याच्या नाण्यांवर हातांत वीणा असलेलें याचें चित्र कोरलेले आहे. त्यावरून तो संगीतज्ञ होता हें ठरते. यानें स्वत: काव्यें व अनेक ग्रंथ रचिलें असून त्याच्या पदरी अनेक विद्वान होते; त्यांत वसुबंधु हा बौध्द पंडितहि होता. त्याच्या राणीचे नाव दत्तदेवी होते. हा केव्हा वारला ते समजत नाही; याच्या पश्चात त्याचा पुत्र दुसरा चंद्रगुप्त गादीवर आला. त्यानें आपल्यास विक्रमादित्य हें बिरूद लाविलें. त्यानें शकाच्या ताब्यातून माळवा, गुजराथ व काठेवाड स.३८८ च्या सुमारास सोडविले. त्यामुळे भडोच, सोपार व खंबायत ही बंदरें त्याच्या ताब्यांत येऊन व्यापाराची भरभराट् होऊन त्याला पुष्कळ फायदा झाला. त्याची शिस्त कडक असे. त्याला लष्करी बिरूदें स्वतःस लावण्याची फार हौस असे. सिंहाशी युध्द करीत असल्याची अगर निरनिराळ्या मर्दानी खेळांत प्रावीण्य मिळवीत असल्याची चित्रे त्यानें आपल्या नाण्यांवर कोरली आहेत. याच्या राणीचें नांव ध्रुवदेवी. समुद्रगुप्त हा प्रख्यात राजा चाळीस वर्षे राज्य करून ४१६ त मरण पावला. याच्या अमदानींत फाहिआन हा चिनी प्रवासी इकडे आला होता. त्यानें खालीलप्रमाणें देशविषयक माहिती लिहून ठेवली आहे.

मगधांतील शहरें मोठी भरभराटलेली असून लोक सुखी व श्रीमंत असत. मोफत चाललेल्या संस्था पुष्कळ असून मार्गात यात्रेकरुंच्या सोईसाठी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या होत्या. राजधानीत एक मोठे मोफत औषधालय होते. पाटलीपुत्रांत यावेळी महायान व हीनयान या दोन्ही पंथाचें मोठे विहार होते. शहरांत अशोकाच्या वेळचे राजवाडे, महाल वगैरे इमारती शाबूत होत्या. त्यांचें कौशल्ययुक्त काम पाहून फहिआन यास त्या दैवी वाटल्या. कोणाहि माणसास सर्वत्र राज्यांत वाटेल तेथे परवाना दाखविल्याशिवाय जाता येत असे. लुटालुट वगैरे अपराधास अवयवछेदनाची शिक्षा होई. देहांतशासन फार क्वचित असे. जमीनमहसूलाची पध्दत उत्तम असून सैन्य व शिबंदी यांनां नक्त पगार देत असत. राज्यांत बौध्द चालीरीती प्रचारांत असून हिंसा, मद्यमांस सेवन होत नसून गुरं ढोरे विकीत नसत. जे अस्वच्छ असून वरील नियम पाळीत नसत त्यांची वस्ती स्वतंत्र असे. अशोककालापेक्षाहि यावेळी अहिंसा जास्त प्रसृत झाली होती. मात्र जातीभेद कडक होते. लौकिकव्यवहारांत सरकार ढवळाढवळ करीत नसे. रस्तेलुटी होत नसत.

दुस-या चंद्रगुप्तानंतर पहिला कुमारगुप्त गादीवर आला. याचें बिरूद महेंद्रादित्य असून त्याच्या राणीचें नांव अनंतदेवी होते. समुद्रगुप्तानंतर पाटलीपुत्र ही राजधानी जाऊन कनोज झाली होती. कुमाराची फार माहिती आढळत नाही. यानें अश्वमेध केला व काही प्रांतहि पादात्रचंत केले होते. त्याच्यामागून स्कंधगुप्त राजा झाला. याच्या कारकीर्दीत मध्यअशियातील रानटी हूणांनी स्वा-या केल्या परंतु यानें त्यांचा पराभव केला. यांच्यानंतर या घराण्यांत बरेच राजे झाले. हाहि या घराण्यांतील प्रख्यात असा राजा होय. पुढें हें घराणे दुर्बळ झालें व त्याची छोटी छोटी अनेक संस्थानें निर्माण झाली. स्कंधगुप्तानंतर परगुप्त राजा झाला. याची नाणी उत्कृष्ट असत. त्यावर प्रकाशादित्य असें नाव आढळतें. याची राणी वत्सदेवी होय. परगुप्तानंतर त्याचा पुत्र नरसिंहबालदित्य गादीवर आला (४८५). यानें नालंदास तीनशें फुटांपेक्षा उंच असें एक विटांचें देऊळ बांधलें. हें अत्यंत सुंदर, सोन्यारत्नांनी खचित होतें असें ह्मुएनत्संग म्हणतो. यानें हूणांचा व मिहिरांचा अनेकदा पराभव केला. याच्यानंतर दुसरा कुमारगुप्त राजा झाला. याचीच चांदीची मुद्रा भीतरी येथें सापडली. हाच शेवटचा गुप्तसम्राट होय. याची राणी महादेवी नांवाची होती. याचें राज्य सर्व हिंदुस्थानभर होतें. याच्यानंतर पुष्कळ काळ गुप्तांची माहिती आढळत नाही. मात्र पुढें एकदम अकरा गुप्तराजांची माहिती मिळते. हे राजे फक्त मगध देशावरच राज्य करणारे होते. सम्राट नव्हते. या अलीकडील राजांत आदित्यसेन हा प्रख्यात राजा होता; याची राणी कोणदेवी होती. त्यानें हर्षाच्या मरणानंतर पुन्हा आपलें स्वातंत्र्य स्थापन करून अश्वमेध केला; याचा बाप माधवगुप्त होता. या शाखेंतील शेवटचा राजा जीवितगुप्त होय; हा आठव्या शतकाच्या पहिल्या भागांत राज्य करीत होता. या शतकाच्या अखेरीस बंगालच्या पालराजांनी मगध खालसा केलें.

मध्यहिंदुस्थानांत बुध्दगुप्त नांवाचा एक राजा राज्य करीत होता (४९०) परंतु त्याचा वरील गुप्तघराण्याशी काय संबंध होता तें समजत नाही. तसेंच ५१० मधील एका भानुगुप्ताचाहि उल्लेख येतो पण त्याचाहि संबंध वरील मोठ्या घराण्यांशी काय होता तें आढळत नाही.

गुप्तकाल.- या घराण्याच्या अंमलाखालच्या काळास हिंदुस्थानचें सुवर्णयुग म्हणतात. कोणी त्याला ग्रीसमधील पेरिक्लीसचा काळ संबोधितात; कोणी हिंदूंच्या पुनरूज्जीवनाचा काळ म्हणतात. या काळांत वाड्.मय, कला, शास्त्रें, वगैरेंचा अभ्युदय झाला होता. अशोकानें बौध्दधर्माचा जरी प्रसार जोरानें केला तरी हिंदु किंवा जैनधर्म हे अस्तंगत झाले नव्हते. गुप्तराजे हे सनातनधर्मी होते तरी त्यांनी बौध्द किंवा जैन धर्माचा द्वेष केला नाही. त्याच्या वेळी धार्मिक आचारविचारांना पूर्ण वाव होता; तत्तध्दर्मीयांनां या राजांनी त्रास दिला नाही किंवा त्यांच्या तीर्थक्षेत्रांचा उच्छेदहि केला नाही. सूक्ष्मपणें पाहिल्यास या (पाचव्या) शतकांत हिंदुधर्माचा पगडा बौध्द व जैनधर्मावर हळू हळू बसत चालला होता.

सनातन धर्माच्या पगड्याबरोबर संस्कृतभाषेचेंहि महत्व वाढूं लागलें. अशोकाचे दफ्तर पालीभाषेंत असे. आंध्रराजेहि प्राकृत भाषाच राजदरबारी वापरीत. मात्र गुप्तराजवटीत ही रीत बदलली. संस्कृतभाषेला राजमान्यता आली. त्यांच्या नाण्यांवरहि संस्कृत लेख कोरले गेले. त्यावेळचें वाड्.मय संस्कृतांत होऊं लागले; मृच्छकटिक (समुद्रगुप्तकाल), मुद्राराक्षस (चंद्रगुप्तकाल), वायूपुराण वगैरे वाड्.मय या काळांत झालें. कालीदास (कांहीच्या मतें), वसुबंधु हे विद्वानहि या काळांतीलच होते. गणितशास्त्र, ज्योतिष, फलज्योतिष यांचहि उगम या वेळी झाला असून प्रख्यात विद्वान आर्यभट्ट (४७६) वराहमिहिर (५०५-५८७) व ब्रह्मगुप्त (५९८) हे या वेळी चमकले. संगीतकलहि चांगलीच उदयास आली असावी (समुद्रगुप्त संगीतज्ञ होता यावरून). समुद्रगुप्ताच्या पदरी या शास्त्रांतील तज्ज्ञ बरेच असावेत. शिल्पकला, खोदकाम, चित्रकला यांचाहि या वेळी कळस झाला होता. गुप्तांच्या नंतर मुसुलमानांची स्वारी हिंदुस्थानावर आल्यामुळें व त्यांनी या सुंदर (देवळें, स्तूप, स्तंभ वगैरे) इमारतीचा उच्छेद केल्यामुळें तत्कालीन अवशेष फारच थोडे पहावयास सांपडतात.

उपलब्ध इमारतीत सर्वांत महत्वाची इमारत ललितपूर तालुक्यांतील देवगडचें दगडी देऊळ होय. हें पाचव्या शतकाच्या शेवटी बांधलें असून त्याच्या भिंतीवर गुप्तकालचे खरे कलाकौशल्य पहावयास सांपडतें. कानपूर जिल्ह्मांतील भितरीगांवचे प्रचंड विटांनी बांधलेले देऊळ (दुस-या चंद्रगुप्ताच्या वेळचें) हेंहि खोदीव कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. सारनाथ येथे पुष्कळ तत्कालीन देवळें होती. या काळी धातूंवरहि उत्कृष्ट कामें होत. प्रयाग येथील समुद्रगुप्ताचा एक लोखंडी स्तंभ (विजयलेख) पाहण्यालायख आहे. तांब्याचे उत्तम तर्‍हेचे मोठमोठे पुतळेहि यावेळी होत असत. नालंदा येथे ८० फूट उंचीचा बुद्धाचा एक पुतळा होता तो, तसेंच सुलतानगंजचा ७॥  फुटांचा बुध्द पुतळा (दुस-या चंद्रगुप्ताच्या काळचा) हल्ली बर्मिगहॅम येथे असलेला, हे या कांमातील उत्कृष्ट नमुने होत. दुसरा चंद्रगुप्त व कुमारगुप्त यांच्या वेळी ही कला उच्चतेस गेली होती. अजंठा येथील लेणी ही याच काळची असून ती अत्युत्कृष्ट कलाकुसरीची म्हणून प्रसिध्द आहेत. स्कंधगुप्ताच्या वेळी तर गिलाव्यावर सुंदर कुसरकाम होत असे.

या वेळच्या शिल्पांत एक विशेष असतो. चित्रांची ठेवण त्यांच्या शरीराचे नाजूक अवयव, हूबेहूब आकार, अंगावरील, झिरझिरीत पोशाख, त्यांतून दिसणारे आंतील भाग, मुंडण पध्दति वगैरे अनेक विशेषांवरून गुप्तकालीन मूर्ती व शिल्पकला तात्काल ओळखून काढतां येते.
गुप्तकाळामध्यें पूर्वपश्चिम यांचा संबंध जास्त प्रमाणावर झाला. या काळात दहा हिंदुस्थानी शिष्टमंडळे चीनमध्यें गेली. तसेंच बौध्द भिक्षूंची धार्मिक मंडळे इकडून चीनमध्यें व तिकडून इकडे येत जात असत. कुमारजीव नांवाचा प्रख्यात भिक्षु इकडून तिकडे गेला होता (३८३). इकडील बंदरांचा व कांबोज, सयाम वगैरे देशांतील बंदरांचा व्यापारी संबंध असे. जावामध्यें बौध्दधर्माचा प्रसार या सुमारास होत होता. अंजिठ्यामधील लेण्यांतील चित्रांवरून इराण व हिंदुस्थान यांचे दळणवळण होतें असें ठरते. तसेंच रोमच्या बादशहाकडेहि इकडून शिष्टमंडळे गेल्याचा पुरावा आढळतो (३३६, ३६१, ५६० या साली) व नाण्यांवरून या विधानाला बळकटीहि येते; दीनार हा रोमन शब्द इकडील सोन्याच्या नाण्याला लावीत असत.

मगधाचें धार्मिक महत्व गुप्ताच्या उतरत्या काळांतहि कायम होतें. चीनच्या एका बौध्दधर्मी राजानें (स.५६९) मगधांत एक भिक्षुमंडळ महायानपंथाच्या धर्मग्रंथप्राप्तीसाठी व त्यांच्या भाषांतरासाठी पाठविले होते. गुप्तराजानें त्याचा सन्मान करून परमार्थ नांवाच्या आपल्या एका भिक्षूला चीनमध्यें पाठविलें. याच सुमारास बोधिधर्म नांवाचा एक हिंदी राजपुत्र चीनमध्यें जाऊन (५२०) तिकडेच कायमचा राहिला.
गुप्तशकाबद्दल माहिती विज्ञानेतिहास (विभाग ५) यांत (पृ.११२) दिलीच आहे ती पहावी.

[संदर्भग्रंथ-स्मिथ-अर्लि हिस्टरी ऑफ इंडिया; भांडारकर कॉमेमोरेशन व्हॉल्युम; इंडियन ऍंटिक्वरी, पु. १५, १७; फ्लीट-गुप्त इंस्क्रिप्शन्स; एफिग्राफिआ इंडिका. पु.१०; हिंदु बुध्दिस्ट मॉन्युमेन्ट्स रिपोर्ट १९१५; डॉ.भांडारकर-नोट ऑन दि गुप्त इरा; बॉम्बे ग्याझे पु.१. भा.२; मावेल डफ; बील-जर्नल रा.ए.सो.पु. १३]

   

खंड १२ : खते - ग्वेर्नसे  

  खतें

  खत्तर

  खत्री

  खत्री, बाबू कार्तिक प्रसाद
  खनिखोदनशास्त्र
  खनिजविज्ञान
  खनियाधान
  खन्ना
  खन्सा
  खंबायत
  खंभलाव
  खंभाल
  खंभालिय
  खमटी डोंगर
  खम्ममेट्ट
  खर
  खर प्रांत
  खरकपूर
  खरगपूर
  खरगा
  खरगोण
  खरतरगच्छ
  खरबूज
  खरर
  खरसावान
  खरार
  खरे, वासुदेव वामन शास्त्री
  खरोष्ट्र
  खरोष्ठ ॠषि
  खर्जी
  खर्डी
  खर्डे
  खलीफ
  खलील इब्न अहमद
  खलीलाबाद
  खवास
  खसखस
  खळ
  खाकी
  खागा
  खाच्रोड
  खाटिक
  खाडववन
  खांडवा
  खांडिया
  खादिजा
  खांदेरी 
  खान
  खानखानान
  खानगड
  खानगा डोग्रान
  खानगी
  खान जहान
  खान जहान कोकलताश
  खान जहान लोदी
  खान झादा
  खानदेश जिल्हा
  खानपूर
  खानाकुल
  खानापूर
  खानापूरकर विनायक पांडुरंग
  खानुआ
  खानेसुमारी
  खापा
  खामगांव
  खायबर
  खारगवान
  खार पाडणें
  खारल
  खारवा
  खाराघोडा
  खारान
  खारिया
  खार्टुम
  खालपा
  खालसा
  खालसादिवाण
  खाल्डिया
  खाल्डून
  खासगीवाले
  खासपूर
  खासी
  खासी आणि जैंटिया डोंगर
  खिचिंग
  खिजदिया
  खिप्रो
  खिरणी-रायण
  खिरपई
  खिरा
  खिलचीपूर
  खिलजी
  खिलजी घराणें
  खिलात
  खिळिगिला
  खीवा
  खुइखदान संस्थान
  खुझदार
  खुटगांव
  खुंटी
  खुतबा
  खुताहन
  खुदागंज
  खुदियन
  खुरासणी
  खुरिया
  खुर्जा
  खुर्दा
  खुर्दादभाई
  खुलदाबाद
  खुलना
  खुशतर
  खुशाब
  खुश्रुशेट मोदी
  खुश्रू अमीर
  खुश्रू सुलतान
  खेक्रा
  खेज्री
  खेड
  खेड ब्रह्म
  खेडा
  खेतूर
  खेत्री
  खेमकरन
  खेम सावंत
  खेराली
  खेरालु
  खेरावाड
  खेरी
  खेळ
  खेळोजी भोंसले
  खैर
  खैरपूर, तहशील
  खैरपूर शहर
  खैरपूर संस्थान
  खैरवार
  खैरागड
  खैरागली
  खैराबाद
  खैरी
  खैरीमूरत
  खैरुद्दिन
  खोकंद
  खोखार
  खोखो
  खोजा
  खोत
  खों जात
  खोंडमाल्स
  खोंडमीर
  खोत
  खोतान
  खोनोम
  खोम्माण
  खोरेमाबाद
  खोलापूर
  खोलेश्वर
  खोल्म
  खोवई
  ख्रिश्चिआना
  ख्रिस्त येशू
  ख्रिस्तीशक
  ख्रैस्त्य
 
  गख्खर
  गंग घराणें
  गंगटोक
  गंगपूर
  गंगवाडी
  गंगा
  गंगा कालवा
  गगाखेर
  गंगाझरी
  गंगाधर
  गंगाधर कवि
  गंगाधरशास्त्री पटवर्धन
  गंगाधर सरस्वती
  गंगापूर
  गंगालूर
  गंगावती
  गंगाव पेटा
  गंगावन
  गंगासागर
  गंगै कोन्डपुरम्
  गंगोत्री
  गंगोह
  गजकर्ण
  गजपती
  गजपतीनगरम्
  गजबाहु
  गंजम, जिल्हा
  गजेंद्रगड
  गझनी
  गझनी घराणें
  गटापर्चा
  गंडकी मोठी
  गडचिरोळी
  गंडमाळा व अपची
  गडवाल
  गडशंकर
  गडहिंग्लज
  गंडा
  गंडिकोट
  गडिया पहाड
  गढमुक्तेश्वर
  गढवाल जिल्हा
  गढाकोटा
  गढी इक्तीआरखान
  गढी यासीन
  गढीवाल
  गढेमंडळ
  गणदेवी
  गणपत कृष्णाजी
  गणपति नागराज
  गणपति राजे
  गणसत्ताक राज्य
  गणितशास्त्र
  गणेश किंवा गणपति
  गणेशचतुर्थी
  गणेश दैवज्ञ
  गणेशपुराण
  गणेश वेदांती
  गणोजी शिर्के
  गंतूर
  गदग
  गदरिया
  गदाधरपंत प्रतिनिधी
  गदी
  गद्दी
  गंधक
  गंधका
  गंधकाम्ल
  गंधकिलाम्ल
  गंधकिसल (सल्फोनल)
  गंधमादन
  गंधमाळी
  गंधर्व
  गंधर्वगड किल्ला
  गधाड
  गधाली
  गधिया
  गधुला
  गंधोल
  गँबिया
  गँबिया नदी
  गॅम्बेटा, लीऑन
  गमाजी मुतालिक
  गय
  गया जिल्हा
  गरमल
  गरमली
  गरमूर
  गरवा
  गॅरिक, डेव्हिड
  गॅरिबाल्डि, गियुसेपे
  गरुड
  गरुडपक्षी
  गरुडपुराण
  गरुडस्तंभ
  गॅरेट्ट
  गरोठ
  गरोडा
  गरौथा
  गरौली
  गर्ग
  गर्गोव्हिआ
  गर्दभील
  गर्भधारण
  गर्भविज्ञान
  गर्भाधान संस्कार
  गऱ्हा
  गऱ्हार्ट
  गलगनाथ
  गलगली
  गलग्रंथिदाह
  गॅलॉट्झ
  गॅलिपोली
  गॅलिली
  गॅलिलीओ गॅलिली
  गॅलिलीचा उपसागर
  गॅलिशिया
  गॅले
  गॅलेशिया
  गल्ल
  गॅल्वे
  गवंडी
  गवत
  गवती चहा
  गवररा
  गवळी
  गवा
  गवार
  गव्हला
  गहरवार घराणें
  गहाणाचा कायदा
  गहूं
  गहोइ
  गळिताचीं धान्यें
  गळूं (विद्रधि)
  गाई व म्हशी
  गागाभट्ट व त्याचें घराणें
  गांगेयदेव
  गाग्रा
  गाग्रौन
  गाजर
  गांजा व भांग
  गाजीउद्दीनखान
  गाजीउद्दीन हैदर
  गाझा
  गाझिआबाद
  गाझीपूर
  गाझीपूर तहशील
  गॉटिंजेन
  गाडरवाडा
  गाणपत्य
  गात्रसंकोचन
  गात्रोपघात
  गॉथ लोक
  गॉथिक वाङ्मय
  गांधार देश
  गांधारी
  गाधि
  गानिगा
  गाबत
  गाबती
  गाम वक्कल
  गायकवाड
  गायत्री
  गार पगारी
  गारफील्ड जेम्स अब्रॅम
  गारिसपूर
  गारुडी
  गारुलिया
  गारो टेंकड्या
  गारोडी
  गार्गी
  गार्डा
  गार्डिनर, सॅम्युएल रासन
  गॉल
  गालगुंड
  गालव
  गालापागास बेटें
  गालिचे
  गावड
  गाविलगड
  गाळणा
  गिगासारण
  गिधिया
  गिधौर
  गिनी
  गिबन एडवर्ड
  गिब्ज
  गिब्स जोसिआ विलिअर्ड
  गिरनार
  गिरसप्पा
  गिरसप्पा धबधबा
  गिरिधर राजा बहादुर
  गिरिधर रामदासी
  गिरिया
  गिरिव्रज
  गिरिष्क
  गिरीदीह
  गिलगांव जमीनदारी
  गिलजित
  गिलबर्ड विल्यम
  गीझो
  गीता
  गुइमे
  गुगेरा
  गुग्गुळाचे झाड
  गुंज
  गुजर
  गुजरखान
  गुजराणवाला, जिल्हा
  गुजराथ
  गुजराथ प्रांत
  गुजराथी वाड्.मय
  गुंजीकर, रामचंद्र भिकाजी
  गुंटकल
  गुडघेमोडीचा ताप (डेंग्यु)
  गुंडलुपेठ
  गुंडा
  गुडियात्तम तालुका
  गुडीवाडा
  गुडूर
  गुणवंत गड
  गुणाढय
  गुणि
  गुणुपुर
  गुणे, पांडुरंग दामोदर
  गुत्त
  गुत्तल
  गुत्ती (गुटी)
  गुंथली
  गुंदिआली
  गुना
  गुन्नौर
  गुप्त घराणें
  गुब्बी
  गुमला पोटविभाग
  गुमसूर तालुका
  गुरखा
  गुरगांव
  गुरमतकाल
  गुरव
  गुरु (ग्रह)
  गुरु
  गुरुकुल
  गुरुंग जात
  गुरुगोविंद
  गुरुत्वाकर्षण
  गुरुदासपूर
  गुरुहा
  गुर्दा
  गुर्रमकोंडा
  गुलछबू
  गुलतुरा
  गुलबाशी
  गुलबुर्गा
  गुलाब
  गुलामकादर
  गुलामगिरी
  गुलाम घराणें
  गुलाल
  गुलावथी
  गुल्म
  गुस्टाव्हस तिसरा
  गुह
  गुहिलोट
  गुळदगुड
  गुळवेल
  गूटी
  गूदलूर
  गूळ
  गृहस्थाश्रम
  गृह्यसूत्रें
  गेज्जीहळ्ळी
  गेडी
  गेबर
  गेरु-माटरगांव
  गेल्झॅक जोसेफ लुई
  गेवरई
  गेवर्धा जमीनदारी
  गेस्लर हेन्रिश
  गेळ
  गैबीनाथ
  गोएटे
  गोकर्ण
  गोकर्णी
  गोकाक
  गोकुळ
  गोकुळ जाट
  गोकुळाष्टमी
  गोखरु
  गोखले, गोपाळ कृष्ण
  गोखले घराणें
  गोखले, बापू
  गोखले रास्ते
  गोगलगाय
  गोगुंडा
  गोग्रा
  गोघा
  गोचीड
  गोझो
  गोंड
  गोंड-उमरी
  गोंड-गोवारी
  गोडबोले, कृष्णशास्त्री
  गोडबोले, परशुरामतात्या
  गोंडल संस्थान
  गोंडा
  गोंडार
  गोत्रें
  गोथा
  गोंद
  गोंदणे
  गोदावरी जिल्हा
  गोदावरी नदी
  गोंधळी
  गोध्रा
  गोप
  गोपथ ब्राह्मण
  गोपालगंज
  गोपालपूर
  गोपिकाबाई पेशवें
  गोंपिचेट्टिपालैयम
  गोपीचंद
  गोपीनाथ दीक्षित ओक
  गोपीनाथपंत बोकील
  गोमंतक
  गोमती
  गोमल घाट
  गोमाटी
  गोमेद (अगेट)
  गोरखचिंच
  गोरखनाथ
  गोरखपुर
  गोरखमठी
  गोरक्षण
  गोराकुंभार
  गोराडू
  गोराण
  गोरी बिदनूर
  गोरी
  गोर्डियम
  गोलपाडा
  गोलमापक
  गोला
  गोलाघाट
  गोलुंदो
  गोलेर
  गोल्ड कोस्ट
  गोल्ड-स्टकर, प्रोफेसर
  गोल्डस्मिथ ऑलिव्हर
  गोंवर
  गोवर्धन
  गोवर्धन-गंगापूर
  गोवर्धन गिरी
  गोवर्धन पर्वत
  गोवर्धन ब्राम्हण
  गोवर्धनाचार्य
  गोंवळकोंडा
  गोविंद कवि
  गोविंदगड
  गोविंद ठक्कुर
  गोविंदपंत बुंदेले
  गोविंदपुर
  गोविंदराव काळे
  गोवें
  गोशीर्ष
  गोसावी
  गोसावीनंदन
  गोहद
  गोहान
  गोहिलवाड
  गोळकोंडा
  गोळिहळ्ळी
  गोळे, महादेव शिवराम
  गौड(गौर)
  गौडपादाचार्य
  गौड ब्राह्मण
  गौतम
  गौतमधर्मसूत्र
  गौतमपुरा
  गौरा-बऱ्हाज
  गौरी
  गौरीपूर
  गौरीशंकर उदयाशंकर
  गौरीशंकर पर्वत
  गौरीहार
  गौहत्ता
  ग्मेलिन
  ग्यासबेग
  ग्योबिंगाक
  ग्रँट डफ
  ग्रँट, रॉबर्ट
  ग्रंथप्रकाशनाचा मालकी हक्क
  ग्रंथिरोग
  ग्रॅफाइट
  ग्रह
  ग्रहण
  ग्रहविप्र (गणक)
  ग्रॉडनो
  ग्रानाइट
  ग्राहाभ
  ग्रीन जॉन रिचर्ड
  ग्रीन थॉमस हिल
  ग्रीन रॉबर्ट
  ग्रीनलंड
  ग्रीस
  ग्रुव्ह, सर विल्यम् राबर्ट
  ग्रे, इलिशा
  ग्रे कॅनॉल
  ग्रेटनाग्रीन
  ग्रेटब्रिटन
  ग्रे थॉमस
  ग्रेनाडा
  ग्रेनाडाईन्स
  ग्रोट जॉर्ज
  ग्लॅडस्टन जॉन हॉल
  ग्लॅडस्टन विल्यम इवर्ट
  ग्लॅसर
  ग्लाबर
  ग्लासगो
  ग्लिसरिन
  ग्लूस्टर
  ग्वा
  ग्वाटेमाला
  ग्वाडलक्विव्हर नदी
  ग्वाडा
  ग्वाडेलोपी
  ग्वादर
  ग्वाम
  ग्वायना
  ग्वायना बॅकोआ
  ग्वाल्हेर
  ग्विडो
  ग्वोच्चिआर्डीनी फ्रान्सिस्को
  ग्वीलोटीन किंवा गीलोटीन
  ग्वेनेव्हीअर
  ग्वेरिक, आटोव्हान
  ग्वेर्नसे
   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .