प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

ज्वर - शरीराचें नेहमीचें उष्णतामान ९७.५- ९८.४ यांच्या दरम्यान असतें. त्याच्यावर उष्णतामान गेल्यास ज्वर आला असें म्हणतात. तो आला असतांना शरीरांतील बहुतेक क्रिया बिघडतात व शरीरांत एक अगर अनेक विर्षें फिरत असतात व तींच रोगोत्पत्तीस कारण असतात.

ज्व रा चे श री रा व र प रि णा म.- शरीरांत ज्वरामुळें खालील प्रकार होतात.

त्वचा:- ही हातास अंमळ किंवा अति कढत लागते. कधीं अगदी रुक्ष तर कधीं फारच घामानें थबथबलेली असते. अति घामानें घामोळ्यांचा पुरळ उठतो. देवी, गोंवर, कांजिण्या अशा सांथीच्या तापांतील पुरळ अगर फोडांशिवाय इतर फरक त्वचेंत एरवीच्या तापांत होत नाहींत. वरील तापांत त्या त्या विषामुळें त्वचेखालीं लाल डागहि दिसतात.

अन्नमार्गः- जिभेस पांढरी बुरशी येते. ती प्रथम ओली असते पण मागून तिला कोरड पडते. बुरशी कांहीं काळानें सोलली जाते व खालील भाग तांबडा लाल दिसतो. नंतर जीभ फारच कोरडी होऊन कठिण व पिंगट दुर्गंधियुक्त बुरशीनें भरलेली दिसते. तिला भेगा पडून त्यांत अन्न, लाळ, तसेंच गालफडांतील अन्नाचें व गालांतील श्लेष्मल त्वचेचें कीट बसलेलें असतें. हिरड्यावर दुर्गंधिमय कीट जमतें. भूक नाहींशी होते. बद्धकोष्ट होतो. प्लीहा कधीं कमी तर कधीं फार वाढते.

रुधिराभिसरणक्रिया:- हृदय प्रथम जोरानें चालतें व शेवटी थकूं लागतें. तसेंच नाडीचा वेग दर  मिनिटास ८०-१२० होतो. नाडी पूर्ण भरलेली, जोराची व टणक अशी चालते. पुढें ती हातास मऊ व कंपित अशी लागते. अति मोठ्या ज्वरांत ती अति कंपित अशी हातास लागते. तापाच्या शेवटीं नाडीचा वेग आणखी वाढून ती अशक्त होते, व हातास बारीक सुतासारखी लागते. हृदयाचा प्रथमध्वनि नीटसा अगर मुळींच ऐकूं येत नाहीं. हृदयनाडी स्तनाच्या बाहेर दिसू लागते. हें भीतिप्रद लक्षण हृद्याची दुर्बलता दर्शवितें.

श्वसनक्रिया:- ज्यामानानें ज्वर असेल त्यामानानें श्वासाचें प्रमाण वाढतें, व दर मिनिटास केवळ ज्वरामुळें तें ३०-४० पर्यंत वाढतें. ताप दीर्घकालीन असल्यास फुफ्फुसाच्या अधोभागीं रक्ताधिक्य होऊन छाचीच्या वरील भागांत श्वसनक्रिया जलद चालते.

मूत्रपिंडः- त्वचा आणि फुफ्फुस या मार्गानें बरेंच बाष्पीभवन झाल्यामुळें व धमन्यांतील रक्ताभिसरण कमी झाल्यामुळें लघवी कमी होते, व ती लाल रंगाची व थंड झाल्यावर युरेटक्षाराचे विटकरी रंगाचें कीट असलेली अशी असते. लघवींतील क्लोराईड क्षार कमी होतात. तींत अल्ब्यूमिन असतें.

मज्जातंतू व मेंदु:- बहुधां मस्तकशूळ असतो कांहींहि मानसिक श्रम करणें अथवा कसलाहि विचार करणें रोगाच्यानें होत नाहीं. डोक्यांत जडपणा व सुस्ती येते. पुढें गुंगी येते व विचार करणें केवळ अशक्य होतें. झोंप लागली कीं बरळण्यास प्रारंभ होतो. नंतर जागा असतांनाहि वातामुळें रोगी बडबडतो. वातामुळें रोगी आपल्याशींच पुटपुटतो. पण एखादा रोगी फार मस्ती करून वेड्याप्रमाणें धावून खिडकीवाटें उडीहि मारतो. शेवटच्या स्थितींत झांपड अतिशय येते. त्यावेळीं रोगी आरंभी चिरगुटें चिवडतो किंवा हवेंत कोणा काल्पनिक व्यक्तीस हातांनी धरतो. शरीरांतील सर्व स्नायूंत परमावधीची ग्लानि असल्यामुळें जीभ व हातापायांस कंप सुटतो. गुरुद्वार शिथिल होऊन त्यावाटें नकळत मलविसर्जन होतें. इंद्रियांतील स्पर्शज्ञान नष्ट झाल्यामुळें लघवी कोंडते व मूत्राशय फुगतो.

रोजचा चढ उतारः- बहुधां पहाटे २ वाजतां ताप कमी असतो व संध्याकाळीं ४-६ पर्यंत जास्ती असतो. पण याच्या उलट किंवा दरम्यानचा प्रकारहि असूं शकतो.

ज्वराचे प्रकार:- ज्वराचे मुख्य भेद तीन आहेत. (१) सततज्वर:- यांत नेहमींच्या स्वाभाविक उष्णतेपेक्षां ताप अधिक असतो; ज्वर निघत नाहीं पण सकाळच्या व संध्याकाळच्या उष्णतामानांतला फरक १० किंवा १.५० पेक्षां अधिक नसतो. (२) या प्रकारांतहि ताप स्वाभाविक उष्णतामानापर्यंत उतरत नाहींच. परंतु सकाळच्या आणि संध्याकाळच्या तापामध्यें १० अगर १.५० डिग्रीपेक्षां अधिक फरक असतो. (३) या प्रकारच्या तापांत सकाळीं ताप स्वाभाविक उष्णतामानापर्यंत अगर त्याच्या खालींहि उतरतो, पण संध्याकाळीं चढतो. विषमज्वर, कफक्षय इत्यादि कांहीं दुखण्यांत वरील सर्व प्रकारचे ताप रोगाच्या निरनिराळ्या स्थितींत पाहण्यांत येतात.

ज्वराचा क्रम.- ज्वर आला असतां तो निघेपर्यंत त्यास आरंभ, मध्यावस्थी व शेवट ह्या तीन स्थिती असतात. आरंभी कमी अगर जास्ती थंडी वाजते. दुसर्‍या स्थितीमध्यें रोग्याचें सर्वांग फार तापते व तिसर्‍या अवस्थेंत ताप जलदीनें (१२-३६ तासांत) अगर सावकाश उतरत जातो तो ९६० ते ९७० पर्यंतहि उतरतो.

ज्व रां त मृ त्यू.- (१) मृत्यू तापानंतर थोड्या दिवसांनीं तापाच्या कडक विषामुळें (प्लेग, इन्फुएंझा इ.) येतो. हें विष शरीरांतील मज्जास्थानें दूषित करतें व त्यामुळें सर्व शरीराचे व्यापार थांबतात. (२) अगर ताप बरेच दिवस टिकून नंतर मृत्यू येतो. (३) मृत्यु येण्याचें ज्वराशिवाय हेंहि कारण तापामध्यें असतें. (४) दुसरीं कारणें- हृद्यक्रिया मंद होऊन तें थांबणें अथवा फुफ्फुसे बिघडून त्यांची क्रिया चालेनाशी होणें.

सां थी च्या ता पा ची का र णें.- त्या त्या रोगांचे जंतू शरीरांत प्रवेश करून त्यापासून उत्पन्न होणारीं विषें रक्तांत व शरीरांत भिनून ज्वर उत्पन्न करितात. यांपैकीं कांहीं ताप अगदीं थोड्या मुदतीचे तर कांहीं लांब मुदतीचे असतात.

चि कि त्सा.- तापाचें कारण असेल त्याप्रमाणें उपचार करावयाचे असतात. पण साधारणतः पुढें लिहिल्याप्रमाणें व्यवस्था ठेवावी. रोग्यास अंथरुणांत निजवून त्यास पूर्णपणें विश्रांति मिळेल असें करावें त्या ठिकाणीं हवा कोंदत नसावी. खोलींतील आरसे, चित्रें व इतर अडगळ काढून टाकावी. रोग्यास वात झाला असतां या जिनसा एखादे वेळीं घोंटाळा उत्पन्न करतात. त्यावर अनुभवशीर परिचारिकांकडून दिवसा रात्रीं सक्त नजर असावी. रोग्यास अति निर्मळ ठेविलें पाहिजे. ताप फार असेल तर अंगांत फार कपडे घालू नयेत. त्यास आरामशीर, थंड वाटेल अशी योजना राखावी. अशाने त्याचा ताप थोडा कमी होतो. रोग्याचे हातपाय झांकलेले असावे व जरूर तर शेकून त्यांस ऊब आणावी.

खाण्यास हलके, पचणारे व पौष्टिक पदार्थ- त्यांत दूध अति उत्तम द्यावें. मोठ्या माणसांस २ पासून ३ शेर अगर अधिक दूध लागल्यास तें दिवसां -रात्रीं देत असावें. मांसकषाय हेहि पदार्थ मधून मधून दिल्यास चालतात. दूध पचत नसलें तर त्यांत सोडावाटर किंवा बारलीचा कषाय घालून द्यावें. खाणें थोडें व थोडथोड्या अवकाशांनीं द्यावें, म्हणजे चहाचा अर्धा पेला दूध दर दोन तासांनीं व ते दिवसां रात्री द्यावे. तहानेसाठीं सोडावाटर, बारीकषाय, लेमोनेड किवा अगदीं थोंडे चहाची पूड टाकून केलेला चहा द्यावा व तो थंड द्यावा. हे पदार्थं लागतील तर वरचेवर पिण्यास कांहीं हरकत नाहीं. डोकें दुखत असेल तर डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवणें चांगलें.

तोंडामध्यें बुरशी, कीट वगैरे सांचल्यानें मागाहून कर्ण ग्रंथिदाह (गालगुंड) होण्याचा संभव असतो. म्हणून प्रत्येक खाण्यानंतर तोंड चुळा भरून टाकून स्वच्छ करावावें. ताप अति वाढला असतां पोटांतील इंद्रियांचें स्पर्शज्ञान कमी होतें. तेव्हां लघवी कोंडली आहे कीं का याजकडें चांगले लक्ष असावें. चाकर मंडळी नुसती लघवी होत आहे असें सांगतात येवढ्यावरून लघवी तुंबली नसेल असें म्हणतां येत नाहीं. ती कोंडल्याचें लक्षण ओटीपोटावर फुगवटी व बोटाच्या अग्रांनीं ठोकलें असतां बद्द आवाज हीं लक्षणें दिसतांच मूत्रशलाका चालवून मूत्र काढलें पाहिजे, रोग्यास स्वतः लघवी करण्याची शक्ति येईपर्यंत रोज दोनदां लघवी काढीत जावी.

औषधयोजना:- ताप कमी करणारीं विलायती अगर देशी औषदें देत असतांना ताप आपोआप निघण्याकडे त्याची आपोआप स्वाभाविक प्रवृत्ति असतें हें सतत ध्यानांत ठेवून औषध द्यावें. औषधानें कित्येक डिग्री ताप कमी केला तरी त्याची विषबाधा जोवर संपत नाहीं तोपर्यंत तो पुन्हां वाढणारच. जर ताप फार चढला तर वस्तुतः जिवास धोका फार थोड्या रोग्यास असतो. मात्र कृत्रिमकेतेनें कडक औषधें देऊन ताप काढल्यानें वास्तविक त्याची तीव्रता व चढउताराचा क्रम अजमावण्याचें साधन उरत नाहीं. आतां हीं औषधें अगदीं देऊं नये असें नाहीं. तीं दिल्यानें रोग्याचे हाल कमी होऊन त्यास ताप सह्य होतो व पोट, छाती, मस्तक यांतील महत्त्वाच्या इंद्रियांत दोष व दुष्परिमाम होण्याचा सभव कमी असतो, हे त्यापासून फायदे असतात. यांपैकीं कांहीं औषधें सौम्य असतात व तींच बहुतकरून योजावीं; व तीं डॉक्टर यांनींच होतां होईल तोपर्यंत योजावींत. पुढील औषधें त्वरित ज्वरघ्न असून तीं पूर्ण माहितगारांवांचून कोणी देऊं नयेत. क्वीनाईन २०-३० ग्रे. स्यालिरीन, स्यालिसिलक अ‍ॅसिड (३० ग्रेन व २० ग्रेन), फेनाझोन १५ ग्रेन, अँटिफेबिन २-५ ग्रेन, पनासिटीन ५-१० ग्रेन यांपैकीं कांहीं औषधें तारतम्याशिवाय दिली तर हृदय अशक्त होऊन हातपाय गार पडून रोग्यास घाम सुटून रोगी निश्चेष्ट पडतो. थंड पाण्याच्या योगानें ज्वर कमी करण्याचा उपाय चांगला आहे व त्यापासून धोकाहि नसतो. पण तो अमलांत आणतांना रोग्यास बराच त्रास होतो. हा उपयोग पुढील तर्‍हेनें करण्यांत येतो.

(१) जलस्नान:- याचा विषमज्वरांत उपयोग करतात. ताप दर तीन तासांनीं पहात असून तो १०२ च्या वर गेला म्हणजे रोग्यास ७० डिग्री उष्णतामान असलेल्या पाण्यांत (म्हणजे थंड पाण्यांत) ठेवावयाचें. पाण्याची उष्णता थर्मामिटरनें पहावी. रोग्यास पाण्यांत १०-१५ मिनिटें ठेवून कोरडें अंग करून बिछान्यावर निववावयाचें, म्हणते ताप ९९० अगर ९८० पर्यंत उतरतो. यांत कांहीं फेरफार करणें फायदेशीर आहेत ते असें:- १०३-५० ताप असेल तरच त्यास पाण्यांत ठेवावें व पाण्याची उष्णता ६००-९०० ठेवण्यास हरकत नाहीं. म्हणजे रोग्यास हलण्याचा त्रास फार पडत नाहीं.

(२) ओलें फडकें गुंडाळणें:- वरीलप्रमाणें ताप चढला असतां एक पलंगपोस पाण्यांत भिजवून (त्या पाण्यांत बर्फ टाकलेले असावे) ते पिळल्यावर रोग्याभोंवतीं १०-१५ मिनिटेंपर्यंत गुंडाळून ठेवावें.

(३) ओला बोळा अंगास चोळणें:- कपडे काढून थंडा बर्फ घालून थंड केलेल्या पाण्यांत फडकें भिजवून त्या बोळ्यानें सर्वांग १०-१५ मिनिटपर्यंत चोळावें. हा उपाय वरील दोहोंपेक्षां अंमल कमी गुणावह आहे व १०-१.५० ताप त्यापासून उतरतो.

(४) रबरी पिशवींत बर्फ घालून ती पिशवी मस्तक अगर पोट किंवा छातीच्या ठिकाणीं ठेवतात व कांहीं वेळानें ताप कमी होतो. उत्तेजक औषधें:- तापामध्यें अशी केव्हां तरी वेळ येते कीं तेव्हां मज्जास्थानें व हृदयक्रिया क्षीण होऊन थकतात व कृत्रिम उत्तेजन देणें जरूर पडतें. ताप दोषी असल्यामुळें त्या विषापासून हीं इंद्रियें क्षीण होतात. निव्वळ साध्या तापापासून असा धोका उत्पन्न होत नाहीं. धोका उत्पन्न झाल्याचीं चिन्हें:- जलद अशक्त चालणारी नाडीं, हृदयाचा पहिला ध्वनी बरोबर ऐंकू न येणें, हृदयाची अनियमित क्रिया व फुफ्फुसाच्या मार्ग रक्ताधिक्य होणें, जिभेस व अंगांस कंप सुटणें, झोंप न लागणें व वात होणें. साधा उत्तेजक उपाय म्हणजे ६ ते ८ औंस ब्रांडी अहोरात्र मिळून देणें. ब्रांडीचें प्रमाण फार देऊं नये. ती देऊं लागल्यापासून नाडींत सुधारणा होते किंवा नाहीं हें नीट पहावे. कारण विनाकारण ती अधिक दिल्यास पुन्हां नाडी अशक्त व जलद चालते व पुन्हां आपल्याशीं रोगी वातामुळें बडबडूं लागतो व मूळ या लक्षणासाठीं ब्रंडी देण्यास सुरुवात केलेली असते तेंच पुन्हां उलटतें. अलीकडे ब्रांडीचा उत्तेजनासाठीं उपयोग कमी करीत जावा असें मत प्रचारांत येऊन स्ट्रिकनिया (२ ते ५ मिनिम लायकर स्ट्रिनियाचे) टोंचणें हा उपाय अधिक पसंत ठरला आहे. किंवा क्याफीन सोडीयो सालीसिलेट अगर क्याफीन व सोडियम बेनझवेट (टोंचून घालणें) अगर तिळाच्या तेलांत कापूर विरवून शेंकडा १०-२० ग्रेन प्रमाणांत तें टोंचणें; एड्रीनालीन किंवा डिजिटालिस (पोटांत देणें अगर टोचणें) हीं औषधें अधिकाधिक प्रचारांत येऊं लागलीं आहेत; व ब्रांडी देण्याचा प्रघात कमी होत चालला आहे. दिलीच तर अहोरात्र मिळून प्रथम मोठ्या माणसास ४ औंसच द्यावी व जरूर तर वर दिलेल्या मोठ्या प्रमाणापर्यंत वाढवीत जावी. अतिवृद्ध माणसें, अशक्त रोगी व अति लहान मुलें यांनां मात्र ब्रांडीचें उत्तेजन ज्वरांत व इतर अवघड दुखण्यांत लागतेंच व त्यांनां ती देण्यास कचरूं नये. वरील अन्य उत्तेजक औषधाचें प्रमाण पुन्हां टोंचण्याच्या वेळीं अगर पोटांत देण्याच्या वेळीं त्याचा नाडी व हृदय यावर झालेला परिणाम पाहून नवीन प्रमाण कमी अगर जास्ती करावें. ज्या रोग्यांनां वेड लागल्यासारखा वात झाला असेल त्यांनां ब्रांडीचें उत्तेजन देण्याच्याऐवजीं वरीलपैकीं एखादें औषध टोंचून उत्तेजन देणें श्रेयस्कर असतें.

आ यु र्वे दी य वि वे च न.

हा रोग वेदकालापासूनचा आहे. ज्याला अथर्ववेदांत तक्मन् म्हटलें आहे व ज्याकरितां पांच सूक्तें खर्चिली आहेत तो ज्वररोगच असावा. त्याचें लक्षण तिसर्‍या विभागांत दिलें आहे (बुद्धपूर्वजग पृ. २८४-८५ पहा.) ताप हा रोग फार सामान्य आहे. हा सर्व प्राण्यांस होणारा रोग आह. हस्त्यायुर्वेदांत हत्तींनां व शालिहोत्रांत घोड्यांनांहि हा रोग कसा होतो याचीं लक्षणें व उपचार हीं वर्णन केलीं आहेत. मनुष्यांस हा रोग नेहमीं होणारा आहे. सुदैवानें जन्मल्यांनंतर एखाद्या मनुष्यास कोणत्याहि कारणानें येणारा ताप जरी आला नाहीं तरी त्यास उपजण्याच्या श्रमानें येणारा ताप अनुभवावाच लागतो. म्हणूनच सर्व रोगांत “ताप” हाच प्रधान रोग मानला आहे. कोणत्याहि कुपथ्यसेवनानें थंड अगर उष्ण हवेंत फिरल्यानें, सांथ उत्पन्न झाल्यानें, ॠतु बदलल्यानें, तसेंच क्षय, पंडु, इत्यादि रोगांमुळें ताप येतो.

याचें शरीरांतील कारण (संप्राप्ति) असें आहे कीं, सर्व प्रकारच्या बाह्य कारणांनीं वात, पित्त किंवा कफ यांपैकीं एक, दोन किंवा तीनहि दोष दुष्ट होऊन आमाशयांत येतात आणि तेथील आमाशीं मिसळून अग्नि मंद करितात, नंतर अग्नीची अग्निस्थानांतील उष्णता व ते दोष सर्व शरीरांत आमाला घेऊन पसरतात; त्यावेळीं शरीराचें उष्णतामान वाढतें व अंग दुखतें. शरीरांत पसरलेल्या आमयुक्त दोषांनीं घाम येण्याचीं छिद्रें बंद होतात. यामुळें घामहि येत नाहीं म्हणून तापाची मुख्य तीन लक्षणें आहेत. शरीराचे उष्णतामान वाढणें, अंग दुखणें आणि घाम न येणें. तापाची वरील तीन लक्षणें हीं जरी मुख्य आहेत तथापि कांहीं प्रकारच्या तापांत घर्माभाव हें मुख्य लक्षण मानीत नाहींत. कारण त्यांत पहिल्यापासूनच घाम असतो. तापाचीं पूर्व चिन्हें खालीं लिहिल्याप्रमाणें आहेत. थकल्यासारखें वाटणें, अस्वस्थचित्तता, वर्ण बदलणें, तोंड बेचव असणं, डोळे पाण्यानें भरून येणें, जांभया येणें, अंग दुखणें, जडपणा वाटणें, रोमांच उभे राहाणें, अरुचि, अंधेर्‍या येणें, हर्ष नसणें, थंडी वाजणें, थंड, वारा, ऊन, पाणी, छाया, शब्द या ठिकाणीं कारणांशिवाय प्रीति किंवा द्वेष होणें, पुष्कळ झोप येणें, गोड खाण्याचा वीट व आंबट, खारट, तिखट यांची आवड होणें, लहान मुलांची आवड नसणें, तहान जास्त वाटणें. या पूर्वचिन्हांपैकीं कोणतीं तरी चिन्हें ताप येण्याच्या अगोदर होतात.

आर्यवैद्यकांत ताप आठ प्रकारचा सांगितला आहे. वात, पित्त, कफ, वातपित्तात्मक, कफपित्तातमक, कफवात्मक, संन्निपातजन्य आणि आगंतुक. वर लिहिल्याप्रमाणें आठ प्रकारच्या तापांचीं पूर्वरूपेंहि दोषभेदानें कमीजास्त असतात. वातिक तापाच्या पूर्वरूपांत जांभया फार असतात. पित्तज्वराच्या पूर्वरूपांत डोळ्यांची आग जास्त होते व कफानें येणार्‍या तापाच्या पूर्वरूपांत अन्नद्वेष जास्त असतो. दोन दोषांनीं अथवा त्रिदोषांनीं येणार्‍या तापांत वर लिहिलेलीं मिश्रपूर्व लक्षणें असतात. याप्रमाणें पूर्व चिन्हांवरून पुढें होणारा रोग कोणता आहे व त्याचा जोर कितपत आहे हें समजतें. पूर्वचिन्हांच्या कमीजास्त प्रमाणावरून व सौम्य, उग्र स्वरूपावरून रोगाचा जोर समजतो. वर सांगितल्याप्रमाणें आठ प्रकारच्या तापांपैकीं वातानें येणार्‍या तापांचीं लक्षणें खालीं लिहिल्याप्रमाणें- कंप असणें, घसा, व ओठ सुकणें, झोंप नसणें, शिंका न येणें, अंग रूक्ष होणें, अंग दुखणें विशेषेंकरून डोकें व हृदय हीं दुखणें, तोंड बेचव असणें, मळ घट्ट होणें, पोट फुगणें व पोट दुखणें, इ. तापाचा जोर, ताप येण्याची व जाण्याची वेळ आणि तापांत असणार्‍या वेदना या सर्वांचा वातिक ज्वरांत अनियमितपणा असतो. तसेंच शरीराचें उष्णतामानहि अनियमितपणानें कमीजास्त होते. पाय बधिर होतात. पोटर्‍या वळतात, सांधे निखळल्यासारखे वाटतात, मांड्या गळल्यासारखें वाटतें, पाठ ठेंचल्यासारखी, पोट पिळवटतेसें वाटतें, सर्व हाडें- विशेषेंकरून बगरगड्या-तोडल्यासारख्या वाटतात, खांदे घुसळल्यासारखे वाटतात, खातांना हनुवटी अशक्त होणें, कानांत आवाज होणें, शंख ठणकणें, तोंड तुरट होणें, शौचाला न होणें, त्वचा, तोंड, डोळे, नखें, लघवी व मळ हीं अरुणवर्ण असणें, तोंडाला पाणी सुटणें. अरोचक, अपचन, घाम न येणें, कोरड्या ओकार्‍या व कोरडा खोकला, खिन्नपणा, दांत शिवशिवणें, भोंवळ बडबडणें, उष्णपदार्थाची इच्छा होणें, अंगाला आळोखे पिळोखे द्यावेसें वाटणें, हीं सर्व किंवा यांपैकीं कांहीं चिन्हें वातजन्य तापांत होतात.

ताप जोरानें भरणें, सर्व अंगांत एकदम ताप येणें, शौचास पातळ होणें, झोंप कमी असणें, पित्ताच्या ओकार्‍या, घसा, ओंठ, तोंड व नाक पिकणें, घाम येणें, बडबडणें, तोंड कडू असणे, बेशुद्धि, दाह, उन्मत्तता, अतिशय तहान, भोंवळ, चित्ताची अस्वस्थता, थुंकींतून रक्त येणें, घशाशीं आंबट येणें, अंगावर लाल गांधी येणें, श्वासोच्छवास दुर्गंधी असणें, हीं पित्ताने आलेल्या तापाचीं लक्षणें आहेत. कफानें आलेल्या तापाची पुढीलप्रमाणें लक्षणें असतात.

ताप सावकाश भरतो, व उष्णतेचें मानहि कमी असतें, अंग जड वाटतें, अरुचि येतें, तोंडाला पाणी सुटतें, तोंड गोड होतों, हृदयावर लेप बसल्यासारखें वाटतें, दमा, पडसें, उम्हासें सुटतात, ओकारी, खोकला, अंगास जडपणा, डोळे, त्वचा, नखें, लघवी व मळ यांस पांढरेपणा, डोळ्यांवर झांपड, अंगावर पुरळ उठतो, आळस, कांही खाऊं नयेसें वाटणें, झोंप जास्त असणें. या लक्षणांवरून कफज्वर समजावा.

वात आणि पित्त या दोन दोषांनीं आलेल्या ज्वरांत वरील निरनिराळ्या दोषांचींच लक्षणें मिसळून होतात व कांहीं दोन दोन दोषांच्या मिश्र लक्षणांहून निराळीं लक्षणें होतात. म्हणून त्या द्विदोषजन्य तापाचींहि लक्षणें सांगितलीं आहेत तीं खालीं लिहिल्याप्रमाणें- वातपित्तात्मक तापांत डोकें दुखणें, अरुचि, बेशुद्धि, ओकारी, दाह, विचाराशक्ति, घसा व तोंड सुकणें, अस्वस्थचित्तता, सांधे दुखणें, झोंप नसणें, तहान, भोंवळ, रोमांच उभे राहणें, जांभया, बडबडणें हीं लक्षणें होतात. कफवातात्मक तापांत उष्णतामान फार वाढत नाहीं, अरुचित सांधे व डोकें दुखणें, पडसें, दमा, खोकला, मळ साफ न होणें, थंडी वाजणें, जडपणा, अंधेर्‍या येणें (डोळ्यांपुढें), भोंवळ, डोळ्यांवर झांपड, संताप हीं लक्षणें होतात. कफपित्तानें आलेल्या तापांत थंडी वाजणें, व उकडणें (दाह) हीं वरचेवर होतात, घाम वरचेवर येतो व बंद होतो, तहान लागते, खोकला, कफ व पित्त यांची ओकारी, विचाराची अशक्ति, डोळ्यांवर झांपड, तोंड कडू व लपेटलेलें, याप्रमाणें लक्षणें होतात. वर लिहिलेल्या द्विदोषजन्य ज्वरांपैकीं वातपित्तात्मक ज्वरांत अरुचि व रोमांच उभे राहणें, वातकफजन्य ज्वरांत संताप, कफपित्तजन्य तापांत थंडी वाजणें व दाह यांचा अव्यवस्थितपणा, हीं लक्षणें द्विदोषजन्यच आहेत (निरनिराळ्या दोषांच्या मित्रलक्षणांहून हीं भिन्न आहेत). त्रिदोषजन्य म्हणजे सान्निपातिक ज्वरांत वर लिहिलेल्या प्रत्येक दोषजन्य तापाचीं लक्षणें होतात विशेषेंकरून खालीं लिहिलेलीं लक्षणें दृष्टीस पडतात.

रोग्यास वरच्यावर थंडी व दाह वाटतात, दिवसां पुष्कळ झोंप व रात्रीं जागरण होतें किंवा सर्वकाळ झोंप अथवा सर्व काळ जागण होतें व घाम अतिशय येतो किंवा मुळींच येत नाहीं. रोगी गाणें, नाचणें, हसणें इत्यादि निरनिराळे चाळे करतो; डोळे लाल असून त्यांतून पुष्कळ पाणी गळतें, किंवा पाण्यानें भरून येतात. डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या रहातात, बुपुळें वांकडीं होतात. पोटर्‍या, बरगड्या व सांधे आणि हाडें हीं दुखतात. भोंवळ येते, कान, ठणकतात व त्यांत आवाज होतात. घशाला कुसें टोंचल्यासारखें वाटतें, जीभ भोंवतालीं जळल्यासारखी व खरखरीत आणि जड असते, अंग व सांधे गळल्यासारखे वाटतात; रक्त पित्त किंवा कफ यांच्या गुळण्या येतात. रोगी डोकें हालवतो, डोकें अतिशय दुखतें. काळ्या किंवा लाल गाधी अंगावर उठतात; हृदयांत पीडा होते; मळाचा अवरोध होतो, किंवा अगदीं थोडा मळ होतो; शक्ति कमी होते, तोंड बुळबुळीत होतें, आवाज बसतो, बडबड असते, झांपड, घशांत सारखा आवाज, दोषांचा पाक मंदगतीनें होणें, ही लक्षणें संन्निपातानें येणार्‍या तापाचीं होत. यासच “अभिन्यासज्वर” म्हणतात. एक किंवा दोन दोषांच्या आधिकारानें संन्निपातज्वराचे तेरा प्रकार चरकांत वर्णिले आहेत त्यांचीं लक्षणें वर लिहिलेल्या लक्षणांपैकींच असल्यामुळें येथें देत नाहीं.

आगंतुक ज्वर चार प्रकारचा आहे. (१) शस्त्र, दगड, लाकूड इत्यादि पदार्थांच्या आघातानें किंवा जखमेमुळें भाजणें इत्यादि कारणांनीं येणारा त्यास “अभिघातज” म्हणतात. (२) दुष्टग्रहांचा आपल्या शरीराशीं संबंध आल्यामुळें, तीक्ष्ण औषधांच्या वासानें, विषारानें, क्रोध, भय, काम व लोक इत्यादि मानसिक कारणांनीं जो ताप येतो त्यास “अभिषंग” ज्वर म्हणतात. यांपैकीं दुष्टग्रहानें आलेल्या तापांत रोगी एकदम हंसतो, अथवा रडतो. तीक्ष्ण औषधांच्या वासानें आलेल्या तापांत बेशुद्धि, डोकें दुखणें, कंप व शिंका येणें हीं लक्षणें असतात. विषारानें आलेल्या तापांत बेशुद्धि, अतिसार तोंड काळसर होणें, दाह व हृद्यांत पीडा हीं लक्षणें असतात. क्रोधजन्य ज्वरांत कंप, डोकें दुखणें हीं लक्षणें, भय व शोकजन्य ज्वरांत बडबडणें हीं लक्षणें होतात. कामज्वरांत भोंवळ, अरुचि, दाह होतो व लज्जा, धैर्य, बुद्धि व झोंप हीं नाहींशी होतात.

यांपैकीं ग्रह, औषधीगंध, व विष यांनीं येणार्‍या तापांत सन्निपाताचा कोप असतो. भय, शोक व काम, यांनीं येणार्‍या तापांत वायूचा कोप आणि क्रोधजन्य तापांत पित्ताचा कोप असतो. (३ व ४) शापानें व अभिचारानें आलेले ताप फारच असह्य व घोर असतात; त्यांपैकीं अभिचारानें आलेल्या तापांत पूर्वीं चित्त व नंतर देह संतप्त होतात. नंतर अंगावर मोठे फोड येतात. तहान, भोंवळ, दाह, बेशुद्धि, हीं लक्षणें होऊन दररोज ताप वाढतो. आगंतुक ज्वरांत कोणत्या तरी बाह्य कारणांनीं ताप येऊन नंतर दोष दुष्ट होतात व ते दोष दुष्ट झाले म्हणजें वर सांगितलेलीं दोषलक्षणेंहि दृष्टीस पडतात.

यापूर्वीं लिहिलेल्या आठ प्रकारच्या ज्वरांचेच खालीं लिहिल्याप्रमाणें प्रत्येकाचे दोन दोन प्रकार आहेत ते असे. शरीर व मानस, सौम्य व तीक्ष्ण, अंतर्गत व बहिर्गत, प्राकृत व वैकृत, साध्य व असाध्य आणि साम व निराम. याप्रमाणें प्रत्येक ज्वर १२ प्रकारचा आहे. पैकीं शरीराला प्रथम ताप होऊन नंतर मनाला पीडा होते त्यास शारीर ज्वर म्हणतात. याच्या उलट प्रथम मन व नंतर शरीर तप्त होतें त्यास मानसिक ज्वर म्हणावें. सौम्य किंवा तीक्ष्ण ज्वर हे वायूच्या योगवाहित्त्व (जवळच्या बरोबर जाणें) धर्मानें होतात. वायु कफयुक्त असेल तर सौम्य व पित्तयुक्त असेल तर तीक्ष्ण ज्वर असतो. अंतर्गत ज्वरांत पूर्वीं सांगितलेलीं तापाचीं पुष्कळ लक्षणें असून अंतःक्षोभ आणि मलावरोध हीं लक्षणें असतात. बहिर्वेग (बहिर्गत) तापांत लक्षणें कमी असून अंतःक्षोभ नसतो व तो ताप सुसाध्य असतो.

ज्या ॠतूंत जो दोष कालस्वभावानें वाढतो त्या ॠतूंत त्या दोषानें येणार्‍या तापास प्राकृत व ज्या ॠतूंत जो दोष वाढत नाहीं त्या दोषानें आलेल्या तापास वैकृत असें म्हणतात. वर्षाॠतूमध्यें वातानें, शरद्ॠतूमध्यें पित्तानें, आणि वसंतॠतूमध्यें कफानें येणार्‍या तापास प्राकृत असें म्हणतात. वातानें आलेल्या प्राकृत ज्वराखेरीज प्राकृत ज्वर सुसाध्य आहेत; वैकृत ज्वर दुःसाध्य आहेत. रोगी बलवान् असून ज्वराचीं लक्षणें थोडीं असतील आणि ज्वराचे उपद्रव (पुढें सांगणार आहों) नसतील तर तो साध्य (बरा) होतो; याच्या उलट असाध्य समजावा. ज्वराच्या लक्षणांची वाढ, ग्लानी नसणें, लघवी पुष्कळ होणें, शौचाला न होणं, झालेंच तर अपक्व होणें, भूक न लागणें हीं सामज्वराचीं लक्षणें होत. साम आणि निराम यांच्यामध्यें “पच्यमान” म्हणून एक अवस्था मानिली आहे. तींत ज्वराचा वेग (उष्णतामान) जास्त असतो. तहान जास्त असते, बडबड, दमा, भोंवळ, तोंडाला पाणी सुटणें, आणि शौचाला जास्त होणें हीं लक्षणें होतात. ताप येऊन सात दिवस झाल्यानंतर किंवा सामज्वराचीं लक्षणें नाहींशीं झाल्यावर निराम अवस्था येते. सन्निपाताचे (दोष आणि काल यांच्या कमीज्यास्तीपणानें) संतत, सतत, अन्येद्यु, तृतीयक आणि चतुर्थक (चवथरा) असे पांच प्रकारचे ताप मानिले आहेत.

सप्त धातू, मूत्र मल इत्यादि यांस वहाणार्‍या स्त्रोतसां (शिरा) चा आश्रय करून ज्यावेळीं तीन्ही दोष कुपित होतात व विशेषेंकरून रसधातूचा आश्रय करून राहतात त्यावेळीं संतत या नांवाचा ज्वर येतो. हा ताप सारखा अंगांत असतो व तो फारच दुःसह असतो. या ज्वरांतील उष्णतेनें धातूंचा किंवा दोषांचा पाक होतो. दोष पक्व झाले तर रोगी जगतो व धातु पक्व झाले तर रोगी दगावतो.

या दोषपाकाची किंवा धातुपाकाची मुदत वात, पित्त, कफ यांच्या आधिक्यानें अनुक्रमानें सात, दहा, आणि बारा दिवसांची आहे. हारीत नांवाच्या ग्रंथकाराच्या मतें ही मुदत १४।१८ आणि २२ दिवस अशी आहे. दोषाची शुद्धि न झाल्यास हा ताप पुष्कळ दिवस सुद्धां येतो. सारांश लोकांत ज्यास “विषम” असें म्हणतात तो हा ताप आहे. यांत अंतर्बाह्य सर्व शरीर तप्त होतें व वर लिहिलेल्या मुदतीप्रमाणेंच हा कमी होतो. इतर ताप ठराविक वेळीं कमीजास्त होतात.

वैद्यकांत वर लिहिलेल्या संततज्वराखेरीज सतत, अन्येद्यु, तृतीयक आणि चवथरा (चतुर्थक) यांस विषम म्हणतात. कारण हे ताप ठराविक मुदतींत निघतात व पुन्हां भरतात. विषम या शब्दाचा अर्थ निघून भरणें असा आहे, या अर्थावरून हें नांव पडलें आहे. हे विषम ज्वर जरी निघाले तरी कृशता, शरीराचा रंग बदलणें, व जडपणा इत्यादि लक्षणें कायम असतातच. यांपैकीं सतत या नांवाचा ताप दिवसां व रात्रीं असा दोनदां येतो व निघतो. अन्येद्यु ज्वर दिवसां व रात्रीं मिळून एक वेळच येतो. यांत दोष मांस धातूचा आश्रय करून असतात. तृतीयकज्वर (एकांतरा) हा एक दिवसाआड येतो; यांत दोष मेद धातूचा आश्रय करतात. तृतीयकज्वरांत वायु व पित्त अधिक असतील तर प्रथम डोकें दुखतें व नंतर ताप येतो. कफ व पित्त यांचें आधिक्य असेल तर खांदे व मानेचा खालचा भाग दुखन ताप येतो. वायु आणि कफ अधिक असतील तर पाठ दुखून नंतर ताप येतो. चतुर्थक, चैवथ्या दिवशीं येणार्‍या (चवथरा) तापांत मेद, मज्जा, किंवा अस्थी यांचा दोष आश्रय करतात. कांहीं ग्रंथकारांच्या मतें मज्जाधातू वाच दोष आश्रय करितात तेव्हां चवथरा ताप येतो. तो दोन प्रकारचा आहे. कफप्रधान, व वातप्रधान, पैकीं कफप्रधान चवथर्‍या तापांत अगोदर पोटर्‍या वळतात; आणि वातप्रधान तापांत डोके दुखून नंतर ताप येतो. या तापाचाच दुसरा प्रकार असा आहे कीं, दोन दिवस सारखा ताप येऊन, एक दिवस ताप नसतो. हा ताप फारच कष्टसाध्यं आहे. हे सर्व ताप (संततखेरीजकरून) ज्या दोषांच्या आधिक्यानें आलेले असतील ते ते दोष वाढण्याच्या वेळीं ते वाढतात आणि दोष कमी होण्याच्या वेळीं कमी होतात. या सर्व तापांचे कारणभूत जे दोष ते कोणत्या धातूचा आश्रय करून आहेत हें समजण्याकरितां धातुगत ज्वरांचींहि लक्षणें सांगितलीं आहेत तीं यणेंप्रमाणें- जडपणा, मळमळणें, ओकारी, अरोचक, दीनपणा, हीं लक्षणें रसधातुगत तापाचीं होत. रक्ताची गुळणी, दाह विचार न सुचणें, ओकारी, भोंवळ, बडबड, अंगावर पुळ्या व तहान हीं लक्षणें रक्तगत ज्वराचीं आहेत. पोटर्‍या वळणें, तहान, लघवी व शौचाला साफ होणें, उष्णता, अतर्दाह, हातापायांस चाळा, ग्लानि, हीं लक्षणें मांसगत ज्वराचीं आहेत. वरचेवर अतिशय घाम, तहान, बेशुद्धि, बडबड,  ओकारी, दुर्गंधी, अरोचक, ग्लानीं व वेदना सहन न होणें हीं लक्षणें मेदोगत ज्वराचीं आहेत. हाडें फुटल्याप्रमाणें वाटणें, कण्हणें, दमा, जुलाब होणें, ओकारी, व सर्वांगास चाळा हीं लक्षणें अस्थि (हाडें) गत ज्वराचीं होत. अंधार्‍या येणें, उचकी, खोकला, थंडी, ओकारी, अतंर्दाह, महाश्वास व मर्में फार दुखणें, हीं लक्षणें मज्जागत ज्वराचीं आहेत. शुक्र बाहेर येणें, लिंग ताठणें हीं लक्षणें शुक्रगत ज्वरांत असून यानें रोगी वांचत नाहीं. रस व रक्ताश्रित, तसेंच मांस, व मेदोगत ज्वर साध्य आहे. अस्थी व मज्जागतज्वर, कष्टानें बरे होणारे व शुक्रगत ज्वर बरे न होणारे असतात.

वर लिहिलेल्या तापांखेरीज “मधुरा” नांवाचा तांप लोकांत प्रसिद्ध आहे, त्यांची लक्षणें- अंगाची आग होणें, भोंवळ, विचार न सुचणें, शौचास पातळ होणें, ओकारी, तहान, झोंप नसणें, तोंड येणें, टाळा व जीभ सुकणें आणि गळ्यावर मोहरी एवढाल्या बारीक पुळ्या उठणें, वर लिहिलेल्या कफपित्तजव्रांत याचा अंतर्भाव होतो. चरक, वाग्भट, सुश्रुत वगैरे ग्रंथांत हा ताप निराळा मानिला नाहीं. याशिवाय नवज्वर म्हणून लोकांत एक ताप प्रसिद्ध आहे. तो निराळा असून मुदतीच्या तापांतील नऊ दिवसांच्या तापासच तें नांव आहे.

मोठा ताप येऊन गेल्यानंतर पुढें अशक्तपणानें जो अल्पप्रमाणाचा ताप शिल्लक राहतो व ज्यांत पानथरी वाढते त्यास जीर्णज्वर म्हणतात. यांत हातापायांची व डोक्याची आग होते आणि पानथरी वाढलेली असते.

ताप उतरतांना, धातूचा क्षोभ होतो. त्यावेळीं रोग्यास दम लागतो. कण्हणें, घाम, ओकारी, कफ, बडबड, बेशुद्धि, रागीट, मुद्रा, मळ जोरानें आणि सशब्द व पातळ होणें, हीं लक्षणें होतात. थकवा, विचाराशक्ति व संताप हीं गेलीं, शरीर हलकें वाटावयास लागलें, तोंड आलें (मुखपाक), इंद्रियें आपापलीं कामें व्यवस्थित करू लागलीं, पीडा शमली, घाम येऊं लागला, शिंका आल्या, आवडीच्या पदार्थांवर इच्छा जाऊं लागली आणि डोखें खाजूं लागलें म्हणजे ताप गेला असें समजावें.

अशक्त मनुष्यास अतिशय जोराचा ताप आला असतां बरा होणें कठिण जातें. तसेंच ज्या तापाचीं कारणे फार आहेत, लक्षणें फार आहेत, तोहि ताप बरा होत नाहीं. पहाणें, ऐकणें, वगैरे इंद्रियांच्या शक्ती ज्या तापांत नाहींशा झाल्या आणि ज्या तापानें केंस दुभंगले तो ताप बरा होत नाहीं. रोग्यास तापांत अतिशय तहान, अंगाची आग, पोट अतिशय फुगणें, जोराचा दमा व खोकला, अतिशय क्षीणता,  बेशुद्धि, विव्हलता, उठण्याची शक्ति नसणें, हृद्यांत नाना प्रकारचें दुःख होणें, तोंडानें श्वासोच्छवास चालणें, डोळें लाल असणें, ही लक्षणें असतील तर रोगी जगणें कठिण असतें.

रोगी फार क्षीण असून श्वासोच्छवास पुष्कळ वेळां जोरानें (प्रमाणापेक्षां जास्त) चालत असेल तर असाध्य समजावा. तापांत उचकी, दमा व तहान आणि डोळे फिरलेले (विभ्रांत) हीं लक्षणें असतां रोगी दगावतो. तापांत रोग्याचें अंग थंड लागत असून त्यास आंतून अतिशय दाह वाटत असेल तर तेंहि असाध्य लक्षण समजावें. या वर लिहिलेल्या तापाच्या असाध्य लक्षणांचा विचार करतांना तापाचा जोर, आणि रोग्याची शक्ति, यांचा प्रथम विचार करून नंतर दुसर्‍या लक्षणांचा विचार करावा. या दोन लक्षणांचा सौम्य किंवा उग्रपणा तारण्यास किंवा मारण्यास कारण होतो.

ज्याअर्थीं अमाशयांतील दोष अग्नीस मंद करून आमाशीं मिसळून व स्त्रोतसांचा अवरोध उत्पन्न करून ताप उत्पन्न करितात त्याअर्थीं तापाचीं पूर्वचिन्हें दिसूं लागतांच किंवा ताप आल्याबरोबर एकदम शक्तिपात न होऊं देण्याविषयीं खबरदारी राखून उपास करावे, कारण आरोग्याचा आधार शक्तीवरच आहे आणि आरोग्याकरितांच चिकित्सा केली जाते.

उपासांनीं दोष क्षीण झाले, अग्नि प्रदीप्त झाला व अंग हलकें झालें म्हणजे स्वस्थता, भूक तहान, पचनशक्ति, शक्ति व ओज हीं उत्पन्न होतातं.

जेवल्याबरोबर ताप आला असेल व तो विशेषतः आमयुक्त असेल आणि त्यांत दोष अतिशय वाढले असून ते आपापल्या स्थानांपासून चाळवले जाऊन संचार करीत असतील व त्यांत कफाचा जोर असेल आणि मळमळ, तोंडास पाणी सुटणें, अन्नाचा तिटकारा,खोकला व विषूचिका हीं लक्षणें त्यांत असतील, तर रोगी वमन देण्यास योग्य असल्यास त्यास वमन देणें प्रशस्त आहे. याहून निराळ्या स्थितींत वमन दिल्यास दमा, अतिसार, मूर्छा व हद्रोग, हे विकार उत्पन्न होऊन ताप विषम होतो. वमन (ओकारीचें औषध) देणें असल्यास पिंपळीबरोबर, इंद्रजवाबरोबर, ज्येष्ठ मधाबरोबर, मधुयुक्त किंवा लवणयुक्त ऊन पाण्याबरोबर, कडू पडवळ किंवा कडू लिंब याच्या काढ्याबरोबर अथवा सातूंचें कढण, उंसाचा रस, आणि मद्य यांबरोबर गेळफळ द्यावें. किंवा रोगाची व रोग्याची शक्ति, काळ वगैरे गोष्टी लक्षांत आणून ओकारीचीं औषधें द्यावीं. वमनास योग्य असल्यास वमन घेऊन व नसल्यास वमनांवांचूनच तापकर्‍यानें वाढलेल्या सामदोषांचें पचन व निरामदोषांचें शमन करण्याकरितां उपास करावें.

वातकफज्वरांत रोग्यास तहान लागत असल्यास त्यानें थोडेथोडे ऊन पाणी प्यावें. तें कफास पातळ करून लवकर तहान कमी करतें, अग्नीस प्रदीप्त करितें, स्त्रोतांस मऊ करून मोकळें करतें, दाटलेलें पित्त, वायु, घाम, मलमूत्र यांस प्रवृत्त करतें, झोंप, जडत्व व अरुचि यांस नाहींसें करतें, व प्राणाचें रक्षण करतें. थंड पाण्यांत याच्या उलट गुण असून तें दोषसमुदायास वाढवितें.

ऊन पाण्यांत जरी वर सांगितल्याप्रमाणें गुण आहेत तरी तें निव्वळ पित्ताच्या तापांत, पित्ताधिकतापांत, डोळे वगैरेंतून वाफा निघणें, सर्वांगाचा दाह, मूर्छा अतिसार हे विकार असलेल्या तापांत विषापासून किंवा मद्यापासून उत्पन्न झालेल्या तापांत, ग्रीष्म ॠतूंत आणि उरक्षत, धातुक्षय, व रक्तपित्त हे रोग असतील त्यांस देऊं नये. त्यांस नागरमोथा, चंदन, सुंठ, पित्तपापडा व वाळा हीं औषधें घालून तापविलेलें पाणी निववून देणें हितकर आहे. १ तोळा औषध एक शेर पाण्यांत घालून अर्धें पाणी आटवून हें थंड करून प्यावयास द्यावयाचें असें याचें प्रमाण आहे. तें पाचक व तहान आणि ताप दूर करणारें आहे. पित्तावांचून उष्णता नाहीं व उष्णतेवांचून ताप नाहीं. म्हणून सर्व प्रकारच्या तापांत व विशेषतः पित्तज्वरांत पित्तास विरुद्ध असे पदार्थ वर्ज्य करावे. तसेंच स्नान, अंगास तेल लावणें, चंदनादिकांची उटी व उपासावांचून बाकीचीं अकरा प्रकारचीं लंघनें वर्ज्य करावीं. उपास हा नवज्वरांत (तापाच्या आरंभीच्या पहिल्या दिवसांत) करावाच. आमाधिक अजीर्णांत पोटांत तीव्र वेदना होत असल्या तरी जसें शूलघ्र औषध देऊं नये तसेचं आमाधिक तापांत ज्वरघ्न औषध देऊं नये. कारण सापास दूध पाजलें असतां जसें त्याचें विषच बनतें तसेंच आमानें भरलेल्या कोठ्यांत तें आमास अधिकच वाढवितें.

वातकफात्मक तापांत अंगावर गांधी, पडसें, दमा, पोटर्‍या हाडांचीं पेरें व सांध्यांत शूल हीं लक्षणें असल्यास घाम काढावा. त्यायोगानें घाम, मलमूत्र व वायु हे प्रवृत्त होऊन अग्नी प्रदीप्त होतो.

उपास, घाम काढणें, दिवस लोटणें, कण्हेरी व कडू औषधें, हीं निरनिराळ्या अवस्थेंत किंवा क्रमाक्रमानें दोषांचें पचन करितात. निवळ वातज्वर, क्षयाचा ताप, आगतुंकज्वर व जीर्णज्वर यांत उपास करूं नये. या ज्वरांत शक्ती कमी न होईल असें शमन- औषध द्यावें. लंघन (उपवास) देणें तें आमज्वराचीं लक्षणें कमी होईपर्यंत द्यावें. आमज्वराचीं लक्षणें कायम असतील तर लंघन बंद करूं नये. इंद्रियें प्रसन्न होणें, मळ, मूत्र व वायु यांचे वेग चांगले येणें, तोंडाला रुचि येणें, तहान व भुक बरोबर लागणें, व्याधीचा जोर कमी होणें, उत्साह वाटणें, आळस न वाटणें हीं लंघनांस योग्य झाल्याची लक्षणें आहेत. हीं लक्षणें झालीं म्हणजे ज्वरांत उपास बंद करावे. लंघनाचीं लक्षणें दिसूं लागल्यानंतर सहा दिवसपर्यंत किंवा ताप कमी होईपर्यंत त्या त्या दोषांच्या तापांत त्या त्या दोषनाशक औषधांनीं सिद्ध केलेल्या कण्हेर्‍या द्याव्या. त्यांत प्रथम पेजेपासून सुरुवात करावी. आरंभीं सहज पचणारी अशी लाह्यांची कण्हेरी, सुंठ, धने व पिंपळीं, यांनीं सिद्ध करून किंचित् सैंधव घालून द्यावी. रोग्याची आंबटावर इच्छा असल्यास त्यांत डाळिंबाचा रस घालावा. ज्या तापकर्‍यास रेच होत असतील किंवा पित्ताचा जोर असेल त्यानें धने व पिंपळी न घालतां नुस्ती सुंठ व मध घालून थंड कण्हेरी द्यावी. बस्ती, कुशी, व डोकें यांत दुखत असल्यास रिंगणीमूळ व गोखरूं यांनीं सिद्ध केलेली कण्हेरी द्यावी. उचकी, शूळ, दमा व खोकला, हे उपद्रव असल्यास लघुपंचमुळांनीं सिद्ध केलेली कण्हेरी द्यावी. कफविकार असल्यास बिल्वादि बृहत्पंचमूळांच्या कषायांत सातू घालून सिद्ध केलेली कण्हेरी द्यावी. मलावरोध असल्यास जव, पिंपळी व आंवळकाठी घालून केलेली व तुपाची फोडणी दिलेली कण्हेरी द्यावी. ही मळ व दोष यांचें अनुलोमन करणारी आहे. घाम व झोंप येत नसून अतिशय तहान लागत असल्यास खडीसाखर, आवंळकाठी व सुंठ यांनीं सिद्ध केलेली कण्हेरी द्यावी तहान, वांती, दाह व ताप हीं नाहींसी करण्याकरितां खडीसाखर, बोरें, द्राक्षें, उपळसरी, नागरमोथा, व चंदन यांनीं सिद्ध केलेली कण्हेरी मध घालून द्यावी. कण्हेर्‍या तयार करण्याकरितां औषधें सांगितलीं आहेत त्यांनींच मांसरस, धान्याचीं कढणें, वगैरे तयार करून द्यावीं. दारूनें येणार्‍या तापांत, नेहमीं मद्य पिणार्‍या तापकर्‍यास, कफ पित्तस्थानांत गेला असतां, ग्रीष्मॠतूंत, पित्तकफाचा जोर असतां व तापांत तहान, उलटी व दाह हे उपद्रव होत असतां व ऊर्ध्वगामी रक्तपित्त झालें असतां कण्हेरी देणें इष्ट नाहीं. त्यांत ज्वरनाशक आंवळे, डाळिंब, द्राक्षें वगैरे फळांच्या अंगरसांतून किंवा काढ्यांतून साळींच्या लाह्यांचें पीठ, साखर व मध घालून द्यावें. नंतर हें लाह्यांचें पीठ किंवा यवागू दिली असल्यास ती जिरल्यावर भूक लागली असतां भाजलेल्या तांदुळांचा भात, किंचित् लवणयुक्त धान्याचीं कढणें किंवा मूग व लाव्यांच्या मांसाचे सुर्व्याबरोबर जेवावा.

याप्रमाणें तापाचे पहिले सहा दिवस शक्ति क्षीण न होऊं देतां व दोष भडकूं न देतां घालवावे. लंघन (उपास) कण्हेर्‍या व योग्यकाल, इत्यादिकांनीं दोष पक्व झाल्यावर शिल्लक राहिलेल्या अपक्व दोषांचें पाचन व शमन करण्याकरितां काढा द्यावा.

पित्तज्वरांत विशेषतः कडु औषधांचा व कफज्वरांत तिखट औषधांचा काढा द्यावा. तुरट औषधें जरी पित्तकफनाशक आहेत तरी नवज्वरांत म्हणजे अपक्व तापांत तुरट औषधांचा काढा देऊं नये. कारण तो मळाचा अवष्टंभ करून तापास विषमावर घालवितो. आणि अरुचि, तळमळ, उचकी, पोटफुगी, वगैरे उपद्रवहि करतो.

कांहीं ग्रंथकार सात दिवसानंतर, कोणी दहा दिवसानंतर, आणि कोणी पेज, कण्हेरी वगैरे हलकें अन्न खाल्यावर ज्वरघ्न औषध द्यावें असें म्हणतात. परंतु वाग्भटाच्या मतें आमाचें आधिक्य तापांत असतां अर्थात् तापाचा जोर असतां किती दिवस झाले तरी औषध देऊं नये. कारण अंगांत तीव्रज्वर असलेल्या रोग्यास दोषांच्या उद्रेककाळीं किंवा दोष अतिशय सांचून त्यामुळें झांपड व अंग जड आणि ओलसर वाटणें हीं लक्षणें होत असतां दिलेल्या औषधांचें पचन न होतां उलट तें तापास फार वाढवितें. ताप सौम्य झाला, अंग हलकें झाले आणि मळमूत्रादि दोष प्रवृत्त झाले असतां, नुक्ताच ताप येऊ लागला असला तरी त्यास औषध द्यावें. वातज्वरावर गुळवेल, पिंपळमूळ, सुंठ यांचा किंवा मिरीं, पादेलोण, सुंठ, काडेचिराईत, लेंडीपिंपळी, काटुकी या औषधांचा काढा द्यावा.

काढ्याची औषधें दोन ते तीन तोळे, चाळीस तोळे पाण्यांत कालवून पांच तोळे पाणी राहिलें म्हणजे गाळून द्यावें. हें प्रमाण सामान्य आहे. रोग, रोगी, वय, काल, इत्यादिक पाहून वैद्यानें यांत फरक करावा, यापुढें जेथें काढ्याच्या औषधांचें विशेष प्रमाण सांगितलें नसेल तेथें हेंच प्रमाण उपयोगांत आणावें.

हिरडेदळ, बेहेडदळ, आंवळकाठी, सुंठ, मिरी, लेंडीपिंपळी, तेड, गूळ, व साखर यांची गोळी करून खावी व वर ऊन पाणी प्यावें. तेडाचें चूर्ण ३॥ तोळे व साखर तीन तोळे, बाकी सात औषधें एक एक तोळा याप्रमाणें घ्यावीं.

पित्तज्वरावर पित्तपापडा, वाळा, रक्तचंदन यांचा किंवा गुळवेल, आंवळकठी, पित्तपापडा, यांचा अगर घमासां, गुळवेल, नागरमोथे व सुंठ यांचा काढा द्यावा. रोग्यास दाह फार होत असेल तर कडुलिंबाचा पाला पाण्यांत वाटून त्याचा फेंस अंगास लावावा. तहान, जीभ व टाळू सुकणें हीं लक्षणें असल्यास महाळुंगाचा गर, मध व सैंधव वाटून डोक्यास लेप द्यावा.

कफज्वरावर काडेचिराईत, कडुलिंब, लेंडीपिंपळी, कचोरा, सुंठ, शतावरी, गुळवेल, कांटेरिंगणी, यांचा किवा गुळवेल, कडुलिंब, रक्तचंदन, पप्रकाष्ट, धने, अगर अडुळशांचीं पानें, नागरमोथें, सुंठ व धमासा यांचा काढा द्यावा. कांकढशिंगी, लेंडीपिंपळीं, कायफळ व पुष्करमूळ यांचें चूर्ण मधांत कालवून चाटावें, त्यानें दमा, खोकला या लक्षणांनीं युक्त असलेला कफज्वर जातो.

वातपित्तज्वरावर गुळवेळ, पित्तपापडा, वाळा, काडेचिराईत, सुंठ यांचा काढा अगर काळी द्राक्षें, मोहाचीं फुलें, जेष्ठमध, लोघ्र, शिवणीचीं फळें, उपळसरी, नागरमोथा, आंवळकाठी, वाळा, कमळकेसर पद्मकाष्ठ, कमळाचे देठ, चंदन, काळावाळा व फालसा, यांचा फांट किंवा हिम (शीतकषाय) जाईच फुलांनीं सुगंधित करून आणि त्यांत मध, खडीसाखर व साळींच्या लाह्या घालून तो दिला असतां वातपित्तज्वर, मदात्यय, वांती, मूर्छा, दाह, श्रम, भ्रम, नाकातोंडांतून येणारें रक्त, तहान व कावीळ या रोगांस बरा करितो. कुटकी पाण्यांत वाटून कोर्‍या व स्वच्छ मडक्यांत शिजवून तिचा रस पिळून घेऊन तूप घालून द्यावा. हा ताप व दाह यांस दूर करतो.

वातकफज्वरांत बाहव्याचा मगज, पिंपळमूळ, नागरमोथे, कुटकी, व हिरडेदळ, यांचा काढा दिला असतां तो दीपन, पाचन करितो. रिंगणीमूळ, सुंठ व गुळवेल यांचा काढा पिंपळीचें चूर्ण घालून दिला असतां वात कफज्वर, दमा खोकला, पडसें व शुळ यांस दूर करितो.

कफपित्तज्वरांवर गुळवेल, कडुलिंबाची साल, कटुकी, नागरमोथे, इंद्रजव, सुंठ, कडू पडवळ, रक्तचंदन, यांच्या काढ्यांत पिंपळीचें चूर्ण घालून द्यावें. त्यानें कफपित्तज्वर  ओकारी, अरोचक, मळमळणें, अंगाची आग, तहान हे विकार नाहींसे होतात.

संन्निपातज्वराची चिकित्सा फार काळजीपूर्वक करावी, कारण संन्निपातज्वराची चिकित्सा म्हणजे मृत्यूबरोबर लढाईच असें वैद्यशास्त्रज्ञ म्हणतात. संन्निपातज्वरांत प्रथम आम व कफ कमी करण्याचे उपाय करावे. ते असे आम कमी होण्याकरितां उपास व कफ कमी होण्याकरितां तापलेल्या वाळूचा शेक, नस्य (नाकांत ओढावयीचीं औषधें). लाळ. सुटणारीं औषधें, अंजन आणि चाटणें, यांचा उपयोग करावा. खापरांत वाळू तापवून ती मडक्यांत घेऊन तीवर कांजी शिंपडावी नंतर त्या वाळूनें शेकावें. महाळुंग व आलें यांचा कोमट रस सैंधव, पादेलोण व मीठ घालून नाकांत घालून ओढावा. त्यानें कफ पातळ होऊन नाकावाटें येतो व डोकें, छाती, गळा, तोंड आणि बरगड्या यांतील दुखणें कमी होतें आल्याच्या रसांत सैंधव व सुंठ, मिरी आणि पिंपळा हीं घालून त्यांची चूळ तोंड भरून द्यावी व थुंकावी. त्यानें छातींतील व मान, गळा, व डोकें यांत दाटलेला कफ पातळ होऊन पडतो व तोंडाला रुचि येते आणि डोकें, बरगड्या व गळा यांस हलकेपणा वाटतो.

तीक्ष्ण (झोंबणारीं) औषधें डोळ्यांत घातलीं असतांहि कफ कमी होऊन झांपड, बडबडणें व डोकें दुखणें, हीं लक्षणें कमी होतात. नागरमोथे, कटुकी, हिरडा, बेहेडा, आवळकाठी, कांटेरिंगणी, कडु पडवळ, दारुहळद, कडुलिंबाची साल, ह्यांचा काढा द्यावा. त्रिभुवनकीर्तिरस आल्याचा रस व खडीसाखर यांतून द्यावा. मोहर्‍या, वेखंड, हिंग, करंजाच्या बिया, तेल्यादेवदार, सुंठ, मिरीं, पिंपळी हीं गोमूत्रांत वाटून सर्वांगास लेप करावा. संन्निपातज्वरांत जीभ फुटली व फार कोरडी झाली असतां काळ्या मनुका मधांत वाटून तूप घालून लेप करावा. तेरा प्रकारच्या संन्निपातांवर जी सामान्य चिकित्सा आहे ती येथें लिहिली आहे. संन्निपातज्वरांत शेवटीं शेवटीं कानाच्या मुळाशीं सूज येते त्यास कर्णमूळ म्हणतात. त्यावर रक्त काढणें, तूप पिण्यास देणें व कफ पित्तघ्न लेप लावणें, हें उपचार करावे. या सर्व तापांत प्रथम उपास, नंतर पेज, भात वगैरे पथ्यकारक अन्न व काढे वगैरे देऊन दहा दिवस झाल्यावर रोग्यास कफाचीं लक्षणें नसतील तर तूप जास्त प्रमाणांत द्यावें. त्यानें उष्णता कमी होऊन ताप नाहींसा होतो. तूप दिल्यानें कफ वाढेल तर तूप बंद करून पुन्हां लंघन करावें. याप्रमाणें चिकित्सा केली असतां वातिकज्वर सात दिवसांनीं, पित्तज्वर नऊ दिवसांनीं व कफज्वर अकरा दिवसांनीं किंवा याच्या दुप्पट मुदतीनें बरा होतो. जास्तीत जास्त बावीस दिवसांची मुदत शास्त्रानें लिहिली आहे. यापुढें राहणारे ताप आमदोषजन्य असतात. वर ज्वरांत जें तूप द्यावयास सांगितलें तें औषधांनीं तयार केलेलें असलें पाहिजे. कारण तुपावर ज्या गुणांचा संस्कार करावा ते गुण त्यांत येतात; त्यामुळें तें स्वतः वातपित्तघ्न औषधांत श्रेष्ठ असलें तरी कफघ्नहि करतां येतें. देहांतील धातूंच्या दुर्बलपणामुळें जो जीर्णज्वर असतो त्यावर तुपासारखें दुसरें औषधच नाहीं. पूर्वीं सांगितलेले काढे तूप घालून द्यावे त्यानें जीर्णज्वर जातो. तिल्वकघृत, विषघृत, तिक्तकधृत हीं शस्त्रांत प्रसिद्ध असलेी घृतें ज्वरांवर प्रशस्त आहेत.

तूप देऊनहि ज्वर गेला नाहीं तर बली रोग्यास ओकारीचें किंवा रेचक औषध दोषाचें आधिक्य पाहून द्यावें. विष व दारू यांपासून ताप असेल तर शोधनच हितकारक आहे. बाहव्याचा मगज, त्रिफळा नळीचें तेड इत्यादि रेचक औषधें मनुकांच्या पाण्याबरोबर द्यावीं किंवा दुधाबरोबर द्यावी. शोधन औषधांनीं दोष बाहेर पडूं लागले म्हणजे ते बंद करूं नयेत. कारण ते दोष शरीरांत राहिल्यानें दुसरे विकार उत्पन्न करतात. फारच ओकार्‍या किंवा जुलाब होतील तर दोषांचे पचन करून ते विकार थांबवावे परंतु स्तंभन औषधांनीं बाहेर जाणारे दोष आंत सांठवून ठेवूं नयेत. ज्या रोग्यास दोषहरणाकरितां शोधन औषधें अशक्तपणामुळें देत नाहींत त्यास पुष्कळ दूध प्यावयास देऊन किंवा निरुहबस्तीनें त्याचे दोष काढून टाकावे. दूध हे जात्याच वातपित्तघ्र असल्यामुळें तापाला लौकर घालवितें व तापांतील तहान व दाह हीं लक्षणें दुधानें त्वरित शमतात. रोग व रोगी यांची शक्ति व काल यांचा विचार करून धारोष्ण, थंड किंवा औषधांनीं तयार केलेलें दूध उपयोगांत आणावें. नाहींतर तें अपायकारक होतें, सुंठ, खजूर, मनुका, साखर व तूप यांत तयार केलेलें दूध मध घालून द्यावें. तसेंच चौपट पाणी घालून पिंपळ्यांनीं तयार केलेलें दूधहि हितकारक आहे. सुंठ, चिकणामूळ, कांटेरिंगणी, सराटे, व गूळ यांनीं तयार केलेलें दूध सूज, लघवी व मळ यांचा अवरोध यांस घालविणारें असून खोंकला आणि ताप यांस घालवितें.

निरूहबस्ती (रूक्ष औषधांचा बस्ती) पक्वाशयांतील दोष घालवितो. पक्वाशयांतील तीन्ही दोषांवर हें उत्तम औषध आहे. बरगड्या, कंबर व पाठ हीं आंखडलीं असतां व शौचास साफ होत नसेल तर अनुवासन (स्निग्ध) बस्तीहि द्यावा. दोषहरणाकरितां नस्य, धूम, गंडूष (चुळा भरणें) हें विधीहि जीर्णज्वरांत करावें. आंवळकाठी, मनुका व खडीसाखर यांची चटणी तोंडांत धरावी. यानें अरुचि जाते. दोषांप्रमाणें औषधें घालून तयार केलेल्या तेलांनीं अभ्यंग करावा. त्यानें त्वचेचा आश्रय करून असलेला ताप जातो. तापांत दाह फार होत असेल तर थंड वीर्याच्या औषधांनीं तयार केलेल्या थंड काढ्यांत रोग्यास बसवावा अगर त्या काढ्यांचा अभिषेक करावा.

विषमज्वर (हिंवताप) हा ताप बहुतकरून थंडी वाजूनच येतो. म्हणून प्रथम खालीं लिहिलेले उपचार करावे. उष्णवीर्य औषधांचे काढे करून ते ऊन असतां अंगावर घ्यावे अगर त्यांत बसावें. विस्तवाच्या साहाय्यानें जे शेकण्याचे प्रकार आहेत त्यांनीं अंग शेकावें. घाम आणणारी औषधें व अन्नें, घराच्या तळघरांतील मध्यभागीं निजणें, गोधडी, कांबळें, रजई इत्यादि उबदार वस्त्रें पांघरणें, बिनधुराचे रखरखीत निखारे, भरलेल्या शेगड्या, दारू, सुंठ, मिरीं, पिंपळी घातलेलें ताक पिणें यानें थंडी वाजणें कमी होतें. कडू पडवळ, नागरमोथे, हिरडे व ज्येष्ठमध या औषधांचा काढा सर्व प्रकारचे हिवताप घालवितो. रसायनविधानें बिब्बा खावा. सकाळीं तेलाबरोबर लसूण खावी. ताप येण्याच्या दिवशीं दोषादि पाहून लंघन किंवा बृंहण करावें. त्रिफळा, गुळवेल, हिरडे व लेंडीपिंपळी यांपैकीं कोणतेंहि एक औषध प्रकृातिमानाप्रमाणें घ्यावें. त्रिफळा, बोरें व शिवणीची फळें यांच्या काढ्यांत समभाग, दहीं घालून तूप सिद्ध करावें आणि ते तयार होत आलें म्हणजे त्यांत लोघ्राच्या सालीची पूड टाकावी. हें हिवतापावरील उत्तम औषध आहे. दारू, तीव्र मद्य, मोर, तित्तिर, कोंबडा याचें मेदस्वी व उष्णवीर्य मांस अन्नाबरोबर खूप खाऊन तापाच्या पाळीच्या दिवशीं निजावें किंवा लागलींच तें अन्न ओकून टाकावें. धूप, अंजन, नस्य, भय दाखविणें हेंहि उपाय करावे. प्रायश्चित, जप, दान वगैरे दैवी उपायांनीं सर्वच प्रकारचे ताप जातात. तथापि विषमज्वरावर ते फारच उपयोगी पडतात. कारण या तापांत आगतुक कारणांचा संबंध असतो. वर लिहिलेल्या उपचारांनीं जो ताप जात नाहीं तो ताप रक्ताश्रित आहे असें समजून विधीप्रमाणें शीर तोडून रक्त काढावें. आगंतु वराची कारणाप्रमाणें चिकित्सा करावी. अभिघातानें आलेल्या तापावर तूप पिण्यास द्यावें. थंड लेप व परिषेक, मांसरसाबरोबर जेवण व त्या त्या रोगावर सांगितलेले रक्तस्त्रावादि उपाय योजावे. भूतबाधेनें आलेल्या तापांत बलि, मंत्र इत्यादि उपाय करावे. उग्र औषधींच्या वासापासून आलेल्या तापांत पित्तशामक व विषजन्य तापांत विषनाशक उपाय करावे.

काम, क्रोध, इत्यादिकांपासून आलेले ताप रोग्यास आवडणार्‍या व त्यांचें मनोरंजन करणार्‍या गोष्टींनीं व त्या त्या दोषांचें शमन करणार्‍या उपायांनीं व हिताहित विवेकाच्या गोष्टींनीं बरे करावे. क्रोधापासून येणारा ताप कामानें व कामज्वर क्रोधानें शांत होतो. तसेंच भीति व शोक यांपासून आलेले ताप क्रोधानें आणि कामक्रोधापासून ओलेले भय शोकानें बरे होतात. शापानें व अथर्ववेदोक्त मंत्रांनीं केलेल्या अभिचारानें आलेल्या तापांत दैवी चिकित्सा करावी.

औषधांचा उग्र वास, विषबाधा, इत्यादिकांपासून आलेल्या तापांत आरंभीं केवळ तप्तता असून मागून त्यांत दोषांचा कोप होतो. म्हणून त्यांत दोषानुसार औषधादिकांची योजना करावी. रोग्याचें लक्ष्य मनोरंजक गोष्टींत गुंतवून त्यास ताप येण्याच्या वेळेची आठवणच होऊं देऊं नये. दयाळु व निर्मळ मन हें सर्व  ज्वरांचें नाशक आहे.

ताप गेल्यानंतरहि अंगांत शक्ति येईपर्यंत मेहनत, स्नान, स्त्रीसंग, जड असात्मय, व विदाहि अन्न, तसेंच इतर तापाची जीं कारणें असतील ती वर्ज्य करावीं. ताप गेला तरी एकदम सर्व प्रकारचें अन्न खाऊं लागूं नये. कारण ताप निघाला तरी तो अशक्त मनुष्यास फार लौकरच मारतो. [वाग्भट; चरक; योगरत्‍नाकर.]

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .