प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

ज्वारी - एक धान्य. यास मराठींत ज्वारी, जोंधळा, रब्बी-शाळू; कानडींत, ज्वाळा व गुजराथींत, ज्वार म्हणतात. हिंदुस्थानांत जोंधळ्याची लागवड फार प्राचीन आहे. मिसर देशांत याला दूरा व दक्षिण आफ्रिकेंत कारिर कार्न असें म्हणतात.

जोंधळ्याचें पृथक्करण केलें असतां त्यांत शेंकडा जीं द्रव्यें सांपडतात तीं पुढें दिलीं आहेत.

 द्रव्य   शेंकडा प्रमाण
 पाणी  १२.५
 मांसजनक घटक  ९.३
 शर्करासत्वादि पदार्थ  ७२.०३
 स्निग्धांश   २.२
 फायबर  २.२
 निरिंद्रिय क्षार  १.७

जोंधळ्याचें ताट साधारणपणें ७ ते ९ फूटपावेतों वाढतें. सुरत, खानदेश, सातारा, अकोला, बुलढाणा, उमरावती, नागपूर, वगैरे जिल्ह्यांत खरीफ जोंधळ्याचें ताट बरेंच जाडें असून तें १०-१५ फूट उंच वाढतें. रब्बी हंगामांतील शाळूचें ताट उंचीला बहुतकरून कमी असतें. पानें लांब व रुंदट असतात. खाण्याच्या सर्व धान्यांत (मक्याखेरीज) जोंधळ्याचें कणीस मोठें असतें. कणसाचा लहान मोठा आकार हंगामावर, जमिनीवर व तिच्या मशागतीवर अवलंबून आहे. कांहीं कणसें घट्ट असतात व कांहीं अगदीं मोकळीं फिसकारलेलीं असतात. कित्येक जातींत तीं ताटांस वांकवून खालीं लोंबत असतात. कांहीं कणसांचा रंग पांढरा सफेत असतो. कांहीचा पिवळा, कांहींचा काळसर व कांहींचा तांबूस असतो. कांहीं कणसांतील दाण्यांवर काळ्या किंवा तांबूस रंगाचें बोंड असतें. (उ. कोंवळीं सोरघम). कणसाप्रमाणें दाण्यांतहि पुष्कळ रंग आढळतात, अगदीं पांढरें (उ. निर्मळी चपटी),तांबूस (उ. राती, अडघर) व पिंवळें (उ. फुलगार).

हिंदुस्थानांत भाताच्या खालोखाल जोधळ्याचें पीक आहे. प्रसिद्ध झालेल्या सरकारी आंकड्यावरून पहातां सर्व हिंदुस्थानांत या पिकाखालीं १९१९-२० सालीं सुमारें २ कोटी २४ लक्ष एकर होते. त्यांपैकीं ५४ लक्ष सयुक्तप्रांतांत, १९ लक्ष संयुक्तप्रांतांत, १९ लक्ष मध्यप्रांतांत व २४ लक्ष एकर वर्‍हाडांत होते. निझामच्या राज्यांत मराठवाड्यांत जोंधळ्याचा पेरा बराच होतो.

 मुंबई इलाखा- मुख्य जिल्ह्यांतील जोधळ्याचें क्षेत्र.
 जिल्हा  एकर  जिल्हा  एकर
 सोलापूर  १२७८०००  अहमदनगर  ८८०५५१
 विजापूर  १४४४२८५  पुणें  ७५१२७९
 धारवाड  ६१४६०४  नाशिक  ११८६२९
 बेळगांव  ६४३७१५  सातारा  ५१४६५३
 अमदाबाद  ३२८४२८  पश्चिम खानदेश  १३५२८९
 पूर्व खानदेश  ३८५२०२
 (मुंबई सीझन आणि क्रॉप रिपोर्ट सन. १९१५-१६).

मध्यप्रांत व वर्‍हाडांत जोंधळा बहुतेक खरीफ हंगामांत पेरितात, व रब्बीचा पेरा थोड्याबहुत प्रमाणांत नागपूर भागांत आढळतो.

 मध्यप्रांत  व वर्‍हाड प्रांतांतील मुख्य जिल्ह्यांतील क्षेत्र.
 जिल्हा  एकर  जिल्हा  एकर
 नेमाड   २३२२२५  अकोला  ७३०९२८
 वर्धा  २६१४२८  उमरावती  ५६७५४८
 नागपूर  २२८४९५  बुलढाणा  ५६९४१७
 व यवतमाळ  ६७५९५०
 वर्‍हाड व मध्यप्रांतांतील एकंदर क्षेत्र (एकर)
 मध्यप्रांत  १५०८०८९
 वर्‍हाड  २५४५३३९
 (सीझन आणि क्रॉप रिपोर्ट मध्यप्रांत व वर्‍हाड, १९१५-१६).

जोंधळा पिंकणार्‍या प्रांतांचें नंबर पुढें दिल्याप्रमाणें लागतात- मुंबई, मुद्रास, संयुक्तप्रांत, वर्‍हाड, मध्यप्रांत, पंजाब.

जा ती.- जोंधळ्याच्या सुमारें १५० जाती आहेत. त्यांपैकीं खरिफांत रब्बी हंगामापेक्षां जास्त आहेत. रब्बी जातीच्या धान्याची भाकरी जास्त चवदार असते. गुजराथेंत चपटी, पिरीयो व सोलापुरी या मुख्य जाती आहेत. खानदेशांत मोठी, अळसपूरी, निरमळी, गुडघी, सातार्‍यांत डुकरी व गिडग्याप; धारवाड जिल्ह्यांत फुलगार (पिंवळी व पांढरी), शडगार, नडीयाल ह्या खरीफांतील मुख्य जाती होत.

मध्यप्रांतांत व वर्‍हाडांत धामणी, आमनेर, सावनेर. डुकरी व गानेर ह्या मुख्य खरीफ जाती होत. ह्या तयार होण्याला जास्त वेळ लागतो. याशिवाय रामकेळ, जगदन, नाटोरा वगैरे जातींचा पेरा हलक्या जमिनींत होत असून त्या लवकर तयार होतात. मोतीचुरा अगर मोतीतुरा ह्या जातींत कणीस फिसकारलेलें असल्यामुळें पांखरांनां वर बसून दाणें खातां येत नाहींत. कणखारी अगर कावळी जातींत दाण्याला वरून काळें व घट्ट बोंड असतें. वाणी म्हणून एक जोंधळ्याची जात आहे. ती हुरड्याकरितां मुद्दाम पेरतात. दगडी, मालदांडी, गुळभेंडी, कावळी, रिंगणी वगैरे रब्बी हंगामांतील मुख्य जाती होत. रब्बी जोधळ्याचें पीक महाराष्ट्रआत व निझामच्या राज्यांत बर्‍याच प्रमाणावर आढळतें. कोंकणांत जोंधळा फारच विरळा आढळतो.

ज्वारी कोणत्याहि जमिनींत होते. तरी या पिकास जितकी उत्तम जमीन असेल तितकी चांगली. रब्बी हंगामांतील ज्वारीस काळी चिक्कण जमीन चांगली. ज्वारीचें उत्तम पीक येण्यास २० ते ३० उंच पावेतों हंगमशीर पाऊस पडला पाहिजे. ज्वारी, कापूस, गहूं, हरभरा, जवस, वगैरेंशीं आळीपाळीनें पेरितात. खानदेशांत, मध्यप्रांतांत व वर्‍हाडांत उडीद, मूग, मटकी व अंबाडी यांचा उतवडा असतो. गुजराथेंत व महाराष्ट्रांत तूर, उडीद, तीळ, मठ व मूग यांची मिसळ करतात. शाळू जोंधळ्यांत करडई व हरभर्‍याची मिसळ करितात. किंवा त्याचे शेतांत पाटे घालितात.

कापसानंतर ज्वारीचें पीक घेणें असल्यास कपाशीची जमीन खतवावी म्हणजे तेंच खत ज्वारीच्या पिकास उपयोगी पडतें. पलाट्या वगैरे काढून झाल्यावर कित्येक लोक जमीन नांगरतात. परंतु सर्वसाधारण चाल उन्हाळ्या दिवसांत वरचेवर कुळवाच्या पाळ्या देणें ही होय. खत दिल्यास ते मात्र नांगरानें जमिनींत मिसळावें लागतें गुजराथेंत जमीन हलक्या नांगरानें नांगरतात व नंतर पाळ्या घालून ती चांगली तयार करतात. शाळूकरितां जमीन पावसांत नांगरून कुळवून तयार करितात. जमीन तयार झाली म्हणजे पाऊस पडून वाफसा झाल्याबरोबर ज्वारी पेरतात. खरीप ज्वारी पेरण्याचा हंगाम जून अखेर पावेतो असतो. कांहीं जातींची ज्वारी जुलईंत पेरली असतां चांगली येते. रब्बी जातीचा पेरा सप्टेंबर, आक्टोबरांत करितात.

जोंधळ्यांत काणी अगर काजळ्या रोग होऊं नये म्हणून पेरणीपूर्वीं बीं मोरचुदाच्या पाण्यांत भिजवून मग पेरावें. मिश्रण करतांना पाण्यांत शेंकडा २ याप्रमाणें मोरचुदाची पूड मिसळावी. मिश्रणांत १० मिनिटें बीं ठेवावें व नंतर बाहेर काढून तें सावलींत वाळवावें व नंतर पेरण्यास न्यावें.

दर एकरीं ६ ते ८ पौंड जोंधळा व सुमारें २ पौंड उतवडा लागतो. शहराशेजारील गावांत जेथें कडबीची फार मागणी असते तेथें बियाचें प्रमाण दर एकरीं सुमारें ४० पौंडपावेतों असते. दाट पेरा केला म्हणजे ताट बारीक येतें व तें गुरें मोठ्या आवडीनें खातात.

गुजराथेंत व खानदेशांत पेरणी दुसर्‍यानें करितात. दोन ओळींत १ १/२  फूट अंतर असतें. वर्‍हाडांत आणि मध्यप्रांतांत बीं तिफणीनें पेरितात. व देशावर पाभरीनें पेरितात. पाभराच्या नळ्यांत अंतर ९ इंच ते १ फूटपावेतों असतें. बीं पातळ पेरलें म्हणजें कणसें मोठीं येतात. शाळूची पेरणी मोघडानें म्हणजे जड पाभरीनें करितात. कारण दाणा खोल पडावा लागतो. ओळींत अंतर १६-२० इंच पर्यंत असतें. ज्वारीच्या पिकास दोन तीन कोळपण्या व एक भांगलणी देतात. पांखरांपासून (भोरड्या, चिमण्या, साळुंक्या, वगैरे) ज्वारीची राखण सुमारें दोन अडीच महिने करावी लागते. कावळी म्हणून एक ज्वारीची जात आहे. तिचा दाणा भोंडांत असल्यामुळें तों पांखरांस खातां येत नाहीं. ही ज्वारी कधीं शेताच्या कडेनें पेरितात. खरीप ज्वारीचें पीक नोव्हेंबर व जानेवारीत होतें व शाळूचें फेब्रुवारी ते मार्चअखेर होते.

ज्वारीचें पीक तयार झाल्यावर ताटें उपटतात, किंवा कापतात. ताटें जाड व रांठ असल्यास तीं विळ्यानें कापतात. परंतु बारीक असल्यास कांहीं उपटतात व कांहीं कापतात. गुजराथ, खानदेश, मध्यप्रांत व वर्‍हाडप्रांतांतील कांहीं ठिकाणीं उंच जोंधळ्याची सुमारें २ ते ३ फूट उंचीचीं ताटें जमिनींत राखून वरील भाग कापून घेतात. शाळू जोंधळा बहुतेक उपटतात. नंतर त्याच्या पेंढ्या बांधून ४-५ दिवसांत वाळल्या म्हणजे कणसें खुडून घेवून तीं खळ्यांत नेऊन बैलांच्या पायांखालीं मळतात. तूर खेरीजकरून बाकी मिसळीचीं पिकें जोंधळ्यापूर्वींच निघतात. कित्येक वेळीं शाळूचीं कणसें पीक उभें असतानांच कापून घेतात. सर्व साधारणपणें कणसें बैलाच्या पायांखालीं मळतात. हें मळण्याचें काम दगडी रुळाने फार कमी खर्चांत होतें इ. स. १९१३-१४ मध्यें जळगांव (खानदेश जिल्हा) येथील सरकारी शेतावर दगडी रुळानें मळणी केल्याचा तपशील खाली दिला आहे.

 बैलानें मळणी  दगडी रुळानें मळणी
 कणसाचें वजन पौंड  ५६३९  ५३६३
 दाणे वजन पौंड  ४५६०  ४३२०
 मजुरी ८ तासास माणसें  ३  २
 मजुरी ८ तासास बैल  ८  २
 मळणीस वेळ, ता  १४  १७-२०
 खर्च रुपये  ६-१४-३  २-१३-१०
  दर हजार पौं खर्च रु.१-८-५   ०-६-७

उपयोग - जोंधळ्याच्या लाह्या, भाकरी, कण्या, वगैरे करून खातात. जोंधळ्याचा दाणा कोंवळेपणीं भाजून खातात, त्यास हुरडा म्हणतात. वाणीचा हुरडा फार नरम व हिरवागार असतो. हिरवी ताटें व वाळलेला कडवा ही जोंधळा पिकणार्‍या मुलखांतील मुख्य वैरण होय. दर एकरीं पेंढ्या सुमारें २५० त ४५० होतात. पेंढीचें वजन ३ ते ७ पौंड असतें. चांगल्या जोंधळ्याचे दाणे तोळ्यांत २२० ते २३० भरतात. दर एकरी उत्पन्नाचे सरासरीचे आंकडे पुढील प्रमाणें:- (आंकडे पौंडाचे आहेत)

 खरिफ जोंधळा  ६००- १०००
 कडबी  १५००-३०००
 भुसकट  ३००-५००
 उडीद  १००-३००
 तूर  ७५-१००
 कडदणाचें भूस  ३००-५००
 रब्बू-शाळू, जोंधळा  ६००-७००
 कडबी  १०००-१५००

कडबा- ज्वारीच्या पिकाचा दाण्याखेरीज कडब्याकरितांहि उपयोग होतो. ताटे चांगलीं पोसलेलीं व पक्व झालेलीं असावीं लागतात. मुंबई इलख्यांत हिरव्या ताटांचाहि कडबा काढतात. हिरवा कडबा असणार्‍या ज्वारीच्या सहा जाती आहेत. (१) सुंठिया- ह्या ज्वारीचा कडबा उत्तम समजला जातो. (२) दुधिया ही ज्वारी खैरा व बडोदा प्रांतांत होते. (३) निळवा- ह्या ज्वारीचा कडबा दख्खनमध्यें उत्तम गणला जातो. (४) उतावळी ह्या ज्वारीचीं कणसें चांगली भरत नाहींत. (५) व (६) काळबोंडी. या सर्व जातींची माहिती ‘चारा’ या लेखांत सांपडेल. या ज्वारीच्या सर्व जातींचा कडबा वजनदार असून त्यांस भरपूर रस असतो. हुंडी व काळबोंडी या ज्वारीचा कडबा उन्हाळ्यात गुरांनां टाकतात व त्यानें गुरें चांगलीं पुष्ट होतात. कडब्याकरितां पेरणी मे महिन्यांत सुरू करून ती जून व जुलै महिन्यांतहि चालू ठेविली असतां कडब्याची कापणी जुलैपासून मार्च व एप्रिलपर्यंत तीनदा होते; व कांपणी करून वाळलेला कडबा चांगला सांठवितां येतो. कडबीची गंजी लावून ठेवितात कित्येक ठिकाणीं लहान वरळीच्या आकाराची गंजी लावून ती मातीच्या ढेकळांनीं दडपून ठेवितात. कित्येक ठिकाणीं सर्व गंजी चिखलानें लिंपून ठेवतात. त्यांस ठेवण पद्धत म्हणतात.

कि र ळ- वि ष.- शेतांत उभीं असलेलीं सरासरी एक दीड महिन्याच्या आंतील कोंवळ्या ज्वारीची ताटें जनावरांनीं खाल्लीं असतां त्यापासून त्यास होणारा जो रोग त्यास आपल्याकडील शेतकरी “किरळ” असें म्हणतात. कांही एका विवक्षित स्थितींत असतांना त्या कोवळ्या ज्वारीच्या ताटांत एक प्रकारचे विष उत्पन्न होऊन त्या विषाची बाधा जनावरांस होते. आतां हें विष ज्वारीच्या ताटांत कसें पैदा होतें तें पाहूं. प्रत्येक ताटाच्या शरीरांत जीं अनेक द्रव्यें आहेत, त्यांत “ग्ल्युकोसाइड” या नावांचें एक द्रव्य असून त्याचे पुष्कळ प्रकार आहेत.त्यांपैकीं ज्यास ‘ढुरिन’ म्हणतात असें जें ग्ल्योकोसाइड आहे तें ज्वारीच्या ताटांत सर्व ठिकाणीं असून अवयवविशेषीं त्याचें प्रमाण मात्र बदलतेसें दिसतें. ज्या भागांत ग्ल्युकोसाइड असेल त्याच भागांत अवश्य पण वेगवेगळ्या परणाणूंत “एंझायम्”- ज्यास निरावयव अति सूक्ष्मजंतू म्हणतां येईल असा पदार्थ- असतो; आणि ताटाच्या ज्या भागांत हे दोन पदार्थ असतील त्यास पाण्यांत घालून ठेंचून अथवा वाटून तें तयार झालेलें मिश्रण थोडावेळ ठेविलें असतां ग्ल्युकोसाइड व एंझायम्  यांच्या परमाणूंचा संयोग होऊन त्यांचें “प्रुसीक अ‍ॅसिड” बनतें. त्याच्या फक्त एका बिंदूनें प्राण जातो; पण हेंच मिश्रण थोडें ऊन केलें असतां त्यांती विष अगदीं नाहीसें होतें.

ज्वारीच्या इतर अवयवांपेक्षां तिच्या पानांत याचें प्राबल्य जास्त असतें. पण तें ताट जसजसें जून होत जाईल तसतसें त्या प्रुसिक अ‍ॅसिडचें प्रमाण कमी होत जाऊन तें शेवटीं अगदीं नाहीसें होतें. याकरितां कोंवळी ज्वारी जनावरास न खाऊं देण्याविषयीं शेतकरी नेहमी काळजी घेत असतात. जर एखादे जनावर डोळा चुकवून कोवळ्या ज्वारीच्या शेंतात गेलें आणि त्यानें तीं पानें नीट चावून गिळलीं तर त्या जनावारच्या पोटांतील पाण्याशीं तीं पीनें मिसळून त्या ताटाचीं पानें फार  विषारी असल्यास हें विष तयार होऊन त्यायोगें चार सहा दिवसांत तें जनावर ठार मरतें आणि विशेष विषारी नसल्यास जनावर एकदोन दिवस रेंगाळून पुन्हां सुधारतें. आतां कोणती जात कमी व कोणती जास्त विषारी आहे याबद्दल अद्याप पक्के अनुमान लागलें नाहीं. करतां कोंवळीं आहे तोपावेतों कोणत्याच जातीची ज्वारी जनावारस खाऊं न देणें सुरक्षितपणाचें व शहाणपणाचें काम होय. (केसरी ३०।१०।१९०६)

कोंकणांत वरकस जमिनींत खरीप ज्वारीची लागवड करण्याचे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. ‘मानट’ किंवा ‘मानवट’ जमिनींतूनहि शाळूचीं पिकें काढतां येतील कीं नाहीं याकडे शेतकीखात्याचें लक्ष लागलें आहे, हें त्यांच्या हस्तपत्रकांवरून दिसेल. [वाटे, शेतकी  रिपोर्ट वगैरे.]

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .