प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

ज्वालामुखी - हें प्रसिद्ध प्राचीन क्षेत्र असून त्या ठिकाणीं देवी वज्रेश्वरीचें देवस्थान आहे. पंजाबमधील कांग्रा जिल्ह्यांत कांग्रा शहरच्या भवन नांवाच्या परिकरांत उ. अ. ३१० ५२’ व पू. रे. ७६० २०’ यांवर हें वसलें आहे. १९०५ सालच्या धरणीकंपनानें याचा बराच नाश केला. हिंदूंच्या अग्र्युपासनेचें हें केंद्रस्थान आहे. गिझनीचा महंमद आणि फिरूज तघलख हे अनुक्रमें  इ. स. १००९ आणि १३६० मध्यें नगरकोटवरील स्वारीच्या वेळीं येथें आले होते. फिरूझ तघलखाच्या स्वारीचा इतिहास देतांना शम्स- इ- सिराज या इतिहासकारानें फिरूझ तघलखनें वज्रेश्वरी देवीला मान दिल्याबद्दलच्या गोष्टीचा पुढील शब्दांत निषेध केला आहे:-

“कांही काफर असें सांगतात कीं, सुलतान फिरूझ मुद्दाम येथील देवीची मूर्ति पाहण्यास गेला आणि त्यानें आपल्या हातानें देवीच्या डोक्यावर सोन्याची छत्री धरली. ... या काफरांनीं धार्मिक व पापभीरू सुलतानची यायोगें निंदा केली आहे. दुसरें कांहीं काफर असें म्हणतात कीं, सुलतान महंमदशहा बिन तघलखशहा यानें याच देवीवर स्वतः छत्री धरली; पण हें खोटें आहे व चांगल्या मुसुलमानांनीं अशा विधानांनां कांहीं एक किंमत देऊं नये.” (ईलियट- हिस्टरी ऑफ इंडिया, पु. २ व ३. लंडन, १८६७-१८७७).

या उल्लेखावरून असें दिसतें कीं मुसुलमान लोक सुद्धां हा भक्तिसंप्रदाय मान्य करीत अकबर बादशहाचा बखरकार अबुलफजल ‘महामाया’ असा देवीचा नामनिर्देश करून या देवस्थानचे पुढीलप्रमाणें वर्णन करतो:- “पुष्कळ दूरदूरच्या भागांतून यात्रेकरू येथें येतात व आपली मनीषा पूरी करून घेतात. आपली प्रार्थना देवीनें ऐकून घ्यावी म्हणून ते स्वतःची जीभ कापून घेतात. कांहींच्या जिभा त्याच जागीं पुन्हां येतात तर कांहीच्या पुढें एक दोन दिवसांनीं येतात. औषधोपचारानें जीभ वाढण्याचें काम सुलभ होत असलें तरी इतक्या थोड्या वेळांत ती येत असलेली पाहून मोठें आश्चर्य वाटतें. [ऐने- इ- अकबरी याचें जारेटनें केलेलें भाषांतर, पु. २(कलकत्ता, १८९१) ३१२.]

गोपथ ब्राह्मणांतील कथा अबुलफजलनेंहि निर्दिष्ट केली आहे. ती कथा म्हणजे शिव आणि त्याचा श्वसुर दक्ष यांच्यामध्यें वैमनस्य असल्यानें दक्षानें त्याला आपल्या यज्ञास बोलाविलें नाहीं. तेव्हां शिवपत्‍नी उमा किंवा सती हिला अपमान वाटून तिनें आत्महत्या केलीं. तेव्हां विष्णूनें तिच्या शरीराचें तुकडे केले त्यांपैकीं जीभ या ठिकाणीं पडली असल्याचें सांगतात. वायुपुराणांत सुबक्ष आणि शिखिशैल या पर्वतांच्या शेजारीं एक शंभर योजनांचा सपाट प्रदेश असून त्या जमिनींतून ज्वाला बाहेर निघतात असें जें वर्णन आहे, तें निःसंशय ज्वालामुखीसंबंधींच होय. शीख गुरु अंगडशहा हा येथें आला असतां त्यानें येथील मूर्तिपूजेसंबंधीचा विधि नापसंत केल्याचें सांगतात.

सी. हुगेलनें येथील प्रवासाचें उत्तम वर्णन लिहून ठेविलें आहे (ट्रव्हेल्स इन काश्मीर अँड पंजाब). येथें देवीची मूर्ति वगैरे कांहीं एक नसून मुख्य देवळाच्या मध्यभागीं एक खड्डा आहे. त्याच्या दोन्ही बाजूला फकीर बसतात. खड्डयाच्या आंतून एकसारखी ज्वाला वर येत असते. आणखी दोन ठिकाणींहि खडकांतून अशाच तर्‍हेच्या ज्वाला बाहेर पडतांना दिसतात, भाविक लोक देवळामध्यें शिरतांच पूजेचें साहित्य म्हणजे बहुधां फुलें या फकीरांच्या हातीं देतात व ते फकीर तीं प्रथम ज्वालेवर धरून नंतर देवळांत टाकून देतात. येथून जवळच साधु गोरखनाथाचें देऊळ आहे. हें ठिकाण पूर्वीं बौद्धधर्मीय असल्यानें येथील ब्राह्मण भिक्षुकांनां कमी प्रतीचें लेखण्यांत येतेंसे दिसतें. कारण मुख्य पुजार्‍याला ‘भोजकी’ पुजारी असें नांव आहे. ज्या ब्राह्मणांनां श्राद्धाच्या वेळीं यात्रेकरू जेऊं घालतात त्या ब्राह्मणांना ‘भोजकी’ हें गौणत्वदर्शक उपपद लावतात. ते मूळचे ब्राह्मण नसून शेतकरी जातीचे होते, पण पुढें देवस्थानाशीं त्यांचा संबंध आल्याकारणानें ते आपणाला ब्राह्मण म्हणवून घेऊं लागले असें सांगतात ज्वालामुखी देवीचा संप्रदाय बंगाल आणि दक्षिण येथेंहि पसरला असून खाखार नांवाचे रानटी याच नांवाच्या अग्निदेवतेचें भजन पूजन करतात.

ज्वालामुखी - ज्वालामुखी व याच वर्गांतील इतर चमत्कारसंबंधीं एक मुख्य गोष्ट म्हणजे पृथ्वीच्या अंतर्भागांतून उष्ण पदार्थ वर येऊन पडणें ही होय. ह्या चमत्कारांपैकीं कांहींचे परिणाम थोड्या कालपर्यंत टिकणारे असतात, तर कांहींचें शाश्वत असून त्याचा पुरावा कायमचा राहतो व या दुसर्‍या तर्‍हेच्या चमत्कारांवरूनच भूस्तरशास्त्रवेत्यांनां ज्वालामुखींच्या संबंधीं खरी माहिती मिळते; कारण हजारों वर्षांपूर्वीं जरी एखाद्या ठिकाणीं ज्वालामुखीचा स्फोट झालेला असला तरी तेथें असलेल्या अवशिष्ट चिन्हांवरून त्याचें अस्तित्व समजूं शकतें.

जागृतावस्थेंत असलेल्या ज्वालामुखीसंबंधीं माहिती दुरूनच गोळा करावी लागते म्हणून ती फारच अपुरी असते. परंतु निद्रित असलेल्या ज्वालामुखीजवळ जाऊन स्वस्थपणें सर्व बारीक गोष्टी पाहून व पूर्ण अभ्यास करून माहिती जमवितां येते. कांहीं ठिकाणीं पृथ्वीच्या पृष्ठभागांत पूर्ण क्रांति होऊन एखाद्या ज्वालामुखीचा तळ वर पृष्ठभागावर आलेला दिसेल व ज्या भागाची माहिती जागृतावस्थेंत कधींहि मिळणें शक्य नाहीं ती सहजच मिळूं शकेल. म्हणून शास्त्रज्ञांनी फक्त जागृतावस्थेंत असलेल्या ज्वालामुखींचाच अभ्यास करून भागत नाहीं तर ज्या ठिकाणीं निद्रितावस्थेंत असलेल्या ज्वालामुखीची अवशिष्ट चिन्हें अगर खाणाखुणा सांपडतील त्या सर्व ठिकाणची माहिती त्यांनां मिळवावी लागते. म्हणजे ज्वालामुखीसंबंधीं खरें व सोपपत्तिक ज्ञान प्राप्त होतें. “ज्वालामुखी” म्हणजे निमुळता आकार असलेली टेंकडी अगर डोंगर असून त्याच्या शिखरामधून वायुरूप पदार्थ, राख किंवा वितळलेले द्रवरूप पदार्थ मधून मधून बाहेर पडत असतात, व अशा बाहेर येणार्‍या पदार्थांच्या संचयामुळेंच हा निमुळता आकार आलेला असतो; किंबहुना ही टेंकडी अगर डोंगर ह्या पदार्थांचाच बनलेला असतो. ह्याशिवाय पृथ्वीच्या अंतर्भागांतील पदार्थ ज्या इतर निरनिराळ्या तर्‍हेनें पृष्ठभागावर येण्याचा प्रयत्‍न करतात ते सर्व चमत्कार ज्वालामुखीच्या चमत्काराशीं बर्‍याच अंशीं संलग्न झालेले आहेत, व त्यांचा विचार ह्याच विषयाबरोबर केला पाहिजे.

हल्लीं जागृत असलेल्या ज्वालामुखींवरून सर्व तर्‍हेच्या ज्वालामुखींच्या संबंधानें यथार्थ कल्पना येणार नाहीं. एखादा ज्वालामुखी नवीन तयार होण्यापूर्वीं पृथ्वीच्या अंतर्भागात अतिशय दाबाखाली असलेले वायुरूप पदार्थ घनपृष्ठभागांतून वर येण्याचा प्रयत्‍न करतात.

(१) कधीं कधीं हे पदार्थ घनपृष्ठांतविवर कोरून वर येतात व तसे होतांना हे घनपदार्थ अतिशय जोरानें वर फेंकले जातात, (२) व केव्हां कव्हां पृष्ठभागांत एखादी भेग अगर पोकळी तयार करून त्यांतून वायुरूप, घनरूप वगैरे पदार्थ बाहेर येतात. पूर्वेकडील अगर पश्चिमेकडील बहुतेक खंडांत निमुळत्या डोंगरांच्या ज्वालामुखीच्या ऐवजी अगणित अशा भेगांतून हजारों चौरस मैलपर्यंत खडकांचा रस वर येऊन त्याचे सपाट थरच्या थर पसरलेले सांपडतात. अशा तर्‍हेचे स्फोट मनुष्याच्या आठवणींत फारसे कोठे झालेल्याचा दाखला नाहीं. फक्त १७८३ सालीं आइस्लंड बेटांत अशा तर्‍हेच्या भागांतून स्फोट झालेला नमूद केलेला आढळतो. पहिल्या तर्‍हेच्या ज्वालामुखीसंबंधीं पुष्कळच माहिती उपलब्ध आहे. कारण व्हेसुव्हिअस, एटना, लिपटी बेटें ह्या ठिकाणीं वरचेवर अशा तर्‍हेचे ज्वालामुखीचे स्फोट होत असतात म्हणून त्यांच्यासंबंधी सांगोपांग माहिती जमा करितां आलेली आहे. परंतु दुसर्‍या तर्‍हेचे ज्वालामुखीचे चमत्कार (फिझ्युअर एरप्शन) कोठेंच अलीकडे होत नसल्यामुळें त्यांची कारणें व कार्यें चांगलीशी समजत नाहींत. प्रथमतः आपण व्हेसुव्हिअस वगैरें ठिकाणीं असलेल्या प्रकारच्या ज्वालामुखीसंबंधी विस्तृतपणें विचार करूं व नंतर दुसर्‍या प्रकारासंबंधीं शक्य तेवढी माहिती देऊं.

ज्वालामुखींचा निमुळता आकार हा आंतून स्फोटाबरोबर निरनिराळे पदार्थ बाहेर पडून विवराच सभोंवार पडल्यामुळें स्वाभाविकपणें आलेला असतो. व्हेसुव्हिअस व त्याच्यासारख्या इतर ज्वालामुखींचा आकार म्हणजे शिखराप्रमाणें निमुळता होत गेलेला भाग, पण त्याचा वरील भाग मात्र नाहींसा झालेला असून वर द्रोणाकार खळगा असतो व त्यासच ज्वालामुखीचें मुख असें म्हणतात. ह्या मुखापासून खोल-लांबवर एक विवर असतें व त्याचा पृथ्वीच्या आंतील उष्णपदार्थापर्यंत संबंध असतो, तेव्हां त्यांस एकच शिखर असून एकच मुख असतें. जेव्हां ज्वालामुखी फार मोठा असतो तेव्हां हें निमुळतें शिखर म्हणजे एक फार मोठा डोंगर असून त्याला पुष्कळ दुय्यम शिखरें व विवरें असतात, व ह्या सर्वामधून स्फोट होत असतांना निरनिराळे पदार्थ बाहेर येतात. एटनां पर्वत हें अत्यंत मोठ्या अशा ज्वालामुखीचें उत्तम उदाहरण आहे. हा पर्वत समुद्रसपाटीपासून १०८४० फूट उंच असून त्याला २०० दुय्यम शिखरें आहेत. कांहीं मोठमोठ्या ज्वालामुखींनां एक मोठें मुख असण्याऐवजीं त्यांचें स्फोट डोंगरांच्या आजूबाजूनेंच होतात. ज्वालामुखीचें स्फोट होऊन जी द्रव्यें बाहेर पडतात त्यांचे ४ वर्ग करितां येतील- (१) वायुरूप पदार्थ, (२) प्राणी, (३) वितळलेले खडक (लाव्हा) आणि (४) इतर घनरूप पदार्थ.

(१) वायुरूप पदार्थ :- निरनिराळे वायू अगर निरनिराळे वायुरूप पदार्थ (व्हेपर्स) पृथ्वीच्या अंतर्भागांतींल वितळलेल्या खनिज (मोल्टन, मॅग्मा) द्रव्यांत विद्राव्य स्थितींत असतात, व ज्वालामुखीचे स्फोट होण्यास पुष्कळसे कारणीभूत होतात. यांतील कांहीं वायू स्फोटाच्या आरंभीं बाहेर पडतात तर कांहीं स्फोटाचा जोर व उष्णान कमी होत आलें असतां बाहेर येतात. ह्या सर्व वायुरूप पदार्थांत अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे जलवायु (वाटरगॅस) हा असून शेंकडा ९९ ह्या प्रमाणांत असतो. याचें रूपांतर होऊन (पाण्याची वाफ होऊन). त्याचे ढग जागृत ज्वालामुखीच्यावर तरंगतांना दिसतात. अतिशय मोठमोठ्या ज्वालाग्राहींच्या स्फोटांच्या वेळीं फारच मोठ्या प्रमाणांत वाफ बाहेर पडून ती थंड होऊन मोठा पाऊस पडतो. एम. फोके नांवाच्या शास्त्रज्ञांचें असें म्हणणें आहे कीं एटना पर्वताच्या एका दुय्यम ज्वालामुखीच्या स्फोटाच्या वेळीं १०० दिवसांत सुमारें ४६, २०,००,००० ग्यालन पाणी बाहेर पडलें. इ. स. १९०२ च्या मे महिन्यांत सेंट [व्हिन्सेट, व मार्टिनिक येथें जें प्राणघातक स्फोट झाले त्यांचें, मुख्य कारण अशा तर्‍हेची अत्यंत उष्ण अशी पाण्याची वाफ हेंच होय. इतकेंच नव्हें तर शेंकडों वर्षें निद्रित असलेल्या नेपल्समधील सोल्फाटारा ज्वालामुखींतून कधी कधीं नुसती पाण्याची वाफ एक सारखी पुष्कळ प्रमाणांत बाहेर पडते.

वाफेचे फवारे ज्वालामूखीच्या बाजूच्या अगर तळाच्या भेगांतून बाहेर येतात त्याच्याबरोबर एंजिनच्या शिटीप्रमाणें आवाज होतो. ही पाण्याची वाफ इतक्या मोठ्या प्रमाणांत बाहेर येत असते कीं ज्वालामुखीचे सर्व भाग झांकून गेलेले असतात व क्वचित प्रसंगी जेव्हां वार्‍यानें वाफ बाजूस जाते तेव्हां थोडासा भाग द्दग्गोचार होतो. ही वाफ बाहेर पडत असतांना जो एकंदर गडगडाट चालू असतो त्यावरून कांहीं अंतरावर असणार्‍या एखाद्या कारखान्याचा भास होतो. ही पाण्याची वाफ पुष्कळ काळपर्यंत ज्वालामुखी पर्वताच्या शिखरापासून लांब असणार्‍या इतर थरामधून येत राहते. खडकांचा रस जो ज्वालामुखींतून बाहेर येतो, त्यांत पुष्कळच पाण्याची वाफ असते व त्याठिकाणीं वाफेचें उष्णमान फारच भयंकर असूं शकतें.

ही पाण्याची वाफ शुद्ध नसतें, तर हींत दुसरे पुष्कळ वायू विरघळलेले असतात; व हे वायू निरनिराळ्या ज्वालामुखीतून निरनिराळे असूं शकतात. अतिशय उष्ण व अत्यंत जागृत अशा ज्वालामुखींतून सर्व तर्‍हेचे वायू बाहेर येत असतात; परंतु उष्णता जसजशी कमी होत जाते तसतसे हे वायूरूप पदार्थहि कमी होतात. व्हेसुव्हिअस पर्वताचा जो १८५५-५६ सालीं स्फोट झाला त्यावेळीं प्रथम येणार्‍या वायूमध्यें, हायड्रोक्लोरिक, क्लोराइड्स आणि सल्फ्युरस अ‍ॅसिड हे वायू होते, त्यानंतर पाण्याची वाफ व नंतर कार्बन डाय ऑक्साइड व इतर ज्वालाग्राही वायू होते. अगदीं नवीन शोधांवरून असें दिसतें कीं, क्लोरीन (व प्लुयुरीन) वायू बाहेर येतो तेव्हां स्फोटाची जागृत अवस्था असते. गंधकमय वायु येतांना त्याचा जोर कमी झालेला असतो, व कॅर्बानिक अ‍ॅसिड वगैरे येतांना तो स्फोट शेवटच्या अवस्थेंत असतो असें समजण्यास हरकत नाहीं. वूल्फ नांवाच्या शास्त्रज्ञानें असें पाहिले आहे कीं, कोटोपॅक्सी येथील ज्वालामुखी पर्वताच्या शिखरामधून हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड, क्लोरिन हे वायू येतात व सल्फरेटेड हायड्रोजन, सल्फ्यूरस अ‍ॅसिड वगैरे वायू त्या डोंगराच्या मध्यावरून अगर उतारावरील भेगांतून बाहेर येतात.

समुद्राच्या तळाशीं जे ज्वालामुखी असतात त्याठिकाणीं सुद्धां असाच पद्धतीनें निरनिराळें वायू बाहेर पडतात असें आढळून आलें आहे वर नमूद केलेल्या वायूरूप पदार्थांशिवाय इतरहि पुष्कळ प्रकारचे वायू ज्वालामुखींतून बाहेर येत असतात. त्यांतील मुख्य म्हटले म्हणजे, नायट्रोजन, आयोडिन, ब्रोमीन, बोरिक अ‍ॅसिड वगैरे होत. पृथक्करणावरून असें आढळून आलें आहे कीं, या वर येणार्‍या वायुरूप पदार्थात वीस मूलभूत द्रव्यें अगर त्यांचेच एकमेकांशीं संयोग होऊन झालेले निरनिराळे पदार्थ असतात. हे वायुरूप पदार्थ वर येत असतांना त्यांची निरनिराळ्या खडकांवर रासायनिक क्रिया घडत असते. इतकेंच नव्हे तर त्यांच्या जवळपास असणार्‍या वनस्पतीवर व प्राणिमात्रावरहि हानिकारक परिणाम होतो. यांतील कांहीं वायुरूप पदार्थ वर आल्यावर थंड होतात व घनीभूत होऊन त्यांचे निरनिराळे खनिज पदार्थ होतात.

(२) पाणी :- पुष्कळ ज्वालामुखींच्या स्फोटांबरोबर पाण्याचे लोटच्यालोट बाहेर पडतात. हें पाणी तीन निरनिराळ्या ठिकाणांहून येऊं शकतें. (अ) ज्या डोंगराच्या शिखरावर बर्फाचा संचय असतो त्या ठिकाणचा बर्फ ज्वालामुखीच्या उष्णतेनें एकदम वितळून त्याचें पाणी होऊन तें प्रवाहरूपानें वाहूं लागतें. आइस्लंडमधील एटना पर्वतावर अँडीज डोंगरावरहि अशा तर्‍हेनें असलेले बर्फाचे थर ज्वालामुखीच्या स्फोटाच्या वेळी एका रात्रींत वितळून त्यांचें पाणी होऊन वाहूं लागलेलें आढळलें आहे. (आ) स्फोट होत असतांना पाण्याची जी वाफ अतिशय मोठ्या प्रमाणांत वर येत असते ती थंड होऊन जलरूप होऊन प्रवाहांतून वाहूं लागते. ह्या तर्‍हेनेंच बहुतेक पाणी ज्वालामुखींच्या स्फोटांच्या वेळीं उत्पन्न होतें. (इ) पृथ्वीच्या अंतर्भागात जें पाण्याचे संचय असतात त्यांतून अगर ज्वालामुखीच्या शिखरावर सरोवरांप्रमाणें जे पाण्याचे संचय असतात त्यांतून पाणी वाहूं लागतें. दक्षिण  अमेरिकेंतील कांहीं ज्वालमुखीच्या शिखरांवर जीं सरोवरें आहेत त्यांतील माशांसह तें पाणी स्फोटांबरोबर वाहूं लागलेलें पुष्कळ वेळां आढळलें आहे. कधी कधीं अशा तर्‍हेनें सरोवरांत असलेलें पाणी वाहून गेल्यानंतर पुन्हा कांहीं वेळानें तें भरून येतें, परंतु त्याचें उष्णान मात्र कमी असतें. पुष्कळ वेळां ह्या पाण्यांत राख मिसळून त्याचा चिखल होऊन, चिखलाचेच प्रवाह वाहूं लागतात. कधीं कधीं पाणी व राख एकदम चिखलाप्रमाणें होऊनच बाहेर पडतात. व यांनां मङ्लाव्हा, असें म्हणतात. ह्यांत पुढें वाळूच्या कणापासून तो दगडांच्या मोठाल्या तुकड्यांपर्यंत लहान मोठे दगड मिसळून ते वाळल्यानंतर त्यांचे ठिसूळ दगड तयार होतात.

(३) लाव्हा अथवा भूगर्भांतील द्रव्यांचा रस- ह्याचें उष्णमान फार असून तो निरनिराळ्या घटक द्रव्यांचा असतो व तो द्रवरूप असल्यामुळें स्फोट होऊन बाहेर आल्यानंतर लांबवर वहात जाऊं शकतो. जसजसा हा रस थंड होत जातो तसतसा तो घट्ट होत होत त्याचे पुन्हां खडक होतात. लाव्हा द्रवरूप असतांना त्यांत निरनिराळे वायू कमजास्त प्रमाणांत मिसळलेले असतात व त्याचप्रमाणें त्यांत निरनिराळीं रूपांतरे सांपडू शकतात. कांहीं अत्यंत पातळ अगर पूर्ण द्रवरूप असतात, तर कित्येक मधाप्रमाणें मध्यम स्थितींत असतात व कांही तर जवळ जवळ घनरूप पदार्थासारखे असूं शकतात.

ज्याप्रमाणें त्यांच्या घनस्थितींत फरक असतो त्याप्रमाणें त्यांचे आणखीहि पुष्कळ निरनिराळे गुणधर्म कमजास्त प्रमाणांत असूं शकतात. (अ) त्यांच्या विशिष्टगुरुत्वांत पुष्कळ फरक असूं शकतात व साधारणपणें तें २.३७ पासून ३.२२ पर्यंत असतें (आ) जड तर्‍हेच्या लाव्हांत लोहांश जास्त प्रमाणांत असतो व अम्ल पदार्थ कमी प्रमाणांत असतात. म्हणून त्यांनां ‘बेसिक लाव्हा’ असें म्हणतात. त्यांत वालुका द्रव्याचें (सिलिका) प्रमाण शेंकडा ४५ ते ५५ पर्यंत असतें. हलक्या जातीच्या लाव्हांत धातूंचे अंश कमी असून आम्ल पदार्थ जास्त असतात व त्यांनां अ‍ॅसिड लाव्हा’ असें म्हणतात. ह्यांत सिलिकाचें प्रमाण शेंकडा ७० ते ७५ असावें. ह्या दोन जातींच्या लाव्हांशिवाय ह्यांच्या मध्यंतरीहि लाव्हा असतात. (इ) लाव्हांच्या रूपांतहि फरक असतात. कांहीं स्फटकिकमय असतात, तर कांहीं कांचेप्रमाणेच असतात व इतरांत लहान मोठीं छिद्रें असतात. (ई) त्यांचे रंगहि निरनिराळे असूं शकतात. काळा, पिंवळा, करडा, तांबूस वगैरे अनेक रंगांचे लाव्हा सांपडतात.

(४) खंडमय पदार्थ :- या सदराखालीं ज्वालामुखीच्या स्फोटांच्या योगानें जे जे घनरूप पदार्थ बाहेर पडतात, त्या सर्वांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, धूळ, रक्षा, वाळू अगर रेती, फोफाटा व लहान मोठे दगड. ह्या पदार्थांचे रंग, रूप, घनीभूत- द्रव्यें वगैरे अत्यंत निरनिराळीं असूं शकतात. एकाच ज्वालामुखीच्या स्फोटामुळें आलेले पदार्थहि अशा तर्‍हेनें भिन्न असूं शकतात. खालीं वर्णन केलेले ४-५ तर्‍हेचे पदार्थ जास्त महत्त्वाचे होत.

(अ) रक्षा व धूळ :- ह्यांचा रंग लांकूड अगर कोळसा जाळल्यानंतर मागे जो अवशेष राहतो त्यासारखा असतो, म्हणून त्यास रक्षा अशी संज्ञा दिली आहे. वास्तविक ही रक्षा नसून लाव्हा या पदार्थाचेच अत्यंत हलके असे परमाणू होत. हे इतके हलके व सूक्ष्म असतात कीं अगदीं बंद केलेल्या खोलींतहि आपला शिरकाव करूं शकतात व बंद केलेल्या पेटींतहि जाऊं शकतात. ही रक्षा किंवा धूळ वर येते तेव्हां तिचें उष्णमान बरेंच असतें व ही कधीं कधीं वाफेबरोबर मिसळून खालीं पडली म्हणजे जवळील पदार्थ करपून जातात.

(आ) लॅपिली :- लहान वाटाण्याच्या आकारापासून तों आक्रोडाच्या फळाच्या आकारापर्यंत जे लहानमोठे तुकडे बाहेर येतात त्यांनां लॅपिली असें म्हणतात. हे तुकडे वर्तुलाकार अगर अणकुचीदार असूं शकतात. बहुतकरून हे जड असतात पण कधीं कधीं पाण्यावर सहज तरंगतील असे हलकेही असूं शकतात; व अशा तर्‍हेचा स्फोट समुद्राजवळ झाल्यास समुद्राचे पृष्ठभाग तरंगत राहतात.

(इ) सेओराईः - लाव्हा वर येऊन थंड होत असतांना खडबडीत असे जे दगड तयार होतात त्यांनां सेओराई असें म्हणतात. हा खडबडीतपणा येण्याचें कारण आंतील वायूंचे प्रसरण होय. अशा तर्‍हेचे दगड पुष्कळ वेळां स्फोटांबरोबर मोठ्या प्रमाणांत बाहेर पडतात.

(ई) ज्वालामुखी बाँब:- ज्वालामुखीच्या विवरांत लाव्हा प्रथम थंड होऊन त्याचे थर तयार झालेले असतात परंतु पुढील स्फोटांच्या वेळीं आंतून येणार्‍या वाफेच्या योगानें हे दगडाचे थर फुटून त्यांचे तुकडे तुकडे वर फेंकले जातात. यांनां ज्वालामुखींतील बाँब असें म्हणतात. यांचा आकार लंबवर्तुळाप्रमाणें अगर गाईच कानाप्रमाणें असतो व यांची लांबी कांहीं इंचांपासून तो कांहीं फुटांपर्यंत असूं शकते. हे बहुतकरून भरींव असतात. परंतु कधीं कधीं पोकळहि असूं शकतात. यांचा आकार कधीं कधीं फारच मोठा असतो. त्यापैकीं एकाची मापें ६X ५ X१ मिटर म्हणजे सुमारे २५ घनमिटर असून त्याचें वजन सुमारें ६८ टन भरतें.

(उ) ज्वालामुखींतील दगडः- हे दगड मोठ्या आंकाराचे असून अणकुचीदार असतात. ज्वालामुखीच्या विवरांत घनीभूत झालेल्या खडकांचे हे तुकडे असतात. हे ज्वालामुखीचे स्फोट आरंभीच्या काळांत बाहेर पडतात व ज्वालामुखींत जवळपास कितीएक चौरसमैलपर्यंत प्रदेश आच्छादून टाकतात. अशा तर्‍हेनें हे जे दगडाचे तुकडे लांबवर पसरून पडलेले असतात व ते मोकळे न राहतां त्यांच्यावरील थराच्या खालच्या थरावर वजन पडून अगर चुन्यासारखे पदार्थ विरघळलेल्या पाण्याच्या क्रियेनें ह्या तुकड्यांचे पुन्हा खडक तयार होतात. यांनां अ‍ॅग्लोमेरेट (पिंडाकृति) अगर कॉन्गलोमेरेट असें म्हणतात. रक्षा, धूळ वगैरे इतर बारीक पदार्थांपासून जे खडक होतात त्यांनां टफ असें म्हणतात.

ज्वा ला मु खी ची क्रि या.- ज्वालामुखीची क्रिया दोन तर्‍हेची असूं शकते सतत चालू असणारी अगर नियमित कालानें उद्भवणारी. दोन्ही तर्‍हेच्या क्रियांची पुष्कळ उदाहरणें आहेत. भूमध्यसमुद्रांतील स्ट्रांबोली येथील ज्वालामुखी पहिल्या जातीचा आहे. म्हणजे हा नेहमींच जागृतावस्थेंत आहे. अर्थांत ही जागृतावस्था कमी अधिक जोराची मात्र असते. सायोआ, टोफुआ, काटोपॅक्सी, येथील ज्वालामुखी सतत जागृतावस्थेंत असतात. परंतु अशीं उदाहरणें अपवादात्मकच होत. साधारण नियम म्हटला म्हणजे ज्वालामुखी कांहीं कालपर्यंत निद्रित असून मधून मधून कांहीकालपर्यंत जागृत होत राहतात.

साधारणपणें ज्वालामुखीच्या तीन अवस्था असतात व त्या त्या अवस्थेप्रमाणें त्यांचें वर्गीकरण करण्याची चाल आहे. ह्या तीन अवस्था म्हणजे (१) जागृत (२) धुमसत असलेला व (३) निद्रित अगर निवालेला. वरील तीन अवस्थांपैकी पहिल्या अवस्थेंत असलेले ज्वालामुखी ओळखणें कठिण नाहीं. परंतु दुसर्‍या व तिसर्‍या अवस्थेंतील ज्वालामुखीचें वर्गीकरण करणें फार कठिण आहे. कारण कांही बाहेरून ‘निद्रित’ वाटणारे ज्वालामुखीं कदाचित् आंत धुमसत असण्याचा संभव आहे व कांही दुसर्‍या अवस्थेंत असणारे ज्वालामुखी तिसर्‍या अवस्थेंत जाण्याच्या मार्गांत असतील.

शिवाय एखादा ज्वालामुखी ह्या तीन अवस्थांपैकीं प्रत्येक अवस्थेंत किती कालपर्यंत असतो हेंहि ठरलेलें नसतें. हें खालील एका ज्वालमुखीच्या इतिहासावरून लक्षांत येईल. इ. स. च्या पहिल्या शतकांत सोमा नांवाचा ज्वालामुखी पर्वत तिसर्‍या अवस्थेंत होता. तेथें कोणत्याहि तर्‍हेची उष्णता, ज्वाला वगैरे कांहीं अस्तित्वांत नव्हतें. त्याच मुखावर सर्व तर्‍हेची दाट झाडी असून तेथें लांडगे, डुकरें वगैरें श्वापदें वास करीत होतीं. परंतु इसवी सन ७९ च्या शरद्दतूंत एकाएकीं मोठा स्फोट होऊन ज्वालामुखीच्या मुखाजवळील खडक उडून गेले व सध्याचा व्हेसुव्हिअस ज्वालामुखी तयार झाला व तेव्हांपासून आतांपर्यंत त्याचे स्फोट मधून मधून होतच असतात. परंतु इ. स. १५०० पासून इ. स. १६३१ च्या मधल्या १३१  वर्षांच्या अवधींत मुळीच स्फोट झाला नाहीं व वरील विवर जवळ जवळ पूर्णपणें भरून गेलें व वर कांही खार्‍या व कढत पाण्याचे झरे हींच मात्र पूर्वीच्या जागृतावस्थेचीं अवशिष्ट चिन्हें शिल्लक राहिलीं. परंतु इ. स. १६३१ मध्यें मात्र फारच मोठा स्फोट होऊन हा निद्रितावस्थेचा काल संपला. सतराव्या शतकाच्या मध्यापासून आतांपर्यंत हा ज्वालामुखी मधून मधून सारखा जागृत होत असतो. हे स्फोट नेहमीं सारख्यात प्रमाणांत होत नाहींत, व त्यांच्या कमी अधिक शक्तीप्रमाणें त्यांनां तीन निरनिराळीं नांवें देण्यात येतात, तीं अशीं- (१) सोल्फाटारिक- अत्यंत कमी जोराचा स्फोट; आंतून वाफ व वायु येणें. (२) स्ट्रांबोलिअन- मध्यम जोरदार स्फोट- धूळ, दगड वगैरेंचा स्फोट होणें. (३) फ्लिनिअन - अत्यंत जोरदार स्फोट सर्व तर्‍हेचे पदार्थ बाहेर येणें.

ज्वा ला मु खी चे उ द्भ व हो ण्या चीं ठि का णें.- भूस्तरशास्त्रज्ञांचें साधारणपणें असें मत आहे कीं, ज्वालामुखीचा उद्भव होण्यास पृथ्वीच्या घनपृष्ठ भागांत कोठेंतरी एखादी भेग अगर फट असली पाहिजे; व ज्वालामुखीचा स्फोट होण्याची जागा ह्या भेगेवर अगर फटीवर सर्वांत कमजोर असणार्‍या स्थलीं असते. कारण या ठिकाणीं आंतील विस्तृत होणार्‍या वायुरूप पदार्थानां सर्वांत कमी विरोध होतो. सध्यां अस्तित्वांत असणार्‍या निरनिराळ्या ज्वालामुखीचें समुदायांकडे पाहिलें तर ते अशा मोठमोठ्या भूपृष्ठाच्या फटींच्या अगर भेगांच्या जवळपास असावे असें वाटतें. आल्यूशिअन व क्युराइल बेटें, जपान व ईस्टइंडीज व वेस्टइंडीजचीं बेटें, वगैरे ठिकाणच्या ज्वालामुखींच्या समुदायावरून असें दिसतें कीं, याच्या खालीं लांबवर गेलेल्या फटी असून यांतून ज्वाला मुखींचे स्फोट होण्यास जागा असल्या पाहिजेत व हींच उदाहरणें ज्वालामुखींचा व भूपृष्ठांतील फटींचा संबंध दाखविणारा पुरावा म्हणून देण्यांत येतात. असे जरी असले तरी पूर्वी कोणत्याहि तर्‍हेची फट अगर भेग भूपृष्ठांत नसतांना सुद्धां नवीनच ज्वालामुखी उत्पन्न झाल्याचीं उदाहरणें पुढें दिलीं आहेत.-

(१) नेपल्सच्या उपसागराच्या किनार्‍यावर दोन दिवसांच्या अवधींत ५०० फूट उंचीचा माँटेनोव्हो नांवाचा ज्वालामुखी तयार झाला.

(२)  इ. स. १७७० त सान साल्व्हाडोर शहराच्या पश्चिमेस ३० मैलांवर एका शेतीवाडीच्या मध्यभागीं एक नवा ज्वालामुखी उत्पन्न झाला. त्यावेळेपासून त्याचे मधून मधून सारखे स्फोट असतात व सध्यां त्याची उंची सुमारें ३००० फूट झालेली आहे.

(३) इ. स. १८८० च्या आरंभीं होपँगो सरोवरांत एक ज्वालामुखी उद्भवून त्यानें पांच एकर क्षेत्रफळाचें बेट तयार झालें व त्याची उंची १६० फूट होती.

ह्या उदाहरणांवरून असें दिसून येईल कीं, ज्वालामुखीचा स्फोट होण्यास भूपृष्ठांत पूर्वींच्या फटींची जरूरी नसते. आतां साधारण असें मत होऊं लागलें आहे कीं, ज्वालामुखीक्रियेच्या अंगीं भूपृष्ठांत नवीन विवर कोरून त्यांतून वर स्फोटकारक द्रव्यें फेंकण्याची पूर्ण शक्ति असते. व जुन्या ज्वालामुखीच्या निरीक्षणावरून आतां असें दिसून आले आहे कीं, त्या ठिकाणीं पूर्वीं भूपृष्ठांत भेग अगर फट नसावी. सर  आर्चिवाल्ड गिकी, डॉ. लो. प्रो. ब्रांक वगैरे शास्त्रज्ञांनीं वरील मतास पुष्टिकारक असा बराच पुरावा गोळा केला आहे. अर्थात भूपृष्ठावर जर पूर्वींच्या फटी असतील तर अशा कमजोर पृष्ठांतून प्रथम ज्वालामुखीचा स्फोट होईल परंतु अशा फटींची ज्वालामुखीचा उद्भव होण्यास जरूरीच असते असे मात्र नाहीं; कारण आतां थंड झालेल्या पुष्कळ जुन्या ज्वालामुखीवरील भाग हवा, पाणी वगैरेंच्या क्रियांमुळें धुवून जाऊन त्यांच्या खालील पृष्ठभाग वर आलेले आहेत व त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणावरून वरील मतास भरपूर पुरावा मिळाला आहे.

वरील विवेचनावरून एक महत्त्वाचें अनुमान निघतें तें हें कीं, पूर्वींची फट असल्याशिवाय जर विवर पाडून आंतील स्फोटकारक द्रव्यें बाहेर येत असतील तर या विवराची उंची फार नसावी. कारण जितका भूपृष्ठाचा थर जाड असेल तितकी तो भेदून बाहेर येण्यास शक्ति जास्त पाहिजे. म्हणजे ज्वालामुखीचा स्फोट होण्याची भूपृष्ठावरील जागा फार खोल नसावी. जमीनीच्या पृष्ठभागापासून कांहीशें फुटांपेक्षां हें स्थल जास्त खोल नसावें. शिवाय पाऊस पडणें व स्फोट होणें ह्यांचा जो संबंध लक्षांत आला आहे त्यावरूनहि वरील अनुमान खरें ठरतें. भूस्तरशास्त्राप्रमाणें निरनिराळे खडक निरनिराळ्या काळीं तयार झालेले आहेत. या वाटेल त्या काळीं तयार झालेल्या खडकांतून ज्वालामुखींचे स्फोट झालेले आढळतात. कांहीं ठिकाणीं ते ग्रॅनाईट व निसोज खडकांतून आलेले आहेत तर कांहीं ठिकाणीं तांबड्या कुरूंदाच्या खडकांतून आलेले आहेत; व कांहीं ठिकाणी तर अगदीं अलीकडे तयार झालेल्या खडकांतहि ज्वालामुखींचे स्फोट झालेले आढळतात.

जा गृ त ज्वा ला मु खी ची ने ह मी ची स्थि ति.- जागृततावस्थेंतील ज्वालामुखीच्या एकामागून एक होणार्‍या दोन स्फोटांत जो कालावधी असतो त्यांत ज्वालामुखीचा जोर सारखा वाढत असलेला दिसतो. ज्वालामुखीचें जे द्रोणाकार मुख स्फोट झाल्यानंतर रिकामें झालेलें असतें, त्याचा पृष्ठभाग आंतील विस्तृत होत असणार्‍या अंतर्द्रव्यांच्या उष्ण रसामुळें हळूहळू वर येतो. वायुरूप उष्ण पदार्थांचा सतत प्रवाह चालू असतो व कधीं कधीं त्याच्या बरोबर धूळ व दगड यांचाहि वर्षाव होतो. ह्या मुखाच्या पृष्ठभागावर ज्या भेगा असतात त्यांतून आंतील द्रव्यांचा लाल उष्ण रस दिसूं शकतो. ज्याठिकाणीं ह्या रसाचें उष्णतामान फार असतें त्याठिकाणीं हा रस फार द्रवस्थितींत असून सारखा जणू काय उकळत असतो व त्याच ठिकाणीं “उकळत असलेलीं सरोवरें” असतात. अशा तर्‍हेचें सरोवर किलौ येथें आहे. ह्या ठिकाणीं कित्येक एकरपर्यंत पसरलेल्या या शिजत असलेल्या रसांतून कारंज्याप्रमाणें हे द्रवस्थितींत असणारे खडक दूरवर फेंकले जातात व त्या उष्ण सरोवरांत पडलेले दिसतात. ह्या सर्व कालांत ज्वालामुखीच्या विवरांत भूपृष्ठाचा रस हळू हळू सारखा वर चढत असतो व एखाद्या कमजोर ठिकाणाहून सांधे मिळतांच स्फोट होऊन वर येतो, किंवा आंतील दाब वाढून कठिण झालेल्या मुखाच्या पृष्ठभागांत विवर पाडूनहि स्फोट होतो.

ह वा मा ना चा प रि णा म.- स्फोट होण्यास काय काय गोष्टी कारणीभूत होतात अगर कोणत्या गोष्टींचा स्फोट होण्याशीं संबंध आहे ह्यासंबंधीं चांगलीशी माहिती उपलब्ध नाहीं. परंतु त्या त्या ठिकाणच्या हवेच्या दाबाशीं स्फोटांचा संबंध आढळून आला आहे. ज्याप्रमाणें हवेचा दाब कमी झाला असतां खाणींतील फायर डँप वायू जास्त प्रमाणांत बाहेर येतो त्याचप्रमाणें भूपृष्ठाच्या उष्ण रसांत जे वायुरूप पदार्थ असतात त्यावर हवेच्या कमी दाबाचा बराच परिणाम होत असला पाहिजे. कारण ह्या वायुरूप पदार्थांवर ज्वालामुखीची क्रिया बरीच अवलंबून असते. स्ट्रांबोली येथील ज्वालामुखीसंबंधी असें आढळून आलें आहे कीं, ज्वालामुखीच्या आंतील वायुरूप पदार्थांचा दाब व हवेचा दाब हे दोन्हीं साधारण सारखे असतात. म्हणून हवेंतील दाबांत जेव्हां फरक होतो तेव्हां ज्वालामुखीचे स्फोट होतात. लिपारी बेटांतील कोळी लोकांच्या म्हणण्याप्रमाणें वादळी हवा असली म्हणजे ज्वालामुखींतून वाफ व दगड यांचा वर्षाव कोरड्या हवेपेक्षा जास्त होतो. हवेच्या दाबाशिवाय आणखीहि कांहीं गोष्टाचा ज्वालामुखींच्या स्फोटावर परिणाम होत असला पाहिजे; व पावसाचा परिणाम बराच होत असावा असे दाखविणारा बराच पुरावा आहे. हावाई येथील ज्वालामुखीसंबंधी जी माहिती गोळा केली होती तीवरून असें दिसून आलें कीं, १९ स्फोटांपैकीं १५ स्फोट पावसाळी हवा असतांना झाले. एटना व व्हेसुव्हिअस ह्या ठिकाणीं हिवाळ्यांत अधिक स्फोट होतात असें आढळून आलें आहे. लारेंझो नामक शास्त्रज्ञांच्या मतें पावसाळीं हवेचा स्फोटांची बराच संबंध आहे. १९०० सालीं स्ट्रांबोली येथील ज्वालामुखीचे मे व नोव्हेंबर महिन्यांत जे भयंकर स्फोट झाले ते अतिशय जोराच्या वृष्टीनंतर झाले हें लक्षांत ठेवव्यासारखें आहे.

जपानमधील स्फोट हिवाळ्यांत जास्त होतात. क्लूग ह्या शास्त्रज्ञानें सूर्यावरील डाग व ज्वालामुखीचें स्फोट ह्यांचा संबंध दाखविण्याचा प्रयत्‍न केला आहे. त्याच्या मतें ज्या वर्षीं सूर्यावरील डाग कमी असतात त्या वर्षीं पृथ्वीर जास्त ज्वालामुखीचें स्फोट होतात. शिवाय त्याचें असेंहि म्हणणे आहे कीं, आगस्ट महिन्यांत जेव्हां जास्त तारे तुटून पडतात त्यावेळीं स्फोट जास्त होतात. परंतु या दोन्ही कल्पनांनां फारसा दुजोरा मिळालेला नाहीं.

स्फो टां ची मु द त किं वा स्फो ट का ल.- पुष्कळ ज्वालामुखीचे स्फोट बरेचसे नियमित तर्‍हेनें होतात. नेहमीं जागृत असणार्‍या स्ट्रांबोली येथील ज्वालामुखीचे स्फोट अगदीं नियमितपणें एक मिनिटाच्या अंतरापासून अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतरानें होतांना दृष्टीस पडत असतात. नेहमीं जागृत नसणार्‍या ज्वालामुखींचे स्फोट सुद्धां असे नियतकालिक असलेले दिसून येतात. ज्वालामुखी जेव्हां इ. स. १८७३ च्या सप्टेंबर महिन्यांत जागृत झाला तेव्हां त्याचे स्फोट २० मिनिटांपासून अर्ध्या तासाच्या अंतरानें नियमितपणें होत होते. अशाच तर्‍हेचे नियमित स्फोट इ. स. १८८८ ऑगस्ट, ते मार्च १८९० पर्यंतच्या जागृतावस्थेच्या वेळींहि झालेले आढळले. ता. ११ फेब्रुवारीपासून ता. २४ मार्च (१८८९) पर्यंत तेथील स्फोटांचे रोजचे टिपण ठेवलें होतें. त्या मुदतींत तीन निरनिराळे कमजास्त जोराचे स्फोट आढळून आले. पहिला काल म्हणजे ता. ११ ते २३ फेब्रुवारी हा असून ह्या कालांत स्फोट वारंवार होत असत व त्यांचा जोरहि मध्यम होता व प्रत्येक तासांत सरासरी १२ स्फोट होत होते. दुसरा काल म्हणजे २४ फेब्रुवारी ते मार्च होय. ह्या मुदतींत होणारे स्फोट जरी जास्त जोरदार होते तरी दोन स्फोटांमधील काल जास्त होता. त्याचे तासी ७ स्फोट होत होते. तिसरा काल म्हणजे २२ मार्च ते २४ मार्चपर्यंतचा होय; व साधारणपणें दोन स्फोटांमधील काल ३ तासांपेक्षां जास्त होता.

एटना व व्हेसुविअस येथील ज्वालामुखींच्या स्फोटासबंधीं अशाच तर्‍हेचा  नियमितपणा आढळून आला आहे. मि. व्हिंपर यानें सांगाई पर्वताच्या शिखरामधून अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतरानें वाफ वर येत असतांना पाहिली आहे व तसेंच कॅटोपाक्सी येथील मोठ्या ज्वालमुखीच्या मुखांतूनहि अर्ध्या तासाच्या अंतरानें वाफेचे स्फोट होतांना आढळून आले.

हावाईमधील किलौआ ज्वालमुखीच्या स्फोटांमध्यें नियमितपणा दिसून येतो. परंतु येथील दोन स्फोटांमधील काल फारच मोठा आहे. साधारणपणें हा काल ३॥ वर्षांपासून १२॥ वर्षांपर्यंतचा असतो, व असें अनुमान आहे कीं, ह्या मुदतीत ह्या ज्वालामुखीचे विवर व मुख ४०० ते ५०० फूट खोलीपासून भरून येतें.

ज्वा ला मु खी चा स्फो ट घ डू न ये णा र्‍या गो ष्टीं चा सा धा र ण अनुक्रम- ज्वालामुखीचा स्फोट होणार हें दाखविणारीं पूर्वचिन्हें नेहमींच त्यांचीं अगाऊ सूचना देतात असें नाहीं. कोणत्याहि तर्‍हेची पूर्वचिन्हें अगर सूचना देण्यापूर्वीं निरनिराळ्या भागांत कित्येक भयंकर स्फोट झाल्याची उदाहरणें आहेत.

हीं पूर्वचिन्हें अगर सूचना दोन गोष्टींवर अवलंबून असतात. (१) भूपृष्ठाच्या पदार्थांच्या रसाची द्रवस्थिति (पातळ अगर घन स्थिति) व (२) ह्या भृपृष्ठस्थ पदार्थांच्या रसास वर येतांना होणारा अडथळा. हावाई येथें चालू शतकांत ते ज्वालामुखीचे स्फोट झाले ते भूकंप अगर इतर पूर्वचिन्हांशिवाय शांतपणें आंतील द्रव्याचा रस बाहेर येऊन झाले. कारण हा रस त्या ठिकाणीं अत्यंत द्रव स्थितींत म्हणजे पातळ असा आहे. परंतु त्याहि ठिकाणीं इ. स. १८६८ मध्यें जो मोठा स्फोट झाला त्यावेळीं भूकंपाचे जोराचे धक्के बसले. व्हेसुव्हिअस ज्वालामुखी जागृत होण्यापूर्वीं पुष्कळ वेळां तेथील विहिरीचें व झर्‍यांचें पाणी अगदीं आटतें अगर कमी होतें. परंतु ज्वालामुखीच्या जागृतावस्थेचीं नेहमींचीं पूर्वचिन्हें म्हणजे जमीनीची हालचाल होय. जमिनीच्या आंतून प्रथम हळूहळू गुरगुरण्यासारखा आवाज येऊं लागतो व नंतर तो आवाड वाढत जाऊन मेघगर्जनेप्रमाणें मोठा गडगडाट होऊं लागतो. पाठोपाठ लहन लहान धक्के बसूं लागतात व यांचा जोर व संख्या वाढत जाऊन चांगल्या भूकंपाचे धक्के बसूं लागतात.

ज्वालामुखीच्या द्रोणाकार मुखांतून वर येणारे वायुरूप पदार्थ जास्त प्रमाणांत येऊं लागतात. त्यामुळें भूपृष्ठाच्या पदार्थांचा उष्ण रस सारखा उकळत असल्याप्रमाणें अस्थिर असतो. आरंभीं हा भूपृष्ठ पदार्थांचा उष्ण रस थंड होऊन परत घनीभूत होऊन ज्वालामुखीचें द्रोणाकार तोंड बंद करतो व आंतील रस ज्वालामुखी पर्वताच्या बाजूस विवर पाडून त्यांतून बाहेर येऊन पर्वताच्या उतरणीवरून वाहूं लागतो. अगर ह्या रसांतील वायुरूप व द्रवरूप पदार्थांचा द्राव इतका वाढतो कीं, ज्वालामुखीच्या तोंडावरील थंड व घनीभूत झालेला खडकांचा थर फोडून भयंकर स्फोट होऊन त्यांतून वाफेचे लोटच्या लोट वर येतात व नंतर धुळीचे लोट येतात व लहानमोठ्या दगडांची वृष्टि होते. द्रोणाकार मुखाच तळ व कडा अगर बाजू यांचा स्फोट होऊन तीं दूरवर फेंकली जातात. ज्वालामुखीचा निमुळता शिखराकार भागहि नाहींसा होतो. हा अंतर्द्रव्याचा उष्ण रस बर्‍याच खोल ठिकाणाहून वर येतो व त्याबरोबर लाल, रसरशीत, वाटोळे अगर अणकुचीदार दगडाचे लहानमोठे तुकडे वर हवेंत फेंकले जातात.

हा खडकांचा उष्ण रस प्रथम लोखंडी रसाच्या नदीप्रमाणें जोरानें खालीं वाहूं लागतो. परंतु हळूहळू तो जसा थंड होतो तशी त्याची गति मंद होते. ह्या रसाचे पृष्ठभागांतून व ज्वालामुखीच्या द्रोणाकार तोंडातूनहि वाफेटे लोट वर येतात. व एकच जागृतावस्थेंत जे निराळे स्फोट राहतात त्यावेळीं धूळ, वाफेचे व दगडाचे तुकडे यांसह वर येणारे ढगच्याढग पर्वताशिखरावर दोन दोन मैल जागा व्यापून राहिलेले दिसतात. हळू हळू या स्फोटांची संख्या व जोर कमी होत जातो, खडकाचा उष्ण रस वर येण्याचें बंद होतें, दगड व धूळ यांची वृष्टि कमी कमी होत जाते व कांहीं कालानंतर तो ज्वालामुखी निद्रितावस्थेंत जातो. हा जागृतावस्थेचा काल कांहीं तास, दिवस अगर महिनेहि असूं शकतो.

परंतु ज्वालामुखीच्या स्फोटांचीं अशीं कांहीं उदाहरणें आहेत कीं, त्याठिकाणीं भूपृष्ठांतील पदार्थाचा रस मुळींच बाहेर आला नाहीं, तरी पण हे स्फोट अत्यंत नाशकारक होते. इ. स. १९०२ च्या मे महिन्यांत वेस्ट इंडियन बेटांत जे अत्यंत हानिकारक स्फोट झाले. त्यावेळीं खडक व उष्ण रसाची मुळीच वृष्टि झाली नाहीं. तरी या स्फोटांनीं मार्टिनीक मधील ३०००० लोकवस्तीचें सेंटपायरी गांव, (सेंट व्हिंन्सेंटमधील बराचसा प्रदेश) २००० वस्तीसह थोड्याच मिनिटांच्या अवधींत नाश पावले. ह्यावेळीं अत्यंत उष्ण व लालभडक धूळ, वाळू व दगडांचे तुकडे यांचाच भयंकर वर्षाव झाला व यांतच उष्ण वायुरूप पदार्थांची भर पडली. ह्या सर्व पदार्थांचा इतक्या पुष्कळ प्रमाणांत वर्षाव झाला कीं, त्यांचे लोटच्या लोट प्रवाहाप्रमाणें वाहूं लागून वाटेंत येणार्‍या सर्व पदार्थांचा नाश करी होते. या वर्षावाबरोबर इतर काळेकुट्ट ढगहि वर येत असत. हे वायुरूप पदार्थ बहुतकरून वाफ व गंधकमिश्रित वायु ह्यांचें मिश्रण असावें व त्यांचा परिणाम द्रवरूप पदार्थांप्रमाणें होत असावा.

भू पृ ष्ठा व री ल फ टी, भे गा (फिझ्युअर्स):- ज्या भूगर्भांतील शक्तीमुळें ज्वालामुखीचे डोंगर तयार होतात त्याच शक्तीच्या योगानें कधीं कधीं भूपृष्ठांत  लांबवर मोठमोठ्या फटी (खंदाप्रमाणें) तयार होतात. ज्वालामुखी उत्पन्न होण्याची क्रिया चालू असतां अशा फटी वारंवार ज्वालामुखीच्या आसमंतात उत्पन्न होतात. इ. स. १६६९ मध्यें (एटना) ज्वालामुखीचा जो स्फोट झाला त्यावेळीं त्या पर्वताच्या बाजूवर सहा समांतर फटी उत्पन्न झाल्या. ह्यांपैकीं एक फट ६ फूट रूंद असून १२ मैल लांब वळणें घेत घेत गेलेली होती. अशा तर्‍हेनें व्हेसुव्हिअस व इतर ज्वालामुखींच्या जवळपासहि फटी तयार झालेल्या आहेत. सर्वांत मोठा व भयंकर असा ज्वालामुखीचा स्फोट म्हणजे इ. स. १८८३ च्या आगस्टच्या २६।२७ तारखेस झालेला सुंडा सामुद्रधुनींतील क्राक्राटोआ ज्वालामुखीचा होय. कांहीं धरणीकंपाच्या धक्क्यानंतर त्या बेटाचा बराचसा भाग भयंकर कडकडाट होऊन ज्वालामुखीच्या जोरानें उडून गेला. हा कडकडाट इतका मोठा झाला होता कीं, तो १५० मैलांवर ऐकू गेला व त्याच्या योगानें शंभर मैल अंतरावर असणार्‍या वटेव्हियांतील भिंती खिडक्या यांनां भेगा पडल्या. ह्या स्फोटाच्या वेळीं धूळ, राख, लहानमोठे दगड वगैरे जे पदार्थ बाहेर पडले, ते सुमारे १ १/२ घनमैल असावेत. ह्या स्फोटामुळें समुद्रांत व हवेंतहि लाटा उत्पन्न झाल्या. हवेंतील लाटा सुमारे ३/४ पृथ्वीच्या पृष्ठाभागावर जाऊन आदळल्या. समुद्रांत उत्पन्न झालेल्या लाटांपैकीं, एक लाट नेहमींच्या भरतीच्या सपाटीच्यावर १०० फूट उंच जाऊन पुष्कळ लहानमोठ्या गावांचा नाश झाला व सुमारें ३६, ३८० लोक प्राणास मुकले. समुद्रांत उत्पन्न झालेल्या ह्या वादळाचे परिणाम ३८०० मैलांवर असणार्‍या एडन बंदरांत व ४६९० मैलांवर असणार्‍या दक्षिण आफ्रिकेंतील पोर्ट एलिझाबेझ येथेंहि पहाण्यांत आले. ज्वालामुखीच्या द्रोणाकार मुखाचा पृष्ठभाग उडणें अगर त्याच्या जवळील प्रदेश दुभंग होऊन तेथें खंदकाप्रमाणें फटी उत्पन्न होणे यास मुख्यत: दोन  कारणें आहेत. (१) (अत्यंत दाबाखालीं असल्यामुळें) वायुरूप पदार्थांच्या भयंकर जोरानें भुपृष्ठ अगर बाजू दुंभगून त्यांतून स्फोट होतात; (२) भूपृष्ठांतील पदार्थांचा जो उष्ण रस वर येत असतो त्याची शक्ति अगर जोर हें दुसरें कारण होय. हा दाब सुमारें प्रत्येक चोरस फुटावर ८ टन वजनाइतका मोठा असतो. ह्या दोन कारणांपैकीं कधीं एकामुळें तर कधीं दोन्ही कारणांनी आंतील द्रव्ये भुपृष्ठावर येऊन मोठमोठे डोंगर निर्माण होतात अगर अत्यंत लांबवर मोठमोठ्या भेगा भुपृष्ठावर उत्पन्न होतात. ह्या फटींतून अगर खंदकांतून भूपृष्ठांतील पदार्थाचा उष्ण रस वर येऊं लागतो व तो रस साच्यांत ज्याप्रमाणें थंड व घट्ट होतो त्याप्रमाणें त्या फटींत थंड होऊन घट्ट बनून त्याचे खडक होतात. व जेव्हां ह्या फटी ओळंब्यांत असतात तेव्हां हे खडक तट अगर भिंती घातल्याप्रमाणें दिसतात. ज्या ठिकाणीं या फटी भूपृष्ठाला समांतर अशा असतात त्या ठिकाणीं या खडकांचे सपाट असे थर होतात. सोमा व एटना पर्वतावर हे तट जुन्या ठिसुळ खडकांत मुद्दाम बांधिलेल्या भिंतीप्रमाणें निराळे प्रामुख्यानें दिसतात.

धू ळ व द ग ड ह्यां चा व र्षा व:- स्फोटामुळें अगर भूपृष्ठांत असणार्‍या फटीमुळें पृष्ठभागांशीं आंतील उष्ण पदार्थांचें दळणवळण सुरू झालें म्हणजे प्रथम तो पृष्ठभाग ज्या खडकाचा असेल त्या खडकाचे लहान मोठे तुकडे मुखावाटें बाहेर येतात. मोठमोठ्या स्फोटांच्या वेळीं अत्यंत कढत व लाल असे तुकडे वर हवेंत फेंकले जातात व कांहीं परत द्रोणाकार मुखांत पडतात व कांहीं पर्वताच्या उतरणीवर पडतात.

सर डब्ल्यू. हॅमिल्टन याच्या लिहिण्यावरून असें दिसतें कीं, व्हेसुव्हिअस पर्वताच्या (१७७९ सालच्या) जागृतावस्थेच्या वेळीं असे उष्ण दगड १०००० फूट उंच उडाले होते. मोठमोठे दगड तिरपे वर येऊन पुष्कर अंतरावर जाऊन पडल्याचीं उदाहरणें आहेत. पाँपे शहर ज्या राखेच्या ढिगाखालीं पुरलें गेलें त्या राखेंत ८ पौंड वजनाचे दगड आढळतात. चिली बेटांतील एँटुको पर्वतांतून निघालेले दगड ३६ मैलांवर जाऊन पडले असें म्हणतात, व काटोपाक्सी पर्वतांतून २०० टन वजनाचा दगड ९ मैल लांब जाऊन पडला; व जपानमधील आसामा डोंगरांतून ४० पासून १०० फूट व्यासाचे दगड वर आलेले आहेत. परंतु पुष्कळ ज्वालामुखींच्या जागृतावस्थेच्या वेळीं लहानमोठ्या दगडांशिवाय ज्वालामुखीच्या द्रोणाकार मुखांतून अतिशय बारीक अशा धुळीचे मोठमोठे लोटच्या लोट वर येऊन ते कित्येक मैल उंच हवेंत जाऊन नंतर ढगाप्रमाणें दूरवर पसरतात. ही धूळ किंवा राख इतकी बारीक असते कीं, अगदीं बंदोबस्तानें बंद केलेल्या पेटींत अगर घड्याळ्याच्या आंत ती सहज जाते. हे धुळीचे ढग इतके दाट असतात, कीं सूर्यप्रकाश नाहींसा होतो व ज्वालामुखी पर्वताच्या आसमंतात कित्येक दिवसपर्यंत रात्रीप्रमाणें काळोकच असतो. इ. स. १८२२ मध्यें व्हेसुव्हिअस पर्वतांतून जी राख बाहेर आली तिचा जवळपासच्या प्रदेशांत तर जाड थर झालाच परंतु ती आस्कोली व कॅसानो ह्या दोन बाजूंस असणार्‍या दोन गावांपर्यंत लांब वर उडून गेली. हीं गांवें अनुक्रमें ५६ व १०५ इटालियन मैल दूर आहेत.

सर्वात मोठा राखेचा वर्षाव म्हणजे १८३५ सालीं झालेल्या निकारगुआ येथील कोसेग्विना येथील ज्वालामुखीच्या स्फोटाच्या वेळीं झालेला होय. त्यावेळीं ३५ मैल त्रिज्येच्या वर्तुलावरील प्रदेशावर पूर्ण अंधार पडला आणि त्या डोंगरापासून ८ लीग किंवा २४ मैल अंतरामधील प्रदेशांत १० फूट उंचीचा थर साचला व सुमारें २७० मैल व्यासाच्या प्रदेशांत हा वर्षाव झाला असावा असें अनुमान आहे. ह्या राखेपैकीं अत्यंत बारीक कण असलेली कांही राख इतकी उंच गेली कीं, ती हवेंतील वरील हवेच्या प्रवाहांत सांपडून पूर्वेकडे वहात जाऊन चार दिवसांनीं जमेका बेटांतील किंगस्टन या ठिकाणीं म्हणजे सुमारें ७०० मैलांवर जाऊन पडली.

इ. स. १८१५ मध्यें झालेल्या सुंवा येथील स्फोटाच्या वेळीं सुमारें दहा लाख चौरस मैल प्रदेशावर धूळ व दगड यांची वृष्टि झाली, व ५० घनमैलांइतका धूळ व दगड यांचा वर्षाव झाला; व एका शास्त्रज्ञांच्या मतें ८५ व्हेसुव्हिअस पर्वताच्या आकाराएवढी वृष्टि झाली.

वरील विवेचनावरून कांहीं गोष्टी जास्त प्रामुख्यानें दृष्टोत्पत्तीस येतात. दगडांचे लहान मोठे प्रकार ज्वालामुखीचा जोर कमी असतांनाहि बाहेर फेंकले जातात. परंतु धूळ किंवा राख यांची वृष्टि फक्त ज्वालामुखी चांगल्या जागृतावस्थेंत असतांनाच होते. व बर्‍याच वेळां नवीन स्फोट होण्याचें कारण बर्‍याच दाबाखालीं असलेली वाफ, हेंच असतें.

धूळ, राख, लहानमोठे दगड यांचे थर सांचूनच ज्वालामुखीला शिखराप्रमाणें आकार आलेला असतो. जडजड पदार्थ अगदीं मुखाजवळ पडतात व हलके पदार्थ जरा अंतरावर पडतात व वरचेवर अशा पदार्थांचा वर्षाव होऊन ज्वालामुखीचा आकार व उंची ही वाढतात. परंतु या पदार्थांचे थर ज्वालामुखीपासून दूर अंतरावरहि सांचतात.

एक्यूडोरमधील सँगे येथील ज्वालामुखीच्या योगानें जवळपासच्या प्रदेश ४००० फूट खोलीच्या राखेच्या ढिगाखालीं गडप झाला आहे. या ढिगांत अनेक प्रकारचीं झाडें व वनस्पती, प्राण्यांचीं अवशिष्टें अगर मनुष्यकृतीचे पदार्थ हे गडप झालेले सांपडतात. व अशा तर्‍हेचे थर म्हणजे ज्वालामुखीच्या स्फोटांचा पुरावाच होय. पण कधीं कधीं हे पदार्थ ज्वालामुखीपासून अतिशय दूर अंतरावर जाऊन पडतात. म्हणून असे थर सांपडले म्हणजे नेहमींच जवळपास ज्वालामुखी असलाच पाहिजे असें अनुमान काढणें चुकीचें होईल.

भू ग र्भ स्थ अ थ वा भू स्त र द्र व्य र सो द्भ व- ह्या उद्भावाचें मुख्य कारण म्हणजे ह्या दगडांच्या रसांत मिसळलेल्या वायुरूप पदार्थांचा विस्तार हें होय. व जरी कांहीं ठिकाणीं नुसतेच वायुरूप पदार्थ ज्वालामुखींतून वर येतात, तरी बहुत करून त्यांच्या बरोबर भूस्तर द्रव्यांच्या रसाचा उद्भव होतोच. ह्या भूस्तर द्रव्यांच्या रसाचा तो वर येत असतांना ज्या विवरांतून तो वर येतो त्याच्या, बाजूवर अत्यंत दाब असतो. मागें सांगितल्याप्रमाणें १००० फूट उंचीच्या थराचा सुमारें ७० ते ८० टन वजनाइतका प्रत्येक चौरस फुटावर दाब असतो. इतक्या दाबाखालीं असलेल्या वायुरूप पदार्थांत अत्यंत शक्ति असते व त्यामुळें हा रस वर येऊन आगाऊ दुंभगलेल्या शिखराच्या बाहेरील बाजूच्या भेगांतून वाहूं लागतो. उंच ज्वालामुखी असला म्हणजे कधीं कधीं हा रस अगदीं ज्वालामुखीच्या तोंडापर्यंत येऊन तें पूर्ण भरून तो रस वरून वाहूं लागतो. परंतु बरेच वेळां कमजोर पृष्ठभागास विवर  पडून अगर पूर्वींच्या भेगांतूनच हा रस बाहेर येतो. लहान ज्वालामुखी असली म्हणजे त्या ठिकाणीं हा रस वर तोंडापर्यंत येऊन वरील बाजूच्या भिंती अगर कडा कमजोर असल्यामुळें एखाद्या ठिकाणी खिंड पाडून त्यांतून वाहूं लागतो. हा वितळलेल्या खडकांचा रस वर आल्याबरोबर त्यांतून पाण्याची वाफ व इतर वायुरूप पदार्थ बाहेर पडून त्यांचे ढग बनतात व त्या वहात असलेल्या प्रवाहाबरोबर त्यांच्यावर तरंगताना दिसतात. हे ढग या प्रवाहाबरोबर पुष्कळ लांब अंतरापर्यंत वर येत असतांना आढळतात.

भूस्तर द्रव्यांचा रस वर येण्याचें ठिकाण जर ज्वालामुखीच्या शिखरापासून बरेंच खालीं असेंल तर हा रस अत्यंत जोरानें बाहेर पडत असल्यामुळें पुष्कळ उंचीपर्यंत वर उडून नंतर खालीं पडतो व अशा तर्‍हेनें वितळलेल्या दगडाच्या रसाचें कारंजेंच बनतें. अशीं कारंजी इ. स. १७९४ मध्यें व्हेसूव्हिअस पर्वतावर व १८३२ सालीं एटना पर्वतावर उडत होतीं. मॉनलोआ येथें १८६८ सालीं ५०० पासून १००० फूट उंच उडणारीं अग्निरसाचीं कारंजी कित्येक आठवडेपर्यंत उडत होतीं, तरी पण ह्या भूस्तर रसांचा उद्भव हे ज्वालामुखीचें कारण नसून एक काय आहे, व खरें कारण म्हणजे ह्या रसांत सांचलेले वायुपदार्थ हें होय.

हा अग्निरस बाहेर आला म्हणजे अत्यंत उष्ण असल्यामुळें पांढर्‍या रंगाचा दिसतो व मधाप्रमाणें अगर लोखंडाच्या रसाप्रमाणें वाहूं लागतो. लवकरच तो थंड होऊं लागून प्रथम त्यास लालभडक रंग येऊन नंतर काळसर रंग होतो; व जसजसा हा रस थंड होऊं लागतो तसतसा त्याचा वरील थर अधिक घनस्थितींत जाऊन त्यावर दगडहि तरंगू शकतो. वरील पृष्ठभाग जरी घनरूप होतो तरी खालील थर उष्ण व पातळ असतात, व त्यामुळें हा प्रवाह लांबवर वाहत जातो. या अग्निरसाच्या प्रवाहाचा जोर व गति वाटेंतील अडथळ्यांच्यावर व उतारावर अवलंबून असते. प्रवाह चालू असतांना कर्कश आवाज उत्पन्न होतो. कांहीं प्रवाहांच्या पृष्ठभागावर फेंस आल्याप्रमाणें दिसतो तर कांहींवर सायीसारखा थर आलेला आढळतो. कांहीं ठिकाणीं हा रस थंड होतांना कांचेप्रमाणें बनतो तर कांहीं ठिकाणीं याला निरनिराळे आकार येतात.

अग्निरसाचा प्रवाह ज्या ज्या प्रदेशांत वाहत जातो तो प्रदेश अत्यंत नाश पावलेला व भयाण असा दिसतो. या भूस्तर अग्निरसाचा प्रवाह सुरू झाल्यानंतर जास्त प्रदेशावर पसरतो व उतरणीवरून तो वेग कमी होत होत वाहूं लागतो. या प्रवाहाच्या बाजू व पुढील भाग तेथील रस थंड झाल्यामुळें एखाद्या किल्ल्याच्या तटाप्रमाणें दिसतात.

भूस्तर(अग्नि) रसाच्या प्रवाहाचा वेग.- हा वेग भूस्तररसाच्या द्रव स्थितीवर, प्रवाहाच्या आकारावर व जमीनीचा उंचसखलपणा व उतार यांवर अवलंबून राहतो. म्हणून प्रवाहाच्या आरंभी हा त्याचा वेग पुष्कळ असतो व तो पुढें पुढें कमी कमी होत जातो, कारण आरंभीं हा रस अधिक पातळ असतो. कारण त्याला थंड होण्यास अवधि नसतो व आरंभीं जमिनीचा उतारहि जास्त असतो. सर्वांत पातळ व अतिशय वेगाने वाहणारा प्रवाह व्हेसुव्हिअस पर्वतावर इ. स. १८०५ च्या ऑगस्ट महिन्यांत १२ तारखेचा होय. त्यावेळीं तो प्रवाह ४ मिनिटांत ३ २/३ मैल लांब वहात गेला. नंतर तो पसरट होऊन त्याचा वेग कमी झाला, तरी ३ तासांत तो टॉरेडिल ग्रेको येथें जाऊन पोहोचला.

मॉनलोआ येथील प्रवाहाचा वेग (१८५२ सालीं) तासीं ७ १/२ पासून १५ मैलप्रमाणें होता. या प्रवाहाचे पृष्ठभाग थंड झाले तरी ते अत्यंत मंद गतीनें पुष्कळ दिवसपर्यंत वाहत राहतात. इ. स. १८९५ च्या जुलैच्या ३ र्‍या तारखेस जो भूस्तर उष्ण रसाचा प्रवाह सुरू झाला तो पुढें चार वर्षेंपर्यंत वाहत होता; व त्याच्या योगानें एक ४०० फूट उंचीची काळसर दगडाची टेंकडी तयार झाली. कधीं कधी वरून थंड व घट्टसर झालेल्या थरांतून आंतील पातळ रस वर येऊन पूर्वींपेक्षां अधिक वेगानें वाहूं लागतो. त्याचप्रमाणें प्रवाहाच्या मार्गांत एखादा तुटलेला कडा आल्यास प्रथम त्या ठिकाणीं प्रवाह आडलासा होऊन नंतर एकदम हा रस त्या उंच कड्यावरून खालीं पडूं लागतो व एक अग्निरसाचा धबधबाच सुरू होतो व त्यामुळें वाफेचे लोट, दगडांचा वर्षाव व या सर्व कारणांनीं अतिशय मोठा आवाज उत्पन्न होतो.

भू स्त र र सा च्या प्र वा हां चा आ का र.- कांहीं ठिकाणीं ज्वालामुखीच्या तोंडांतून हा रस आल्यानंतर डोंगराच्या पायथ्यापर्यंत न जातां जवळच थंड होऊन त्याचा कांचेसारखा पदार्थ होतो. परंतु इतर ठिकाणीं हे प्रवाह नुसतेच डोंगरांच्या पायथ्यांपर्यंत जातात असें नाहीं तर लांबवर सपाटीवर कित्येक मैल वाहत जातात. इ. स. १८६२ त एटना पर्वतांतून जो प्रवाह सुरू झाला त्यामुळें सुमारें ९ कोटी २० लक्ष घनमिटर इतका रस बाहेर आला. १८५२ सालीं ४२ कोटी घनमिटर व इ. स. १६६९ त ९८ कोटी घनमिटर आला. परंतु सर्वांत अत्यंत मोठा प्रवाह म्हणजे आइस्लंडमधील जोकुल पर्वताच्या १७८३ सालच्या स्फोटाच्या वेळचा होय. लाकी येथील भेगेंतून १२ मैल लांबीचा प्रवाह वरचेवर वाहून नद्यांचीं पात्रें भरून कांहीं ठिकाणीं २०० फूट रूंद व ६०० फूट उंचीचे प्रवाह जाऊन सपाटीच्या प्रदेशांत पसरून १२ ते १५ मैल रूंदीचीं वितळलेल्या खडकांचीं सरोवरें बनलीं.

भू स्त र र सा ची नि र नि रा ळी द्र व स्थि ति.- सर्व ठिकाणीं भूस्तर रस जेव्हां वर येतो तेव्हां तो द्रवस्थितींत असतो. हा द्रवरूप पदार्थ कांचेसारखा मुख्यतः असून त्यांत निरनिराळीं खनिज द्रव्यें अत्यंत उष्णतेमुळें विरघळलेलीं असतात. परंतु हा रस पातळ अगर घट्टसर असा निरनिराळ्या परिस्थितीप्रमाणें असूं शकतो व ह्या द्रव स्थितींतील फरकाप्रमाणें या रसाच्या प्रवाहाची गति व विस्तार यांतहि बदल होतो. ट्राकाईट जातीचे खडक ज्या भूस्तर रसापासून झाले तो घट्टसर असला पाहिजे व त्यांत वालुकामय पदार्थ जास्त प्रमाणांत असून त्यांचें विशिष्टगुरुत्व, कमी असतें. काळ्या दगडाच्या जातीचे जे खडक तयार होतात ते पातळ रसापासून होतात, त्यांत लोहांश जास्त असून त्यांचें विशिष्ट गुरुत्व जास्त असतें व या रसाचे थर फार जाड नसतात. ह्या द्रवस्थितींतील फरकाचीं कारणें. उष्णमान कमीअधिक असणें व त्यांतील रासायनिक द्रव्यांत फरक असणें ही होत. ह्यांशिवाय कांहीं शास्त्रज्ञांच्या मतें आणखी एक कारण म्हणजे त्यांत असणार्‍या वाफेच्या व इतर वायुरूप पदार्थांच्या प्रमाणांतील फरक हे होय.

या भूस्तररसाच्या द्रवस्थितीप्रमाणें त्यापासून होणारे परिणामहि निरनिराळे होतात. उदाहरणार्थ, अत्यंत (पातळ) द्रवस्थितींत ह्या अग्निरसाचीं कारंजीं असूं शकतात. कांहीं ठिकाणीं त्यापासून दुय्यम ज्वालामुखीचीं शिखरें तयार होतात व त्यांपासून निघणार्‍या प्रवाहांची गति व विस्तार यांत त्याच्या द्रवरूप स्थितीप्रमाणें बदल होतो.

भू स्त र र सा पा सू न स्फ टि क.- लोहरसारखा हा भूस्तर रस बाहेर पडल्याबरोबर घट्ट होऊं लागून त्याचा वेग कमी होतो. ऑबसिडीअन व इतर कांचेप्रमाणें दिसणारे खडक त्यापासून तयार होतात तरी पण त्या खडकांचें सूक्ष्मदर्शक यंत्रांतून निरीक्षण केल्यास त्यांत अत्यंत सूक्ष्म असे स्फटिक तयार झालेले दिसतात. इतकेंच नव्हें तर हा भूस्तर रस पूर्णपणें थंड होण्यापूर्वींच त्यांत बारीक बारीक स्फटिक तयार झालेले आढळतात. कदाचित् हा रस ज्वालामुखींतून बाहेर येण्यापूर्वींच त्यांत स्फटिक तयार होऊं लागत असावेत व स्फटिकमय रस व स्पटिकाशिवाय असलेला रस असे त्याचे विभाग होऊन स्फोट होतांना दोन निरनिराळ्या बाजूस हे निरनिराळे रस बाहेर येतात. बिन स्फटिकाच्या रसापासून कांचेप्रमाणें व अम्लपदार्थ जास्त असलेले खडक तयार होतात व त्याच्या उलट जातीचे खडक स्फटिकमय रसापासून होतात.

ज्या भूस्तर रसांतून वायुरूप पदार्थ जास्त प्रमाणांत बाहेर येतात त्यांत स्फटिक फारसे तयार होत नाहींत. मुख्यत्वेकरून हा रस थंड होण्यास जो कमी जास्त वेळ मिळतो त्यावरच स्फटिक तयार होणें अगर न होणं हें अवलंबून असतें. जाड थर असल्यामुळें ज्या ठिकाणीं हा रस थंड होण्यास पुष्कळ काळ लागतो. त्या ठिकाणचे खडक पूर्णपणें स्फटिकमय होतात व अगदीं पातळ थर असल्यामुळें जेथें भूस्तर रस ताबडतोब थंड होतो त्या ठिकाणीं त्यापासून कांचेप्रमाणें स्फटिकविरहित खडक तयार होतात. व ही गोष्ट पृष्ठभागानजीक असलेल्या व खोल असलेल्या, जुन्या ज्वालामुखीपासून तयार झालेल्या खडकांच्या थराचें निरीक्षण करून सिद्ध झालेली आहे.

भू ग र्भां ती ल र सा चें उ ष्ण मा न.- इ. स. १८५५ मध्यें स्काकी व सेंट क्लेअरडेव्हिल ह्या शास्त्रज्ञांनीं व्हेसुव्हिअस येथें कांहीं प्रयोग करून पाहिले. बाहेर येणार्‍या भूगर्भांतील रसांत चांदी, लोखंड व तांबे ह्या धातूंच्या बारीक तारा धरल्या होत्या. त्यावेळीं सुमारें १२२८० अंश इतकें उष्णमान आढळून आलें.

परंतु १८१९ सालीं केलेल्या प्रयोगाच्या वेळीं १/३० इंच जाडीची चांदीची तार ह्या रसांत धरल्याबरोबर ताबडतोब वितळली, म्हणजे त्याचें उष्णमान निदान १८००० अंश असावें, इतकेंच नव्हें तर तांब्याची तार सुद्धां वितळली तेव्हां त्याचें उष्णमान २२०४० अंश असावें. हें उष्णमान बरेंच अधिक असावें याला दुसराहि पुरावा आहे. टॉरेडेल ग्रेको येथें या भूगर्भांतील रसांत कांहीं घरेंच गडप झालीं. त्याठिकाणीं पुढें असें आढळून आलें कीं, या रसाच्या योगानें पितळेचें पृथक्करण होऊन त्यांतील तांब्याचे स्फटिक तयार झाले व तसेंच चांदीहि वितळून तिचे स्फटिक तयार झाले व गारगोटीसारख्या दगडाचे कांठहि थोडेसे वितळले. सांटोरिन येथील भूगर्भांतील रसांत जे चुन्याचे दगड सांपडले त्यांचें रूपांतर होऊन निरनिराळीं स्फटिकमय खनिज द्रव्यें तयार झालीं. व्हेसुव्हिअस पर्वतांतून जो रस बाहेर येतो त्याचें उष्णमान आरंभीं सुमारें २०००० अंशापेक्षां जास्त असावें.

भू ग र्भां ती ल र सा च्या प्र वा हा ची जा डी व (स पा टी) उ त र ण अ ग र क ल.- एके काळीं असा समज होता की, ज्वालामुखी पर्वताच्या उतरणीवर भूगर्भांतील रस थंड होऊन त्याचे थर तेथें राहूं शकणार नाहींत व म्हणून ज्वालामुखीच्या उत्पत्तीसंबंधीं जी उपपत्ति लावीत असत तींत असें समजतें कीं, ज्वालामुखीच्या स्फोटानंतर हा ज्वालामुखी पर्वत भूगर्भांतूनच सगळा खालून वर येतो. परंतु सर्व ठिकाणच्या निरीक्षणावरून असें आढळून आलें आहे कीं, ही उपपत्ति बरोबर नसून भूगर्भांतील रस या सर्व डोंगराच्या उतरणीवर थंड झाल्यामुळें घनभूत होऊन त्याचे थर होऊं शकतात. ३५० अंशापासून ४०० अंशांपर्यंत जरी ही उतरण असली तरी त्याठिकाणीं थर राहूं शकतात.

हावाई बेटांतील डोंगराची उतरण २५० अंश आहे. तीवर ह्या भूगर्भांतील रसाचे थर होऊन राहिलेले आहेत. व्हेसुव्हिअस येथें ३०० अंश उतरणीवर थर बनलेले आढळतात. एटना पर्वताची पूर्वेकडील उतरण १७० पासून ४८० अंशांइतकी मोठी आहे तरी तेथें देखील या रसाचे थरच्या थर थंड होऊन राहिले आहेत व त्या थरांची साधारण जाडी १६ फूट आहे. परंतु मॉनालोआ येथें तर ४९० अंशांपासून ९०० अंशांइतक्या उतरणीवर म्हणजे तुटलेल्या कडयावर हा रस थंड होऊन त्याचे थर होऊन राहिले आहेत. अगदीं सपाट दिसणार्‍या भूपृष्ठावरहि ह्या भूगर्भांतील रसाचा प्रवाह लांब अंतरावर गेलेला आढळतो. फार तर त्याची उतरण १० अंशाइतकीच असेल. त्या थरांच्या जाडींत पुष्कळ बदल असूं शकतो. अत्यंत द्रवस्थितींत असलेल्या रसापासून १० ते १२ फूट जाडीचे थर झालेले आहेत तर घट्टसर रसापासून शेकडोंशें फूट जाडीचे थर झालेले दर्‍यांतून आढळतात.

भू ग र्भां ती ल र सा च्या प्र वा हा ची र च ना.- हे प्रवाह कधीं कधीं सजातीय असतात, परंतु बहुतकरून त्यांत निरनिराळे तीन थर तयार झालेले असतात. अगदीं तळाशीं असलेला थर ओबडधोबड असा असतो; आणि मधला व मुख्य थर चांगला पूर्ण घनरूप झालेले असून त्यांत बारीक बारीक छिद्रें असतात व वरील थर दगडाच्या लहानमोठ्या तुकड्यांचा झालेला असतो. ह्या निरनिराळ्या थरांत छिद्रें असण्याचें कारण त्यांत अडकून राहिलेली पाण्याची वाफ हें होय.

भू ग र्भ स्थ र सां ती ल वा यु रू प प दा र्थां चें घ नी भ व न.- पाण्याच्या वाफेशिवाय पूर्वीं भूगर्भांतील रसांत मिसळलेले असे पुष्कळ पदार्थ प्रथम वायुरूपानें खडकांत असणार्‍या भेगांतून अगर दुय्यम मुखांतून बाहेर येतात व वरील हवेच्या योगानें थंड होऊन त्यांचें धनपदार्थांत रूपांतर होतें. ह्या पदार्थांपैकीं, मुख्य पदार्थ म्हणजे मीठ अगर सैंधव हा होय. त्याची बारीक भुकटी अगर लहान मोठे स्फटिक झालेले ह्या भेगांच्या जवळपास अगर भूगर्भांतील रसाच्या पृष्ठभागावर सांपडतात. त्याचप्रमाणें क्लोराईड ऑफ आयर्न आणि क्लोराईड ऑफ कॉपर हेहि पदार्थ निरनिराळ्या रंगाचे सांपडतात. नवसागर, गंधक, तुरटी व हिराकस आणि इतर खनिज पदार्थ ज्वालामुखीच्या आसमंतात आढळतात.

भूगर्भांतील रस निवण्यास फारच वेळ लागतो. ह्या रसाच्या प्रवाहाचा पृष्ठभाग प्रथम घनभूत होतो. ह्या घनभागांतून उष्णता फारच थोड्या प्रमाणांत बाहेर जाऊं शकते. म्हणून वरील पृष्ठभाग चालतां येईल इतका जरी थंड झाला तरी त्याच्या खालीं थोड्याच इंचांवर अत्यंत उष्ण असा अग्निरस असूं शकतो. व ह्या प्रवाहाचें एकंदर उष्णमान जवळपासच्या जमीनीइतके होण्यास पुष्कळ वर्षें लागतात. एटना पर्वताच्या एका स्फोटानंतर ११ महिन्यांनीं ह्या प्रवाहाच्या तळाशीं उष्ण रस दिसत होता व त्यांत काठी धरली असतां तिनें पेट घेतला. व्हेसुव्हिअस येथील १७८५ च्या स्फोटानंतर सात वर्षांनीं तेथील भूगर्भांतील रस उष्ण असलेला व त्यांतून वाफ बाहेर पडत असलेली आढळली. परंतु सर्वांत आश्चर्यकारक उदाहरण म्हणजे मेक्सिकोमधील जोरूलो पर्वताचें होय. त्या ठिकाणीं १७५९ सालीं स्फोट झाला. त्यानंतर २१ वर्षांनीं तेथील भेगांतून असलेल्या उष्णरसामुळें चिरूट पेटवितां येत असे. ४४ वर्षांनंतरहि वाफ बाहेर पडतांनां दिसत होती व ८७ वर्षांनंतर सुद्धां दोन वाफेचे लोट बाहेर पडलेले आढळले.

वरील उदाहरणांवरून हा भूगर्भांतील रस किती हळू हळू थंड होत असतो ह्याची सहज कल्पना येते. व अशा तर्‍हेच्या पुराव्यावरून शास्त्रज्ञ लोक भूगर्भांतील द्रव्यें अत्यंत उष्णस्थितींत द्रवरूप असलीं पाहिजेत असें म्हणतात.

भू ग र्भ स्थ र स प्र वा हा चा स भों वा र च्या भू पृ ष्ठा व र पा ण्या चे प्र वा ह व सं च य यां व र हो णा रे प रि णा म:- भूगर्भांतील रसाचा प्रवाह वाहूं लागला म्हणजे तो पाण्याच्या प्रवाहांत आडवा पसरून त्याचा जणू काय ताल तयार होऊन त्या प्रवाहाचें तळें अगर सरोवरच बनतें. कधीं कधीं सबंध प्रवाहाचें  पात्रच ह्या रसानें भरून त्यावर कित्येक फूट उंच खडकाचे थर तयार होतात व जें पात्र तयार होण्यास हजारों वर्षें लागलीं असतील तें थोड्या कलाकांच्या अवधींत भरून नाहींसें होतें. अशा तर्‍हेनें, पाण्याचे लहानमोठे प्रवाह, तळीं अगर सरोवरें, दर्‍या वगैरे बुजून जाऊन त्या प्रदेशांतील भूपृष्ठांत क्रांति घडून येते, प्रवाहांच्या दिशा बदलतात व कांहीं नवीनच प्रवाह सुरू होतात. दुसर्‍या तर्‍हेचें कार्य म्हणजे या भूगर्भांतील रसाचा भूपृष्ठावर होणारा परिणाम हें होय. निरनिराळ्या खडकांचें रूपांतर होतें. पूर्वींच्या घटकद्रव्यांत फरक होऊन त्यांची निराळी रचना होते. असें जरी आहे तरी कांहीं भाग जसेच्या तसेच राहूं शकतात व त्याठिकाणीं असलेलीं झाडें व वनस्पतीहि जिवंत राहूं शकतात. कांहीं ठिकाणीं बर्फाच्या जाड थरावर या उष्ण रसाचा परिणाम न होतां व हे थर न वितळतां कित्येक दिवस तसेच राहतात.

भू पृ ष्ठा व र ये णें खा लीं जा णें अ ग र उं च स ख ल हो णें.- जमीनीच्या सपाटींत होणारा फरक समुद्रकांठीं सहज लक्षांत येतो. कारण समुद्राच्या पाण्याच्या सपाटीपासूनच नेहमीं सर्व ठिकाणांची उंची मोजतात. ज्या ठिकाणीं समुद्रांत असणार्‍या वनस्पतींचीं अगर प्राण्यांचीं अवशिष्टें सांपडतात. त्या ठिकाणीं जमीन समुद्रांतून वर आली असली पाहिजे. याचा चांगला पुरावाच आहे व अशा तर्‍हेचा पुरवठा एटना, व्हेसुव्हिअस व भूमध्यसमुद्रांतील इतर ज्वालामुखींच्या जागीं सांपडतो. म्हणजे हे ज्वालामुखी प्रथम समुद्रांत उत्पन्न होऊन जमी वर येत येत तयार झाले असले पाहिजेत. ज्याप्रमाणें कांहीं ज्वालामुखीजवळचा प्रदेश वर आलेला आढळतो त्याचप्रमाणें कांहीं दिवस स्फोट झाल्यानंतर पुष्कळ ज्वालामुखीचें प्रदेश खालीं गेलेले आढळतात. हें जमीनीच्या कालीं जाणें समुद्राजवळच्या प्रदेशांत लवकर ध्यानांत येतें, कारण तेथें पाणी चढलेलें दिसतें. १८६६-६७ सालीं सांटोरिन येथें अशा तर्‍हेनें जमीन खालीं गेली. ज्वालामुखीचा प्रदेश अशा तर्‍हेनें सखल होण्यास दोन कारणें आहेत. एक (१) ज्वालामुखींतून जे पदार्थ अतिशय मोठ्या प्रमाणांत वर येऊन पडतात त्यांच्या वजनामुळें परिणाम होऊन जमीन खालीं दबली जात असावी व (२) दुसरें कारण असें कीं, ज्वालामुखींतून पुष्कळ पदार्थ बाहेर आल्यामुळें खालीं पोकळी होत असावी व त्यामुळें वरील वजन सहन न झाल्यामुळें पृष्ठभाग खालीं जात असावा.

पा ण्या चे व चि ख ला चे लों ढे:- पुष्कळ ज्वालामुखींच्या स्फोटाबरोबर पाण्याचे लोट बाहेर पडतात. शांत झालेल्या ज्वालमुखीच्या द्रोणाकार मुखांचीं मोठमोठीं सरोवरें झालेली असतात व कांहीं ज्वालामुखींच्या शिखरावर बर्फाचें आच्छादनहि तयार होतें. नवीन स्फोट होतांना या सरोवराचें पाणी अगर बर्फ वितळून त्याचें पाणी प्रवाहरूपानें एकदम वाहूं लागतें, अगर आंतून येणार्‍या राखेंत मिसळून चिखल होऊन त्याचा लोंढा वाहूं लागतो. या चिखलाच्या लोंढ्यापासून कधीं कधीं फारच हानि होते, कारण ते बरेच द्रवरूप असल्यामुळें एकदम जलद वाहूं लागून वाटेंत येणार्‍या पदार्थांचा नाश करतात. मोठमोठ्या दर्‍या भरून जातात व उतरणीवरून खालीं येतांना त्यांच्या बरोबर लहानमोठे दगड, झाडें अगर इतर पदार्थ वाहून खालील सपाट मैदानावर येऊन पडतात. १८७९ त झालेल्या स्फोटाच्या वेळीं असाच चिखलाचा मोठा लोंढा आल्यामुळें हरक्युलेनियम येथील घरेंच्या घरें त्याच्याखालीं बुडून गेलीं. व त्यामुळें त्यांतील पुष्कळ वस्तू चांगल्या स्थितींत आज उपलब्ध आहेत. अशा तर्‍हेचे लोंढें मध्य व दक्षिण अमेरिकेंतील  ज्वालामुखींच्या मधून पुष्कळ वेळां आल्याचीं उदाहरणें आहेत. वरील दोन्ही तर्‍हेच्या लोंढयांपैकीं, चिखलाच्या लोंढ्यांपासून जमीनीच्या पृष्ठभागावर एकदम कायमचे परिणाम होतात. पूर्वींच्या दर्‍या, प्रवाह वगैरे बंद होऊन नवीन प्रवाह सुरू होतात.

ज्वा ला मु खी चें वि व र बं द हो ण्या चा प रि णा म.- ज्वालामुखीचा जोर कमी झाला म्हणजे आंतून येणारे पदार्थ विवरामध्येंच घनस्थितींत जातात व अशा तर्‍हेनें ज्वालामुखीचें तोंड बंद करतात. तरी आंतील शक्ति पूर्णपणें नाहींशी झालेली नसते व ती आंतील द्रव्यें वर ढकलण्याचा प्रयत्‍न करीत असते. अशा वेळीं जर जवळपासच्या खडकांत भेगा असल्या तर त्यांत हा रस जाऊन तेथें त्याचे खडक बनतात अगर दोन थरांच्यामध्यें शिरून तेथें तिसरा थर थंड होतो.

ज्वा ला मु खीं ती ल वा यु रू प प दा र्थ.- ज्वालामुखीचा जोर कमी होत चालला म्हणजे वायुरूप पदार्थ बाहेर येतात. नेपल्सजवळील सोल्फटोरा पर्वतावर ११९८ सालच्या स्फोटानंतर नेहमीं अशा तर्‍हेचे वायुरूप पदार्थ बाहेर येत असतात. व्हलक्यानों बेटावरहि आतां असेच वायुरूप पदार्थ बाहेर येतात. तरी अद्याप तेथें मधून लहान लहान स्फोटहि होतात. हे वायुरूप पदार्थ वर आल्यावर थंड झाल्यामुळें घनरूप अगर द्रवरूप होतात, अगर एकमेकांवर त्याच्या क्रिया होऊन रासायनिक पदार्थ तयार होतात. गंधकाच्या धुरापासून तेजाब तयार होते. व त्याची खडकावर व इतर जवळपासच्या पदार्थावर क्रिया घडते व त्यामुळें हे खडक पांढरे अगर पिंवळे होतात. शिवाय गंधकाच्या धुरापासून गंधकाचे थर तयार होतात. तसेच सिलीकाचे थरहि पुष्कळ बनतात. ह्याशिवाय जिप्सप, अ‍ॅलम (तुरटी), सल्फाईड्स ऑफ आयर्न अँड कॉपर व बोरॅसिक अ‍ॅसिड वगैरे पदार्थ या वायुरूप पदार्थाच्यापासूनच थंड झाल्यावर तयार होऊन पुष्कळ ज्वालामुखींच्या आसपास सांपडतात व कांहीं ठिकाणीं ह्यांचा मोठा व्यापार चालतों. ह्याशिवाय कार्बन डायऑक्साईड म्हणून जो विषारी वायु बाहेर येतो तो कांहीं ठिकाणीं फार प्रमाणांत येत असल्यामुळें तेथें कोणतेहि प्राणी राहूं शकत नाहींत. यापैकीं प्रख्यात जागा म्हणजे जाव्हा बेटांतील मृत्यूची दरी ही होय. या ठिकाणीं हा विषारी वायु पुष्कळ प्रमाणांत येत असल्यामुळें त्याच्या जवळपास जाणारे वाघ, अस्वलें, हरणें, डुकरें वगैरें प्राणीं मरून त्यांचे सांगाडे पडलेले दिसतात.

उ ष्णो द का चें का रं जें.- अशा तर्‍हेचीं कारंजीं आइस्टंड बेटांत पुष्कळ आहेत. उष्णोदकाच्या झर्‍यात व यांत फरक असा आहे कीं, याठिकाणीं कांहीं ठराविक कालानंतर उष्णोदक व वाफ यांचे फवारे कित्येक फूट उंच हवेंत उडतात. तसेंच यांचा आकार बाहेरून निमुळता असा असतो व झर्‍याचा भूगर्भाच्या आंतील भागांशीं खोल विवरांच्या योगानें निकट संबंध असतो. ह्या पाण्याबरोबर येणार्‍या घनपदार्थांचे थर ह्या कारंज्यांच्या सभोंवार सांचल्यामुळें त्यांनां वर सांगितलेला निमुळता आकार आलेला असतो. प्रथम अंतर्भागांतून गुरगुर असा आवाज कांहीं कालपर्यंत येऊन त्या विवरांत जरा मोठासा गडगडाट होतो; व पृष्ठभागावरील झर्‍याचें पाणी खवळू लागतें. नंतर उष्णोदक व वाफ यांचे फवारे मोठ्या आवाजासरसें उंच हवेंत उडूं लागतात. अमेरिकेंतील यलोस्टोन पार्क येथील ओल्ड फेथफुल नांवाचें कारंजें फार प्रख्यात आहे. ह्याठिकाणीं सुमारें एक कलाकाच्या अंतरानें वर वर्णन केल्याप्रमाणें उष्णोदक व वाफ याचे फवारे मोठा आवाज होऊन सुमारें शंभर फूट उंच हवेंत पांच मिनिटापर्यंत उडत असतात.

आइस्लंड बेटांतील ग्रेट गेशर येथें कांहीं शास्त्रज्ञांनीं ह्या कारंज्यांच्या उष्णमानासंबंधीं प्रयोग करून पाहिले त्यावरून असें दिसतें कीं, वर पृष्ठभागावर आल्यानंतर पाण्याचें उष्णान (२१२० अंश) असते, परंतु उष्णमापक यंत्र जेव्हां खोल विवरांत सोडून पाहिलें तेव्हां असें आढळून आलें कीं, तेथील उष्णतामान थोड्याशा खोलीवर बरेच अधिक (२२६० फा. अंश) होतें. आतां या उष्णतामानास पाणी द्रवस्थितींत असूं शकतें नाहीं, परंतु हा जो विवरांत उंच पाण्याचा थर असतो त्याच्या दाबाखालीं असल्यामुळें तें द्रवरूप असूं शकतें व वर आल्यावर दाब कमी झाल्यामुळें त्याची वाफ होऊं लागते व खालील पाण्यावरीलहि दाब एकदम कमी झाल्यामुळें पाण्याची वाफ होऊन ती जोरानें वर येऊन दाबाखालीं असल्यामुळें हवेंत उंच उडते. तेव्हां असें दिसतें कीं, कारंजीं उडण्याकरितां लागणारी शक्ति या दाबाखालीं असलेल्या वाफेपासून प्राप्त होते; व ही शक्ति इतकी मोठीं असते कीं हिच्या योगानें नुसतें पाणी व वाफच वर हवेंत फेंकली जातात असे नाहीं तर मोठाले दगडहि शंभर फूट उंच फेंकले जातात. या पाण्याबरोबर त्यांत विरघळलेले कित्येक क्षार व खनिजद्रव्यें वर येतात. दर दहा हजार पाण्याच्या भागाबरोबर सुमारें १२ भाग घनपदार्थ वर येतात. यांपैकीं मुख्य म्हणजे वालुकामय पदार्थ सोडिअम कार्बोनेट, मीठ हीं होत. हे घनपदार्थ वर आल्यावर झर्‍याच्या काठांवर यांचे थर तयार होतात व त्यांवर सूक्ष्म वनस्पती उगवून त्यांत भर पडते. कांहीं कालानंतर अंतर्भागांतील रचनेंत फरक झाल्यामुळें ह्या कारंज्यांचा जोर कमी होत होत तीं उडेनाशीं होतात व आंतील विवर वालुकामय पदार्थांचा थर सांचून कायमचे बंद होतें, व पृष्ठभागावर फक्त ह्या घनपदार्थांचे जे निमुळते थर तयार झालेले असतात तेवढींच यांचीं अवशिष्ट चिन्हें म्हणून राहतात.

चि ख ला चे अ ग र मा ती चे ज्वा ला मु खी.- या प्रकारच्या ज्वालामुखींतून वायुरूप पदार्थ बाहेर येतात. ह्यांचा आकार निमुळत्या शिखराप्रमाणें असून हे ३ फुटांपासून १०० फुटांपर्यंत उंच असतात. ह्यांतून निरनिराळे वायुरूप पदार्थ कांहीं ठराविक कालानंतर येतात व कांहीं कालपर्यंत हे निद्रित असतात. ह्यांतून येणार्‍या वायूमध्यें मार्शगॅस, कार्बन डायाक्साईड, हायड्रोकारबन्स, नैट्रोजन, पेट्रोलियम वायू हे मुख्यत्वें असतात. चिखलाबरोबर क्षारयुक्त पाणीहि येतें. चिखल बहुतकरून थंड असतो. मोठ्या पावसानें हे लहान सहान ज्वालामुखी धुवून जाऊन सपाट प्रदेश होतो; व पुन्हां स्फोट होऊन पूर्वींच्या आकाराचे ज्वालामुखी होतात. अशा तर्‍हेचे ज्वालामुखी, सिसिली, कॉकेशस, सिंधूचें मुख वगैरे ठिकाणीं आहेत.

ज्वा ला मु खी प र्व तां ची र च ना.- अर्वाचीन कालांतील ज्वालामुखींच्या फक्त पृष्ठभागावरील भागांची रचना आपल्याला चांगली कळूं शकेल. परंतु प्राचीन कालांतील ज्वालामुखीच्या आंतील भागांतहि वरील भाग नैसर्गिक शक्तीच्या  योगानें नाहींसे झाल्यामुळें दृष्टोत्तपत्तीस येतात म्हणून त्यांची अंचर्रचनाहि कळूं शकते. परंतु आपण फक्त अर्वाचीन ज्वालामुखींचाच विचार करूं. अशा ज्वालामुखींतून बाहेर पडणार्‍या पदार्थांची दोन निरनिराळ्या पद्धतींनीं रचना होते. हे पदार्थ जर एका मध्यवर्ती मुखांतून वर येत असतील तर त्याच्यापासून निमुळता शिखराकार ज्वालामुखी होतो, परंतु हे पदार्थ जर भूपृष्ठांतील भेगांतून वर येत असतील तर त्यापासून सपाट असें मैदानच तयार होतें.

ज्वा ला मु खीं चीं शि ख रें.- शिखराकर ज्वालामुखीबद्दल पूर्वीं बरेंच विवेचन केलेलें आहे. एखाद्या पूर्वीं अस्तित्वांचा असलेल्या विवरामधून अगर नवीन  विवर पाडून ज्वालाग्राही पदार्थ वर येतात. त्यांतील घनपदार्थ वर आल्यावर ते ह्या विवराच्या सभोंवार पडून त्यांची कड तयार होते व जसजसे जास्त जास्त पदार्थ वर येतील तसतसे ते सभोंवार पडून निमुळत्या शिखराप्रमाणें त्यांची रचना होते, व हळू हळू त्या आकाराची टेंकडी अगर पर्वत तयार होतो. अर्थातच एकामागून एक असे जे स्फोट होतात व त्यांच्या बरोबर जे पदार्थ बाहेर येतात त्यांच्या थरामुळेंच या टेंकड्या अगर डोंगर झालेले असतात. असें होत असतांना वरील पदार्थांचे थर अगदीं मोठ्या उतरणीवरहि राहतात. ह्या पर्वताच्या थरांचे सूक्ष्म निरीक्षण केलें असतां असें आढळून येतें कीं, हे उंचवटे अगर पर्वत घन द्रव्यांचे निरनिराळे थर पूर्वीमच्या पृष्ठभागावर सांचून तयार झाले आहेत. हे थर उतरणीवर राहूं शकतात ही गोष्ट अंतर्द्रव्यांचा रस ज्वालामुखींतून बाहेर पडल्यावर उतरणीवर कसा थंड होतो हें प्रत्यक्ष स्फोट होत असलेल्या ज्वालामुखींच्या उदाहरणांवरून सिद्ध झालें आहे.

नेहमींच्या ज्वालामुखींच्या शिखरावरील टोंक नाहीसें झालेले असतें व त्या ठिकाणीं द्रोणाकार खळगा असतो. यासच आपण मुख असें म्हणतो. हा वर्तुलाकार सर्व ठिकाणीं वायूरूप पदार्थांचा सारखाच दाब असल्यामुळें आलेला असतो. हें मुख अतिशय लहान आकारापासून फार विस्तीर्ण असें असूं शकतें व त्याचप्रमाणें याची खोलीहि पुष्कळ असते. ज्याला चिखलाचे ज्वालामुखी म्हटलें आहे त्या ठिकाणच्या मुखाचा व्यास व खोली कांहीं इंच असते. परंतु हा व्यास कांहीं ठिकाणच्या ज्वालामुखीवर कित्येक मैल लांबीचा असून त्याची खोली हजारों फूट आहे. मुखाच्या सभोंवार तटबंदीप्रमाणें भिंती तयार झालेल्या असतात. शांत झालेल्या ज्वालामुखीच्या मुखाचा तळ बहुतकरून सपाट असा असतो, व त्यांतून बरेच वेळां वायू वर येतात. मुख असलेल्या ज्वालामुखीवर या एका मुख्य मुखाशिवाय दुसरीं दुय्यम मुखें असतात. कधीं कधीं हीं दुय्यम मुखें मुख्य मुखाएवढींहि असतात. सर्वच ज्वालामुखींनां मुखें असतात असें नाहीं.

ज्वा ला मु खीं च्या मु खां चीं झा ले लीं स रो व रें.- ज्वालामुखीचा स्फोट होऊन वरील भाग उडून गेल्यामुळें द्रोणाकार खोल असें मुख तयार होतें. त्यांत पाऊस पडून पाणी सांचतें व त्याचें सरोवरच बनतें. अर्थातच अशीं सरोवरें शांत झालेल्या ज्वालामुखीवरच होतात. ईफेल ह्या ठिकाणीं इटलींत पुष्कळ ठिकाणीं अशीं सरोवरें आहेत. हिंदुस्थानांत अशा तर्‍हेचें सरोवर मुंबई व नागपूर ह्यांच्यापासून सारख्या अंतरावर लोणार सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. येथील खडक दक्षिणेंतील काळ्या दगडाचा आहे. हें सरोवर वर्तुलाकार असून त्याचा व्यास १ मैलापेक्षां जास्त आहे आणि तें ३०० -४०० फूट खोल आहे. ह्याच्या तळाशीं क्षारयुक्त पाण्याचा संचय आहे. उत्तरेकडील बाजूशिवाय इतर सर्व बाजूंनीं काळ्या दगडाची कड अगर भिंत आहे. ही भिंत ४०-५० फुटांपासून कांहीं ठिकाणीं १०० फुटांपर्यंत उंच आहे.

नेहमीच्या ज्वालामुखींच्या शिखरांशिवाय इतरहि निरनिराळीं शिखरें असतात. (१) कांहीं शिखरें ज्वालामुखीतून आलेल्या पदार्थांचीं नसतात तर पूर्वीं अस्तित्वांत असलेल्या खडकांतून वायुरूप पदार्थ येत असतांनां झालेलीं असतात. (२) दुसर्‍या जातीचीं शिखरें ज्वालामुखींतून येणार्‍या राखेचीं व लहान सहान दगडांचीं झालेलीं असतात. ह्यांनां टफ कोन्स व सिंडर कोन्स असें म्हणतात. (३) चिखलापासून झालेलीं लहान मोठीं शिखरें हीं निराळ्या प्रकारचीं होत. व ह्याशिवाय (४) लाव्हा कोन भूगर्भांतील द्रव्यांच्या रसापासून झालेलीं शिखरें सर्वांत मुख्य होत. शिखरें निरनिराळीं एकावर एक पडून बनलेलीं असतात. हे थर निरनिराळ्या मजल्याप्रमाणें अगर पायर्‍याप्रमाणें रचले जातात.

स मु द्रां ती ल ज्वा ला मु खी.- ज्वालामुखींचा उद्भव समुद्राच्या तळाशींहि होऊ शकतो इतकेच नव्हें तर ह्या समुद्रांतील ज्वालामुखींचा जोर अधिक असतो. अगदीं अर्वाचीन काळांतहि अशा तर्‍हेचे ज्वालामुखी समुद्रांत उत्पन्न झाल्याचीं उदाहरणे आहेत. १७८३ सालीं आइस्लंड बेटाच्या पश्चिमेस ३० मैलांवर एक ज्वालामुखीचा स्फोट झाला. त्याबरोबर एक नवीन बेट तयार झालें आणि तेथून धूर व ज्वाला वर येऊं लागल्या परंतु सुमारें एक वर्षांत लाटांच्या योगानें वरील भाग फुटून वाहून गेला व तेथें फक्त उंचवटा राहिला. एक शतकानंतर (१८८४ सालीं) त्याच्या जवळच दुसरें एक बेट ज्वालामुखीचा स्फोट होऊन तयार झालें व तेंहि लवकरच समुद्राच्या लाटांच्या तावडींत सांपडून धुवून गेलें. अशा तर्‍हेचीं बेटें ज्वालामुखीच्या शक्तीच्या योगानें निरनिराळ्या समुद्रांत अगर महासागरांत उत्पन्न झालेलीं आहेत.

समुद्रांतील ज्वालामुखींचा आकार निमुळता, शिखराप्रमाणेंच असतो. हे ज्वालामुखी बहुतकरून एका रेषेंत उत्पन्न झालेले आढळतात व कांहीं ठिकाणीं ह्यांचे समूह सांपडतात. एका रेषेंत असलेल्या ज्वालामुखींचीं उदाहरणें म्हणजे आलूशिअन बेटें, जपान, जाव्हा व एँटिल्स येथील ज्वालामुखी हीं होत. ह्या ठिकाणीं समुद्राच्या तळाशीं पूर्वींची भेग असावी. समुद्रांतील ज्वालामुखींचे स्फोट होत असतांना जे पदार्थ बाहेर येतात ते जमीनीवरील ज्वालामुखींतून येणार्‍या पदार्थांपासून निराळे नसतात असें गोळा केलेल्या नमुन्यांवरून आढळतें. निरनिराळ्या स्फोटांच्या मध्यें बराच काल लोटत असावा व ह्या कालांत समुद्रांतील प्राण्यांची अवशिष्टें, चुना वगैरे ह्यांचा बराच थर जमतो व पुन्हां त्यावर ज्वालामुखींतून येणार्‍या पदार्थाचा दुसरा थर तयार होतो. ह्यांतील कांहीं समुद्रांतील ज्वालामुखी फार प्राचीन कालीं तयार झालेले असावेत.

पृ ष्ठ भा गा व री ल भे गां तू न झा ले ले स्फो ट.- पुष्कळ काळपर्यंत एटना. व्हेसुव्हिअस वगैरे ठिकाणीं असलेल्या द्रोणाकारमुख असलेल्या ज्वालमुखींशिवाय इतर निराळ्या ज्वालामुखीची कल्पना नव्हती. परंतु दक्षिण अमेरिका, आइस्लंड व हिदुंस्थान ह्याठिकाणीं हजारों चौरस मैल विस्तार असलेले खडक आहेत. हे पृथ्वीच्या आंतील उष्ण रस वर येऊन त्यांपासून थंड झालेले आहेत परंतु ह्याठिकाणीं त्यांचीं उगमस्थानें हीं द्रोणाकार मुख असलेले ज्वालामुखी दिसत नाहींत. शिवाय ह्यांचा विस्तार इतका मोठा आहे कीं, हे ज्वालामुखीतून निघून तयार झालेले नसावेत. ह्यांचा स्फोट लांबवर मोठमोठ्या भेगा पडून पृष्ठभाग दूभंगून त्यांतून रसबाहेर येऊन शेंकडों किंवा हजारों मैल दूरवर पसरून त्यांचे खडक बनले आहेत. असे स्फोट वारंवार होऊन थरावर थर रचून हजारों फूट उंचीचे खडक तयार झालेले आहेत.

ह्या तर्‍हेच्या नवीन ज्वालामुखीचें उत्तम उदाहरण म्हणजे हिंदुस्थानांतील दक्षिणेकडील काळा खडक (डेक्कन ट्रॅप) हें होय. ह्याचें क्षेत्र सुमारें २००००० चौरस मैल विस्ताराचें असून ह्याची उंची सुमारें ६००० फूट आहे. हे सर्व खडक अर्थातच एकदम एक स्फोट होऊन तयार झालेले नाहींत. इतक्या जाडीच्या उंचीचे थर जमण्यास बरेच स्फोट झाले असले पाहिजेत व प्रत्येक स्फोट पुष्कळ काळपर्यंत टिकणारा असला पाहिजे. हे स्फोट अत्यंत प्राचीन काळीं म्हणजे क्रेटॅशिअस (सितोपल) कालांत झाले असावेत व पूर्वींच्या पृष्ठभागावर पसरून त्या कालीं अस्तित्वांत असलेल्या नद्या, नाले, सरोवरें वगैरें बुजवून भरून टाकिलीं असावींत.

ज्वा ला मु खी उ त्प न्न हो ण्या ची का र णें.- ज्वालामुखीं उत्पन्न होण्यास काय कारणें असावींत याबद्दल फार दिवसांपासून शास्त्रज्ञांमध्यें मतभेद आहेत- (१) अगदीं प्राचीन काळीं बर्नर नामक शास्त्रज्ञ व त्याचे अनुयायी यांच्या मतें ज्वालामुखीचें कारण म्हणजे पृथ्वीच्या आंतील भागांत असलेल्या दगडी कोळशास आग लागून त्या उष्णतेमुळें हे उत्पन्न होत असावेत; (२) कांहीं कालानंतर सर हंप्रे डेव्ही व इतर शास्त्रज्ञ यांनीं असें प्रतिपादन केलें कीं, पृथ्वीच्या आंत मोठमोठ्या रासायनिक क्रिया घडत असाव्यात व भूपृष्ठावरील पाणी आंत झिरपून सोडिअम व पोटॅशिअम धातूंच्यावर त्याची क्रिया होऊन हे स्फोट होतात व (३) त्यानंतरच्या कालांत भूस्तरशास्त्रज्ञांच्या मतें पृथ्वीचा अंतर्भाग द्रवस्थितींत असावा असें ठरलें. तेव्हांपासून ज्वालामुखीचा स्कोट होण्याचें तेंच कारण असावें असें मत होऊ लागलें. त्याचप्रमाणें पृथ्वी हळूहळू थंड होत आहे व त्या अकुंचनामुळें ज्वालामुखी व धरणीकंप ह्यांसारखें परिणाम सहजच होतात. कॉर्डिअर ह्याचें असें म्हणणें कीं, १/२५ इंचाइतकें जरी आकुंचन झाले तरी त्यामुळें ५०० स्फोट होऊं शकतात. परंतु वरील कोणत्याहि कारणानें पूर्ण उलगडा होत नाहीं. कारण वरील  कारणें अस्तित्वांत असतात तरी ज्वालामुखीचें स्फोट मात्र कधीं कधीं होतात, ते नेहमीं झालेले आढळून येत नाहींत. (४) हल्लींच्या सर्व भूस्तरशास्त्रज्ञांच्या मतें ज्वालामुखीचें मुक्य कारण पृथ्वीच्या आंतील भयंकर उष्णता हें आहे. तसेंच निरनिराळे होणारे स्फोट व त्यांतून बाहेर पडणारे पदार्थ ह्यांच्यावरून असेंहि अनुमान निघतें कीं, हे स्फोट होण्याचें अगदीं शेवटचें कारण म्हणजे पृथ्वीच्या आंतील उष्ण रसांत असलेले निरनिराळे वायुपदार्थ व त्यांचे गुणधर्म हें होय. कांहींच्या मतें हे वायुरूप पदार्थ मूलमूत द्रव्यापैकींच आहेत, व ह्यांस पुरावा म्हणजे आकाशांतील जे उल्कापात होऊन दगड खालीं पडतात त्यांतहि हायड्रोजन सारखे वायू शोषून राहिलेले सांपडतात. त्याचप्रमाणें पुष्कळ धातू वितळलेल्या स्थितींत वायु शोषून घेतात. परंतु कांहींच्या मतें हे वायुरूप पदार्थ मूलभूत द्रव्यांपैकीं नसून मागून उष्णरसांत मिसळत असावेत व यास पुरावा म्हणजे निरनिराळे स्फोट होत असतांना मुख्यतः पाण्याची वाफ हा पदार्थ अतिशय जास्त प्रमाणांत बाहेर येतो व हें पाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरूनच आंत जात असावें. नद्या, सरोवरें व समुद्र ह्याच्या तळांतून पाणी झिरपून झिरपून खोलवर जात असावें व आंतील उष्णतेमुळें त्याची वाफ होऊन रसांत मिसळत असावी. त्याचप्रमाणें धरणीकंप, ज्वालामुखीचें स्फोट वगैरेंच्यावेळी ज्या लहानमोठ्या भेगा पडतात त्यांतूनहि पावसाचें पाणी झिरपत असावें. ज्वलामुखीच्या स्फोटामुळें वर येणार्‍या पदार्थांत क्लोराइड्स जास्त असतात. ह्यावरून समुद्राचें पाणी आंत जात असावें असें अनुमान निघतें.

एकंदरींत असें दिसतें कीं, भूपृष्ठावरून आंत जाणारें पाणी हळूहळू झिरपत जाऊन आंतील उष्ण रसांत वायुरूपानें मिसळतें व जेव्हां त्याचा दाब अतिशय वाढतो तेव्हां तें ज्वालामुखीच्या विवरांतून बाहेर पडण्याचा प्रयत्‍न करतें, व अशा रीतीनें ज्वालामुखीचा स्फोट होतो. पुन्हां नवीन पाणी सांचूं लागतें व त्याची वाफ होऊन पूर्वींप्रमाणें दुसरा स्कोट होतो. प्रो. अरिनिअस ह्यांनीं जे शोध लावले आहेत त्यांवरून वरील विवेचनाला पाठिंबा मिळतो. उष्ण मानाप्रमाणें पाण्याच्या गुणधर्मांत अतिशय फरक होऊन त्याच्या अंगी फारच शक्ति येते. उष्णोदककारंज्याचे स्फोट ज्याप्रमाणें मुख्यत्वेंकरून वाफेमुळेंच होतात त्याचप्रमाणें ज्वालामुखीचे स्फोटहि मुख्यत्वेंकरून अत्यंत दाबाखालीं असलेल्या व अतिशय उष्णता असलेल्या वाफेच्या योगानेंच होत असावेत.

हें जरी मुख्य कारण असलें तरी त्याशिवाय कांहीं ठिकाणीं इतर दुय्यम कारणेंहि असावींत. कांहीं कार्वाइड्स नामक पदार्थांवर पाण्याची क्रिया होऊन त्यांतून वायुरूप पदार्थ तयार होतात व त्यामुळें लहान सहान स्फोट होणें शक्य आहे.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .