प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

टोन, थिओबाल्ड वूल्फ - (१७६३-१७९८) - एक आयरिश देशभक्त. हा डब्लिनमधील वूल्फटोन पिटरटोन नांवाच्या गाडीवाल्याचा मुलगा. हा ट्रिनिटि कॉलेजमध्यें असतांना त्यानें आपल्या अभ्यासाकडे फार थोडें लक्ष दिलें. त्याला लष्करी पेशाची फार आवड होती. पण मॅटिल्डा बुइदरिंग्टन नांवाच्या एका कुमारिकेच्या प्रेमपाशांत सांपडल्यामुळें त्यानें १७८६ सालीं कॉलेजचीच पदवी घेतली व वकीलीचा अभ्यास केला. १७८९ सालीं तो वकीलीची परीक्षा पास झाला त्यानें, साउथ सीजमध्यें एक नवीन लष्करी वसाहत स्थापण्यासंबंधींचा मसुदा तयार करून पिटकडे पाठविला. पण त्याकडे पिटनें लक्षच दिलें नाहीं; त्यामुळें चिडून जाऊन त्यानें आयरिश राजकारणाकडे आपलें लक्ष वळविलें. १७९० सालीं बकिंगहॅमच्या राज्यकारभारावर सणसणीत टीकात्मक लेख लिहिल्यामुळें तो व्हिग संघाच्या नजरेस आला. त्याचप्रमाणें १७९१ सालीं 'नार्दर्न व्हिग' या नांवाखालीं एक जहाल निबंध लिहिल्यामुळें तो प्रसिध्दीस आला.

या निबंधामध्यें प्रॉटेस्टंट व कॅथोलिक लोकांमधील ऐक्य होण्याची आवश्यकता त्यानें जोरानें पुढें मांडली. तसेंच ग्रेटब्रिटननें आपल्या प्रचंड उद्योगानें पार्लमेंटमध्यें जी सुधारणा घडवून आणली होती तीसंबंधानें या निबंधांत टोननें पूर्ण तिरस्कार व्यक्त केला होता.

आपल्या कल्पनांनां मूर्त स्वरूप देण्यासाठीं त्यानें 'संयुक्त आयरिश राष्ट्रमंडळ, या नांवाची सभा, थॉमस रसेल, व नॅप्पटॅंडी यांच्या सहाय्यानें स्थापन केली. या सभेचा मूळ उद्देश कॅथोलिक व प्रॉस्टेस्टंट लोकांमध्यें ऐक्य घडवून आणणें व कायदेशीर पध्दतीनें राज्यकारभारांत सुधारणा घडवून आणणें हा होता. पण या सनदशीर मार्गांनी देशाचें कल्याण साधणार नाहीं असें त्याला कळून आल्यानें त्यानें त्या मंडळांतील सभासदांच्या बहुमतानें, सशस्त्र बंडाच्या सहाय्यानें स्वातंत्र्य मिळविण्याचें या मंडळाचें धोरण निश्चित केलें. इंग्रजांविषयीं टोनच्या मनांत जात्याच द्वेष होता व त्याप्रमाणें तो स्वत: कबूल करीत असें. वर सांगितल्याप्रमाणें आयरिश संयुक्त राष्ट्रमंडळानें आपलें धोरण बदलल्यामुळें, त्यांतील लॉर्ड केनमेरच्या नेतृत्वाखालीं ६८नेमस्त मतांचीं मंडळी फुटली व त्यामुळें संयुक्त आयरिश राष्ट्रमंडळाचीं सत्रें जहाल मंडळींच्या हातांत आलीं. या जहाल मंडळींतील अग्रणी डब्लिन येथील व्यापारी जॉन केओघ होता. १७९२ त रोमनकॅथेलिक कमिटीनें टोन हा प्रॉटेस्टंट असतांना सुध्दां त्याला आपल्या कमिटीचा चिटणीस निवडलें व त्यामुळें संयुक्त राष्ट्रीय मंडळांमध्यें कॅथोलिक लोकांनां सुध्दां अधिक उत्साहानें भाग घेतां येऊं लागला. फ्रान्समधील जॅकोबाईट लोकांच्यां धर्ममतांचा संसर्ग लागूं नये या कारणास्तव आयरिश धर्मोपाध्यांनां आयर्लंडमध्यें शिक्षण देण्यांत यावें अशा प्रकारचे यत्न बर्क व ग्रॅटन यांनीं चालवलिे होते. टोननें देखील हीच कल्पना पण अगदीं उलट हेतूनें अंमलांत आणण्याची खटपट केली. आयर्लंड मध्येंच या उपाध्यायांच्या शिक्षणाची सोय झाल्यास या उपाध्यायांनां देखील आपल्या गोटामध्ये ओढून घेतां येईल हा त्याचा अंतस्य हेतु होता. आयरिश पार्लमेंटमध्यें आपलीं मते मान्य होणें शक्य नाहीं असें वाटल्यामुळें संयुक्त आयरिश राष्ट्रमंडळानें आपली सर्व भिस्त फ्रेंचांच्या मदतीवर ठेवली.

कर्मधर्मसंयोगानें एन १७९४ साली फ्रान्समध्यें बरीच वर्षे राहिलेला विल्यम जॅक्सन नांवाचा एक धर्मोपदेशक फ्रेंच राज्यमंडळाकडून आयरिश राष्ट्रमंडळाची वाटाघाट करण्यासाठीं आयर्लंमध्यें आला. याला सर्व माहिती समजून देण्याच्या निमित्तानें टोननें एक मसुदा तयार केला. त्यांत आयर्लंडची हीन स्थिति कशी झाली आहे याचें वर्णन करून आयर्लंड हें बंडाला तयार आहे असें दाखविलें. याबद्दल टोनला शिक्षा झाली असती पण त्यानें इंग्रजी अधिकारीवर्गांतील आपल्या मित्रांचें वजन खर्च करून आपली सुटका करून घेतली व तो १७९५ मध्यें अमेरिकेला निघून गेला.

अमेरिकेमध्यें गेल्यावर रेनॉल्ड्स, रोमन, नॅपर, टूंडी इत्यादि साथीदारांच्या सहाय्यानें त्यानें आपलें काम करण्यास पुन्हां सुरुवात केली; पण परत पॅरिस येथें येऊन त्यानें आयर्लंडला स्वातंत्र्य मिळविण्यासाठीं फ्रेंच अधिकार्‍याचीं मनें वळविण्यास सुरवात केली. डीला क्रॉइ व कार्नो हे त्याचा उत्साह व कार्यनिष्ठा पाहून फार प्रसन्न झाले. कार्नो यानें टोनला अडज्यूटंट जनरलच्या कामावर नेमलें. फ्रेंच सैन्य आयर्लंडमध्यें उतरतांच आयर्लंडमध्यें लगेच बंड होईल व फ्रेंचांच्या साहाय्यानें आयर्लंड स्वतंत्र होईल असें त्यानें कार्नोला सागितलें. फ्रेंच अधिकार्‍यानीं फिट्झिराल्ड व ओकोनार यांच्याशीं पत्रव्यवहारानें टोनच्या म्हणण्याची खात्री करून घेऊन हॉचच्या आधिपत्याखाली सैन्य पाठविण्याचे कबूल केलें. १७९६ सालच्या डिसेंबरच्या सोळाव्या तारखेस ब्रेस्ट येथून तीस जहाजें व १५००० सैन्य आयरिश लोकांनां दारूगोळा व हत्यारें पुरविण्याकरतां निघालें. फ्रेंचांच्या आरमाराची अगोदरच असावी तशी व्यवस्था नव्हती व त्यांतच वादळ सुटल्यामुळे आरमाराची अत्यंत दुर्दशा झाली व त्यामुळें आरमाराला परत फ्रान्सला येणें भाग पडलें. तरी पण टोननें आपला धीर खचूं दिला नाहीं. फिरून तो डच आरमाराच्या मदतीनें आयर्लंडमध्यें स्वारी करण्याच्या बेतानें आला पण त्याच्या दुर्देवानें याहि वेळीं प्रतिकूल वारा सुटून आरमाराची दुर्दशा झाली व त्यामुळें कॅंपरडौनच्या लढाईमध्यें आरमाराचा पूर्ण पराजय झाला व टोन हा पॅरिस येथें परत आला. याच वेळीं टोनची ज्याच्यावर भिस्त होती तो हॉच सेनापतीहि मरण पावला. अशा रीतीनें टोनच्या मागें दुर्देव हात धुवून सारखें लागलें होतें. नेपोलियन बोनांपार्टच्या टोननें पुष्कळ वेळां मुलाखती घेतल्या पण हॉचच्या इतका नेपोलियन हा आयर्लंडच्या बाबतीत उत्साही नव्हता. त्यामुळें १७९८ सालीं आयर्लंडमध्यें बंडाळी होण्याच्या वेळींच नेपोलियन हा ईजिप्तकडे निघून गेला. फ्रेंच अधिकार्‍यानींहि किरकोळ सैन्याच्या तुकडयांशिवाय अधिक कुमक पाठविली नाहीं. हम्बर्ट नांवाच्या फ्रेंच सेनापतीनें आपल्या हजाराच्या तुकडीसह आयर्लंडच्या किनार्‍यावर येऊन तेथील इंग्रजी सैन्याचा पराभव केला व तो पुढें चाल करून जाऊं लागला. पण लेक व कॉर्नवालींस ह्यांनीं आपल्या २०००० सैन्याच्या योगानें त्याचा पराभव केला. या लढाईंत टोनचा भाऊ पकडला जाऊन त्याला फांसावर चढविण्यांत आलें. दुसर्‍या तुकडीचा डोनिगलच्या बंदरामध्येंच पराभव झाला. याचवेळीं फ्रेंचांनींहि हार्डी नांवाच्या सेनापतीला ५००० सैन्यानिशीं टोनच्या मदतीला पाठविलें. पण लफखिली येथें मोठी लढाई होऊन फ्रेंचांचा पराजय झाला. टोन हा यावेळी फ्रेंच सरदाराच्या पोषाखांत असल्यानें तो फ्रेंचांचा सरदार आहे असें समजून, त्याला पकडल्यानंतर सन्मानानें वागविण्यांत आलें. पण सर जॉर्ज हिल नांवाच्या एका आयरिश मित्रानें त्याला आयत्यावेळी ओळखल्यामुळें त्याच्या पायात बेड्या पडल्या. टोननें आपल्या खटल्याच्या वेळीं धैर्यानें व सडेतोडपणानें भाषण केलं. 'इंग्लंडशी लढाई करून आयर्लंडला स्वतंत्र करण्याची मी उघड खटपट केली' असें त्यानें कोर्टांत सांगितलें. फ्रेंच सैन्यांतील सरदार अगर अधिकारी या नात्यानें फ्रेंच शिक्षा देण्याच्या ऐवजीं लष्करी मानाप्रमाणें आपल्याला तोफेच्या तोंडी देण्यांत यावें यासाठीं त्यानें कोर्टाची विनवणी केली, पण ती मान्य न करतां फांशीची शिक्षा फर्मावली. पण आदले दिवशीं रात्रीं चाकूनें आपला गळा कापून त्यानें आत्महत्या केली. अशा रीतीनें या देशभक्ताचा १७९८ सालीं अंत झाला.

टोनच्या अंगी जरी मोठेपणाचे विशेष गुण नव्हते तरी तो आपल्या उद्योगशीलतेनें व साहसानें प्रसिध्दीस आला असें लेकीनें म्हटलें आहे. त्याचप्रमाणें लेकीनें असेंहि म्हटलें आहे कीं मोठ्या माणसांच्या अंगी देखील, फाजील वक्तृत्व, हलकें मन, मत्सरी स्वभाव, अविवेक, संकुचित बुध्दि इत्यादि जे दोष दिसून येतात त्यांपासून हा अलिप्त असून व्यापक दृष्टीचा, धैर्यशाली व करारी माणूस होता. आपल्या लहानपणी जडलेलें मद्यपानव्यसन त्यानें आपल्या निश्चयानें नाहीसें केलें. स्वार्थत्याग व विवेक यांची संवय त्यानें अंगी बाणून घेतली होती; व यामुळें फ्रान्स व हॉलंडमध्यें देखील त्याचें फार वजन पडलें. त्यानें पॅरिसमध्यें असलेल्या राहणीच्या आपल्या डायरीमध्यें सुंदर हकीकत लिहून ठेवली होती व त्याच्या मुलानें त्याच्या मरणोत्तर ती प्रसिध्द केली. त्यानें लिहिलेलें एक आत्मचरित्रहि आहे.

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .