प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग चवदावा : जलपैगुरी - तपून

डेन्मार्क - डेन्मार्कचें राज्य हें द्वीवकल्प बाल्टिक समुद्र व उत्तर समुद्र यांनां वेगळें करणारीं बेटें यांचें बनलेलें आहे. हें राज्य उ. अ. ५४०३३' ते ५७०४५; व पू. रे. ८०४'-५४ ते १२०४७'-२५'' यांच्या दरम्यान आहे. द्वीपकल्प हें डेन्मार्क व जर्मनी या दोघांचें आहे. डॅनिश भाग उत्तरेकडचा असून मोठा आहे व त्याला जटलंड म्हणतात. व्हर्सेलिसच्या तहानें उत्तर स्लेस्विग हा प्रांत डेन्मार्कच्या ताब्यांत आल्यामुळें डेन्मार्कचें क्षेत्रफळ १९२० सालीं १६९७८ चौ. मैल होतें; याशिवाय डेन्मार्कच्या ताब्यांतील फेरोज व ग्रीनलंड या प्रदेशांचें क्षेत्रफळ निराळेंच. डेन्मार्कच्या भूपृष्टभागांत फारच थोडें वैचित्र्य आहे. हा प्रदेश सर्वसाधारणपणें सखल आहे, परंतु हॉलंडप्रमाणें समुद्रसपाटीच्या खालीं नाहीं. समुद्रकिनार्‍याजवळ प्रदेश उंच असून आंतील भाग सपाट आहे. प्रदेश सुपीक आहे. त्यांत ''बीच'' वृक्षांचीं रानें, लागवडी शेतें व कुरणें आहेत. लहान सरोवरें पुष्कळ आहेत. एरेसो व एस्रोम्सो या नांवाचीं दोन मोठीं सरोवरें आहेत. गुडेना ही या देशांतील मोठी नदी होय. समुद्रकिनारा सखल व वालुकामय आहे.

मुख्य खंडावरील या देशाचा भाग जटलंट हाच होय. फ्युनेन, झीलंड व त्यांच्या लगतचीं बेटें असे दोन बेटांचे विभाग आहेत. हीं बेटें सुपीक असून तेथें चांगली लागवड केलेली आहे. एरोस्कजोबिंग, रुडक्जेबिंग व लेंगलँड हीं येथील मुख्य बंदरें होत. फ्युनेनमधील शहरें समुद्रकिनार्‍यावर आहेत. ओडेन्स हें मुख्य शहर गणलें जातें. नायबोर्ग, स्व्हेंडखोर्ग, फाबोर्ग, आसेन्स, मिडलफार्ट, बोजेन्स, ही इतर शहरें आहेत. ओडेन्सहून या सर्व शहरांनां रेल्वे गेली आहे. झीलंड व फ्युनेन यांच्यामध्यें ''ग्रेटबेल्ट'' आहे. झीलंड अथवा सीलंड हें दक्षिणोत्तर ८० मैल व पूर्वपश्चिम ६८ मैल आहे. याचा किनारा फोर्डनीं दुभागलेला आहे. राजधानीचें शहर कोपनहेगन, व रोस्किल्डे, स्कागेल्स, कॉसीर, नीस्टव्हेड व एल्सिनोर हीं इतर शहरें या बेटांत आहेत. फाल्स्टरवर नायकजोबिंग हें बंदर आहे, यंथून १/८ मैल लांब असा एक पूल लालंड बेटापर्यंत आहे. मारिबो, सूक्सजेबिंग व रॉड्बी हीं इतर शहरें आहेत. बोर्नहोम बेट या द्वीपसमूहाच्या जवळच्या टोंकाच्या पूर्वेस ८६ मैलांवर आहे.

भूस्तर वर्णन.- डेन्मार्कचा भूपृष्टभाग साधारणत: ''बोल्डरक्ले'' चा बनललेला आहे. 'हिमप्रलयकालांत' नॉवेंजियन पर्वतांवरील बर्फामुळें हे बोल्डरक्लचे प्रदेश बनलेले आहेत. यांचे थर नाहींत; परंतु पाण्याची त्यांच्यावर क्रिया घडून हे थर बनले आहेत. यांपैकीं कांही थर माती व आर्टिकमहासागरांतील प्राण्यांचे अवशेष भाग यांचे बनलेले आहेत व कांही फार विस्तीर्ण थर, वाळू व मुरूम यांचे बनलेले आहेत. ''क्रॅटेशस'' (खडूच्या) काळाच्या अंतानंतर डेन्मार्कचे कांही भाग समुद्रसपाटीच्या वर आलेले आहेत असें समजतात, परंतु सर्वसाधारणपणें हिमप्रलयकाळ संपेपर्यंत समुद्रसपाटीच्या वर फारसा भाग नसावा.

हवा, वनस्पती व प्राणी.- डेन्मार्कची हवा त्याच अक्षांशांतील ग्रेटब्रिटन येथील प्रदेशांतील हवेपेक्षां फारशी निराळी नाहीं. परंतु उन्हाळा व हिंवाळा हे थोडेसे जास्त कडक असतात; यास्तव हिंवाळ्यांत इंग्लिश बगीच्यांत जे पदार्थ पिकतात ते उघड्या डेन्मार्कमध्यें होत नाहींत. जुलै ते नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडतो. उन्हाळ्यांत वादळें होतात. बेटांत व पूर्व किनार्‍यावर उत्तर यूरोपांतील सर्वसाधारण झाडें होतात व हीथवर व अटलांटिक महासागराच्या लगतच्या वालुकामय टेंकड्यांवर निरनिराळ्या प्रकारच्या वनस्पती होतात. येथील जंगलांत बीच झाडें होतात. ओक, अ‍ॅश् व एल्म हे क्चचितच सांपडतात. परंतु फर व पाइन झाडें विपुल आहेत. बोर्नहोम बेटांत पाइन, बर्च व अ‍ॅश हीं झाडें पुष्कळ आहेत. डेन्मार्कमध्यें बाकीच्या मध्य यूरोपांत सांपडणारें पशु-पक्षी सांपडतात. मोठे चतुष्पाद प्राणी नाहींसे झाले आहेत. बकर्‍याशिवाय इतर माणसाळलेले प्राणी येथें अनेक आहेत. समुद्रामध्यें मासें धरणें हा तेथील लोकांचा फार महत्त्वाचा धंदा आहे. कालवे (ऑइस्टर) कोठें कोठें सांपडतात. गुडेना हीच एकटी सामन नांवाचे मासे असलेली नदी आहे.

लोकसंख्या.- १९२० सालीं डेन्मार्कची लोकसंख्या ३२ लक्ष होती. जटलंडमध्यें एका चौरस मैलास १०९ व इतर बेटांत एका चौरस मैलास २७२.९५ असें लोकसंख्येचें मान (१९०१) होते. डेन्स लोक पिवळ्या केसाचे निळ्या डोळ्यांचे, व मध्यम बांध्याचे आहेत. हे ट्युटॉनिक वंशाचे असून स्कॅंडेनोव्हियन लोकांशीं यांचें बरेंच साम्य आहे. स्विडिश लोकांपेक्षां यांची राहणी उत्तरेकडील जर्मन लोकांशीं अधिक सदृश आहे. पुष्कळ शेतकरी जमीनीचे मालक असल्यामुळें हे लोक बहुधा निष्काळजी असतात. हे कांहींसें मंद व अनिश्चित असतात. परंतु राजकीय विषयांत बरेंच लक्ष घालतात. डेन्स लोक फार देशाभिमानी आहेत. वेस्ट इंडियन बेटें खेरीजकडून सर्व भागांत स्कॅंडिनेव्हियन भाषा बोलतात. पुरुषांपेक्षां बायकांचें प्रमाण १०००:१०५२ या प्रमाणांत जास्त आहे. त्यामुळें अनौरस संततीचें प्रमाण मोठें आहे. कोपनहेगन येथें तर शेंकडा २० मुलें अनौरस असतात.

दळणवळणाचे मार्ग.- येथील रस्ते रुंद व चांगले आहेत. रेल्वे बहुतेक चोहोंकडे आहे. स्लेस्विगहून सरहद्दीमधून दोन रेल्वेचे रस्ते डेन्मार्कमध्यें येतात. मुख्य डॅनिश रस्ते दोन तीन आहेत. लहान लहान बेटांमध्यें 'स्टीमफेरी' (वाफेनें चालणार्‍या बोटी) आहेत. बहुतेक बाल्टिक समुद्रावरील बंदरें व कोपनहेगन यांच्यामध्यें दळणवळण आहे. स्वीडन व डेन्माक्र यांचें दळणवळण कोपनहेगन व माल्मो आणि एल्सिनोर व हेल्सिंगबोर्ग यांच्या दरम्यानच्या साउंडवरील फेरींच्या योगानें चालतें. तारखातें व टेलिफोनखातें यांचें काम व व्यवस्था डाकखात्याकडे आहे.

शेती.- शेतकी हा येथील मुख्य धंदा आहे. २/५ लोक या धंद्यावर उपजीविका करतात. देशांतील जमीनीपैकीं शेंकडा ७४ इतकी शेतकीकडे जमीन आहे. पैकीं १/१२ जमीनीवर कुरणें आहेत. मुख्य पिकें ओट, जव, राय व गहूं आहेत. बीट फार विपुल पिकतें. १९ व्या शतकाच्या उत्तारार्धापासून दूधदुभत्याचा धंदा फारच वाढला आहे व शास्त्रीय पध्दति व यंत्रे यांच्या सहाय्यानें हा धंदा या देशांत पूर्णावस्थेस जाऊन पोहोंचला आहे. लोणी काढणे, कोंबडीं व बदकें पाळणें व डुकरें वाढविणें हे येथील धंदे आहेत. जंगली ससे फार सांपडत नाहीं. पाळीव ससे बाहेरदेशीं पाठवितात. या देशांतील क्षेत्रफळाचा शेंकडा ७ एवढा भाग जंगलमय आहे. झाडें तोडण्याची मनाई आहे.

इ. सन १९१९ मध्यें शेतकीसंबंधानें पुष्कळ कायदे करण्यांत आले; व सरकारच्या ताब्यांत ज्या जमीनी होत्या त्यांचे तुकडे पाडण्यांत येऊन ते खंडानें लोकांनां देण्यांत आले. महायुध्दाच्या पूर्वी डेन्मार्कमधून पुष्कळ धान्य परदेशीं जात असे. महायुध्द सुरू झाल्यानंतर डेन्मार्कमध्यें कच्चा माल फारसा येईनासा झाला, त्यामुळें शेतकीचा धंदा थोडासा बसला पण १९१८ सालानंतर पुन्हां शेतकीला ऊर्जितावस्था प्राप्त झालीं. १९११ सालीं लोण्याच्या निर्गतीसंबंधानें एक कायदा करण्यांत येऊन, बाहेर जाणार्‍या लोण्याला सरकारी परवानगी घेतली पाहिजे असें ठरविण्यांत आलें.

इतर धंदे.- खनिज द्रव्यांच्या बाबतींत हा देश फार दरिद्री आहे. या देशांत निरनिराळ्या प्रकारची चिकणमाती सांपडते. बोर्नहोम बेटांमध्यें अति मऊ दगड व संगमरवरी दगड यांच्या खाणी आहेत. येथील कारखान्यांत स्थानिक गरजा पुरविण्यापुरता माल उत्पन्न होतो. मोठ्या कारखान्यांत एंजिनें व लोखंडी जहाजें तयार करतात. लोंकरीचें कापड, कापसाचें कापड, तागाचें कापड, साखर शुध्द करणें, कागदाच्या गिरण्या, कलाली भट्या व दारू गाळण्याचे कारखाने हे इतर धंदे आहेत. मातीचीं भांडी करणें हा त्यांचा फार महत्त्वाचा धंदा आहे. या देशांत मजूरसंघ आहेत व वारंवार संप होतात

उद्योगधंदे.- डेन्मार्कमध्यें कोळसा फार कमी उत्पन्न होत असल्यामुळें त्याच्या साहय्यानें जे धंदे चालूं शकतात ते धंदे डेन्मार्कमध्यें चांगल्या रीतीनें चालणें शक्य नाहीं. कातड्याचा कारखाना, सीमेंट, मार्गराइन, तंबाखू, स्पिरिट, साखर, बीर, तेल, कातड्याच्या पेठ्या, कागद, शेतकीला लागणारी यंत्रें इत्यादि जिन्नस तयार करण्याचे कारखाने डेमार्कमध्यें आहेत. १९१९ सालीं डेन्मार्कमध्यें ९९४ जॉईटस्टॉक कंपन्या होत्या. १९१९ सालच्या अखेरीस, डेन्मार्कमध्यें दर्यावरील गलबतांची संख्या १५८४ होती. १९२० सालीं डेन्मार्कमध्यें ३१४२ दशलक्ष क्रौन किंमतीच्या मालाची आयात व १८१४ दशलक्षाच्या किंतीची निर्गत झाली.

व्यापार.- पूर्वी डेन्मार्कचे व्यपारी-कायदे असे होते कीं बाहेरील देशांतून आणलेला माल जकातीच्या अधिकार्‍याच्या हवालीं करावा लागे, तेथे तो जाहीर लिलांवानें विकला जात असे व माल मागवणाराला जकात वजा जातां बाकीची किंमत मिळत असे. याशिवाय देशांतील कर होतेच व रस्ते चांगले नसल्यामुळें व्यापाराची वाढ होत नव्हती. तथापि १९ व्या शतकांत डेन्मार्क व इतर यूरोपियन राष्ट्रे यांच्यामध्यें अनेक व्यापारी तह होऊन डॅनिश जकातीचें व कराचें प्रमाण बरेंच नियमित व सैल करण्यांत आलें.

साऊंडमधून जाणार्‍या जहाजांवर कर घेण्याचा जो हक्क त्याबद्दल पुष्कळ शतकें वाद व तंटा चालला होता. पण त्या प्रश्नाचा निकाल लागून १८५७ सालीं हे कर उठविण्यांत आले. डेन्मार्कचा मुख्य व्यापार म्हणजे देशांत माल पैदा करणें व त्याचा देशांतच व्यव करणें हा होय; परंतु बाहेरदेशीं फिरून परत पाठविण्याच्या इराद्यानें कांहीं माल परदेशाहून येतो, व या बाबतींत सरकारनें फ्रीपोर्ट व कोपनहेगन येथील वखारी यांनां सवलती दिल्या आहेत. या देशांतून बाहेरदेशीं खाण्याचें पदार्थ रवाना होतात. यांमध्यें लोणी विशेष महत्त्वाचा पदार्थ आहे. डेन्मार्कची या पदार्थाबद्दल ख्याति आहे. इतर जिन्नस मॅर्गराइन, बेकन (डुकराचें मांस) व अंडीं वगैरे होत. भाजीपाला, लोंकर, हाडें, चरबी, दुभत्याचीं यंत्रें व सीमेंट हे कमी महत्त्वाचें पदार्थ बाहेरदेशी पाठवितात. गुरें व बकर्‍याचें मांसहि पाठवितात. इमारतीचें लांकूड, कोळसा, खनिज पदार्थ हीं बाहेरदेशांहून मागवितात.

डेन्मार्कचा आयात व्यापार जर्मनी, ग्रेटब्रिटन व अमेरिकेंतील संयुक्त संस्थानें यांशीं चालतो; व निर्गत व्यापार ग्रेटब्रिटन, जर्मनी व स्वीडन या देशांबरोबर चालतो. ४ मे १९०७ च्या कायद्यान्वयें मिट्रिकसिस्टिमची वजनें व मापें सरकारीरीत्या तीन वर्षांत व लौकिकरीत्या पांच वर्षांत व्यवहारांत वापरलीं जावींत असें ठरलें.

पैसा व पेढया.- डॉनेश मुख्य नाणं कोन (क्रऊन) म्हणजे एक शिलिंग १ १/३ नेन्स आहे. याचें १०० ओर होतात ७ १/२ ओर म्हणजे एक पेन्स. २० व १० क्रोनची सोन्याची नाणीं पडण्यांत आलीं होती परंतु लोकांनां बँक नोटा फार पसंत आहेत. कोपनहेगन येथील नॅशनल बँक ही मुख्य पेढी असून हिला नोटा काढण्याचा अधिकार आहे. या नोटा १०, ५०, १०० व ५०० क्रोन किंमतीच्या असतात. डॅन्स्की लँडमँड्स बँक, हँडेल्स बँक, प्रायव्हेट बँक या इतर कोपनहेगन येथील पेढया आहेत प्रांतिक पेढयाहि पुष्कळ आहेत. या पेढया सेव्हिंग बँक्सहि आहेत. यांचा व्याजाचा दर शें. ३॥ ते ४ आहे. याशिवाय परस्पर सहकारी पतपेढया आहेत; त्यांमधून गहाणावर कर्ज मिळतें. सर्व गहाणखतें नोंदली पाहिजेत असा या देशाचा कायदा आहे. परंतु ही पध्दत फार सोपी आहे. यामुळें या देशाची फार सुधारणा झाली आहे. सर्व प्रकारचें विमे उतरणार्‍या कंपन्या येथें आहेत. आयुष्याचा विमा उतरण्याची सर्वांत मोठी कचेरी सरकारी आहे. ९ एप्रिल १८९१ च्या कायद्यान्वयें ६० वर्षांच्या वरील वयाच्या लोकांकरितां म्हातारपणी पेन्शन देण्याची एक पध्दत काढण्यांत आली.

राज्यव्यवस्था.- येथील राज्यव्यवस्था नियंत्रित राजसत्ताक पध्दतांची आहे. राजाची सत्ता पार्लमेंट (रिग्स्डॅग्) नें नियंत्रित केलेली असते. याचे दोन विभाग आहेत. (१) लँड्स्थिंग् व (२) फोकथिंग्: परंतु यांच्या रचनेमध्यें मोठासा फरक नसतो. राज्यकारभरयंत्रातील पुराणमतवादी लोकांचें लँडस्थिंग बनलेलें असतें. फोकथिंगमधील १४० सभासद चार वर्षांकरितां निवडलेले असतात. मताचा अधिकार २५ वर्षे वयाच्या प्रत्येक स्त्रीपुरुषास आहे. लँडस्थिंगमधील ७२ सभासदांपैकीं १८ जणांनां जुने प्रतिनिधी निवडतात. बाकीचे ५४ आठ वर्षांकरितां डेप्युटी इलेक्टर लोकांचे प्रतिनिधी महणून निवडलेले असतात. या दोन्ही विभागांतील प्रत्येक उमेदवाराचें वय २५ हून जास्त असलें पाहिजे व प्रत्येकाला पार्लमेंटची बैठक सुरू असतांना दररोज १५ क्रोन व प्रवासखर्च देतात. फोकभिंकची पध्दत अशी आहे कीं प्रत्येक १६००० रहिवाशांबद्दल एक सभासद घ्यावयाचा. रॅडिकल, लिबरल, काँझर्व्हेटिव्ह, सोशॅलिस्ट व इंडिपेंडट असे पांच राजकीय पक्ष आहेत. हें पार्लमेंट दरवर्षी आक्टोबर महिन्याच्या पहिल मंगळवारीं सुरू होतें. यांत बजेटवर वादविवाद होतो. जकात, अबकारी, जमीनमहसूल, घरपट्टी, स्टॅम्प, रेल्वे, कोर्टाची फी, सरकारी लॉटरी व मृत्युकर या उत्पन्नाच्या बाबी आहेत.

स्थानिक राज्यकारभार.- राज्यकारभाराच्या सोयीकरितां या राज्याचे १८ प्रांत (कौंटी) केले आहेत. या प्रांतांमध्यें मुख्य अधिकारी अ‍ॅमत्मंड होय. स्थानिक कामकाज आम्टसराड व सोग्रेराड (इंग्लंडमधील प्रांतिक कौन्सिल व स्थानिक कौन्सिल) पाहतात. या संस्था स. १८४१ पासून आहेत पण त्यांत बरेच फेरफार झाले आहेत. या कौन्सिलांचे सभासद लोक लँडस्थिंगच्या सभासद निवडण्याच्या पध्दतीनें निवडले जातात. हाच प्रकार प्रांतिक शहरांतील कौन्सिलांचा आहे. निदान ४०० क्रोन उत्पन्नावर ज्यांनां कर द्यावा लागतो ते लोक कोपनहेगन येथील कौन्सिल निवडतात. कोपहेगन येथील बर्गोमास्टर (मेयर) यास राजाच्या संमतीनें शहरचें कौन्सिल निवडतें व इतर ठिकाणचे बर्मोमास्टर राजा नेमितो. येथील म्युनिसिपालिटीची सांपत्तिक स्थिति साधारण बरी असते.

न्याय.- न्याय देण्याकरितां या राज्याचे हेरेड (शतकें) केलेले आहेत यांपैकीं कित्येक इतके लहान आहेत कीं कांहींवर एकच न्यायाधीश काम करूं शकतो. प्रत्येक शहर एका स्वतंत्र 'बायफोगेड' च्या हातीं असतें. असे १२६ न्यायाधीश आहेत. प्रत्येकजण आपआपल्या जिल्ह्यांतील सर्व प्रकारच्या दाव्यांचा निकाल लावतो; शिवाय तो पोलिसचा मुख्य अधिकारी असतो. एक कोपनहेगन येथें व दुसरें व्हायबोर्ग येथें अशी दोन अपील कोर्टे (ओव्हरेट) आहेत. मुख्य अपील कोर्ट (होजेस्टेरेट) कोपनहेगन येथें आहे. व्यापार व समुद्रांवरील खटल्याकरितां एक निराळें कोर्ट आहे. शेतीसंबंधीं प्रश्नांचा निकाल लँडकमिशनें लावतात. डॅनिश न्यायपध्दतीची मुख्य गोष्ट ही आहे कीं आपसांत निकाल लावण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणताहि 'कन्सिलिएशन' (तडजोड) कमिट्या करतात, व कायदेशीर रीतीनें काम सुरू करण्यापूर्वी कोर्ट देखील आपसांत निकाल लावण्याचें काम करते. योग्याप्रकारें २/५ प्रकरणांचा निकाल लागतो. आरोग्यव्यवस्था बोर्ड ऑफ हेल्थच्या स्वाधीन आहे. या देशाचे कित्येक जिल्हे केले आहेत, व प्रत्येक जिल्ह्यावर एक पगारी वैद्यकी अधिकारी नेमलेला असतो. याचें काम गरीब लोकांची शुश्रुषा करणें व आरोग्याबाबतींत व मृत्युनंतर पंचनामा करण्याच्या कामीं स्थानिक अधिकार्‍यानां मदत करणें हे होय. बाहेर रिलिफचीं कामें काढून गरीब लोकांचीं चांगली सोय केली आहे. शिवाय गरीब पण काम करण्यास लायक अशा लोकांकरितां काम करण्याचीं घरें (वर्क हाऊस) स्थापन झालीं आहेत. भिक्षागृहें व इतर संस्थाहि आहत.

सैन्य व आरमार.- डेन्मार्कमध्यें राष्ट्रीय सैन्याची पध्दति आहे. प्रत्येक अव्यंग माणसाला सैन्यांत नोकरी करावी लागते. या नोकरीला २० व्या वर्षी सुरवात होऊन तिची मुदत १६ वर्षांची असते. पैकीं पहिली आठ वर्षे प्रत्यक्ष काम करावें लागतें. डेन्मार्कचें सैन्य (१९१७) दोन लाईफगार्ड बॅटेलियनें, १५ पायदळाचीं रेजिमेंटें, ४ घोडदळ रेजिमेंटें व चार चार तोफांच्या २० बानेर्‍या (बॅटरी) मिळून बनलें होतें. ६ लहान लढाऊ बोटी, ३ किनारासंरक्षक बोटी, ५ क्रूझरें, ५ गन-बोटी, व १२४ टार्पेडो मिळून डेन्माक्रचें आरमार बनलें आहे.

धर्म.- डेन्माक्रचें चर्च राष्ट्रीय लूथर पंथचें आहे. राजा याच पंथाचा असावा लागतो. येथें पूर्ण धर्मसहिष्णुता आहे. मोर्मोन अ‍ॅपोतल (धर्मसाधू) नीं डॅनिश शेतकर्‍यात धर्मप्रचार केला व कांहीं लोक या पंथाचे बनले. धार्मिक नियंत्रणाकरितां देशाचे दहा विभाग केले आहेत. मुख्य धर्मगुरू कोपनहेगन येथें राहतो. परंतु त्याचें चर्च रोस्किल्डे येथें आहे. बिशप लोक राज्यकारभारांत हात घालतात. यांनां ठराविक पगार असतात.

शिक्षण व कला.- प्राथमिक शिक्षण १९१४ सालापासून सक्तीचें व मोफत आहे. प्रत्येक मुलानें वयाच्या ७व्या वर्षापासून १४व्या वर्षापर्यंत खेड्यांतील शाळेंत गेलेंच पाहिजे, अथवा अन्यरीतींनी त्याच्या शिक्षणाची योग्य तजवीज केली आहे असें आईबापांनां सिध्द करावें लागतें. दुय्यम शिक्षणाच्या शाळा शहरांत असतात. यांमध्यें थोडीशी फी घेतात. सार्वजनिक व्याकरण शाळा आहेत. विश्वविद्यालय कोपनहेगन येथें आहे. शास्त्रीय शिक्षण व इतर शिक्षण देण्याकरितां असंख्य संस्था आहेत. यांपैकीं मुख्य पोलिटेक्निक (विविधकला शाळा) स्कूल, शेतकी व पशुवैद्यकांच्या शाळा, बादशाही पुस्तकालय, शास्त्रांची रॉयल सोसायटी, उत्तरेकडील पुरातन वस्तुसंग्रहालय व सोसायटी इत्यादि या होत. कलासंग्रहालयें फारशीं नाहींत, कोपनहेगन येथील संग्रहालय चांगलें आहे. मात्र पहिल्या प्रतीचें कलाशिक्षण रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ आर्टस व इतर शाळा यांच्यामध्यें दिले जातें.

प्राचीन इतिहास.- डेन्मार्कविषयीं पुरातन माहिती प्लिनीच्या ग्रंथांत मिळते. स्कॅंडिया नामक तीन बेटांचा तो उल्लेख करतो. या बेटांच्या रहिवाशासंबंधीं तो माहिती देत नाहीं, पण जुटिश द्वीपकल्प अथवा किम्ब्रिक खर्सोनीजसंबंधी तो वर्णन देतो. या द्वीपकल्पाच्या उत्तर टोंकावरील अ‍ॅलोकिर्याद नांवाच्या तीन बेटांचाहि तो उल्लेख करतो. मॉन्युमेन्टम ऑन्सिरॅनमध्यें सांगितलें आहे कीं, किंब्री व चॅरिडीज यांनी आगस्टसकडे इ. स. पूर्वी पांचव्या शतकांत वकील पाठविले होते. ख्रि पू. दुसर्‍या शतकाच्या अखेरीस गॉल व इटली यांच्यावर ज्यांनीं स्वारी केली तेच हे किंब्री व ट्युटन लोक असावेत असा रोमन लोकांचा समज झाला होता.

अलीकडील डॅनिश दंतकथेवरून डेन्मार्क देश व्हिथेस्लीथ (झीलंड, मूएन, फाल्स्टर व लालंड), जटलंड व स्कानी यांचा बनलेला होता. डेन्स लोकांचा मूळ पुरुष डॅन यानें जटलंड मिळविलें होतें. झीलंड पूर्वीपासून राज्यकारभाराचें ठिकाण होतें व लेज्रे हें राजाचें वसतिस्थान होतें. आंग्लोसॅक्सन दंतकथेंत स्किल्ड (स्किओल्डर)चा उल्लेख आहे; हा स्किल्ड डॅनिश व इंग्लिश राजघराण्यांचा मूळ पुरुष होय. स्कॅंडिनोव्हियन दंतकथेंतील दुसरा मोठा पुरुष फ्रोई हा होय. पण ५ व्या शतकापूर्वीच्या राजांची विश्वसनीय अशीं नांवें मुळीच आढळत नाहींत. हील्फडेनीचें राज्य पांचव्या शतकाच्या शेंवटच्या अर्धांत होतें. हॉयकुल्फचें राज्य सहाव्या शतकाच्या मध्याच्या सुमारास होतें. पुढें सहाव्या शतकाच्या मध्यापासून आठव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत डॅनिश इतिहासासंबंधीं कांहींच माहिती नाहीं. सॅक्सोमध्यें बरेच राजे सांगितलें आहेत परंतु त्यांचें ऐतिहासिक दृष्टया अस्तित्व दाखविणारा पुरावा नाहीं. आठव्या शतकाच्या आरंभी डॅनिश राजा ओन्जेन्ड याचा उल्लेख आहे. हॅराल्डर राजानें बरींच वर्षे भरभराटीनें राज्य केल्यावर ब्रॅव्हालाच्या मोठ्या लढाईंत तो मरण पावला.

ही लढाई ७५० च्या सुमारास झाली. यानंतर पन्नास वर्षांनी युरोपखंडांतील इतिहासांत डेन्स लोकांचा वारंवार उल्लेख सांपडतो. ७७७-७९८ या वर्षी डेन्स लोकांचा सिगिफ्रिडस राजा झाला. हा शार्लमेनवर मोठी स्वारी करण्याच्या तयारींत होता. पण त्याच्या अनुयायानें त्याला ८१० सालीं मारलें. याच्या मागून याचा भाऊ हेमिंगस राज्यावर आला पण हा स. ८१२ मध्यें मेला. यानंतर सिगेफ्रिडस नेपॉस गॉडेफ्रिडि रेगिस व अ‍ॅनुलो नेपॉस हेरिओल्डी कॉन्डम रेगिस यांच्यामध्यें गादीबद्दल तंटा लागला; मोठी लढाई झाली व दोघेहि मारले गेले, परंतु अ‍ॅनुलोचा पक्ष विजयी झाला व त्यांनीं अ‍ॅनुलोचे भाऊ हेरिओल्डस व रेगिनफ्रिडस यांनां राजे केले. गॉडेफ्रिडसच्या मुलांनीं त्यांनां हांकून लावलें. हेरिओल्डसला बादशहाचा आश्रय मिळाला व तडजोडीनें त्यांनीं राज्य वांटून घेतलें. ८२० मध्यें मेन्झ येथें हेरिओल्डस ख्रिस्ती झाला. ८२७ सालीं त्याला हांकून लावण्यांत आलें, परंतु ख्रिस्ती धर्मोदशेक सेंट अन्स्कार ह्याला राहूं दिलें. ८३६ त हिरॉइक हा डेन्स लोकांचा राजा होता. हा गॉडेफ्रिडसचा मुलगा होता. ८५० त हिरॉईकवर त्याच्या पुतण्यांनी हल्ला करून राज्याची वांटणी केली. स. ८५२ मध्यें हेरिओल्डस फसवेगिरीच्या आरोपावरून फ्रँक लोकांकडून मारला गेला. ८५४ सालीं डेन्मार्कमध्यें राज्यक्रांति झाली. हिरॉईकचा पुतण्या गॉड्विन हा नॉर्थमेन लोकांचें सैन्य घेऊन आला व त्यानें चुलत्याचा पराभव केला व राजघराण्यांतील एका मुलाखेरीज सर्व पुरुष या लढाईंत मारले गेले. हाच मुलगा हिरॉईक ज्यूनियर या नांवानें राजा झाला. याच्यासंबंधी माहिती नाहीं. याच्यानंतर सिगाफ्रिड, हाल्फडेनि व गॉडेफ्रिडस राजे झाले. यांच्यासंबंधीं फारशी माहिती नाहीं. परंतु एवढें माहीत आहे कीं, हाल्फडेनि स्कॉटलंडमध्यें ८७७ साली मेला, गोडेफ्रिडसला स. ८८५ मध्यें सॅक्सनीच्या हेनरीनें विश्वासघातानें मारलें. सिगेडिफ्रस व गॉडेफ्रिडस नांवाचे राजे यानंतर कांहीं वर्षांनी झाले व दोघेहि ८९१ सालीं डाइलवरच्या मोठ्या लढाईंत मारले गेले.

यानंतर हीलिगो ओलेफ व त्याचे मुलगे च्मॉब व गुर्थ राजे झाले. यानंतर सिगेरिक हिलीगो डॅनिश राजा झाला व त्याच्या मागून नॉर्वेहून हाडेगॉन राजा आला. स. ९१६ नंतर कांही वर्षांनीं हार्डेक्नथ अर्म हा राज्य करीत होता. हार्डेक्नथ अर्म हाच प्रसिध्द गोर्म असावा. यानें थायरा डॅन्मार्काबॉटशीं लग्न लाविलें होतें. यांचा मुलगा हॅरोल्ड ब्ल्युटूथ हा होता.

मध्ययुगीन व अर्वाचीन:- नवव्या शतकाच्या आरंभी खर्‍या डॅनिश इतिहासाला आरंभ होतो. स्कॅडिनेव्हियन घराण्यांतील अगदीं दक्षिणेकडील शाखा म्हणजे डेन्स लोक हे जटलंड व स्कॅनिया ह्या बेटांत राहात असून ७७७ सालीं फ्रँक लोकांच्या राज्याशीं विरोध करण्यास समर्थ होते व ते त्या राज्यांतून पळून आलेल्या लोकांनां आश्रय देत असत. चार्लस दि ग्रेटला ७८२ सालीं लिप्पे येथे शरण आलेल्या राजांमध्यें डॅनिश राजा सिगाफ्रिड हा होता. याच वेळीं उट्रेक्टहून विलीब्रॉईडनें रानटी डेन्स लोकांनां ख्रिस्ती दीक्षा देण्याचा प्रयत्न केला पण तो फसला. व्हायकिंग लोकांच्या कालापूर्वीची डॅनिश इतिहासाबद्दल एवढीच माहिती आहे. ७९३ सालीं लिंडिस्फारनीं उद्ध्वस्त करण्यांत आला व ९११ सालीं नार्मंडीमध्यें रोलानें वस्ती केली. इंग्लंडच्या दक्षिण भागांत व नार्मेडीमध्यें ज्या भटकणार्‍या लोकांनीं वसाहत केली ते लोक डेन्स होते.

डेन्स लोकांचा ख्रिस्ती धर्मस्वीकार :- पश्चिम यूरोपांत सरंजामी पध्दति स्थापन होण्याच्या कारणांपैकीं व्हायकिंग लोकांच्या स्वार्‍या हें एक कारण होय. या आडदांड लोकांनां चर्चनें आपल्या अंकित केलें. ७९३ च्या पूर्वी इंग्लंड व जटलंडमधील समुद्रांत जहाजांत बसून गेल्याचें कोणालाहि स्मरत नव्हतें. आपलें ज्युटिश राज्य वचावण्याच्या हेतूनेंच हॅरोल्ड क्लॅक राजा ८२६ मध्यें इन्गेल्हेम येथे आला व आपली बायको, मुलगा गॉडफ्रेड व बरोबरचे लोक यांसह ख्रिस्ती झाला व अन्स्गार या ख्रिस्ती मिशनर्‍याला डेन्मार्कमध्यें घेऊन गेला. श्लेस्विग राइव व आर्‍हास येथें बिसपांची स्थापना झाली परंतु खरोखर ख्रिस्ती धर्माचा प्रसार हॅरोल्ड ब्ल्युटूथ हा राजा ख्रिस्ती झाल्यापासून झाला (९६०).

डॅनिश लोकांचा विस्तार:- व्हिश्रुला नदीपर्यंत बाल्टिक समुद्रकांठचा प्रदेश व्यापणार्‍या जर्मन व वेंड लोकांच्या योगानें आपली अभिवृध्दि करण्याचा प्रयत्न डॅनिश राजे करीत होते. हॅरोल्ड ब्ल्युटूथ यानें इडरच्या दक्षिणेचा जर्मन प्रदेश जिंकला (९४०-९८६) व ओडर नदीच्या मुखाजवळ जुलिन अथवा जोम्सबर्ग ही लष्करी वसाहत केली. नॉर्वेचा कांहीं भाग डॅनिश व स्वीडिश लोकांनीं एकत्र होऊन जिंकला व १०२८ व १०३५ यांच्यामध्यें कॅन्यूट दि ग्रेट यानें तें सर्व राज्य आपल्या राज्यास जोडलें, परंतु त्याच्यामागून ही एकी फार काळपर्यंत टिकली नाहीं. इंग्लंडमधील राज्यहि अल्प काळपर्यंतच टिकलें.

कॅन्यूटचा मृत्यू व पहिल्या हाल्डेमारचें राज्याहोरण यांमधील काळ डेन्मार्कमध्यें फार धामधुमीचा होता. या राज्याचे तोतया राजांनीं हिस्से पाडले व ते शेजारच्या राजांची व वेंड लोकांची मदत मागत असत. परंतु या घोटाळ्यांमुळें एक गोष्ट निश्चित झाली ती ही कीं, राष्ट्रीय चर्च निर्माण झालें व लंडन येथें (इ. स. ११०४ च्या सुमारास) आर्चबिशपची स्थापना झाली. अ‍ॅबसॅलोन (डेन्मार्कचा मोठा मुत्सद्दी) हा तिसरा आर्चबिशप होता. यानें व्हाल्डेमार (पहिला) व सहावा कॅन्यूट यांनां बाल्टिकवर डेन्मार्कचा विस्तार करण्यांत मदत केली.

व्हाल्डेमार राजांचा काळ डॅनिश इतिहासांत फार महत्त्वाचा होता. याच काळांत जुनी पितृसत्ताक पध्दत जाऊन इस्टेटींची वांटणी करण्याची पध्दत आली. राजसत्ता पूर्वीपेक्षां जास्त बलवान होती व सरदार लोकांनां लष्करी नोकरी करण्याच्या करारावर जमिनी देण्यांत आल्या होत्या व याच लोकांचें बादशाही राड अथवा कौन्सिल (मंडळ) बनलेलें होतें. धर्मोपदेशक लोक राजाश्रयामुळें बरेच वजनदार बनले होते व शिक्षणप्रसारहि होत होता. पुष्कळ डेन लोक पॅरिस येथील विश्वविद्यालयांत शिकत होते. मध्यमवर्ग हेरिंग नांवाचे मासे पकडणे, तसेंच घोडे व गुरें यांची पैदास करणें, या धंद्याच्या योगानें भरभराटीस आला. बॉडर अथवा शेतकरी लोक मातब्बर व स्वतंत्र होते. डॅनिश राज्याचा विस्तार ६०,००० चौरस किलोमिटर होता. लोकसंख्या ७००००० होती व राष्ट्राच्या संरक्षणाकरितां १६०००० सैन्य व १४०० जहाजें होतीं.

विभागणीचा काळ:- दुसर्‍या व्हाल्डेमारच्या मृत्यूनंतर विभागणीचा काळ सुरू झाला. याच्यामागून एरिक प्लोव्हपेनिंग हा गादीवर बसला. तेराव्या व चौदाव्या शतकांत राजे लोकांमध्यें व सरदारांमध्यें तसेंच राजे व पोप यांच्यामध्यें भांडणें चालू होतीं. स. १२८२ मध्यें सरदार लोकांनीं एरिकला एक सनद देणें भाग पाडलें. या सनदेच्या योगानें डेन हॉफला राष्ट्रीयसभा मानण्यांत आलें. दुसरा ख्रिस्टोफर यास तर याहूनहि जास्त हक्क द्यावयास लावलें. परंतु सरदार लोकांनां दिलेलें हक्क, राजांच्या कमकुवतपणाइकेच त्रासदायक ठरले व सर्व राज्याचे निरनिराळे तुकडे पडले.

चौथा व्हाल्डेमार (१३४०-१३७५):- चौथ्या व्हाल्डेमारनें हे सर्व तुकडे एकत्र करून बाल्टिक समुद्रावर डेन्मार्कचें मोठें राज्य प्रस्थापित केलें. त्यानें सामाजिक स्थिति सुधारून राज्यव्यवस्थेंतहि फेरफार केले. यानें राजाचें उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला. या वेळेपासून वार्षिक लँडगिल्डे अथवा राज्यांतील शेतकर्‍यांनी दिलेला सारा हेच राजाचे उत्पन्न बनलें व अत:पर सर्व जमीन ही राजाची वंशपरंपरागत मालमत्ता समजली जाऊं लागली. राष्ट्रीय सैन्याची जुन्या धर्तीवर स्थापना झाली; शहरांनांहि शिपाई व जहाजें पुरवावीं लागत व शेतकर्‍यानां तिरंदाज लोक द्यावे लागत. व्हाल्डेमारनें लांडगे धरण्याकरितां जाळी शोधून काढलीं व पुष्कळ पाणचक्क्या बनविल्या. अशा रीतीनें त्यानें राज्यांत शांतता स्थापिलीं.   

काल्मरचा संघ (१३९७):- व्हाल्डेमारचें काम त्याची मुलगी मार्गारेट हिनें तडीस नेलें. तिनें स्वीडन, नार्वे व डेन्मार्क या उत्तरेकडील तिन्ही देशांचें एक राज्य बनविलें. प्रत्येक राष्ट्रानें आपापले कायदे पाळावेत व तेथील लोकांनीच त्यांच्यावर राज्य करावे ही अट मार्गारेट व तिचे वारस यांनीं मोडली. त्यामुळें हें एकीकरण नार्वे व स्वीडन या दोन्ही देशांत फार अप्रिय झालें. पुढील राजा, सतवा एरिक याला पदच्युत करून हँसियाटिक लीग व होल्स्टेनर लोक यांनी बव्हेरिच्या ख्रिस्तोफरला गादीवर बसविलें. एरिकला पदच्युत केल्यानंतर सरदार लोकांचें प्राबल्य पुन्हां माजलें व शेतकरी लोकांची स्थिति केवळ गुलामाप्रमाणें बनली.

संघाचा भंग:- ख्रिस्टोफर मेल्यावर १८४८ सालीं रिग्स्त्राडनें ओल्डेन्बर्गच्या काउंट ख्रिश्चियनला गादीवर बसविलें. परंतु स्वीडननें कार्ल नटसन (चार्लस आठवा) हा पसंत केला व नॉर्वे डेन्मार्कला मिळालें. नंतर आपापसांत लढाया सुरू झाल्या व ब्लॅकडेथ नांवाच्या रोगानें या देशाची पूर्ण नासाडी केली. स्वीडनमध्यें धर्मोपदेशक व सरदार लोक या संघाला अनुकूल होते परंतु सामान्य लोक फार विरुध्द होते. याच वेळेला डॅनिश आरमार बाल्टिक समुद्रांत श्रेष्ठ बनलें.

दुसरा ख्रिश्चियन (१५१३-१५२३) :- या राजाच्या कारकीर्दीत स्कॅंडेनोव्हियन राज्याचें मार्गारेटचें स्वप्न खरें ठरण्याचा योग आला. हा तरुण राजा करारी स्वभावाचा व बुध्दिमान होता. हा डेन्मार्क व नार्वेचा राजा असून त्याने स्वीडनची शक्ति हत्यारांच्या जोरानें कमी केली. परंतु स्टोकहोम येथील कत्तलीमुळें स्वीडिश लोक डेन्मार्कचे कट्टे वैरी बनले. त्याचा हेतु उत्तरेकडील तिन्हीं राज्यें एकत्र करून हंसालीगची अथवा कोण्याहि परकीय राष्ट्राची ढवळाढवळ नाहींशी करण्याचा होता. तो धर्मोपदेशकांचें महत्त्व समजत असे. पण त्याचें वर्तन क्रूर व धरसोडीचें होतें.

पहिला फ्रेडरिक व धर्मसुधारणा:- दुसरा ख्रिश्चियन पळाल्यावर त्याचा चुलता पहिला फ्रेडरिक (१५२३-१५३३) गादीवर बसला व चर्चचें पूर्वीचें वर्चस्व पुन्हां स्थापित झालें. प्रथम नवीन राजा तटस्थ होता. परंतु लुथेरियन धर्माची लाट इतकी जोरानें आली कीं, संबंध डेन्मार्कमध्यें तिला कोणीच अडथळा करूं शकला नाहीं. हॅन्स टॉसेनला मुख्य बादशाही चॅप्लेने नेमलें व त्याच्या बारा अनुयायांच्या वकृत्त्वानें डॅनिश लोकांवर फारच परिणाम होऊं लागला. यावेळीं जितक्या बिशपच्या जागा रिकाम्या झाल्या तितक्या सर्व राजानें आपल्या पसंतीच्या लोकांनां दिल्या. स्वत: राजा अंतर्यामी लुथेरन होता. स. १५२७ मधील हुकुमानें दोन्ही पंथांनां (लुथेरन व रोमनकॅथोलिक) बरोबरीचे मानलें. ख्रिश्चियननें नॉर्वेवर (१५३१) स्वारी केली व काउंटची लढाई (१५३४-३६) झाली. या दोन गोष्टींनीं ही धर्मसंबंधीं आणीबाणीची वेळ दिरंगाईवर पडली. १५३६ मधील हुकुमानें असें ठरविण्यांत आलें कीं, विशप लोकांचे पारलौकिक व ऐहिक वर्चस्व नष्ट होऊन त्यांच्या जमिनी त्यांच्यापासून हिसकावल्या जातील व लोककल्याणास्तव राजाच्या स्वाधीन केल्या जातील. परंतु लूथरच्या उपदेशानें कॅथोलिक धर्माचें समूळ उच्चाटण झालें नाहीं.

धर्मसुधारणेचे परिणाम:- धर्मसुधारणेपासून डेन्मार्कच्या शिक्षणास प्रथम फार थोडा फायदा झाला व डेन्माकचें पारमार्थिक जीवन जरी हलक्या प्रतीचें होतें तरी राजकीय दृष्टया ही धर्मसुधारणा राष्ट्राला फायद्यांची झाली. चर्चची मालमत्ता जप्त केल्यामुळें राजाचा दोन रीतीनें फायदा झाला. एक तर त्याला कायमचें उत्पन्न मिळालें व दुसरें पुष्कळ मालमत्ता ताब्यांत येऊन राज्यकारभार फायदेशीर रीतीनें चालवितां आला. यामुळें तिसर्‍या ख्रिश्चियनला आपल्या जर्मन भाडोत्री शिपायांचा पगार चुकवितां आला, आरमार वाढवितां आलें व अधिकारी लोकांनां पुरेसा पगार देतां आला. त्यामुळें त्यांची लायकी वाढून जॉन फ्रिअस, पिडरऑक्स, हेर्लफ ट्रोले व पिडर स्क्रॅम सारखे मुत्सद्दी व दर्यावर्दी निपजले. उत्पन्न वाढल्यामुळें डेन्मार्कला उत्तरेकडील संस्थानांचें या (१५४४-१६२६) काळांत धुरणीत्व प्राप्त झालें व डेन्मार्कचें समुद्रावरील वर्चस्व सर्वांनी कबूल केलें.

चौथ्या ख्रिश्चियनच्या राज्यारोहणप्रसंगीं डेन्मार्कची स्थिति (१५८८):- व्हासा घरण्यांतील राजाच्या कारकीर्दीत स्वीडनची भरभराट होत असतांना डेन्मार्क दिवसेंदिवस र्‍हास पावत होतें. निवडलेल्या राजाचा नैसर्गिक दुबळेपणा व शास्ता व शासित यांच्यामधील प्रेमभावाचा लोप ही दोन कारणें या र्‍हासाच्या मुळाशी होती. डेन्मार्कमध्यें राजा सत्ताधीश नसून तो सरदार लोकांच्या रिग्स्त्राडचा अंकित होता. नवीन राजा निवडला जाण्याच्या पूर्वी त्याला नवीन सनद करून द्यावी लागे. या काळाला डॅनिश इतिहासांत अ‍ॅडेल्स्बाल्डे अथवा सरदारांचें राज्य म्हणतात. राजा व सरदार यांच्या खालच्या लोकांस प्रजा म्हणत. यांपैकीं धर्मोपदेशक लोक यांच्या धर्मसुधारणांपासून जमिनी गेल्या होत्या तरी हे रिग्स्डॅगमध्यें होतें. हे संरक्षण व चरितार्थ याबद्दल राजावर अवलंबून होते.

वर्जेस लोकांचे प्रतिनिधी रिग्स्डॅगमध्यें होते व डॅनिश व नॉर्वेजियन व्यापार्‍याची फार भरभराट झाली होती. या समाजसोपानाची शेवटची पायरी शेतकरी लोकांची होती. यांची स्थिती फार खालावलेली होती. धान्याचे भाव वाढल्यामुळें व कर कायमच राहिल्यामुळें त्यांची सांपत्तिक स्थिति सुधारली होती परंतु स्वतंत्र शेतकर्‍यांची संख्या कमी झाली होती व सरदार लोकांच्या जमिनीवर काम करण्याचे दिवस वाढत चालल्यामुळें ते केवळ गुलाम बनले होते. त्यांनां कांहीच राजकीय हक्क नव्हते व त्यांचे प्रतिनिधी रिग्स्डॅगमध्यें नव्हते.

चौथा ख्रिश्चियन (१५८८-१६४८).- चौथा ख्रिश्चियन १५८८ सालीं गादीवर बसला. कोपनहेगन, एल्सिनोर व इतर शहरें येथील बंदरें विस्तृत करण्यांत आली. हँसियाटिक शहरांचे राहिलेले हक्क काढून टाकले, व्यापार व उद्योगधंदे सुधारण्याचे निरनिराळे प्रयत्न करण्यांत आले. डेन्मार्क बाकीच्या प्रॉस्टेस्टंट संस्थानचें वैरी होतें. काल्मार लढाई संपल्यावर डेन्मार्क व स्वीडन यांचा समेट होऊन हे देश पुढें तीस वर्षे शांततेनें राहिले परंतु तीस वर्षांच्या लढाईमध्यें या दोन देशांमध्यें पुन्हां लढा उपस्थित झाला व ख्रिश्चियनच्या शौर्यामुळें डेन्मार्कची बाजू राखली. ब्रोम्सेब्रोच्या तहानें (१६४५) ओसेल व गॉटलंड बेटें, व जेम्टेलँड व हर्जेडॅल हे प्रांत कायमचे व हॅलँड तीस वर्षपर्यंत डेन्मार्कला द्यावें लागलें. बाल्टिक समुद्रावरील स्वीडनच्या प्रांतापासून जकात घेऊं नये असेंहि ठरविण्यांत आलें.

तिसरा फ्रेडरिक (१६४७-१६७०):- या तहापासून डेन्मार्कची फारच हलाखी होत चालली. परराष्ट्रीय कारभार राजाच्या हातांतून रिगस्त्राडच्या हातांत गेला. स. १६५७ मध्यें तिसर्‍या फ्रेडरिकनें स्वीडनशीं लढाई पुकारली स. १६५८ मध्यें रॉस्किल्डेचा तह झाला. या तहानें डेन्मार्कनें तीन स्कॅनियन प्रांत, बोर्नहोम बेट, बाहस व ट्रॉडझेमप्रांत देण्याचें कबूल केलें, व स्वीडनविरुध्द सर्व तह मोडून स्वीडिश जहाजावरील सर्व कर उठविण्यांत आले. परंतु लवकरच कोपनहेगनचा तह झाला. यानें ट्रॉडझेप प्रांत व बोर्नहोम बेट परत करण्यांत आलें व रोस्किल्डे तहाच्या पुष्कळ अटींतून डेन्मार्कला मुक्त करण्यांत आलें

वंशपरंपरागत राजसत्तोची स्थापना (१६६०):- या नुकत्याच संपलेल्या लढाईमुळें एक महत्त्वाचा राजकीय परिणाम घडून आला. यामुळें सरदार लोकांची सत्ता नाहींशीं झाली. कोपनहेगनेंन सार्वजनिक कामांत मत देण्याचा अधिकार मागितला. राजाचें वर्चस्व पूर्वीपेक्षां वाढलें होतें. नुकत्याच झालेल्या लढाईंत दाखविलेल्या धैर्य व शौर्यादि गुणांमुळें फ्रेडरिकची लोकप्रियता अतिशय वाढली होती.

१६६० सालीं रिग्स्त्राड कोपनहेगन येथें भरली व पहिलें बिल आलें तें असें कीं, खाण्याच्या पदार्थांवर एक कर बसवावा, व गुरेंडारें यांवरहि कर घ्यावा. सरदार लोकांनीं या कराबद्दल माफी मागितली, परंतु धर्मोपदेशक व बर्जेस (नगरवासी लोक) यांचें म्हणणें पडलें कीं सर्वांवर सारखे कर बसवावेत. अखेरीस सरदार लोकांस या बिलास संमति देणें भाग पडलें. याप्रमाणें सांपत्तिक प्रश्नाचा निकाल लागला. लष्करी नोकरीबद्दल दिलेल्या सर्व जहागिरी राजाच्या सत्तेखालीं ठेवण्यांत आल्या व यांवर कर घेण्याचा व जो जास्त पैसे देईल त्याला भाड्यानें देण्याचा अधिकार राजाला मिळाला. यामुळें सरदारांची सत्ता नष्ट झाली. याच सुमारास हॅन्स नॅन्सेन व क्रिस्टोफर हॅसेन यांनीं अशी सूचना आणली कीं डेन्मार्कचें राज्य राजाला वंशपरंपरागत द्यावें. याला ''इंन्स्ट्रुमेंट'' म्हणत. पण हें रिग्स्त्राडनें अजिबात फेंटाळून लाविलें. राजानें शहराची शिबंदी दुप्पट केली, शहरांतील कवायती लोकांनां दारुगोळा देण्यांत आला व त्याच दिवशी राजानें रिग्स्त्राडजवळून स्पष्ट जबाब मागितला. रिग्स्त्राड शरण आली व १३ आक्टोबर रोजीं एका करारनाम्यावर सही करून या सभेनें असें कबूल केलें कीं खालच्या सभेप्रमाणें (लोअर एस्टेट) या सभेनेंहि राजा व त्याचे वारस यांनां डेन्मार्कचें राज्य वंशपरंपरागत दिलें आहे.

परंतु जरी वंशपरंपरागत राजसत्ता प्रस्थापित झाली, तरी देशाचे कायदे रद्द झाले नव्हते. नंतर एक कमिटी नेमण्यांत आली. तिनें ठरविलें कीं राजाला शपथ घ्यावयास लावावें व त्यानें करून दिलेली सनद त्याला परत द्यावी, व राजानें आपल्या व लोकांच्या कल्याणाकरितां एक नवी राज्यघटना जाहीर करावी. ही सनद राजाला परत देण्यांत आली व त्यानें सर्व दर्जांच्या लोकांचा दरबार भरवून जाहीर केलें कीं, मी खर्‍या वंशपरंपरागत ख्रिश्चन राजाप्रमाणे राज्य करीन व चांगली राज्यव्यवस्था स्थापन करीन. यानंतर मेजवानी झाली. परंतु 'राज्यघटने' संबंधानें पुढें कांहींच ऐकूं आलें नाहीं.

अनियंत्रित राजसत्तोची स्थापना:- याप्रमाणें नियंत्रित राजसत्तोचें हळू हळू अनियंत्रित राजसत्तेत रूपांतर झालें. स. १६६१ मधील इंस्ट्रुमेंट नांवाच्या कायद्यानें डेन्मार्क व नॉर्वेचें वंशपरंपरागत राज्य व सर्व हक्क राजाला देण्यांत आले. कोपनहेगन येथें ''कोंगलेव्ह'' अथवा राजाचा कायदा प्राप्त झाला. राज्य अविभक्त राखणें, धर्म पाळणें, ''कोंगलोव्ह'' पाळणें एवढींच राजाची कर्तव्यें होतीं. १६६० सालच्या राज्यक्रांतीमुळें नार्वेचा फायदा झाला. १६६१ सालीं राज्याची सांपत्तिक व आर्थिक स्थिति तपासण्याकरितां एक नवीन कमिशन नेमण्यांत आलें. ''लष्करी जहागिरी'' मोडून ''काऊंटी'' बनविण्यांत आल्या. सरदार लोकांवर कर बसविण्यांत आले. १६६२ सालीं नॉर्वेमधील शहरांनां कांहीं विशिष्ट हक्क देण्यांत आले.

पांचवा ख्रिश्चन (१६७०-१७९९):- ही अनियंत्रित राजसत्ता डॅनिश संस्थानला फायदेशीर झाली. त्याचा तात्कालिक परिणाम पुढें दिल्याप्रमाणें झाला:- मध्यम वर्गांतील लोकांनां राज्यकारभारांतील सर्व अधिकाराच्या जागा खुल्या झाल्या. याचवेळीं इकडे फ्रेंच राजा लुई यानें नेदरलंड घेण्याच्या इराद्यानें स्वीडनशीं तह केला, व नेदरलंडवर सैन्य पाठविलें. यानंतर बँडन्बर्गच्या इलेक्टरनें लिओपोल्ड बादशहाशीं तह केला व त्यास डेन्मार्कला संमति द्यावयास लाविलें.

उत्तरेकडील महायुध्दाच्या वेळचा डेन्मार्क:- यावेळीं डेन्मार्कला तटस्थ राहणें कठिण होतें. फ्रान्सला मिळाल्यास स्वीडनच्या अंकित व्हावें लागणार व नेदरलंडशीं दोस्ती केली तर स्वीडनच्या हल्ल्यास तोंड द्यावें लागणार अशा पेंचांत ग्रिफेनफेल्डट पडला. अखेरीस १६७३ सालीं कोपनहेगन येथें एक तह होऊन असें ठरलें कीं १०००० माणसें व वीस लढाऊ जहाजें डेन्मार्कनें द्यावींत व नेदरलेंडनें मोठी खंडणी द्यावी. स्वीडनला फ्रान्सपासून अलग करण्याचा प्रयत्न ग्रिफ्रेनफेल्डट यानें केला व त्याला ऍंटी-फ्रेंच लीगमध्यें जबरदस्तीनें भाग घ्यावा लागला. यामुळें २०००० सैन्य तयार डेन्मार्कला फॉन्टेब्लोचा तह करावा लागला.

फॉन्टेनेब्लोच्या तहानें फ्रान्स व स्वीडनच्या फायद्याकरितां डेन्मार्कचें नुकसान केलें. ४१ वर्षांनतर हॅनोव्हर व प्रशियाच्या फायद्याकरितां डेन्मार्कचें फिरून नुकसान झालें. उत्तरेकडील लढाईंत स्वीडिश आरमारापासून जर्मन संस्थानांचा बचाव डॅनिश आरमारानें केला. परंतु याबद्दल ६००००० रिक्सडॉलरशिवाय डेन्मार्कला कांहीं एक मिळालें नाहीं. ब्रेमेन व व्हर्नेन येथील बिशपांच्या जागा, पोमेरॅनिया प्रांत व रूगेन बेट हीं अंशत: हॅनोव्हरचा इलेक्टर व अंशत: प्रशियाचा राजा यांनां देण्यांत आलीं.

चौथा फ्रेडरिक (१६९९-१७३०):- या राजानें देशाची सांपत्तिक स्थिति सुधारण्याचें बरेच प्रयत्न केले. दरबारनें शिक्षणप्रसारार्थ बराच यत्न केला. राजा गादीवर बसल्यानंतर जमलेल्या बादशाही शेतांतील सर्व शेतकर्‍याची गुलामगिरींतून मुक्तता झाली.

सहावा ख्रिश्चन (१७३०-१७४६)- या राजानें राष्ट्रीय ''मिलशिया'' सैन्य मोडून टाकलें. धान्याचे भाव उतरले तेव्हां शेतकरी लोक बाहेरदेशीं जाऊं लागले. १७३३ सालीं एक कायदा करण्यांत आला त्यायोगें नऊ ते चाळीस वर्षांच्या दरम्यान प्रत्येक शेतकर्‍यानें देशांतच राहिलें पाहिजे असें ठरविण्यांत आलें; व मिलिशिया सैन्य पुन्हां जमविण्यांत आले.

पांचवा फ्रेडरिक (१७४६-१७६६):- या राजाच्या कारकीर्दीत व्यापार, उद्योगधंदे व शेती सुधारण्याकरितां बरेच यत्न करण्यांत आले. डेन्मार्कचा माल नेआण करण्याचा व्यापार वाढविण्याकरितां, बार्बरी स्टेट, नेपल्स, जिनोआ यांशीं कांहीं तह करण्यांत आले. तथापि यावेळीं शेतकर्‍याची स्थिति खालावलेलीच होती. १७५७ त नेमलेल्या कमिशननें शेतकीखात्यांतील पुष्कळ दोष नाहींसे केले; वंशपरंपरागत पट्टे देण्याची पुष्कळ जमीनदारांनीं सुरवात केली: व शेतकर्‍याची गुलामगिरी मोडून टाकण्यांत आली.

सातवा ख्रिश्चन (१७६६-१८०८):- परराष्ट्रीय राज्यकारभार जे. एच्. इ. बर्नस्टॉर्फ व त्याच्यामागून त्याचा पुतण्या ऍंड्रीज बर्नस्टॉफ यांच्या हातीं होता. यांनीं डेन्मार्कला तटस्थ राखण्याचें धोरण ठेविलें. राजा स्वत: अर्धवट वेडा होता. परंतु यावेळी सी. डी. एफ. रेव्हेनट्लो व ओव्ह ह्यूल गुल्डबर्ग वगैरे विद्वान मंडळी पुढें आली.

शेतकरी लोकांचें दास्यविमोचन हाच त्यावेळी मुख्य राष्ट्रीय प्रश्न होता व याचा व्यावहारिकरीत्या निकाल लावण्याचें श्रेय रेव्हेंटलो यालाच दिलें पाहिजे. सर्फडम (शेतकर्‍याची गुलामगिरी) मोडून टाकण्यांत आली. १७८८ सालीं धान्याच्या व्यापारावरील कर माफ झाला असें जाहीर करण्यांत आलें. निग्रो लोकांनां गुलाम करून विकण्याचा व्यापार बंद करण्यांत आला व भाषणस्वातंत्र्य जास्त देण्यांत आलें. तरी रशियन बादशहा पॉल याच्या आग्रहावरून मर्यादित सेन्सारशिप (मुदणनियंत्रण) स्थापण्यांत आलें.

नेपोलियनच्या लढाईच्या वेळचें डेन्मार्क व गेटब्रिटन:- रशियाची खुशामत करण्याकरितां डेन्मार्कची व ग्रेटब्रिटनची पहिली लढाई झाली. १८०० सालीं झारनें डॅनिश सरकारला ''आर्मड् न्युट्रॅलिटी लीग'' (सशस्त्र तटस्थता) ला संमत्ति द्यावयास लावलें. ग्रेटब्रिटननें आपल्या बंदरांतील लीगमधील राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांनां जाण्याची मनाई केली; व पार्कर नेल्सन यांच्या आधिपत्याखालीं एक आरमार डेन्मार्कवर पाठविलें. डॅनिश आरमाराचा मोड झाला व त्यांनां नुकसानकारक तह करावा लागला.

आपला तटस्थपणा कायम राखण्याच्या निरर्थक प्रयत्नामुळें डेन्मार्कची व इंग्लंडची दुसरी लढाई झाली. इंग्लंडनें त्यांनां आपल्याशीं दोस्ती करण्याविषयीं विचारलें व पुष्कळ सढळ अटी दाखविण्यांत आल्या, परंतु राजप्रतिनिधीनें त्या अमान्य केल्या. ब्रिटिश आरमारानें तोफांचा मारा करून होपनहेगनला शरण यावयास लाविलें. यानंतर डेन्मार्क नेपोलियनच्या पक्षाला जाऊन मिळालें व त्याबद्दल त्याला चांगली शिक्षाहि मिळाली. कीलच्या तहान्वयें डेन्मार्कला नॉर्वे स्विडनला देणें भाग पडलें.

१८१५ नंतरची डेन्मार्कची स्थिति:- यानंतर या देशाची स्थिति फार शोचनीय झाली. धान्याचे भाव उतरले. सहाव्या फ्रेडरिक राजाच्या शेवटच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत राजकीय चळवळ पुन्हां उपस्थित झालीं. प्रांतिक सभा जटलंड, श्लेस्विग, व हॉल्स्टेन येथें स्थापित झाल्या व फ्रेडरिक व त्याचा वारस आठवा ख्रिश्चन (१९३९-१८४८) यांच्या कारीकीर्दीत स्वतंत्र राज्यव्यवस्थेबद्दल चळवळ फार जोरांत चालू होती. जर्मनींतील राष्ट्रीय मत श्लेस्विग व हॉल्स्टेनला स्वतंत्र होण्यास उत्तेजन देत होतें. आठव्या ख्रिश्चननें योजलेली व सातव्या फ्रेडरिकनें (१८४८-१८६३) प्रचारांत आणलेली संयुक्त राज्यपध्दति प्रशियाच्या सशस्त्र चळवळीस कारणीभूत झाली; व १८५१ सालीं प्रशियन, आस्ट्रियन व डॅनिश सभासदांचें मिळून बनलेलें आंतरराष्ट्रीय कमिशन नेमून डेन्मार्कला हॉल्स्टीनच्या सरकारास शरण जावें लागलें.

मध्यंतरीं अर्वाचीन पध्दतीवर पार्लमेंट बनविण्याच्या उद्योगांत डेन्मार्क गुंतलें होते १८४८ सालीं असें ठरविण्यांत आलें कीं, १५२ प्रतिनिधींचें राष्ट्रीय मंडळ स्थापन करावें, यांपैकीं ३८ प्रतिनिधी राजानें निवडावे, यांच्या सभेस अपर हाऊस (लँडस्टिंग) म्हणावें व बाकीचें प्रतिनिधी लोकांनीं निवडून द्यावे व त्यांच्या सभेला लोकसभा (फोकस्टिंग) म्हणावें. राजाला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार नसावा असें फिलो-पेझंट पक्षाचें म्हणणें होतें. परंतु राष्ट्रीय उदारमतवाद्यांचा (लिबरल्स) जय होऊन समानहक्कप्रतिपादक लोकांनांहि बहुमतांस सामील व्हावें लागलें, व १८४९ जून रोजीं नवीन राज्यव्यवस्थेला राजाची संमति मिळाली.

जर्मनी व डंनिश डची.- याच वेळीं डेन्मार्कच्या परराष्ट्रीय संबंधामुळें या देशाच्या अंतिम राज्यव्यवस्थेस बराच बाध आला. १८५१-५२ मधील कन्व्हेन्शन (ठरावा)मुळें राज्यांतील प्रत्येक भागाला स्थानिक स्वातंत्र्य असावें व सर्वसाधारण कारभार पाहण्यासाठीं मध्यवर्ती सरकार असावे असें ठरलें. होल्स्टेन डेन्मार्कला परत देण्यांत आलें. लंडन येथील कान्फरंसमध्यें डेन्मार्कची अविभक्तता स्थापित करण्यांत आली, व प्रिन्स ख्रिश्चनला गादीचा वारस ठरविण्यांत आलें.

राज्यपद्धति – सन १४५५ मध्यें (सर्वसाधारण) मध्यवर्ती राज्यपध्दतीचा प्रसार करण्यांत आला. रिगस्त्राड (पार्लमेंट) मधील डचीचे नवीन प्रतिनिधी या पध्दतीच्या विरुध्द होते व त्यांनां जर्मन संस्थानिकांचें पाठबळ होतें. १८५७ सालीं कार्ल ख्रिश्चन हॉल हा मुख्य प्रधान झाला. यानें जर्मन संस्थानिकांनां सात वर्षेपर्यंत चातुर्याने झुलविलें. परंतु १८६२ सालीं राजाच्या जाहीरनाम्यानें मध्यवर्ती राज्यव्यवस्थेपासून होल्स्टिन शक्य तितकें अलग करण्यांत आलें. पुढल्या वर्षी डेन्मार्क व श्लेस्विगकरितां मध्यवर्ती राज्यव्यवस्था स्थापन करण्याबद्दल बिल त्यानें रिगस्त्राडमध्यें आणलें. या सुमारास सातवा फ्रेडरिक राजा मेला व त्याच्या गादीवर ननवा ख्रिश्चन बसला. यानें प्रजेला संतुष्ट राखण्याकरितां या बिलाला संमति दिली व १८ नोव्हेंबर १८६३ सालीं नवीन राज्यपध्दतीला कायद्याचें स्वरूप प्राप्त झालें. यामुळें प्रुसोडॅनिश युध्द उपस्थित झालें. डेन्मार्कसंबंधी या प्रश्नाचा निकाल १८६४ मधील व्हिएन्नाच्या तहानें लागला व या तहान्वयें श्लेस्विग व होल्स्टेन या दोन्ही डची (जहागीरी) डेन्मार्कच्या ताब्यांतून कायमच्या गेल्या. यानंतरच्या वर्षांतील डॅनिश राजकारभाराचा मुख्य विषंय म्हटला म्हणजे 'फोकस्टिंग' व 'लँडस्टिंग' मधील तंटे हा होय. हें भांडण १८७२ त सुरू झालें व सर्व जहाल उदारमतवाद्यांचा युनायटेड लेफ्ट नांवाचा एक संघ होऊन त्यानें सरकारविषयीं अविश्वास प्रदर्शित केला व बजेट नामंजूर केलें. १८७५ मध्येंज जे. बि. इस्ट्रप हा मुख्य प्रधान झाला. यानें जमाबंदीची प्रधानकी आपल्या ताब्यांत ठेविली व राजा लँडस्टिंग व देशांतील कांहीं लोक यांच्या आश्रयाच्या बळावर यानें लँडस्टिंग, व फोकस्टिंग यांच्यामधील समेट करणें व यूरोपांतील राज्यांत लढाई उपस्थित झाल्यास डेन्मार्कला आपली तटस्थवृत्ति कायम राखतां यावी म्हणून फौज वाढविणें हीं दोन कामें कायम करण्याकडें त्यानें आपलें सर्व लक्ष लाविलें. १८७९ सालच्या निवडणुकीमुळें जहाल उदारमतवाद्यांमध्यें बरीच फूट पडली व त्या कारणामुळें इस्ट्रपला 'सैन्य व आरमार संरक्षणाबिल' व 'नवीन लष्करी पीनलकोड' पास करून घेतां आला.

१८८१ सालच्या निवडणुकीनंतर जहाल उदारमतवादी लोकांच्या निरनिराळ्या पक्षांची एकजूट होऊन सरकारला जोराचा प्रतिकार होऊं लागला. तरी इस्ट्रप हा मुख्य प्रधान होता. त्याच्या मतें यावेळीं डेन्मार्कला पुराणमतवादी प्रधानमंडळाची फार गरज होती. जेंव्हा रिगस्त्राडनें बजेट नामंजूर केलें तेव्हां त्यानें राजाला तात्पुरता पैशाचा हुकूम काढण्याचा सल्ला दिला व पुढेंहि ज्या ज्या वेळीं पैशाची गरज लागे त्यात्यावेळीं असेच हुकूम काढीत असत. स. १८८६ मध्यें युनायटेड पक्षानें सरकारशीं तडजोड करण्याचें योजिलें व १८९४सालीं फोकस्टिंग आणि सरकार व लँडस्टिंग यांच्या मध्यें समेट होऊन इस्ट्रपचें प्रधानमंडळ मोडलें. १८९४ सालीं समेटं झाला होता तरी फोकस्टिंग व लँडस्टिंगमधील तंटे डॅनिश राजकारणांत वारंवार दृष्टोपत्तीस येत असत. स. १९०१ त लेफ्ट पक्षाचें प्रधानमंडळ बनलें. त्यानें जर्मनीशी सलोखा केला. १९०६ सालीं ख्रिश्चियन राजा वारला व त्याचा मुलगा आठवा फ्रेडरिक गादीवर आला.

आधुनिक इतिहास.- १९०८ त ख्रिस्तिेन्सन व त्याच्या मंत्रिमंडळानें राजीनामा दिला व त्या जागीं नील्स नीलगार्ड व त्याच मवाळ पक्ष अधिकारारूढ झाला. या पक्ष्याच्या अमदानींत राष्ट्रसंरक्षणाचा प्रश्न प्रामुख्यानें पुढें येऊन त्याच्यावर मोठीं रणें माजल्यामुळें नीलगार्डच्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागला; व कौटहोलस्टीन लेडे्रबॉर्ग हा प्रधान झाला. याच्या अमदानींत राष्ट्रसंरक्षणाचा प्रश्न तडीला लागून सैन्य व आरमार यांची वाढ व्हावयाचें ठरलें. कोपनहेगनच्या संरक्षणासाठीं आरमाराची जय्यत तयारी करावयाची व इतर सैन्याची संख्या १९२२ च्या आंत कमी करावयाची असेंहि ठरवण्यांत आलें. अशा रीतीनें होलस्टीननें या क्लिष्ट प्रश्नाची विल्हेवाट लावली. पण फोकस्टिंगमध्यें या पक्षाला बहुमतं नसल्याकारणानें याचा इतर प्रश्नांच्या बाबतींत पराभव होऊं लागल्यामुळें होलस्टीनला प्रधानपद सोडणें भाग पडलें व त्याच्या बदली झहले या रॅडिकल पक्षाच्या पुढार्‍यानें आंपलें मंत्रिमंडळ बनविलें. पण त्याच्या पक्षाला देखील पुरेसें मताधिक्य नव्हतें त्यामुळें याच्या पक्षाचा कार्यक्रमहि याला अमलांत आणतां आला नाहीं. डेन्माक्रची शासनपध्दति लोकसत्ताक असावी असें या पक्षाचें म्हणणें होतें व तशा प्रकारचें एक बिल या पक्षानें राष्ट्रसभेंत आणलें. पण या बिलाला अर्धचंद्र मिळाल्याकारणानें झहलें व त्याचा पक्ष पदर्भष्ट झाला व मवाळपक्ष पुन्हां अधिकारारूढ झाला. या मवाळ पक्षाचें धुरीणत्व क्लेअस बर्टसेन याच्याकडे आलें. १९९२ सालीं मे महिन्याच्या १४व्या तारखेस फ्रेडरिक राजा मरण पावल्यामुळें त्याच्या जागीं दहावा ख्रिश्चियन हा राज्यावर असला. शासनपध्दतींत बदल करण्याचें बिल पुन्हां चर्चेकरितां पुढें आणलें, पण लँड्स्टिंग उर्फ वरिष्ठ सभेमध्यें सरकारी मताचें प्राबल्य असल्यामुळें या बिलाचा कायमचा कांहींच निकाल लागला नाहीं, त्यामुळें पुन्हां निवडणुकी झाल्या व फोकस्टिंग उर्फ खालच्या कायदेमंडळांत रॅडिकल व सोशियालिस्ट पक्षांचेंच बहुमत झालें. पुन्हा झहले हा प्रधान झाला व त्यानें हे बील चर्चेकरिता पुढें आणलें. पुन्हा सरकारे पक्षानें याला कसून विरोध केला, तेव्हा डेन्मार्क सरकारने सभा बरखास्त करून टाकली. देन्मार्कला आपल्या राज्यावर संकट येणार म्हणून धास्ती वाटू लागली. महायुध्दाच्या तहकुबीनंतर डेन्मार्कनें आपल्या सैन्याला रजा दिली. दोस्तांचा या महायुध्दांत जय झाल्यामुळें, स्लेसस्विग हा प्रांत जर्मनांच्या ताब्यांत होता तो परत मिळविण्याची डेन्मार्कनें खटपट सुरू केली. शांततापरिषदेपुढें हा प्रश्न चर्चेला निघून उत्तर स्लेस्विग प्रांत डेन्मार्कला देण्यांत आला. मध्यस्लेस्विगमधील लोकांनीं डेन्मार्कच्या विरुध्द मत दिल्यामुळें तो प्रांत मात्र डेन्मार्कला मिळाला नाहीं. उत्तर स्लेस्पिग प्रांत डेन्मार्कच्या ताब्यांत आल्यानंतर नवीन निवडणुकी झाल्या त्यांत मवाळ पक्षाला बहुमत मिळालें व नीलगार्ड हा पुन्हां मुख्य प्रधान झाला.

डॅनिश भाषा.- डेन्मार्कमधील सांप्रतची भाषा स्वीडनची भाषा ज्या मूळ भाषेपासून निघाली तिच्यापासूनच निघलेली असून त्या दोघींचीहि जननी जुनी स्कॅंडिनेव्हियन भाषा ही होय. ही स्कॅंडिनेव्हियन भाषा अद्यापहि थोड्याफार फरकानें आईस्लंडमध्यें आहे आणि इ. सन ११०० पर्यंत सर्व स्कॅंडिनोव्हियन व नार्वेचें वाड:मय त्याच भाषेंत निर्माण होत होतें. या जुन्या भाषेपासून अलीकडील डॅनिश भाषा स्वतंत्र निर्माण होण्याला प्रथम लो जर्मन भाषा व नंतर हाय जर्मन भाषा यांचा परिणाम कारणीभूत झालेला आहे. १२व्या शतकापासूनच हा फरक पडण्यास सुरवात झाली. भाषेची वाढ परिपूर्ण होण्याच्या एकंदर काळाचे चार विभाग पडतात. पहिलया ११००-१२५० दरम्यानच्या काळांत प्रथम शद्वांची रूपें बनण्याच्या नियमांमध्यें थोडथोडा फरक पडूं लागला. दुसर्‍या १४०० र्प्यंतच्या काळांत स्वरांच्या पध्दतींतील फरक कायम होत गेला आणि क्रियापदांच्या रूपांमध्यें सोपेपणा येत चालला. तिसर्‍या १५३० पर्यंतच्या काळांत जर्मन भषेचा डॅनिश भाषेवर पूर्ण पगडा बसून धर्मसुधारणेच्या वेळी त्याचा शेवट चवथ्या (१५३० ते १३८० च्या) काळांत हें वाढीचें काम तडीस जाऊन सांप्रतची डॅनिश भाषा तयार झाली.

[संदर्भग्रंथ-डेन्मार्क्स रिगेस हिस्टरी (कोपनहेगन १८९८-१९०५); आर. निस्बेट बेन-स्कांडिनेव्हिया (१९०४); एच्. वीटेमेघर-हेन्मार्क(१९०१); अडॉल्फ डिटलेव्ह जॉर्चेन्सन-हिस्टरी आफांड लिंगेर (१८९८); सॅस्को-गेस्टा डॅनोरम (१८८६); लुडविग होलबर्ग-होंग ओग डेनहोफ (१८९५); पौल फ्रेडरिक बारफोर्ड-डेन्मार्कस् हिस्टरी १३१९-१५३६ (१८८५); नील्म पीटर जेन्सन-डेन अंडेन स्लेस्विग क्रिग; एस्. एन्. मौरिटसेन-व्हॉर फॉर्फटॅनिंग्ज हिस्टरी (१८९४)]

वाड:मय.- डेर्न्माकमधील सर्वांत जुना ग्रंथ म्हटला म्हणजे एका इंग्लिश मंकनें नूड साधूचें लॅटिन भाषेंत लिहिलेलें चरित्र हा होय. डेन्मार्कमध्यें आणखी कित्येक लॅटिन लेखक होऊन गेले असून त्यांच्या ग्रंथांपैकी डेन्मार्कसंबंधी बखरीवजा व इतिहासवजा लिहिलेले ग्रंथ प्रसिध्द आहेत.

१६व्या शतकापर्यंत डेन्मार्कमध्यें देशी भाषेंत वाड्:मय होण्यास सामान्यपणें सुरवात झाली नव्हती. जुने जुने कायदेलेख उपलब्ध आहेत. त्यांवर १३ व्या शतकापासूनचे सन आढळतात. १३ व्या शतकांतला वैद्यकावरील फक्त एकच ग्रंथ हार्पस्टे्रगनें लिहिलेला हयात आहे. डॅनिशमध्यें लिहिलेल्या एका राजाज्ञापत्रकावर १३८६ हा सन आढळतो; आणि स. १३९७ मध्यें लिहिलेला कॉल्मार येथील एकीकरणाचा कायदा (अ‍ॅक्ट ऑफ यूनियन) हा १४ व्या शतकांतील अत्यंत महत्त्वाचा लेख होय. तथापि १३०० ते १५०० च्या दरम्यान रचल्या गेलेल्या सुमारें ५०० कवितांचा उर्फ डॅनिश पोवाड्यांचा संग्रह हीच मध्ययुगांतील डेन्मार्कची अत्यंत अमूल्य देणगी होय. या कवितांच्या कर्त्यासंबंधीं आज आपणांस कांहींच माहिती नाहीं; पण त्यांत 'शिव्हलरिक' युगांतील प्रतापी योध्दयांच्या व रमणीय युवतींच्या साहसकथा अगदीं अकृत्रिम पण बहुश: अत्यंत सुंदर भाषेंत वर्णन केल्या आहेत. त्यांतील कित्येक विषय जुन्या पुराणांतले आहेत; कांहीं ख्रिस्ती दंतकथांतले आहेत व पुष्कळ राष्ट्रीय इतिहासांतील आहेत. त्या पोवाड्यांची भाषा १६ व्या व १७ व्या शतकांतील आहे व ती तोंडी परंपरेंत बदलत जात जात अगदीं आधुनिक बनली आहे. ते पोवाडे खंडश: प्रसिध्द होतां होतां १८८३ सालीं पांच भागांमध्यें ग्रुंडव्हिगरनें प्रसिध्द केले.

१४९० सालीं प्रथम कोपनहेगन येथें गॉटफ्रीडनें छापखाना काढला. तो त्यानें वेस्टफॅलियाहून आणिला होता. नंतर पांच वर्षांनी त्यांतून पहिलें डॅनिश पुस्तक छापून निघालें. तें पुस्तक म्हणजे डेन्मार्कचा पद्यमय इतिहास होय. त्यांत १ ल्या ख्रिश्चियनच्या स. १४८१ तील मृत्यूपर्यंतची हकीगत आहे. १५०६ सालीं कोपनहेगनच्या युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. मिकेलनें 'कुमारी मेरीची गुलाबमाला,' 'सृष्टयुत्पत्ति,' व 'मानवी जीवित' हीं पुस्तकें १५१४त प्रसिध्द केली. यांबरोबरच लॅटिन ग्रंथ मात्र पुष्कळच झाले. डॅनिश वाड्:मयाला खरें उत्तेजन धर्मसुधारणेच्या चळवळीमुळें मिळालें. पेडरसेन हा डेन्मार्कमधील पहिला विद्वान मनुष्य होय. यानें अनेक स्तोत्रें, (साम्स), न्यू टेस्टामेंट व बायबल यांचें भाषांतर केलें. धर्मसुधारणेच्या चळवळींतील अत्यंत उत्तम वक्ता व उपदेशक ट्युसेन यानेंहि धर्मग्रंथांचें भाषांतर व स्वतंत्र उपदेशपर गोष्टी लिहिण्याचें काम केलें आहे. तद्विरुध्द कॅथॉलिक पक्षामधील उत्तम विवादपटु हेल्गेसेन यानें लुथरविरुध्द स्वीडनच्या पहिल्या गुस्टॅव्हसच्या बारा धार्मिक प्रश्नांनां उत्तर दिलें आहे व 'क्रिबी क्रॉनिकल' म्हणून इतिहासवजा एक पुस्तक लिहून त्यांत ऐतिहासिक प्रसंगावरील मतेंहि प्रदर्शित केली आहेत. ह्यूटफील्डनें डेन्मार्कच्या राज्याची बखर १० भागांत प्रसिध्द केली आहे.

धर्मसुधारणेपूर्वी नाटकें क्वचित झालेली आढळतात. त्यांत स्थेनचें कोर्टव्हेनडिंग (दैवाचा बदल), हनॅसनेचें 'दि फेथलेस वाईफ (स्वैरिणी स्त्री).' रँचचें काँग सॅलोमन्स हिंल्डिंग (सॉलोमन राजाचा राज्याभिषेक) व सॅम्सन्स फैंगलसेल (सॅम्सनचा तुरुंगवास) आणि कॅरिग निडिंग (कृपण पापी मनुष्य) वगैरे नाटकें प्रसिध्द आहेत. शिवाय क्लौसेन, अरेबो, वगैरे कवी व थॉट व उल्फेल्ड या लेखिका प्रसिध्द आहेत. डॅनिश वाड:मयाचा प्राथमिक काळ १७०० च्या सुमारास संपतो; त्या काळातील किंगो व ब्रोर्सन हे अखेरचे कवी होत. किंगोची भाषा सुंदर व सुलभ असून तिच्यामध्ये मोहक कल्पनाशक्ति होती. आधुनिक डॅनिश वाड.मयाचा पाया हालबर्ग (१६८४-१७५४) यानें घातला. त्याच्या कित्येक ग्रंथांतील चित्ताकर्षकता अद्याप कायम आहे. इतिहासकार या नात्यानें त्याची लेखनपध्दति मोजकी व ओजस्वी, त्याची वृत्ति तत्त्वविवेचक आणि माहिती अगदीं बिनचूक आहे. त्या काळाच्या मानानें तो अत्यंत सुसंकृत मनुष्य असून शिवाय अत्यंत व्यवहारकुशलहि होता; व त्यामुळें अशिक्षित माणसांनां झटपट शिक्षण मिळून फायदा कशानें होईल, हें तो स्पष्ट जाणत असे. त्यानें आपलीं तेहेतीस नाटकें मोलियरचें थोडेबहुत अनुकरण करून लिहिलीं असून त्यांच्यायोगानें डॅनिश वाड्:मयंत अतिशय महत्त्वाची भर घातली आहे.

होलबर्गच्या अनुयायांचा म्हणून स्वतंत्र असा एकहि संप्रदाय जरी निघाला नव्हता, तरी त्याच्या ग्रंथाचा चोहोंकडे तत्काल परिणाम दिसूं लागला. कोपनहेगन युनिव्हर्सिटीप्रमाणें ग्रॅमनें स्थापन केलेली डॅनिश रॉयल अकेडमी ऑफ सायन्सेस, लँगबेकची डॅनिश भाषा सुधारणारी सोसायटी यांनां व कायदेशास्त्राचा लेखक होईर, प्राणिशास्त्राचा पॉटोपीडन या व इतर अनेक विद्वानांनां ५ व्या फ्रेडरिकचा चांगला राजाश्रय असे. यानंतर क्लॉपस्टॉक नांवाचा प्रसिध्द जर्मन कवि कोपनहेगनला येऊन राहिला. त्यानें ललितकलांकरितां सोसायटी काढली व मोठ्याला देणग्या मिळवून उत्तम लायक लोकांनां काव्यादि लेखनांबद्दल मोठमोठीं बक्षिसें देण्याचें सुरू केलें.

रसात्मक काव्याचें पुनरुज्जीवन:- स. १७४२ ते १७४९ च्या दरम्यान म्हणजे ज्यावेळी होलबर्गचा लेखनव्यवसाय अगदीं शिखराला पोहोंचला होता अशा काळांत अनेक कवी जन्माला आले व त्यांनीं आपल्या काव्यांनी वाड्:मयांत उत्तम भर घातली. त्यांपैकीं वेसेल व एवाल्ड यांनीं ओजस्वी ग्रंथरचना करून व आपल्या अल्पायुष्यक्रमांत हालअपेष्टा सोसून नवीन पिढीचें लक्ष्य वेधिलें. एबाल्डसारखा कवि तर सर्व यूरोपमध्येंहि १८ व्या शतकांत क्वचितच झाला असेल. होलबर्गनंतर व्होल्टेबरचीं दु:खपर्यवसायीं नाटकें डेन्मार्कमध्यें फार होती. अशा वेळी बेसेलनें एक 'लव्ह विदाउट स्टॉकिंग्ज' नावाचें फ्रेंच धर्तीवर नाटक लिहिलें, त्यानें केवळ जादूसारखा परिणाम होऊन फ्रेंच नाटकें व इटालियन ऑपेरा सुध्दां होण्याचें अजीबात बंद झालें; व प्रत्येक नाटकप्रयोगाला राष्ट्रीय वळण लागून तो प्रयोग डॅनिश भाषेंतच होऊं लागला. ऑपेरा म्हणजे संगीत नाटकांची उणीव हार्टमननें व देशी गवयांनीं नाटकें करून भरून काढली. बुंन, फ्रिमन वगैरे लेखकांनीं 'क्रिटिकल आबझर्वर' नांवाचें सौंदर्यशास्त्रविषयक मासिक उत्तम रीतीनें चालविलें होतें. दुसरे कित्येक कवी नॉर्वेमध्यें जन्माला येऊन कोपनहेगनला अभ्यासक्रम संपल्यावर त्यांनी मोठमोठे पर्वत, नद्या वगैरे निसर्गदत्त सृष्टिसौंदर्ययुक्त विषयांवर कविता लिहून डेन्मार्कसारख्या रुक्ष देशांतील लोकांनां नवीन गोडी लावून दिली. आतां त्यांच्या काव्यग्रंथांवर नार्वेजियन लोक हक्क सांगूं लागले आहेत, परंतु मूळ त्यांनीं डेन्स लोकांकरितां ग्रंथ लिहिलेले असल्याकारणाने डॅनिश वाड्:मयांतच त्या ग्रंथांची गणना केली पाहिजे.

त्यावेळच्या गद्यग्रंथकारांमध्यें वैद्यग्रंथकार टोड, इतिहासकार सूम, व तत्त्ववेत्ता ट्रेसचौ, वगैरे ग्रंथकार होऊन गेले. काव्यलेखन मंदावलें पण गद्यग्रंथ चांगले निर्माण होऊं लागले. राहबेक यानें गोड कांदबर्‍या व नाटकें लिहिलीं. ब्रून हा भूगोलकार, औलुफसेन हा प्राणिशास्त्र व अर्थशास्त्रकार, व्येरय हा भाषा-वाड्:मयोतिहासकार, एंजलस्टॉफ्ट हा इतिहासकार, मिन्स्टर हा ईश्वरविज्ञानवेत्ता वगैरे विद्वान गद्यग्रंथकार होऊन गेले. अद्भुतकथालेखनाची चळवळ सुरू होण्याच्या सुमारास बॅगसेन नामक डेन्मार्कमधील सर्वोकृष्ट विनोदी कवि झाला; सर्व डेन्स लोकांत औपरोधिक व विनोदी कविता लिहिण्यांत त्याच्या तोडीचा दुसरा लेखक नाहीं.

अद्भुतकथालेखनप्रवृत्ति (रोमँटिसिझम):- १९ व्या शतकाच्या आरंभीं तत्त्वज्ञान व काव्य या वाड्:मयप्रांतांत एक नवीनच प्रतिभा चमकूं लागली. ती मूळ जर्मनींत उत्पन्न होऊन सर्व यूरोपभर पसरली व त्याबरोबर तिनें डेन्मार्कमध्येंहि प्रवेश केला व तिचा परिणाम डेन्मार्कइतका जलद व उज्वल दुसर्‍या कोणत्याही देशांत झाला नसेल. डेन्मार्कमध्यें एक नवीन, कविवर्ग उदयास आला, त्याची प्रसिध्दि यूरोपांतील सर्व देशांत झाली, इतकेंच नव्हें तर कोणत्याहि देशांत किंवा कोणत्याहि युगांत मानमान्यतेस चढण्यासारखेच ते कवी होते. त्यांच्या उदयाबरोबर उत्कृष्ट काव्यरचनेपुढें इतर सर्व वाड्:मयशाखा मागें पडल्या; व कविताबध्द-लेखनकलेंतील कौशल्य अगदीं शिखरास पोहोंचलें. या कवींतला पहिला जर्मनींत जन्मलेला स्टॅफेल्ड होय. याची कविता फार रसाळ व नवीन शास्त्रीयशोधांस धरून आहे. त्यानंतरचा ओहलेनइलेगर हा डेन्मर्कामधला सर्वश्रेष्ठ कवि होय. त्यानें आपल्या देशबांधवांमध्यें आपल्या प्राचीन स्कॅंडिनोव्हियन राष्ट्रीयत्त्वाची जागृति करून दिली. ओहलेनश्लेगरनंतर जटलंडर ब्लिचर हा 'ए व्हिलेज सॅक्सटन' स डायरी', दि स्पिनिंग रूम' वगैरेरंचा कर्ता, इंगेमन हा वाल्टर स्कॉटसारखा ऐतिहासिक अद्भुत गोष्टी लिहिणारा, हीबर्ग हा टीकाकार, त्याची आई बॅरोनेट गिलेंबर्ग-इहरेनस्वॉर्ड ही कादंबरीकर्ती, बॉडचर हा गीतकार व या वर्गांतील शेवटला हेर्टझ हा उपहासात्मक व विनोदी लेखक इत्यादि ग्रंथकार होऊन गेले.

या अद्भुतकथालेखन काळांतील सर्व मोठमोठे कवी दीर्घायुषी होते ही गोष्ट लक्षांत घेण्यासारखी आहे. अंडरसन यानें १८३५ सालीं एक फेअरीटेल्स (कल्पितकथा) चा भाग प्रसिध्द करून पुढें दरसाल नाताळच्या सुमारास एक किंवा दोन गोष्टी प्रसिध्द करण्याचा क्रम आजन्म चालविला. फ्रे. मुल्लर याचीं पौराणिक व इतर नाटकें, गीतें, आनन्दपर्यवसायी काव्यें, 'कॅलॅनस' नांवाचें शोकपर्यवसायी नाटक हीं फार उत्तम असून त्यांत त्याची अगाध कल्पनाशक्ति व व्यापक ग्राहकशक्ति दिसून येते. या काळांत डेन्मार्कमधील वाड्:मयावर कवींचा पूर्ण पगडा बसलेला होता. तथापि रास्क हा भाषाशास्त्रज्ञ, अडेंट हा वनस्पतिशास्त्रज्ञ व पुराणवस्तुशास्त्रज्ञ, मोलबेक हा कोशकार, वगैरे विद्वान त्याच कालांतील आहेत. तसेंच कीर्केगार्ड हा तत्कालीन प्रसिध्द तत्त्ववेत्ता आहे. शेक्सपियरचा उत्तम भाषांतरकार फ्रेओर्सम व आनन्दपर्यवसायी नाटककार व डॅनिश रंगभूमीचा इतिहासकार ओव्हरस्कौ हे नाट्यशाखेंतील लेखक होत. यांशिवाय अद्भूतकथालेखनकाळ व तद्नंतरचा काळ यांच्यादरम्यान ऐतिहासिक कादंबर्‍या लिहिणारा इवाल्ड उत्कृष्ट नाटकें लिहिणारा हॉस्टरप, तत्त्ववेत्ता नीलसेन, वगैरे होऊन गेले.

निसर्गबादित्त्व (नॅचरॅलिझम):- काल्पनिक वाड्:मय याच्या वाढीला १९ व्या शतकोत्तरार्धांत निश्चित स्वरूप येत चाललें. अद्भुत-कथा-लेखन-काळांतील कवींच्या मृत्यूबरोबरच ती लेखनपध्दतीहि बंद पडत चालली. व काल्पनिकध्येयवाद्यांच्या (आयडिआलिस्ट) जागीं नवे लेखक आले. त्यांनां निसर्गवादी असें नांव आहे. त्यांचा ओढा फ्रेंच वाड्:मयाकडे होता. त्यांपैकीं ड्रॅकमन (१८४६-१९०८) यानें आपल्या स्वत:च्या समुद्रसफरींतील अनुभवांच्या आधारावर अनेक गोष्टी लिहिल्या. स्कॅंडॉर्फनें 'कंट्री लाइफ' व ‘विदाउट ए सेंटर' हीं पुस्तकें, व मौपॅसंटनें 'लिटल फोक' ही कादंबरी प्रसिध्द केली. या निसर्गवादी उर्फ सत्यवादी (रिअ‍ॅलिझम) पंथांत जेलेरप, स्क्रॅम, ब्रँडेस, बॅग वगैरे होऊन गेले. नॅन्सेन यानें अनेक सुंदर पण फाजील शृंगारिक गोष्टी लिहून कुप्रसिध्दि मिळविली. या निसर्गवाद्यांच्या काळांत पूर्वीच्या काळांतील पध्दतीवर लिहिणारे कित्येक निघालेच.

सन १८८५ ते १८९२ मधील काळ हा डॅनिश वाड्:मयांतील संक्रमणकाल होय. तोंपर्यंत सर्व प्रमुख लेखकांनां निसर्गवादित्व हेंच तत्त्व कबूल झालेलें होतें. स.१८८५ च्या सुमारास कवीनें प्रचलित तत्त्व झुगारून देऊन उघडपणें पुराणवादित्त्व पत्करलें आणि राष्ट्रीय देशभक्तीचें धोरण स्वीकारलें. हळू हळू होतकरू लेखकांपैकीं कित्येक त्याला येऊन मिळाले. परंतु कांहीं ब्रॅंडेसच्या निसर्गवादित्त्वाला चिकटून राहिले. या संक्रमणकाळांतील लेखकांमध्यें प्रसिध्द पाँपेपिडन हा फारच जोरदार कादंबरीकार होऊन गेला. डॅनिश समाजाला निव्वळ सत्यवादित्वाचा कंटाळा आल्याकारणानें या नवीन पंथाची बरीच चहा होऊं लागली. ड्रँकमनचे जॉर्जेन्सेन, फोन्स, इप्सेन वगैरे अनुयायी निघाले.

नाट्यकलेची बराच काल डेन्मार्कमध्यें भरभराट चालू होती. मुख्य थिएटरांत नवीन नाटककरांनां संधि मिळत असेच; पण शिवाय डॅनिश लोक या कलेचे विशेष शोकी असल्याकारणानें खासगी दिवाणखान्यातून व खासगी थिएटरांतून प्रयोगांनां भरपूर संधि मिळत असें. ड्रॅकमननेंच कितीएक अद्भुत नाटकें राष्ट्रीय दंतकथांच्या आधारावर लिहिलीं होतीं आणि वर उल्लेख केलेल्या बहुतेक लेखकांनीं व कवींनीं नाटकें लिहिण्याच्या कमी अधिक प्रयत्न केला आहे. ईश्वरविज्ञान या विषयामध्यें गेल्या काळांतल्या क्लौसेन, मार्टेनसेन यांच्या योग्यतेचा एकहि लेखक निघाला नाहीं. परंतु इतिहासविषयांत मात्र डॅनिश लोकांचे फार प्रयत्न चालू होते. स. १८८० मध्यें स्टीनस्ट्रॅप याच्या प्रामुख्याखालीं अनेक तरुण डॅनिश इतिहासाच्या साधनांचें संशोधन करून ती छापण्याचें ठरविलें. १८९६ सालीं या साधनांच्या आधारानें एक विस्तृत इतिहास लिहिण्याचें ठरलें. तत्त्वज्ञानामध्यें नांव घेण्यासारखा कोणीची लेखक अलीकडे निघाला नाहीं. तथापि हॉफडिंग हा बराच प्रसिध्द असून त्याच्या 'प्रॉब्लेम्स ऑफ रिलिजन' आणि 'फिलासफी ऑफ रिलिजन' या पुस्तकांचें सन १९०६ मध्यें इंग्लिशमध्यें भाषांतर झालें आहे. लेहमन हा मानसशास्त्रावरील लेखक बराच पुढें आलेला आहे. रोनिंगनें डेन्मार्कमधील विचारप्रगतीचा इतिहास (हिस्ट्री ऑफ थॉट) लिहिला आहे. कलांवरील टीकाकार म्हणून लँग व मॅडसेन हे प्रसिध्द आहेत. वाड्:मयटीकाकार म्हणून ब्रँडिस हा बहुत दिवसांचा अगदीं प्रमुख असून त्यानें कला व विचार (आर्ट अ‍ॅन्ड थॉट) यांनां उत्तम वळण लावून दिलेलें असून त्या कालांत त्याच्या इतका वजनदार लेखक दुसरा कोणीही झालेला नाहीं.

इसवी सन १९१० ते १९२१ यांच्या मधील डॅनिश वाड्:मयाच्या उत्पादकांपैकीं, कार्लजेरलस, हरमन बंग, पीटर नान्सेन, विल्डेम बार्सो, सोफस बॉडिट्स, ट्रोएल्स फ्रेड्रिक लंड, एडवर्ड होल्म, फ्रेडेरिका, इत्यादि ग्रंथकार मरण पावल्यामुळें डॅनिश वाड्:मयाची फार हानि झाली. हेन्रीक पांटोप्पीडन या कादंबरीकाराला १९१७ सालीं नोबल प्राईज मिळालें.

तथापि या काळामध्यें पुष्कळ नवीन ग्रंथकार निर्माण झाले. त्यांपैकीं नील्स मोल्लर व लुडविग होल्स्टीन हे प्रमुख होत. यांच्या काव्यांत १८८० सालच्या सुमारास डेन्मार्कमध्यें जो दांभिकपणा माजला होता त्याचें प्रतिबिंब दिसून येतें. व्हिगो स्टकेनबर्ग, सोफस क्लासेन, सोफस मायकेलिस, एडबर्ग ब्लामुल्लर यांच्या कवितांत, निसर्गसौदर्यांचीं वर्णनें आढळून येतात. स्ट्रकेनबर्ग व मायकेलियस हे कादंबरीकारहि होते. पण सर्वांत उत्कृष्ट कवी म्हणे, व्हल्डेमर रोरडम व हल्डोरोड हे होत. रोरडम लंगे, मोलर इत्यादि कवींनीं परकीय काव्यांचींहि बरींच भाषांतरें केलीं आहेत. याशिवाय नील्सन, काइ हॉफमन, ओलाफ हान्सेन, थोगर लारसेन इत्यादि कवींचीं काव्येहिं चांगलीं आहेत.

कादंबरीवाड्:मयामध्यें, हॅराल्ड किड्डे, व जोहान्स बुखोल्ट्झ हे प्रसिध्द कादंबरीकार होत. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून, डॅनिश वाड्:मयांत प्रांतिक अभिमानाची छटा दिसून येऊं लागली होती. ही छटा, जेकब नुडसेन याच्या कादंबर्‍यात प्रामुख्यानें झळकते. नुडसेन हा प्रतिभासंपन्न कादंबरीकार होता. जेप्पे अकजेर हा कादंबरीकार स्फूर्तिदायक गोष्टी व निबंध लिहिण्याबद्दल नांवाजलेला आहे. जेन्सेनच्या कादंबर्‍यातील डॅनिश भाषा फारच ओजस्वी आहे. यांशिवाय मॉर्टेन कॉर्च, थॉरकिल्ड ग्रंव्हलंड, नड जोर्टो, मार्टिन ऍंडर्सन नेक्सो, बर्गस्टेर इत्यादि कादंबरीकार प्रसिध्द आहेत.

पुराणवस्तुसंशोधनक्षेत्रांत सोफस बिम्मर याचें नांव अग्रस्थानीं चमकतें. लुडबिग विम्मर हा लिपिशास्त्रज्ञ म्हणून फार प्रसिध्द आहे. फीलबर्ग, फॅंग क्रिस्टेन्सेन, अ‍ॅक्सेल ओलिरिक, ट्रोएल्स लंड, बिल्हेल्म ऍंडरसेन, व लेमार बेडेल हे ग्रंथकार पौराणिक गोष्टी लिहिण्यांत प्रसिध्द आहेत.
 

[संदर्भग्रंथ.-आर. न्येरुप-डेन डॅन डिग्टेकुंस्टस् हिस्टरी (१८००-१८०८); एन्. एम्. पीटरसेन-लिटरेचर हिस्टरी (१८६७-१८७१); ब्रुन – बिल्विओथेका डॅनिका (१४७२-१८९६); पी. हॅन्सेन-इलस्ट्रेरे डॅन्स्क लिटरेचर हिस्टरी (१९०१-१९०३)]

   

खंड १४ : जलपैगुरी - तपून  

 

 

 

  जलमस्तिष्क रोग
  जलयंत्रशास्त्र
  जलालपेठ
  जलालखंड
  जलालाबाद
  जलालाबाद, तहसील
  जलाली
  जलालुद्दीन मुहम्मद वल्खी
  जलालुद्दीन सयुती
  जलेश्वर
  जलेसर, तहसील
  जलोदर
  जलोपचार
  जव
  जवस
  जवादि डोंगर
  जवानबख्त मिर्झा
  जवासिया
  जव्हार
  जशपूर
  जसदन संस्थान
  जसपुर
  जसवंतनगर
  जसवंतसिंह, महाराणा
  जसील
  जस्टिन
  जस्टिनियन
  जस्त
  जस्सो
  जहागिराबाद
  जहागीर, जहागीरदार
  जहांगीर
  जहांगीर बादशहा
  जहाज फिरंगी
  जहाजपुर
  जहांदरशहा
  जहानआरा बेगम
  जहानाबाद
  जहनु
  जहलण
  जळगांव
  जळापूर
  जळापुर तालुका
  जळू
  जाई
  जाकोबाबाद
  जाखाऊ
  जाखन
  जांजगरि
  जाजमाउ
  जाट
  जाटपु
  जाटपोल
  जातक
  जाति
  जातिभेद
  जादम
  जादू
  जादूचा कंदील
  जाधव
  जाधवराई
  जॉन
  जानसाथ
  जॉनसन अॅंड्र
  जॉनसन, डॉय साम्युएल
  जानसार बावर
  जॉन, सेंट
  जानीबेग तुर्खन मिर्ज्ञा
  जानेफळ
  जानोजी निंबाळकर
  जाफना
  जाफरखान
  जाफराबाद
  जांब
  जांबवान
  जाबाल
  जांबु घोडा
  जाब्लोस्काव, पाल
  जांभळी जमीनदारी
  जांभूळ
  जांभेकर, बाळ गंगाधर
  जामखेड
  जामगड
  जामतारा
  जामदारखाना
  जामनगर
  जामनेर
  जामपुर
  जामराव कालवा
  जामी
  जामीनकी
  जामोद
  जाम्निया
  जायफळ, जायपत्री
  जारकर्म
  जॉर्ज टाऊन
  जॉर्ज राजे
  जॉर्जिया
  जालंदर, जिल्हा
  जालना
  जालवणकर, नारायणबोवा
  जालापहाड
  जालारी
  जालिआ
  जालोर
  जावजी दादाजी चौधरी
  जावड
  जावरा
  जावळी
  जावा
  जाविदखाना
  जासवंद
  जासी
  जासुंद
  जाहिरात
  जिऊ महाला
  जिगणी
  जिजाबाई
  जिजिराम
  जिंजी
  जितुलीया
  जिंतूर
  जिंद
  जिनकीर्ति
  जिनगर
  जिनप्रभ
  जिनीव्हा
  जिनेश्वरसुरि
  जिनोआ
  जिन्सीवाले, श्रीधर गणेश
  जिप्सी
  जिब्राल्टर
  जियागंज
  जिरंग
  जिरळ कामसोळी
  जिराफ
  जिंरार
  जिराईतखाना
  जिरें
  जिलेटिन
  जिवबादादा बाक्षी
  जीन मेरी रोलंड
  जीवकचिंतामणी
  जीवधन किल्ला
  जीवनकार्यविचार
  जीवन्मुक्त
  जुई
  जुगार
  जुगोस्लाव्हिया
  जुजुत्सु
  जुझोतिया ब्राह्मण
  जुडा
  जुडीआ
  जुतोघ
  जुनागड
  जुनापाणी
  जुनापादर
  जुनो
  जुनोना
  जुन्नर
  जुपिटर
  जुबल
  जुबो
  जुभखा
  जुव्हेनल
  जूब
  जूल, जेम्स प्रेस्कॉट
  जेऊर
  जेकब
  जेजाकभुक्ति उर्फ जिझोटी
  जेजुरी
  जेझील
  जेतपुर
  जेघे
  जेना
  जेपाळ
  जेफर्सन, थॉमस
  जेबील
  जेम्सटाऊन
  जेम्स मेरी सॅन्ड्स
  जेम्स राजे
  जेयोर
  जेरिको
  जेरिझिम
  जेरुसलेम
  जेरेसा
  जेर्हा
  जेलेपला
  जेल्डर्लंड
  जेवर
  जेव्होंन्स, विल्यम स्टॅनले
  जेष्ठमध
  जेसर
  जेसरी
  जेसलमीर
  जेसुइट लोक
  जेजोर, जिल्हा
  जेहोव्ह
  जैटिया
  जैटियापूर
  जैन, संप्रदाय
  जैनेंद्र व्याकरण
  जैमिनी
  जैस
  जैसवाय
  जोक्जाकर्त
  जोग, कृष्णाजी महादेव
  जोगापरमानंद
  जोगी
  जोगेश्वरी
  जोडिया
  जोतिबाचा डोंगर
  जोत्याजी केसरकर
  जोदिया
  जोधपुर
  जोधबाई
  जोन ऑफ आर्क
  जोनगन
  जोनपुर
  जोनराज
  जोन्स, सर विल्यम
  जोबत, संस्थान
  जोरा
  जोरिय
  जो-हाट
  जोवई
  जोशी
  जोशी, अण्णा मार्तंड
  जोशी, गणेश कृष्ण
  जोशी, गणेश वासुदेव
  जोशी, गणेश व्यंकटेश
  जोशी, चासकर
  जोशी, बारामतीकर
  जोशीमठ
  जोहानिस्बर्ग
  जोहानीझबर्ग
  जोहार
  जोही
  जोहोर
  जौगड
  जौहरीफरवी
  ज्यूटीगल्पा
  ज्योतिपंत महाभागवत
  ज्योति:शास्त्र
  ज्योतिष्टोम
  ज्योती
  ज्वर
  ज्वांग, पट्टुआ
  ज्वारी
  ज्वालामुखी
 
  झऊरी मुल्ला
  झगरपूर
  झज्जर
  झंझरपुर
  झमानशहा
  झमानिया
  झमीनदवार
  झरथुष्ट्र
  झलिदा
  झलून
  झाकाटेकस
  झांग, जिल्हा
  झांजी
  झांझमेर
  झांझीबार
  झाडीतेलंग
  झानेसव्हील
  झान्टे
  झान्थस
  झाफरखान
  झाफरवाल
  झाबिताखान
  झाबुआ
  झाबुलीस्तान
  झाबेल
  झांबेसी नदी
  झांबोअंग
  झामपोदर
  झामसिंग
  झामोरा
  झामोरीन
  झार
  झारगर जात
  झारा
  झारापाप्रा
  झा-होन
  झालकाटि
  झालरपाटण
  झालवान
  झालावाड
  झालावाड संस्थान
  झालोड
  झांशी, जिल्हा
  झांशीची राणी, लक्ष्मीबाई
  झिंगकलिंग हकमती
  झिगन
  झिंझुवाडा
  झितोमीर
  झिनत-उन-निसा बेगम
  झिंपी तौडू
  झियाउद्दीन बरनी
  झिरा
  झिरी
  झिवारत
  झीटून
  झीत्झ
  झीनवर
  झीनॉफानेझ
  झीलंड
  झुंगेरिया
  झुंझुनु
  झुबेदा खातुन
  झुब्दतुन्निसा
  झुरळ
  झुलफिकारखान
  झुलुलंड
  झूवा
  झूरिच
  झूसी
  झेंद-अवेस्ता
  झेनागा
  झेनाटा
  झेनिद
  झेनोफोन
  झेनोबिआ
  झेप्पेलिन, काऊंट फर्डिनंड
  झेब-उन्-निसा बेगम
  झेब्रा
  झेरबस्ट
  झेरिआ
  झेर्नोविट्झ
  झेलम
  झेलम कालवा
  झेलम नदी
  झेलम वसाहत
  झैदपूर
  झैनखान कोक
  झैनाबादी महाल
  झैनुल अबिदिन
  झैमुख्त
  झैसान
  झोडगे
  झोब जिल्हा
  झोला, एमिली एडवर्ड चार्लस
 
 
  टंकारी
  टक्कर देश
  टक्का
  टझी
  टनब्रिजवेल्स
  टरपेलट
  टर्गो, अॅन रॉबर्ट जॅक्स
  टनेंट
  टॅव्हर्नियर
  टॅसिटस कॉनेंलिअस
  टस्कुलम्
  टांकणखार
  टांक तहशील
  टाकळ
  टाकळ घांट
  टाकळा
  टांकळी
  टाकळी बुदुक
  टाकी
  टॉंगकिंग
  टांगानिका
  टांगानिका प्रदेश
  टागोर, देवेन्द्रनाथ
  टागोर, राजा सौरेन्द्र मोहन
  टाटा, जमशेटजी नसरवानजी
  टाटा, सर रतन
  टोंड, कर्नल
  टॉडहंटर, आयझॅक
  टान्जीर
  टापिओका(कासावा)
  टायको ब्राही
  टायग्रे
  टायबर
  टायबेरिअस
  टायर
  टाराक्विनी
  टारांटो
  टारिसेली, इव्हर्जिलिस्टा
  टारेटम्
  टॉके
  टानों
  टार्सस
  टालबॉट, विल्यम हेनरी
  टालमड
  टॉलस्टॉय, लिओ
  टॉलेमी क्लॉडिअम
  टॉलमी फिलाडेल्फस
  टालेरंड, पेरीगॉर्ड प्रिन्स
  टावी
  टासमन, अबेल जॅन्सेन
  टासी
  टिकमगड
  टिटवी
  टिटागड
  टिडोर
  टिन्डाल जॉन
  टिपगड डोंगर
  टिपरा जात
  टिप्पू सुलतान
  टिप्पेरा
  टिफ्लिस
  टिंबक्टु
  टिंबा
  टिबेस्टी
  टिम्माड
  टिरोल
  टिलोता खैरी
  टिल्सिट
  टिळक, बाळ गंगाधर
  टीजिआ
  टीरिआ
  टुलुझ
  टूर्नें
  टूलाँ
  टेकचंद मुनशी
  टेक्सस
  टेगर्नसी
  टेग्युसीगलपा
  टंट, पिटर गथ्री
  टेन, हिप्पोलाइट अडोल्फ
  टेनेस्सी
  टेंपलबार
  टेबल माउंटन
  टेंभुरणी
  टेमेश्वार
  टेराडेलफ्यूगो
  टेलर, फिलिप मेडोज
  टेसिफॉन
  टैन-शान पर्वत
  टोक, संस्थान
  टोकिओ
  टोगोलंड
  टोचीनदी
  टोन, थिओबाल्ड वूल्फ
  टोपल्या
  टोबेगो
  टोमाटो
  टोराँटो
  टोरी फत्तेपूर
  टोलेडो
  टोवला
  टोशाम
  टोळ
  टौंगी
  टौंगुप
  टौंगू
  टौंग्थ
  टौंग्यु
  ट्युनिस
  ट्युनीशिआ
  ट्यूस
  ट्रॅलिझ
  ट्रान्सवाल
  ट्राम्बे
  ट्रॉय अथवा ट्रोड
  ट्रिनिदाद
  ट्रिपोली, प्रांत
  ट्रिबिझाँड
  ट्रीएस्टे
  ट्रटिश्के, हेन्रिक व्हॉन
  ट्रेंट
  ट्विकनहॅम
  ट्विन, मार्क
 
  ठग-ठगी
  ठठ्ठा
  ठाकुर
  ठाकुरगांव
  ठाकूरदासबोवा
  ठाकूरद्वार
  ठाणभवान
  ठाणें
 
  डॅडी
  डॅन
  डॅनिएल
  डन् कर्कं
  डॅन्झिग
  डफरिन, लार्ड
  डफळे
  डंबल
  डबलबीन
  डंबार्टन
  डब्लिन
  डभई
  डमडम
  डरहॅम
  डर्बी
  डलहौसी, लॉर्ड
  डलास
  डहोमे
  डॉक
  डाका, जिल्हा
  डाकोर
  डांग
  डांगची
  डांगर
  डांगी
  डांग्या खोकला
  डाग्वेरे, एल्. जे. एम.
  डोन नदी
  डान्यूब नदी
  डाबी
  डामर
  डायमंड हारबर
  डायमंड बेट
  डायोजेनीस
  डार्टमाउथ
  डार्डानेल्स
  डार्विन, चार्लस रॉबर्ट
  डॉलफिनचें नोंज
  डाल्टन, जॉन
  डास
  डाहाणु
  डाळिंब
  डिंक
  डिकन्स, चार्लस
  डिकेमाली
  डिक्वेन्सि, थॉमस
  डिंगरी
  डिंगणकर, मोरो विश्वनाथ
  डिडीमी
  डिडेरोट डेनिस
  डिफो, ड्यानिअल
  डिवार, सर जेम्स
  डी अर्लेबर्ट
  डीग
  डीगची लढाई
  डी बॉइने
  डीसा
  डुकर
  डुकी
  डुक्करकंद
  डुंगर
  डुप्ले
  डुम जात
  डुरिअन
  डूलचेन्यो
  डूलाँग
  डेकॅपोलिस
  डेकाटें
  डेडिआगॅच
  डेन्मार्क
  डेन्व्हर
  डेमॉस्थेनीस
  डेमिएटा
  डेमोक्रिटस
  डेराइस्मायलखान
  डेरागाझीखान
  डेरागोपीपूर
  डेराजात
  डेरानानक
  डेरापूर
  डेलफाय
  डेलवेअर
  डेव्हनपोर्ट
  डेव्ही
  डेहराडून
  डोंगरगड
  डोंगरपाली
  डोंगरपुर
  डोंगराळी जमीनदारी
  डोंगरा
  डोंगरे, वासुदेव नारायण
  डोडोना
  डोनाटेलो
  डोंबगांव
  डोबरेनर
  डोंबारी
  डाब्रूजा
  डोम
  डोमल जात
  डोमिनिका
  डोरली
  डोव्हर
  डोहर
  ड्युडरनेक
  ड्युबॉपिएरी
  ड्युसेल्डॉर्फ
  ड्यूमा अलेक्झांडर
  ड्यूरर आल्ब्रेक्ट
  ड्रायडन, जॉन
  ड्रॉयमन
  ड्रेस्डेन
  ड्रोघेडा
  ड्विन्स्क
 
  ढक्की भाषा
  ढालगज
  ढालाईत
  ढीमर
  ढुंढये जैन
  ढेकूण
  ढेरा
  ढोर
 
 
  तगर
  तंगेल
  तंगौंग
  तंजावर
  तंजावरचें राजघराणें
  तडवी
  तंडागांव
  तंडो
  तंडोअडाम
  तंडोअलाहयार
  तंडोवागो
  तंडोमहमदखान
  तत्रक
  तंत्रग्रंथ
  तत्त्वज्ञान
  तनकपूर
  तनखा
  तनावल
  तनुकु तालुका
  तपकीर
  तपागच्छ
  तपून

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .