प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ 
           
नेत्ररोग- नेत्रांची रचना व इतर माहिती शारीरशास्त्र व इंद्रियविज्ञान या लेखांत आढळेल. या ठिकाणी फक्त नेत्ररोगासंबंधीं विवेचन आहे. अंधत्व आणि जुनाट खुपर्‍या या सदराखालीं नेत्ररोगापैकी महत्त्वाच्या भागाचें वर्णन दिलें आहे. त्याशिवाय अनेक महत्त्वाच्या नेत्ररोगांचें व दृष्टिमांद्यप्रकाराचें वर्णन पुढे देण्यापूर्वी डोळे कसे तपासण्यांत येतात याची कल्पना करून देणें योग्य आहे. डोळ्याची रचना हें सदर वाचल्यानें पापण्या, कांचपटल, कनीनिका, कनीनिकापटल, अश्रुपिंड व अश्रुवाहक नलिका, सिलियरी पिंड, कोराईड व कृष्णपटल, कांचमणिपटल, दृष्टिपटल, दृष्टिमज्जा या व इतर डोळ्याच्या बाह्य भागापासून आंतपर्यंत असणार्‍या रचना कळतील; त्यांनां नानाविध रोग होतात. या आपल्या उष्णकटिबंधांतील देशांत खोल असणार्‍या रचनारोगापेक्षां बाह्यरचनारोगच फार होतात. बाह्यरचना नुसत्या नजरेनें उजेडांत पाहून नेत्रविद्या तपासतो. अडचण वाटल्यास अगर अति बारीक व्रण, फूल तपासण्यासाठीं दोन्ही अंगांस फुगीर कांचेचा उपयोग, त्या विकृत भागावर न दिपणारा उजेड पाडून रोगपरीक्षा करतां येते. खोलरचना विकृत झाल्यास त्या तपासण्याचें साधन (नत्र-परीक्षणयंत्र) म्हणजे सुमारें एक रुपयाच्या आकाराचा हातांत धरण्यास सोईस्कर असा आरसा असून त्याच्या मध्यभागीं आरपार भोंक असतें. अंधार्‍या खोलींत रोग्यास दिव्याशेजारी बसवून या दिव्यानें प्रकाशित झालेल्या आरशाचा उजेड नेत्रावर पाडल्यानें मधील छिद्रांतून डोळ्याच्या कांचपटलावरील व्रण, डोळ्याचे खोलरचनेचे रोग पहातां येतात. हे यंत्र डोळ्याशीं धरून व रोग्याच्या डोळ्यापुढें थोड्या अंतरावर सांगितलेलें, डोळे तपासण्याचें दोन्ही अंगास फुगीर असें भिंग धरल्यानें या खोलरचनेचें उलट व ठळक सबंध पण बारीक प्रतिबिंब त्या भिंगांत दिसतें, व भिंग बाजूस करून परीक्षणयंत्राचा उजेड रोग्याच्या डोळ्यावर अगदीं जवळून पाडल्यानें हीच नेत्रविकृति अंशत: पण आहे तेवढ्या आकाराची पाहतां येते. दृष्टिमांद्य किती आहे हें याहि प्रकारानें तपासतां येतें, व चष्मा देतां येतो व मोतीबिंदु आहे किंवा नाही हें तपासतां येतें. या यंत्राचें तत्त्व हें कीं, रात्रीं अंधारांत आपण घराबाहेर उभे राहिलों व घरांतील अंधार्‍या खोलींत उजेड आणला तर बाहेरच्या माणसास खोलींतील पदार्थ दृग्गोचर होतात तद्वत् हा उजेड नेत्रवैद्य, अंधार्‍या खोलींत कनीनिकारूपी खिडकीवर पाडून आंतील परीक्षण करतो.

दृष्टिमांद्य रोग- याचे मुख्य तीन प्रकार आहेत, ते:- र्‍हस्व दृष्टिरोग- पुष्कळ तरुण लोकांनां नेत्रांत विकृति नसूनहि लांबचें दिसत नाहीं; वाचावयास पुस्तक डोळ्यांजवळ न्यावें लागतें म्हणून यास र्‍हस्वदृष्टि हें नांव समर्पक आहे. निरोगी दृष्टि असतां बाहेरील आकृतीच्या उलट प्रतिबिंब नेत्रांतील दृष्टिपटलावरच नेमकें पडतें. परंतु अशा र्‍हस्वदृष्टिपीडीत लोकांच्या डोळ्याचा आकार वाजवीपेक्षां लांबट असल्यामुळें या प्रतिबिंबाचे किरण दृष्टिपटलाच्या पुढें प्रतिबिंबित झाल्यामुळें रूपरंगादि तज्जन्य ज्ञानाचा बोध मेंदूशी असलेल्या दृष्टिपटलास व्हावयाचा तो डोळ्याच्या कमी अघर अधिक व्यंगाच्या मानानें कमी अगर अधिक होतो. यास उपाय म्हणजे दोन्ही अंगांस खोलगट असलेलें भिंग डोळ्यापुढें (चष्म्याप्रमाणें) ठेवल्यानें बाहेरील पदार्थाचें प्रतिबिंब त्या खोलगट भिंगाच्या साहाय्यानें निरोगी डोल्यांत पडावें त्याप्रमाणें नेमकें दृष्टिपटलावर पडूं लागतें. जसें कमी- अधिक दृष्टिमांद्य असेल त्यामानानें पाव अंशापासून वीस अंशांपावेतों हीं भिंगें खोलगट असतात; व उजवा आणि डावा डोळा वेगळे तपासून त्याप्रमाणें चष्मा घेतला म्हणजे उत्तम दिसतें. यापुढील इतर प्रकारचें दृष्टिमांद्य अजमावण्यासाठीं स्वेलेनकृत टाइपांच्या अक्षरांचे लहान-मोठे कागद मिळतात. हे टाइप प्रमाणशीर असतात; म्हणजे काटकोनाचे ९० भाग असतात; तर ५ भागांचा जो लहान कोन होतो तेवढेहि लहान टाइप यांत असतात व त्यांचा आकार प्रमाणशीर वाढविलेला असल्यामुळें निरोगी माणसास ते किती अंतरावरून वाचतां आले पाहिजेत हें ठरलेलें असते. त्यापेक्षां जितक्या कमी अंतरावरून ते वाचतां येतील तितकी दृष्टि अधु आहे असें समजावें. हीच दृष्टिपरीक्षणाची तर्‍हा पुढील प्रकारच्या व सामान्यत: प्रौढ व वृद्ध माणसांत वाढणार्‍या दृष्टिमांद्यप्रकारांत असते.

दीर्घदृष्टिरोग, चाळिशी लागणें:- जन्मापासून एखाद्याची दृष्टि उत्तम असूनहि ४० ते ४६ वयाच्या सुमारास त्या माणसास वाचण्याच्या वेळीं नीट न दिसल्यामुळें पुस्तक दूर धरावेसें वाटतें व नंतर डोळे ताणल्यानें त्यास दिसतें. याचें कारण वरच्या प्रकारच्या उलट म्हणजे प्रतिबिंबित आकृति दृष्टिपटलाच्या मागें या डोळ्याच्या र्‍हस्वरचनेमुळें बिंबित होते हें आहे. डोळे तपासण्याची ही तर्‍हा वरील प्रकाराप्रमाणेंच आहे.

दोन्ही अंगांस फुगीर (पाव ते २० पर्यंत अंशाची) भिंगें चष्माच्या रूपानें वापरल्यामुळें आकृति दृष्टिपटलावरच नेमकी पडून दृष्टिव्यंग दूर होतें. हे दोन्ही व पुढील व्यंगहि नेत्रवैद्यास या टाइपामुळें व तसेंच अंधार्‍या खोलींत नेत्रपरीक्षणयंत्रसाहाय्यानेंहि तपासतां येतात; व कांहीं खोल रोगविकृति असल्यास ती पाहतां येते.

ऋणनियमित दृष्टि व धनानियमित दृष्टिरोग:- दूर अगर जवळ अंतरावर उभ्या व आडव्या रेघा अगर अक्षरें असल्यास कांहीं रोगास उभ्या व अक्षराचा उभट भाग तेवढा दिसतो व आडव्या रेघा व अक्षराचा आडवा भाग दिसत नाहीं; अगर याच्या उलट प्रकार म्हणजे आडव्या रेघा स्पष्ट दिसणें व उभ्या न दिसणें. या प्रकारचें चमत्कारिक दृष्टिमांद्य हें आहे. हें दूर होण्यासाठी भिंगाची मागील एक बाजू सपाट व पुढील बाजू खोलगट अगर फुगीर (जसें व्यंग असेल त्याप्रमाणें) अशा प्रकारचा चष्मा वापरावा लागतो. तो न वापरल्यानें कपाळशूळ, आंचके वगैरेहि रोग उद्धवतात. याखेरीज दुहेरी दिसणें व तिरवेपणा यांवर चष्म्याचा इलाज थोडाबहुत आहे, पण विस्तारभयास्तव वर्णन आवरलें पाहिजे.

पापण्यांच्या कडाचा दाह रोग- गलिच्छ, व अशक्त मुलांनां हा रोग होऊन तेथें सूज, लाली व चिडलेलें असतें; हयगयीमुळें पापण्यांचें केंस झडतात अगर वाकडे होतात. याला उपाय सोडा बायकार्ब १० ग्रेन व पाणी १ औंस हें औषध डोळ्यांत घालावें व त्यानें डोळे धुवावे. पापण्यांच्या केंसांस सिल्व्हर नायट्रेट २ ग्रेन व बाष्पजल १ औंस हें लावावें. बारीक ग्रंथिरोग पापण्यांच्या कडांनां होतो. त्यांत पूहि होतो. याला उपाय म्हणजे पापण्या शस्त्रानें चिरून कापून काढाव्या व आंतील मगज दाबून खरवडून काढावा.

रांजणवाडी- हिचें वरच्याप्रमाणें परंतु प्रकृतीस बिघाड होऊन होणारी व बरीच ठणकणारी व पुवाळणारी बारीक गांठ पापणीच्या आंत होते व फुटते अगर फोडावी. याला एकामागून दुसरी, तिसरी असें पीकहि येतें. याला उपाय शेकणें व जरूर तर फोडणें.

आगंतुक कण व पदार्थ डोळ्यांत जे शिरतात ते, योग्य अशा बिनधारेच्या शस्त्रानें बाहेर काढतां येतात. अश्रुग्रंथि व नलिका यांचा दाह- गळूं व त्यांतील पोकळी बंद होऊन डोळ्यांतून एकसारखें पाणी वहाणें हा त्रासदायक रोग होतो. अश्रुवाहक छिद्रांत त्यासाठीं केलेली सळई रोज घालून तो मार्ग न बुजेल असा ठेवणें व स्तंभक व जंतुघ्न औषधांनीं तो धुणें आणि गळूं झाल्यास तें वेळेवर फोडून त्याचें लासूर अगर व्रण बनूं न देणें हे उपाय आहेत.

पापण्या- पापण्यांच्या जुनाट दाहाचें वर्णन `जुनाट खुपर्‍या व अंधत्व’ या सदराखाली दिलें आहे. त्या रोगापासून होणार्‍या दुष्परिणामामुळें त्या रोगास भयावह मानतात.

तीव्रदाह अगर डोळे येणें- अक्षिपुटदाह, ठणका, लाली, थोडा पू या लक्षणांसह सांथीप्रमाणें हा रोग संसर्गानें होतो. मागाहून औषधोपचारानें पूर्ण बराहि होतो. उपाय- बोरीक असिड (१० ग्रेन : पाणी १ औंस) अगर झिंकसल्फेट (२ ग्रेन : पाणी १ औंस) अगर झिंकसल्फेट (२ ग्रेन : पाणी १ औंस) अगर तुरटी (५ ग्रेन : पाणी १ औंस) यांनीं हा रोग बरा होतो.

पूयप्रमेहजन्य अक्षिपुटदाह व प्रसूतिजन्य बालाक्षिपुटदाह:- यांपैकीं पहिला रोग परमा झालेल्या माणसास परम्याच्या स्रावाचा संसर्ग डोळ्यास लागून होतो, व दुसरा मूल जन्मतेवेळी प्रसूतीचा योनिमार्ग दूषित स्थितींत असतां मुलांस होतो. दोन्ही रोग सूज, दाह, लाली, ठणका, गळ, पू व बरे होण्यास लागणारा काळ यांमुळें भयंकर आहेत. फुलें व व्रण पडण्याचा व डोळा जाण्याचाहि संभव दोहोंत असतो. उपाय- रोग बरा होईपर्यंत दररोज डोळा रसकापुराच्या धावनानें (१ भाग : पाणी ६००० भाग) धुवावा. पापणी उलटून त्यांत सिल्व्हर नायट्रेट (१० ग्रेन : पाणी १ औंस) लावावें. दुसर्‍या डोळ्यास संसर्ग देऊं नये म्हणून तो बांधून ठेवावा.

अहिरा- डोळ्याच्या पांढर्‍या भागावर बारीक पुटकळी व त्या भोंवती रक्तवाहिन्यांची एके ठिकाणी लाली असें याचें स्वरूप आहे. अशक्त लहान मुलांनां व रोगी माणसांनां हा रोग होतो. डोळ्यास दीप, डोळे मिटणें हीं लक्षणें असतात. उपाय- यास पार्‍याच्या पिवळ्या आक्साइडचें मलम (४ ग्रेन : १ औंसामध्यें) निजतेवेळीं डोळ्यांत घालावें.

बारीक वसाग्रंथि व तिकोनी लहान मांसग्रंथि या दोन प्रकारचे रोग या ठिकाणी होतात, ते शस्त्रक्रियासाध्य आहेत. कांचपटलाचे रोग व दाहरोग हे मुख्य असून त्यांचे भेद आहेत व त्या सर्वांची सामान्य लक्षणें दु:ख, उजेड सहन न होणें, पाण्याची गळ, दृष्टिमांद्य, काळ्या बुबुळाभोंवती खोल भागांत गुलाबी लाली, व डोळ्याच्या कांचपटलामध्यें मलिनता येणें हीं होत. कांचपटलामध्यें एकाखालीं एक असे थर आहेत. त्यांतील पृष्ठभागावरील थरांचा दाह फार करून पाहण्यांत येतो. ह्यांतच रक्तवाहिन्या फुगून लाली फार आली म्हणजे त्या रोगास पॅनस असें म्हणतात. हा रोग लवकर शमला नाहीं तर काळ्या बुबुळाभोंवतालची श्लेष्मल त्वचा बारीक कात्रानें वर्तुळाकार कातरतात. म्हणजे रक्तवाहिन्या तुटून लाला कमी होते. दाहशमनासाठीं अफू, बेलाडोना वगैरे औषधें उपयुक्त आहेत.

कांचपटलावरील साधा व्रण अगर फूल पाडण्यास कारण हा दाहच होय व त्यामुळें कांचपटलाचा कांहीं भाग गळून जाऊन तेथें बारीक खड्डा पडतो. तो पाहण्यास फुगीर भिंगाची मदत चांगली होते अगर नुसत्या डोळ्यांनीहि दिसतो. उपाय- बारीक व्रण असल्यास अट्रोपीन हें औषध डोळ्यांत घालावें. मोठा व खोल व्रण असल्यास एसेरीन अगर पायलोकारपिन हें औषध अधिक बरें. फूल जुनाट झाल्यास पारदाच्या पिवळ्या ऑक्साईडचें मलम डोळ्यांत रोज एकदां अगर दोनदां घालावें व डोळा मिटून तो अंमळ व हळू चोलावा.

दूषित व्रण वरील कारणामुळेंच होऊन त्याची खोल व रुंद पसरण्याकडे प्रवृत्ति असते, व त्यामुळें कांचपटलाच्या मागील पोकळींत थोडा पू जमतो. उपाय- या व्रणास सिल्व्हर नायट्रेटची कांडी अगर अन्य प्रकारच्या भाजण्याच्या कांडीनें थोडा कडा व तळ यास स्पर्श करावा. कांचपटलाचा खालचा भाग शस्त्रानें चिरून त्यांतून पू निघून जाण्यास मार्ग करून देतात, व नंतर बेलाडोना अगर अट्रोपीनचे थेंब डोळ्यांत घालतात.

कांचपटलाच्या मधील थरांचा दाह, ज्या मुलांच्या मातापितरानं फिरंगोपदंश हा रोग झालेला असतो त्यांनां होतो व त्यामुळें डोळ्यावर दाट सारा येतो. अगोदर एक डोळा बिघडून मागून दुसरा बिघडतो. रोगास उगम ५ ते १६ या वयाच्या दरम्यान होतो; याला योग्य उपाय केले नाही तर कनीनिकापटलदाह, आगंतुक कांचबिंदुरोग, सारा, हे रोग होतात. सारा कितीही आला असला तरी उपचार केल्याबरोबर तो भराभर कमी होऊन डोळे स्वच्छ होतात. उपाय- पारदाचें लहान प्रमाण बरेच दिवस द्यावें व शक्तीसांठीं पोटांत लोह द्यावा. डोळ्यांत अट्रोपीनचे थेंब आणि पिवळें मलम घालावें.

कांचपटलाच्या मागील थरांत दाहरोग असतो; पण बहुतकरून त्यासह कनीनिकादाह अगर दुसरा तसाच नेत्ररोग असतो. सारा लहान वर्तुळाकार असतो. या सर्व प्रकारच्या कांचपटलदाहामुळें लहान मोठ्या आकाराचा सारा व व्रण, डाग मागें शिल्लक रहातात व ते डोळ्याच्या बाहुलीसमोर असले तर स्पष्ट दिसण्यास अडथळा उत्पन्न करतात व सौंदर्यांत व्यंग आणतात. खोल व्रण पडून एखादे वेळी कांचपटल कोंचदार होतें; अगर व्रण फुटून आंतील कनीनिकापटल त्यांत अडकून त्यावरील लस वाळून विद्रूपता प्राप्त होते; यासच डोळ्यांत वडस वाढणें म्हणतात.

कांचपटलावर अगर आंत आगंतुक पदार्थ गेला तर तो शक्य तेवढा जलद काढून टाकणें इष्ट असतें. प्रथम डोळ्यामध्यें कोकेन औषधानें चांगली बधिरता उत्पन्न करून रोग्यास उजेडासमोर खुर्चीवर बसवून त्याचें डोकें मागें करावें. नेत्रवैद्यानें खुर्चीमागें उभें राहून पापण्या उघडून बुबुळ न हलेलसें बोटानें स्थिर करावें व उजव्या हातांतील बिनधारेच्या शस्त्रानें तो पदार्थ अलगत उचलून घ्यावा.

नेत्रावरण नामक श्लेष्मल त्वचा दाहरोग:- यामुळें बुबुळापासून थोड्या अंतरावर लाली उत्पन्न होऊन ती बरेच महिने टिकते. हा रोग क्षयी, संधिवातरोगी अगर फिरंगोपदंशरोगी अशा माणसांत विशेष होतो; व यामुळें कांचपटलदाह कनीनिकादाह हे रोगहि होतात. उपचार- अफूच्या बोंडानें शेकणें, जळवा लावणें, चोळणें (बेलाडोना अगर अट्रोपीन ही औषधें कनीनिकादाह असल्यास) हे उपाय करून शिवाय संधिवात, क्षय, उपदंशादि व्याधिदोषावर तीं तीं उपयुक्त औषधें योजून द्यावींत.

डोळ्यांतील जखमा- कांचपटलास जखम झाल्यास ती लवकर भरून येते; तसेंच नेत्रावरणनामक पांढर्‍या श्लेष्मल त्वचेची जखम लहान असून आंत आगंतुक पदार्थ शिरला नसेल आणि काळ्या बुबुळाच्या मागील बाजूस निदान पाव इंच असल्यास जखमेस टांके मारून ती बरी होते. परंतु जेथें नेत्रावरण व कांचपलट यांचा संधि होतो त्या प्रांतांतील जखम अत्यंत भयप्रद होय. कारण तीमुळें त्या सबंध डोळ्यांत दाह होऊन तो डोळा जाऊन शेजारील डोळाहि तशाच दाहामुळें जातो. म्हणून अशा वेळीं आगाऊ उपाय म्हणून तो जखमी डोळा काढून टाकणें इष्ट असतें. कनीनिकापटल, सिलियरी ग्रंथि व कोरॉइडपटल या तिन्ही रचनांचा सुखदु:खाचा समान अंशभागी असा संघ आहे असें म्हणण्यास हरकत नाही. म्हणजे यांपैकीं कोठेंही रोग सुरू झाला तरी तो या सर्व ठिकाणीं पसरण्याची प्रवृत्ति असते.

तीव्र कनीनिकापटलदाह, लक्षणें:- डोळ्यांत चेहरा व कपाळ वगैरे ठिकाणीं दु:ख, वेदना व शूळ, अंधुक दिसणें, पाण्याची गळ, नेत्रावरणांतील रक्तवाहिन्या लाल दिसणें व त्यामुळें बुबुळाभोंवतीं गुलाबी छटा व साधारणत: थोडी दीप ही लक्षणें असून उजेडांत व अंधेरांत लहान मोठी बाहुली होते. त्या शक्तीचा र्‍हास होणें, ती लहान होणें व तिचा रंग बदलणें व तीवर अट्रोपीन घातलें असतां ती चांगलीशी नेहमीप्रमाणें मोठी न होणें हींहि लक्षणें असतात.

जुनाट कनीनिकादाहांत एक लहान (विकृत) बाहुली व दुसरी चांगली, कमी दिसणें व कधी कधीं डोळा दुखणें एवढींच लक्षणें असतात. फिरंगोपदंश, संधिवात व पादांगुष्ठ रोग या रोगांनीं पीडित माणसांनं तसेंच इजा अगर कांचपटलदाह किंवा सिलियरीपिंड अगर कोराइडपटलदाह यांमुळेंहि या रोगास निमित्त होतें. अगोदर संधिवाताची प्रकृति असून परमा झाला तर हा रोग फार करून होतो व पादांगुष्ठरोग्यामध्यें बिनदु:खाचा व चेंगट प्रकारचा असला दाह सुरू होतो. उपचार- प्रथम डोळ्यांत अट्रोपीनचे थेंब रोज घालून बाहुली विस्तृत राहील असें करावें; नंतर लाली असल्यास कानशिलाच्या ठिकाणीं १-२ जळवा अगर एखादें पलिस्तर मारावें. पोटामध्यें त्या त्या प्रकारच्या संधिवातादि प्रकृतिमानाप्रमाणें इष्ट उपचार सुरू ठेवावेत. सिलीयरी पिंडदाहाचीं लक्षणें व उपचार बहुतेक वरीलप्रमाणें आहेत.

कोरॉईडपटलदाह- याचीं बाह्य लक्षणें फारशीं नसून याचें अस्तित्व नेत्रपरीक्षणयंत्रानेंच कळतें. फिरंगोपदंश, अतिर्‍हस्व दृष्टिरोग, क्षय वगैरे याचीं कारणें असतात. उपचार- पोटांत सूक्ष्म प्रमाणांत पारदाच्या सौम्य भस्मापैकीं एखादें योजून द्यावें. वरील तिन्ही (कनीनिकापटल वगैरे) रचनासंघांत पूययुक्तदाह होऊन सबंध डोळ्याचा विद्रधि बनतो अगर लस स्रवणारा दाह एका डोळ्यास होणार्‍या इजेमुळें दुसर्‍या डोळ्यास होतो, व त्यामुळें दोन्ही डोळे जातात. या दोन्ही जातींचे दाह कष्टसाध्य अगर अशाध्यच आहेत.

नेत्रांतील कांचमण्याचे रोग (मोतिबिंदु)- दोन्ही अंगांस फुगीर अशा काचेंतून किरण दृष्टिपटलावर पडतात तेथें पदार्थ प्रतिबिंबित होतो. परंतु त्याच्या रचनेंत बदल होऊन हा मणि अंशत: अगर पूर्णपणें अपारदर्शक होतो व यास मोतिबिंदु म्हणतात. पस्तीस वयाखालील लोकांत होणार्‍या मोतिबिंदूस मृदु अगर अपूर्ण व बाकीच्यांनां कठिण अगर पूर्ण मोतिबिंदु असें म्हणतात. आपोआप होणार्‍या मोतिबिंदूस स्वतंत्र व इतर नेत्ररोगामुळें दुष्परिणाम म्हणून बनणार्‍या मोतिबिंदूस परतंत्र मोतिबिंदू असें नांव आहे. उदाहरणार्थ, कांचबिंदु या रोगाच्या अखेरीस मोतिबिंदु होतो तो या परतंत्र प्रकारचा असतो.

पूर्ण अगर कठिण मोतिबिंदू अपारदर्शक बनण्यास त्याच्या मध्यबिंदूपासून आरंभ होतो किंवा पृष्ठभागांतून अपारदर्शकता होत जाते. पहिल्या प्रकारचे मोतिहिंदू रंगानें पिवळसर व कठिण असतात. परंतु मधुमेहाच्या रोग्यांत मात्र तसे नसतात. दुसर्‍या प्रकारचे मोतिबिंदूची अपारदर्शकता त्याच्या आंसापासून पांढर्‍या रेषाच्या रूपानें दिसते. जन्मत: असणारे मोतिबिंदू दोन्ही डोळ्यांत असतात. एकादे वेळीं पूर्ण मोतिबिंदू विरघळून जातो.

अपूर्ण अगर मृदु मतिबिंदूचे रचनेप्रमाणें तीन चार भेद आहेत. मोतिबिंदू पक्क अगर पूर्ण झाल्याचीं लक्षणें म्हणझे तो रंगानें पांढरा, पिवळा अगर करडा दिसतो व डोळ्याची बाहुली मोठी करून फुगीर भिंगाच्या उजेडानें पाहिला तर तो दिसतो. अपूर्ण मोतिबिंदू या भिगांने तिरकस उजेड पाडून किंवा अंधार्‍या खोलींत नेत्रपरीक्षणयंत्रानें पहातां येतो. त्याच्या रेषा काळ्या दिसतात. लक्षणें- रोग्यास कमी दिसूं लागतें व डोळ्यापुढें काळे डाग व रेषा दिसतात. संध्याकाळीं बाहुली विस्तृत झाल्यामुळें तेव्हां रोग्यास अंमळ बरें दिसतें. पदार्थ जवळ घेऊन पाहिला तर स्पष्ट दिसतो. एका डोळ्यानें पाहिलें तर कोणा रोग्यास दोन आकृती दिसतात; अगर दोहोंपेक्षांहि अधिक आकृती दिसतात.

उपचार:- म्हातारपणीं मोतिबिंदू झाला असतां अट्रोपीनचा थोड्या प्रमाणांत उपयोग केल्यानें (अर्धा ते एक ग्रेन : १ औंस पाणी) कांहीं दिवस दृष्टि सुधारते. परंतु शेवटीं तो पूर्ण पक्क झाल्यावर शस्त्रक्रिया केली पाहिजे. मात्र ती करण्यापूर्वी पुढील गोष्टी ध्यानांत ठेवाव्या:-  (१) पापण्या व अश्रुमार्ग हा पूरहित व स्वच्छ स्थितींत नसल्यास औषधें घालून तो तसा करावा. (२) मोतिबिंदु काढल्यानंतर डोळ्याचा खोल व इतर भाग दृष्टि परत येण्याइतका शाबूत आहे अशी अगोदर खात्री करून घ्यावी. नाहीं तर शस्त्रक्रिया व खटाटोप व्यर्थ जाऊन निराशा होते. रोगी वृद्ध असल्यास एक डोळा काम करण्यास उपयोगी आहे व मोतिबिंदु झालेल्या डोळ्यानें इतर कांहीं दिसत नसून फक्त उजेड आहे किंवा अंधार आहे येवढेंच कळत आहे अशी वेळ शस्त्रक्रियेस उत्तम. (३) रोग्यास पादांगुष्ठवात, मधुमेह, अलब्यूमिन प्रमेह, रक्तवाहिन्यांचा व इतर रोग असल्यास तदर्थ अगोदर औषधें देऊन प्रकृति सुधारावी. मोतिबिंदु काढण्याचें प्रकार दोन आहेत:- (१) सुईनें खरवडून काढणें; हा प्रकार मृदु मोतिबिंदूसाठीं पसंत करतात. (२) सबंध ओढून काढणें; हा प्रकार कठिण मोतिबिंदुस (म्हातारपणच्या) प्रशस्त आहे. त्याचें वर्णन देण्यापूर्वी कनीनिकापटलविच्छेदननामक बाहुलीच्या छिद्राचा एक कोपरा कापून मोठा करण्याची शस्त्रक्रिया आहे तिचें वर्णन देऊं. कारण ती अगोदर करून नंतर लागलीच मोतिबिंदु काढण्यांत येतो. कनीनिकापटलविच्छेदन हें मोतिबिंदु काढण्याशिवाय पुढील रोगांतहि करावें लागतें. (१) कांचपटलावर मोठा सारा येऊन अंधत्व आलें तर दृष्टि सुधारण्यास; (२) कांहीं विशिष्ट प्रकारच्या अंशत: पांढरे झालेल्या मोतिबिंदूमध्यें; (३) पुन्हां पुन्हां उलटणारा कनीनिकादाह, कांचबिंदु व कनीनिकापटलाचा मागील भाग त्याच्या मागील रचनेस चिकटणें. या रोगांत प्रथण रोग्यास टेबलावर उताणा निजवून क्लोरोफार्मनें गुंगी आणावी; अगर कोकेनचें थेंब घालून डोळ्यांस बधिरता आणावी. नंतर रोग्याच्या उशाशीं वैद्यानें उभें राहून डोळे उघडे ठेवण्याचा चाप लावावा. नंतर जेथील कनीनिकापटलाचा तुकडा कापणें असेल त्याच्या बरोबर समोरील श्लेष्मलत्वचा चिमट्यांत धरून स्थिर करावी. नंतर कांचपटल चिरण्याचा बारका त्रिकोनी पात्याचा चाकू कांचपटलांत घुसवून त्यांत चीर पाडावी व त्याची मूठ खाली थोडी दाबून त्या पटलामागील पोकळी अंमळ मोठी व स्पष्ट करून तो चाकू बाहेर काढावा आणि श्लेष्मलत्वचा पकडलेला चिमटा मदतनिसास धरून ठेवण्यास सांगावें. नंतर कांचपटलांतील जखमेंतून कनीनिकापटल पकडण्याचा बारीक चिमटा घालून बाहुलीची कड त्यानें इतर ठिकाणी धक्का न लावतां पकडून बाहेर ओढावी व कांचपटलांतील जखमेसरशी आडवा अगर उभा तुकडा बारक्या कातरीनें उघडावा. नंतर याप्रमाणें छेदन झालेले तें पटल एका बोथट हत्यारानें जागच्याजागीं व डोळा पट्ट्यांनीं बांधून ठेवावा. कांचबिंदुरोगामध्यें आराम पडण्यासाठीं जेव्हां ही क्रिया करतात तेव्हां या पटलाचा मोठा तुकडा कापतात.

मोतिबिंदु काढण्याची शस्त्रक्रिया:- वर सांगितल्याप्रमाणें कनीनिकापटलछेदन करावें; म्हणजे बाहुलीच्या अरुंद छिद्रांतून तो बाहेर काढणें सोपें पडतें (कोणी वैद्य ही शस्त्रक्रिया केल्याशिवाय मोतिबिंदू काढतात). त्यासाठी कांचपटलाच्या बाहेरील कडेस ३ मिलिमिटर रुंदीचा कांचपटलाचा छेद होईल अशा बेतानें अरुंद पात्याच्या चाकूनें छेद करावा व त्याचें टोंक दुसर्‍या बाजूस बाहेर काढावें व छेद पुरा करावा. नंतर जरूर वाटल्यास कनीनिकापटल- छेदनक्रिया करावी. ती झाल्यावर डोळ्याची श्लोष्मलत्वचा चिमट्यांत धरून स्थिर करून अणकुचीदार हत्यार कनीनिकापटलांतील छिद्रांत घालून कांचमण्याचें वेष्टण आडवें कापावें. नंतर डोळ्याच्या वरील बाजूस चमच्यासारख्या हत्यारानें दाबावें म्हणजे मोतिबिंदुची कड जखमेंत दिसूं लागते व तसाच दाब ठेवीत गेल्यानें तो मोतिबिंदू बाहेर येतो. ह्यानंतर डोळे उघडे ठेवण्याचा चाप काढून थोडा वेळ पापण्या मिटवाव्या. मग काळ्या बुबुळाच्या खालीं जरा दाबल्यानें आंत कांहीं मऊ पदार्थ राहिला असल्यास तो बाहेर येतो. नंतर कनीनिकापटल जागच्या जागी बसवून ठेवावें व डोळा पट्ट्यांनीं एक आठवडाभर बांधावा. दररोज पट्टी सोडून हळूच पापण्या धुवाव्या व कनीनिकापटलदाह सुरू झाला आहे किंवा काय हें तपाशीत जावें; तसें चिन्ह दिसल्यास अट्रोपीन आणि जळवांचा उफयोग करावा. कांचपटलांतील जखमेंत पू झाल्यास तीस सिल्व्हर नायट्रेट लावावें अगर तीवर आयोडोफार्म टाकावा. कनीनिकापटल जखमेमध्यें गुंतणे, रक्तस्त्राव, अथवा सर्व डोळ्याचा पूययुक्त दाह हे दुष्परिणाम कधीं कधं होतात. दोन महिन्यांनीं डोळे तपासून चष्मा द्यावा. बाहुलींत कांहीं अडकलेलें आहे असें दिसल्यास पुन्हां शस्त्रक्रिया करून सुईसारख्या शस्त्रानें तें काढून टाकावें. सुईनें मृदु मोतिबिंदु खरवडून काढण्याची शस्त्रक्रिया- रोग्यास टेबलावर उताणा निजवून त्याच्या डोक्यांत कोकेनचें थेंब टाकून बधिरता आणावी. रोगी मूल अथवा भित्रा अगर घाबरट असल्यास त्याला क्लोरोफॉर्म देऊन गुंगी आणणें बरें. अगोदर अट्रोपीन घालून बाहुली मोठी करून ठेवावी. रोग्याच्या उशाशीं उभें राहून डोळे उघडे ठेवण्याचा चाप बसवावा व चिमट्यानें बुबुळ स्थिर करून एक सरळ व तीक्ष्ण सुई काळ्या बुबुळाच्या कडेनें डोळ्यांत खुपसून बाहुलीच्या छिद्रांतून मोतिबिंदुवेष्टणास स्पर्श करील इतकी घालून त्याला तिनें उभा व आडवा छेद करावा. म्हणजे तें वेष्टण फाटतें. मग हळू हळू सुई काढावी आणि डोळ्यांत अट्रोपीन घालून डोळा बांधून ठेवावा. याचा परिणाम असा होतो की मोतिबिंदुंतील मगज कांचपटलामागें येऊन तेथें तो जिरून अगर वितळून जातो. आठदहा दिवसांनीं या मगजापासून आग अगर ठणका लागल्यास व तो जिरून न गेल्यास कांचपटलास जखम करून तो बाहेर काढून टाकावा व यावेळीं त्या जखमेंत कनीनिकापटल न अढकेल अशी खबरदारी घअयावी.

दृष्टिमज्जातंतुदाह व दृष्टिमज्जातंतुक्षय, तसेच दृष्टिपटलदाह व दृष्टिपटलच्युति व दुसरे कित्येक रोग नेत्ररोगांतील खोल भागाचे आहेत. त्यांचें वर्णन विस्तारभयास्तव येथें देता येत नाही.

कांचबिंदू- नेत्रामध्यें जो स्वाभाविक हवेचा व इतर दाब असतो तो पाडल्यानें नेत्रांचा स्वाभाविक टणकपणा जास्त भासूं लागतो व त्यामुळें हा रोग होतो. लक्षणें:- मिटलेल्या डोळ्यांवर दोन्ही तर्जन्या ठेवून जरा दाबल्यानें टणकपणा बोटास कळतो. डोळ्यास हात लावल्यानें व आपोआपहि दु:ख होतें. डोळ्याभोंवतालच्या रक्तवाहिन्या लाल होतात. त्यांचें स्पर्शज्ञान अंमळ कमी होते. त्याचप्रमाणें सारा व बुबुळावर बारीक खळगे दिसतात. कांचपटलामागील पोकळी उथळ होते, बाहुली मोठी होते, डोळ्यांतील खोल भाग नेत्रपरीक्षणयंत्रानें हिरवट दिसतो व तेथील धमन्या रक्ताधिक्यानें भरलेल्या व उडत असलेल्या दिसतात. दृष्टिमांद्य येतें, उजेड कमी समजतो व नाकाच्या बाजूस नजरेचा पल्ला कमी पोहोंचतो. हीं लक्षणें होण्याच्या अगोदर रोग्यास सर्व कांही भुरकट दिसूं लागतें, व दिव्याभोंवताली रंगीत वलयें (कडी) दिसतात, कपाळशूळ उठतो, व वाचण्यास नीट दिसेनासें झाल्यामुळें वरच्यावर चष्मे बदलावे लागतात. या रोगाचे तीव्र, मध्यम व जुनाट असे तीन प्रकार आहेत ते-

(१) तीव्र रोगाची लक्षणें:-
रोग्यास कपाळशूळ, ओकारी सुरू झाल्यामुळें पित्त झालें आहे असें वाटतें. हा कपाळशूळ एकाएकीं उठतो. जरी बाहुली विस्तृत असली तरी बुबुळावर सारा असल्यामुळें डोळ्याच्या खोल भागाची तपासणी करतां येत नाहीं. डोळ्याच्या अंतर्भागांतील खळगा विशेष खोलगट नसतो, परंतु धमन्या मात्र स्पष्टपणें उडतांनां दिसतात. थोड्या दिवसांनीं हीं लक्षणें कमी होतात. पण कांहीं दिवसांनीं पुन्हां उलटतात व कायमचा रोग होऊन बसतो. मग डोळअयांत फार वेदना व बुबुळाचा टणकपणा व त्यांत रक्तस्राव, त्यामुळे होणारा (परतंत्र) मोतिबिंदु, फुलें, डोळ्यांत वडस वाढणें नंतर सबंध डोळा आकसणें हे दुष्परिणाम होतात.

(२) हीं मागें सांगितलेल्या व पुढें येणार्‍या प्रकाराच्या दरम्यान तीव्र असतात.

(३) तिसरा प्रकार (जुनाट):- तीव्र रोग वरच्यावर झाल्यामुळें शेवटीं हा प्रकार होतो किंवा आरंभापासूनच हळू हळू डोळा दुखल्याशिवाय व लाली, व टणकपणआ विशेष वाढल्याशिवाय हा रोग होतो. नजरेचा विस्तृतपणा अगर पल्ला कमी होतो. कांचपटलाचें स्पर्शज्ञान कमी होतें व नेत्राच्या आंतील खळगा रुक्ष होऊन शेवटीं अंधत्व येतें. हा रोग बहुधां उतारवयांत होतो व बहुधां चाळीस वयाच्या पुढें होतो. तो कदाचित वंशपरंपराहि असतो. डोळ्यांतील प्रवाही रसांच्या गतीस अवरोध जाल्यामुळें हा रोग होतो. ज्यांनां दीर्घदृष्टिरोग आहे, व ज्यांनीं इतर नेत्ररोगांकरितां अट्रोपीन या औषधाचा वाजवीपेक्षां फाजील उपयोग केला असेल त्यांनां हा रोग होतो. उपचार- डोळ्यांत एसेरीनचे थेंब घालावे. तसेंच कनीनिकापटलच्छेदनक्रिया केल्यानें रोग्यास आराम वाटतो. मात्र त्या पटलाचा बराच मोठा तुकडा कात्रीनें उडवावा लागतो. हट्टी प्रकारच्या कांचबिंदूस डोळ्याच्या पांढर्‍या बुबुळास थोडा छेद केल्यानें डोळ्यांतील टणकपणा कमी होऊन डोळा नरम पडतो. जुनाट कांचबिंदूरोगामध्ये शस्त्रक्रियेचा उफयोग होत नाही.

डोळ्याच्या खळग्यासंबंधी रोग- (१) डोळ्यांस मार लागून रक्तवाहिन्या फुटून पांढर्‍या बुबुळांवर लाल डाग दिसतात. नंतर ते आपोआप बरे होतात. (२) कधीं सबंध डोळ्याचे विद्रधी अगर गळूं बनून डोळा जातो. (३) डोळ्याच्या खाचेंत अगर डोळ्याच्या आंत एखाददुसर्‍या प्रकारचा ग्रंथिरोग वाढून डोळा बटबटीत व पुढें आलेला दिसतो.

डोळा काढण्याची शस्त्रक्रिया-कित्येक वेळां डोळा काढून टांकणें भाग पडत असल्यामुळें हें वर्णन येथें देतों. रोग्यास टेबलावर उताणा निजवून क्लोरोफॉर्मनें गुंगी आणावी, नंतर डोळा उघडण्याचा चाप बसवावा व चिमट्यानें बुबुळ स्थिर करून ठेवावें, नंतर कात्रीनें काळ्या बुबुळाभोंवतालची श्लेष्मल त्वचा वर्तुळाकार कातरावी. तिच्याखाली चोहोंकडचीं स्नायुबंधनें असतात तीं हुकानें उचलून धरून कातरीनें तोडावी म्हणजे बुबुळ पुढें येतें, त्याच्या मागें कातरी घुसवून डोळ्याच्या तळाशीं दृष्टिमज्जातंतु असतो तो कातरावा आणि डोळा बाहेर काढावा. रक्तस्त्राव थांबविल्यावर खळग्यावर अंमळ दाब ठेवून डोळा बांधावा. जखम बरी झाल्यावर सुमारें तीन महिन्यांनीं कृत्रिम डोला बसवावा, म्हणजे डोळ्याच्या खांचेमुळें येणारी विद्रुपता बरीच कमी होते. तिरपेपणा दोन्ही अगर एका बुबुळामध्यें वर, खालीं, अथवा अंत:अगर बहिर्वक्रता आली म्हणजे त्या त्या त-हेचा तिरपेपणा प्राप्त होतो. डोळा वरखालीं, आत बाहेर व तिरकस फिरविण्याचे बारीक स्नायू आहेत त्यांनां ताण पडून त्यांत अशक्तता अगर लुलेपणा आल्यामुळें हा रोग होतो. या सर्व प्रकारांचें वर्णन देण्यास अवकाश नाहीं. कांहीं प्रकारामध्यें रोग्यांस दोन आकृती दिसतात. उपचार-कांहीं प्रकारचा तिरपेपणा अँट्रोपीन अगर एसेरीन क्रकचायत (भिंगाचे)चष्मे वापरून आणि दुहेरी चित्रें पहाण्याच्या दुर्बिणींतून चित्रें पाहण्याची संवय केल्यानें त्या स्नायूस व्यायाम होऊन तिरपेपणा कमी होतो. वातरोग कारण असल्यास त्यावर युक्त औषधें पोटांत द्यावींत. कांहीं प्रकारामध्यें शस्त्रक्रिया करून हें व्यंग दूर होतें. ती शस्त्रक्रिया अशी:- रोग्याच्या डोळ्यांत कोकेन घालून बधिरता अगर क्लोलोफार्म देऊन गुंगी आणावी. नंतर नेत्रवैद्यानें त्याच्या उजव्या हातास उभें रहावें व डोला उघडण्याचा चाप बसवावा. बुबुळाचा अधोभाग आणि अंतर्भागाचा मिलाफ होण्याच्या ठिकाणची त्वचा चिमट्यांत धरून स्थिर करावी आणि ती बोथट शेंड्याच्या कातरीनें थोडी कातरावी, व कात्री घुसवून त्याच्या आंतील डोळ्याचें वेष्टन कातरावें. नंतर एक आंकडा जखमेंत घालून त्या स्नायुबंधनाच्या खालून पापणीच्या खालीं त्याचें टोंक निघेल असें करावें आणि नंतर पुन्हां कात्री घालून एक दोन चटक्यांत तें स्नायुबंधन कापावें. नंतर एक दिवस डोळा चांगला बांधावा.

डोळ्याचें बहुतेक चलनवलन होण्यास कारण मस्तिष्कजन्यतृतीयमज्जातंतु आहे; त्यास रोग झाला असतां डोळ्याच्या स्नायूस अर्धांगाप्रमाणें लुलेपणा येतो. वर खालीं वगैरे कुठेंच डोला फिरवितां येत नाहीं. उजव्या बुबुळाची नजर डावीकडे व डाव्याची उजवीकडे कायमची होऊन बसते. डोळ्याची बाहुली लहान मोठी करण्याची वर्तुळाकार स्नायूंतील शक्ति जवळचें व लांबचे दिसण्याच्या कामीं नष्ट होते आणि इतर प्रकारचाहि लुलेपणा प्राप्त होते. यास फिरंगोपदंश हें बहुधां कारण असतें व त्यासाठीं पोटामध्यें पोट्याशियम आयोडाईड हें औषध द्यावें अगर दुसरें कांहीं कारण असल्यास त्याकारणाप्रमाणें औषध योऊन द्यावें.

बुबुळांची चंचलता.- लहानपणीं मुलांस आंकडी अगर झटके येऊन अपस्मार वगैरे होऊन अगर मोठेपणीं खाणींत वाकून काम करणा-या मजुरास हा रोग होतो.

लक्षणें- बुबुळ वर खालीं सारखें फिरत असतें. नजर मुळींच स्थिर नसते. याला उपाय फार धिमेपणानें केले पाहिजेत. विजेची पेटी लावणें, पोटांत शक्तीचे औषध देणें वगैरे इलाज करून पहावे नंतर डोळ्यांस एका बिदूंकडे पहाण्यास लावून त्यास व्यायाम करवावा.

वरचीपापणी लुली पडणें.- हा रोग होण्याचें कारण मस्तिष्कजन्य सप्तमज्जातंतूचा रोग झाल्यामुळें तो स्नायु लुला पडतो व पापणी आपोआप उघडतां येत नाहीं. तसेंच कानाच्या आंतील भागांतील बारीक हाडें, कान फुटून फार वाहिल्यामुळें कुजून जाऊन पापणी उघडतां येत नाहीं. त्यावरहि कान फुटतेवेळींच योग्य इलाज करावेत.

जुनाटखुप-या.- पापण्यांच्या आंतील श्लेष्मलत्वचेवर व त्यांतल्यात्यांत वरच्या पापणीखालीं टांचणीच्या टोंकायेवढे करड्यातांबुस रंगाचे वाळूच्या कणायेवढे बारीक उंचवटे असतात त्यांनां खुप-या म्हणतात व त्या तीव्र आणि जुनाट प्रकारच्या असलेल्या आढळून येतात.

कारणें:- अति लहान अर्भकाखेरीज सर्व मोठ्या माणसांनां हा रोग होतो. परंतु कोंदट, रोगट व अस्वच्छ राहणी या रोगास विशेष अनुकूल असते व म्हणून जेथें गर्दीमुळें आरोग्य बिघडतें अशा शाळा, संस्था सैन्याच्या छावण्या. प्लेगक्यांप, दलदलीच्य जागा या ठिकाणीं डोळे येऊन डोळ्यांतून पू वाहण्याची सांथ पसरते. या तीव्र प्रकारच्या खुप-या कांहीं रोग्यांच्या शेवटीं ब-या होतात. परंतु पुष्कळ रोग्यांच्या खुप-या पूर्ण ब-या न झाल्यामुळें जुनाट होऊन बसतात.

लक्षणें:- पापण्यांस फुगवटी व जाडपणा दिसणें, थोडें ऊन, उजेड व अंमळ चकचकीत दिव्याच्या प्रकाशामुळें डोळ्यास दीप असणें, डोळ्यांतून थोडा चिकट व पिंवळा स्त्राव सुरू होणें वगैरे. हा स्त्राव संसर्गकारी असतो. या खुप-या श्लेष्मलत्वचेखालीं व्रणासारख्या पसरून त्यांतून पू वाहून त्या ब-या झाल्या तरी तेथें व्रण राहून त्या ठिकाणीं पापणीं आकुंचित होते, व त्यामुळें पापण्यांचे केंस सरळच्याऐवजीं वक्र होतात व पडकेंस वगैरे नव्या व्याधी उत्पन्न होतात. आणखी यामुळें नव्या व्याधी म्हणजे पापण्या आंत अगर बाहेर आकुंचनानें वळणें व त्यामुळें पापण्यांचे केंस वांकडे होणें अगर ते झडणें, अगर ते बुबुळास खुपणें व त्यामुळें बुबुळावर फुलें (व्रण) पडणें, काळ्या, अर्ध्या अगर सर्व भागांतील रक्तवाहिन्या फुगून डोळे लाल होणें, डोळ्यांत सदा कांहीं तरी कारणानें चिकट स्त्राव व लाली उत्पन्न होणें, वडस वाढणार आहे अशी स्थिति बुबुळाची होणें व त्यामुळें कनीनिकापटलदाह वगैरे या आगंतुक व्याधीमुळें ह्या रोगास भयंकर रोग मानतात व त्यामुळें अंधत्वहि कसे  येतें व जनतेंतील अंधत्व ही आपत्ति कशी कमी होईल हें समजण्यासाठीं या ग्रंथांतील “अंधत्व” हा लेख पहावा.

उपचार:- जुनाट खुप-यांत पिंवळा स्त्राव होत असेल तर पापण्या उलटून त्यांवर सिलव्हरनायट्रेट (१ औंस बाष्पजलांत १० ग्रेन) हें झोंबणारें औषध लावून लागलीच ते सैन्धवाच्या पाण्यानें धुवून टाकावें म्हणजे आंकुचन न होतां स्त्राव कमी होईल. प्रोटार्गल, आरजिराल हींहि औषधें (४ ग्रेन व बाष्पजल १०० थेंब) चांगली असून पापण्यांनां मागाहून धुवावें लागत नाहीं. आकुंचन व स्तंभन करणारीं औषधें लावूं नयेत; परंतु आठवड्यांतून दोन अगर तीन वेळां मोरचुताचा खडा खुप-यावर हलक्या हातानें फिरवावा. पडकेस व पापण्याची अंत: व बहिर्वक्रता कायम बरी होण्यास-शस्त्रक्रियेनें ते सरळ होतात. पडकेंस यांसाठीं  तात्पुरता उपाय म्हणजे तो बारीक चिमट्यानें उपटणें. काळ्या बुबुळांत लाली फार आल्यास कनीनिकापटलदाह न होऊं देण्यासाठीं एटोपीनचा (४ ग्रेन = १ औंस पाणी) १ थेंब डोळ्यांत एकदां घालावा. हे सर्व उपाय चालू असतां रोग्याची शारीरिक स्थिति, पौष्टिक आहार, औषधें व मोकळी हवा यांच्यायोगानें सुधारावी.

आयुर्वेदीय.- आयुर्वेदांत डोळ्यांच्या ९४ रोगांचें वर्णन केलें आहे. कृछ्रोन्मील, निमेप, वातहत, कुंभिका, पित्तोक्लिष्ट, पक्ष्मशात, कफोत्क्लिष्ट, उत्संगा, रक्तोतक्लिष्ट, रांजणवाडी, बिसवर्त्म, उत्क्लिष्टवर्त्म, श्लिष्टवर्त्म, कर्दमवर्त्म, वहलवर्त्म, कुकुणक, पक्ष्मोपरोध, अलजी, अर्बुद इत्यादि पापण्यांचे रोग होत. जलस्त्राव, कपस्त्राव, उपनाह, रक्तस्त्राव, पर्वणी, पूयस्त्राव, हे डोळ्यांच्या सांध्यावर होणारे रोग आहेत. शुक्तिका, शुक्लार्म, बलासग्रथित, पिष्टार्म, शिरोत्पात, शिराजाल, रक्तार्म, अहिरा, स्नावार्म शिराजपिटिका, हे बुबुळांचे रोग होत. मोतिबिंदु, कांचबिंदु, रातांधळ, उलट्या बाहुल्या हेहि दृष्टिदोषच आहेत. या रोगांवर उपाय सांगितले आहेत. कुंभिकासारख्या रोगांत पापणीचें लेखन करतात. पापणीचे केंस गळून पडत असल्यास त्यांच्या मुळाशीं सुईनें गोंदावें किंवा जळवा लावाव्या. खुप-यांचें लेखन करून सुंठ व सैंधव यांचें चूर्ण वर चोळून ऊन पाण्यानें धुवून खैर, तूर, शेवग्याचा पाला यांच्या काढ्याची घडी ठेवावी. याप्रकारे डोळ्यांच्या निरनिराळ्या ९४ विकारांवर चिकित्सा वाग्भटासारख्या आयुर्वेदी ग्रंथांत सांपडते.

निरोगी मनुष्यानें देखील आपले डोळे चांगले रहावे म्हणून नेहमीं जव, गहूं, साळी, साठेसाळी, व हरीक हीं जुनीं धान्यें आणि मूग वगैरे कफपित्तनाशक धान्यें पुष्कळसें तूप घालून खावीं. तसेंच कफपित्तनाशक भाज्या, जांगलमांस, डाळिंब, खडीसाखर, सैंधव, त्रिफळा, द्राक्षें खाणें, पावसाचें पाणी पिणें, छत्री, जोडा वापरणें व वमनदिकांनीं दोषांचें शोधन करणें या गोष्टी कराव्यात म्हणून सांगितलें आहे. पायांस तेल, तूप, उटणें लाविल्यानें डोळ्यांस हितकर असतें.

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .