प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ          

नेदर्लंड- एक प्राचीन यूरोपीयन देशसमूह. याची भौगोलिक माहिती ‘हॉलंड’ व ‘बेलजम’ या लेखांतून आढळेल हीं दोन राष्ट्रें जेव्हां एकच होतीं तेव्हांचा इतिहास या ठिकाणीं सांपडेल. जुलियस सीझरच्या गॉलच्या स्वारीनंतर नेदरर्लंड देशाची रोमन लोकांनां माहिती झाली. येथें गॅलोकोल्टिक, जरमॅनिक व इतर दुस-या जातीचे लोक रहात असत. गॅलोकेल्टिक जातींना बेल्जी लोक असे म्हणत असत. यामध्यें नूरवी लोक फार शूर आणि धाडशी असत. सीझरची स्वारी इ. स. पूर्वीं ५७ या वर्षीं झाली. त्यानें सर्व बेल्जी जातींनां रोमच्या सत्तेखालीं आणलें. इ. स. पूर्वीं आगस्टसच्या बादशाही अंमलाखालीं नेदर्लंड हा गालिया बेल्जिका या नांवानें प्रसिद्धीस आला. यानें बटाव्हियन लोकांनां इ. स. १३ मध्यें जिंकलें. त्यांनां साम्राज्यघटक न बनवितां नुसते दोस्तच करण्यांत आलें होतें. हा देश म्हणजे रोमचें सैन्यभरतीचें पेवच झालें होतें. मध्ययूरोपांतील लढाईची तयारी करण्याची ही उत्तम जागा रोमला लाभली. बटाव्हियन लोक फार शूर आणि नांवाजलेले योद्धे होते. फ्रिजियन लोक रोमसत्तेखालीं इ. स. ४७ मध्यें आणले.

नेरोच्या मृत्यूनंतर रोमच्या पातशाहीबद्दल भांडणें सुरू झालीं. तेव्हां क्लॉडियस सिव्हिलिस या बटाव्हियन अग्रणीनें बंड पुकारलें. हा मोठा राजकारणपटु मनुष्य होता. आपल्या भावाचा सूड उगविण्यासाठीं व आपणास भोगाव्या लागणा-या शिक्षेचा वचपा काढण्यासाठीं त्यानें जर्मन आणि बेल्जी लोकांनां रोमच्या विरूद्ध बंड करण्याकरितां उद्युक्त केलें. प्रथम प्रथम रोमचा पराभव झाला. परंतु पुढें जर्मन व केल्ट जातींमध्यें भांडणें झालीं. शेवटीं रोमचा व बटाव्हियनांचा तह होऊन ते पुन्हां रोमचे दोस्त झाले.

फ्रँक लोक.- इ. स.  ४८१-५११ मध्यें मध्य आणि दक्षिण नेदर्लंड फ्रँक लोकांच्या ताब्यांत गेलें. बाकीचा मुलूख स्वतंत्र फ्रिजियन लोकांच्या हातीं राहिला. उत्तरेकडील जर्मन लोक सॅक्सन या नांवानें माहीत होते. यांच्यात व फ्रिजियन लोकात कांहीं विशेष फरक नव्हता.

या मध्य आणि दक्षिण नेदर्लंडचा राजा क्लोव्हीस यानें ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. व यामुळें या देशांतील लोकांची सुधारणा होऊन हळू हळू हे लोक गॅलो-रोमन लोकांत मिसळून गेले. केंब्री, टूर्ने, अँरॉस, थेरोने व लीज या ठिकाणीं विशपांचे मठ स्थापण्यांत आले. फ्रिजियन लोक ख्रिस्ती होण्यास फार नाखूष होते. त्यांनीं विंटफ्रेड नांवाच्या इंग्लिश बिशपाचा स ७५४ मध्यें खून केला. परंतु शार्लमेन बादशहानें त्यांनां ख्रिस्ती होण्यास भाग पाडलें.

८४३ सालीं कॅरोलिजियन बादशाहीचे ३ तुकडे करण्यांत आले. यांतील मधला तुकडा बादशहा लोथेअर याला देण्यांत आला. यामध्यें नेदर्लंडचा समावेश झाला होता. या बादशहानंतर दुसरा लोथेअर हा बादशहा झाला. याला लोथारी हा प्रदेश मिळाला. या लोथेअरला वारस नसल्यामुळें याचें राज्य (८७० सालीं) पूर्व आणि पश्चिम फ्रँकियांत वांटून देण्यांत आलें. स. ९२४ मध्यें लारेन हा हेनरी दि फौलरच्या राज्यांत जर्मन (पूर्व फ्रँकिश) साम्राज्याखालीं गेला. हेनरीचा मुलगा ओटो (ओटो दि ग्रेट) यानें स. ९५३ मध्यें आपल्या पराक्रमी भावाच्या ताब्यांत हा देश दिला; याप्रमाणें यापुढील नेदर्लंड देशाचा इतिहास हा लहान लहान संस्थानांचा इतिहास आहे. यांतील प्लँडर प्रांतच फक्त फ्रंच सत्तेखाली राहिला.

कॅरोलिंजियनचें साम्राज्य मोडल्यावर लहान लहान छोटी संस्थानें आपले हातपाय पसरूंलागली, व यांच्यांत लौकरच भांडणें सुरू झाली. याच सुमारास नॉर्स लोकांनीं स्वारी केली. यावेळीं जिकडे तिकडे अंधाधुंदी माजली, व सर्व प्रदेश ओसाड पडला. या गडबडीच्या काळांत कांही लहान लहान संस्थानें येथें निर्माण झाली. उदाहरणार्थ, फ्लँडर्स, हॉलंड, ब्रँबँट, लिंबर्ग, लग्झेंबर्ग, युट्रेच लीज, गेल्डरलँड इत्यादि.

९ व्या आणि १० व्या शतकांत नार्स लोकांच्या स्वार्‍यांमुळें या देशाची फार दैना उडाली. ते देशच्या देश लुटून उध्वस्त करीत. लुटालूट, जाळपोळ, खून हे दिवसाढवळ्या जिकडे तिकडे होत असत.

११ व्या शतकाच्या अखेरीस जहागिरीपद्धति (फ्यूडल सिस्टीम) नेदर्लंडमध्यें पूर्णपणें सुरू झाली व हळूहळू या देशांतून सुधारणेचें पाऊल पुढें पडूं लागलें व जितके तिकडे व्यवस्थित राज्यपद्धति प्रचलित झाली. याच सुमारास पीटर दि हरमिट यानें क्रुसेडसाठी सर्व पश्चिम यूरोप हलवून सोडला. या पहिल्या क्रुसेडचे मोठमोठे पुरस्कर्ते नेदर्लंडमधीलच होते. स. १२०३ मधीललॅटिन क्रुसेडनें कॉन्स्टांन्टिनोपलचा मुकुट तर फ्लँडर्सच्या बाल्डविनच्या डोक्यावर ठेविला. स. १२१८ मध्यें नेदर्लंडच्याच लोकांनीं तरवार वाजविली. या क्रुसेडचा नेदर्लंडच्या बाबतींत फार चांगला परिणाम झाला. यामुळें येथील लोकांची कूपमंडूकवृत्ति जाऊन त्यांचे मन प्रगल्भ झालें. पूर्वेकडील ज्ञानभांडार प्रथम यूरोपमध्यें यांनींच आणलें, व यांच्यामुळें व्यापाराला उत्तेजन मिळालें.

१२ व्या शतकांत येथील शहरांस सनदा मिळूं लागल्या. या शहरांचे दोन प्रकार असत. एक स्वतंत्र शहर आणि एक समाईक मंडळ (काम्यून). समाइक मंडळाला, वारसा, न्याय, कर, सर्पणाचा उपयोग, इत्यादि हक्क मिळत असत, व हे समाईक मंडळ आपले अधिकारी निवडीत असे, व हा निवडण्याचा हक्क कांहीं थोड्या घराण्यांनां असे. पुढें हा हक्क वंशपरंपरागत झाला व या सत्ताधारी अल्प वर्गाला कुलीन (पॅट्रिशियन) वर्गाचे लोक असें म्हणूं लागले. बर्गोमास्टर म्हणून एक अधिकारी नेमला जात असे;त्याचें काम मंडळाचा जमाखर्च पाहणें हें होतें. याप्रमाणें म्युनिसिपालिटीं (नगर संस्था किंवा स्थानिक संस्था)च्या रूपानें छोटेखानी प्रजासत्ताक गांवें निर्माण झालीं.

घेंट, ब्रजेस, व यिप्रेस ही तीन शहरें फार भरभराटीस पोंचली. येथील लोकसंख्या लाखांनीं मोजण्यासारखी असे. येथें कापडाचा व्यापार चाले. मोठा ब्रजेस हें जगाच्या व्यापाराचें केंद्र बनलें होतें. या शहरांतील निरनिराळ्या पेशाच्या लोकांनीं भराभर जातिसंस्था किंवा विशिष्ट धंदेसंस्था स्थापन केल्या, आणि त्यांनीं कुलीन वर्गाला असलेल्या सर्व सवलती मिळविल्या. कुलीन वर्गानें फअरेंचांची मदत मिळविली, पण स. १३०२ मधील कोर्टरॉयच्या लढाईनें या कारागीरवर्गानें सरशी मिळविली. याप्रमाणें घेंट येथील प्रसिद्ध नागरिक मुत्सद्दी जेक्स व्हॉन आर्टव्हेले याच्या वेळेस (१२८५-१३४५) प्लेमिश शहरांची सत्ता कळसास पोंचली. परंतु पुढें या शहरांतून आपापसाबद्दल असूया उत्पन्न झाली व शेवटी यामुळें त्यांचें सामर्थ्य लोपलें. स. १३८२ मध्यें रूजबेकच्या लढाईंत पराभव झाल्यामुळें या नगरसंस्थांच्या उत्कर्षास ओहोटी लागली.

याप्रमाणें १४ व्या शतकाच्या शेवटीं या नगरसंस्थांच्या योगानें व्यापार व उदीम फार वाढला, व फ्लँडर्स देशाच्या सधनतेमुळें यावर सर्वांची दृष्टि जाऊं लागली. हळू हळू सर्व नेदर्लंड या सुमारास बर्गंडी घराण्याच्या ताब्यांत आला. १३८४ सालीं फिलिफ दि बोल्ड हा फ्लंडर्स आणि अर्टाईसचा राजा झाला. १४१९-१४६७ सालीं फिलिफ दि गुड (चांगला फिलिफ) यानें बर्गंडियन सत्तेला दृढ केलें. चार्ल दि बोल्ड (धीट चार्लस) यानें स. १४६८ ते लीज घेतलें व १४७३ सालीं गेल्डरलँड हा भाग आपल्या राज्यास जोडला.

बर्गंडी राजघराण्याची इच्छा मध्यवर्ती सत्ता निर्माण करण्याची होती, व या गोषअटीकडे लक्ष ठेवून फिलिफ दि गुडनें सर्व शहरांनां दडपून टाकलें. याच्या दरबारचा थाट फार भपकेदार असे. फिलिफ राजा जरी दुष्ट होता तरी तो राजकीय दृष्ट्या फार श्रेष्ठ होता. १४७३ सालीं मेलिन्स येथें एक महामंडल, (ग्रँड कौन्सिल) स्थापण्यांत आलें व त्याच्या हातीं न्यायाची आणि जमाखर्चाची सूत्रें देण्यांत आलीं. धीट चार्लसच्या वेळेसच फ्रान्समध्यें ११ वा लुई राज्य करीत होता. तो फार धूर्त आणि चाणाक्ष असे. चार्लसनें फ्रान्सवर स्वारी केली व तींत त्याला यश आलें. यानें प्रथमच खडें सैन्य ठेवण्याचा प्रघात पाडला. चार्लस जरी फार शूर होता तरी त्याच्यांत मुत्सद्देगिरी मुळीच नव्हती. १४७६ सालीं ग्रँडसन येथें आणि मोरात येथें स्वीस लोकांनीं त्याचा पराभव केला. १४७७ साली पुन्हां नॅन्सी येथें त्याचा पराभव होऊन चार्लसच्या राज्यविस्ताराचें सर्व मनोराज्य लयास गेलें. या लढाईंत खुद्द चार्लस मारला गेला.

ही संधि साधून ११ व्या लुईनें बर्गंडी, अरटॉईस इत्यादि प्रदेश घशाखाली घातला. परंतु ह्या नेदर्लंडच्या प्रांतांनां फ्रेंच सत्ता नको होती. १४७७ सालीं ``ग्रेट प्रिव्हिलेज’’ (मोठा हक्क) नांवाच्या सनदेवर मेरीची सही फ्लँडर्स, ब्रॅबँट इत्यादि शहरांनीं करवून घेतली. या सनदेप्रमाणें लढाई करणें, लग्नसंबंध जोडणें, कर बसविणें तो लोकांच्या मताशिवाय बसवूं नये, एतद्देशीय खेरीजकरून इतरांस मोठमोठ्या हुद्याच्या जागा देऊं नयेत, व सर्वत्र राष्ट्रीय भाषाच चालावी, असें होतें. याप्रमाणें स्थानिक हक्क लोकांस देण्यांत आल्यामुळें राजसत्तेस बराच आळा बसला. लौकरच मेरीचें लग्न आस्ट्रियाच्या मॅक्झिमीलियनरोबर झालें, व याप्रमाणें हॅब्सबर्ग घराण्याशीं नेदर्लंडचा संबंध आला. १४९२ सालीं मेरी मरण पावली. १४९४ सालीं फिलिफ दि फेअर (मेरीचा मुलगा) यास नेदर्लंड देण्यांत आलें. याचा विवाह अरागॉनच्या जोन्नाशीं झाला. १५०६ सालीं फिलिफ व जोन्ना यांनां कॅस्टाईलचें राज्य मिळालें. याच वर्षी फिलिफ मरण पावला, व त्याच्या मागें त्याचा ६ वर्षांचा मुलगा चार्लस हा राजा झाला. अद्याप फिलिफचा बाप मॅक्झिमीलियन हा जिवंतच होता. तो चार्ल्सचा पालक झाला. त्यानें आपली मुलगी मार्गारेट हिला गव्हर्नर जनरल नेमलें. ती फार हुषार असल्यामुळें तिनें आपलें काम ८ वर्षेपर्यंत चोख रीतीनें बजावलें. पुढें चार्लस १५ वर्षांचा झाल्यावर तो कॅस्टाईलचा आणि अरॅगॉनचा राजा झाला, व या कॅस्टाईलच्या राज्यपदाबरोबरच इटली व अमेरिका यांचाहि बराच मुलूख त्यास मिळाला. १५१९ सालीं मॅक्झिमीलियन बादशहा मरण पावला. त्याच्या गादीवर चार्लस हा बसला. हा बादशहा नेदर्लंडमधील प्रजेस अत्यंत प्रिय झाला होता. याच्या राज्यांत बर्‍याच लढाया झाल्या. नेदर्लंडचा राज्यकारभार १५३० पर्यंत बहुतेक मार्गारेटच पहात असे. पण पुढें तिनें ही व्यवस्था आपली मेरी नांवाच्या बहिणीच्या हाती दिली. तीसुद्धां मोठी शहाणी स्त्री असल्यामुळें तिनें नेदर्लंडची व्यवस्था फार धोरणानें चालविली होती. तिला जेव्हां गव्हर्नर जनरल करण्यांत आलें, त्यावेळीं तीन निरनिराळ्या सभा निर्माण करण्यांत आल्या, व त्यांच्या हातांत सर्व राज्यव्यवस्था देण्यांत आली. चार्लसची नेदरलंड्सची राज्यपद्धति फार नेमस्त होती. परंतु पुढें पुढें त्याला जास्त करभार वसूल करणें भाग पडलें. घेंट नवीन वाढविलेला कर देईना म्हणून १५४० साली चार्लसनें घेंट शहर घेतलें व त्या शहराचें सर्व हक्क आणि सनदा हिरावून घेतल्या, व त्या शहरावर बरीच खंडणी लादली. जर्मनीच्या प्रॉटेस्टंट राजाशीं होणार्‍या लढायामुळें या ५ व्या चार्लस बादशहास द्रव्यबळ आणि मनुष्यबळ यांची सारखी टंचाई भासूं लागली. व यामुळें त्यानें वारंवार नवीन हुकूम काढले व स. १५५० मधील हुकूम फार सक्तीनें अंमलांत आणला. याचा उद्देश, प्रॉटेस्टंट लोकांच्या त्रासाचा समूळ नायनाट करावयाचा असा होता. याप्रमाणें नवीन प्रॉटेस्टंटपंथी लोकांनां जिवंत गाडण्यांत आलें. परंतु, ही सुधारणेची लाट कांहीं केल्या थांबली नाही. चार्लस हा या अवाढव्य राज्याचा कारभार पाहून त्रासला होता. त्यानें १५५५ सालीं राज्यत्याग केला, तेव्हां दुसरा फिलिफ हा गादीवर बसला. त्यानें फ्रेंचांचा १५५७ साली सेंटक्वॅटिन व १५८ साली ग्रॅव्हेलाइन्स येथें पराभव केला. यामुळें केटा कॅम्बेसिस येथील तहाचीं कलमें त्याला अगदी अनुकूल अशीं होतीं. फिलिफ ही स्पॅनिअर्ड असल्यामुळें त्याची नेदर्लंडमधील प्रजा त्याच्याविषयीं नेहमी साशंक असे. फिलिफ हा स. १५५९ या वर्षी ब्रुसेल्सहून स्पेनमध्यें गेला, तो पुन्हां परत आला नाहीं.

त्यानें ५ व्या चार्लची मुलगी मार्गारेट हिच्या हाती नेदर्लंडचा सर्व कारभार दिला. तिनें सुद्धां राज्यकारभार फार शहाणपणानें केला. तिच्या मदतीस ३ मंत्र देण्यांत आले होते. त्यांपैकीं कार्डिनल ग्रॅनव्हिले हाच खरा राज्यकारभार पाहणारा होता असें म्हटलें असतां चालेल. हा अत्यंत लायख आणि विचारी असा मनुष्य होता. नवीन धर्मपीठें आणि स्पेनचें सैन्य यामुळें नेदर्लंडमधील लोकांत असंतोष पसरला. तेव्हां स्पेनचें सैन्य १५६१ सालं परत धाडण्यांत आले. याच सुमारास दुसरी एक अडचण उपस्थित झाली. नासूचा विल्यम, आरेंजचा राजा, फिलिफ दि माँटमोरेन्सी, हूर्नचे सरदार इत्यादि फार वजनदार अशा नाईट ऑफ फ्लीस सभेच्या सभासदांस निव्वळ नामधारीच सभासद बनविल्यामुळें त्यांनीं आपल्या जागेचा राजीनामा दिला व ग्रॅनव्हिले यास काढून टाकण्याविषयी राजास त्यांनीं अर्ज केला. याप्रमाणें १५६४ साली ग्रॅनव्हिले ब्रुसेल्स सोडून गेला.

१५६३ सालीं ट्रेंटच्या सभेचें कार्य संपले, व तिनें मंजूर केलेले हुकूमनामे चहंकडे अंमलांत आणण्यांत आले. यामुळें नेदर्लंडमध्यें जिकडे तिकडे धार्मिक छळ सुरू झाला. मोठमोठ्या गव्हर्नरांनीं असले हुकूम अंमलांत आणण्याऐवजीं राजीनामे दिले. १५६६ सालीं ``दि रिक्वेस्ट’’ नांवाचा अर्ज मार्गारेटकडे पाठविण्यांत आला व जेव्हां ही सारी मंडळी तो अर्ज घेऊन मार्गारेटजवळ पोंचली, तेव्हां तिच्या तीन सल्लागारांपैकीं एक बालेंमाँट तिला म्हणाला, ``काय बाईसाहेब, आपण या भिकार्‍यांनां इतके कां घाबरतां?’’ यामुळें नेदर्लंडमध्यें देशभक्तांच्या ``दि बेगर्स’’ म्हणजे दरिद्री या नांवाचा एक पक्षच निर्माण झाला.

तेव्हां आरेंजचा विल्यम, हूर्न इत्यादि मंडळी स्पेनमध्यें नेदर्लंडची नाजुक परिस्थिति समजावून सांगण्यासाठीं गेली. यांचा फिलिपनें चांगला सत्कार केला. परंतु त्यानें त्यास स्पेनमध्यें अडकवून ठेवलें. इकडे लोकांचा संताप जास्तच वाढत गेला. भर दिवसां मोकळ्या पटांगणांत लोकांच्या सभा भरूं लागल्या आणि कॅल्विनिस्ट धर्मगुरूंची व्याख्यानें धडकून होऊं लागली. या व्याख्यानांचा असा परिणाम झाला कीं, लोक मूर्तिभंजकतेचा उघड उघड पुरस्कार करूं लागले, व त्यामुळें लोकांनीं चर्चमधील मूर्ती, तसबिरी, व्यासपीठें वगैरे फोडण्यास आणि तोडण्यास सुरवात केली, व या सर्व गोष्टींचा कळस अँटबर्पच्या भव्य मंदिराची विटंबना करण्याच्या प्रसंगांत झाला. तेव्हां फिलिपनें आल्वाच्या ड्यूकास नेदर्लंडमध्यें या धर्मभ्रष्ट लोकांचा पुरता नायनाट करण्याकरितां धाडिलें.

आरेंजचा विल्यम हा कांहीं यावेळीं स्वस्थ बसला नव्हता. त्याला पुढें कांहीं विपरीत घडणार हें कळलेंच होतें. त्यानें एग्मांट व हूर्न यांचें मन विळविण्याचा यत्न केला पण जेव्हां ते राजाविरुद्ध त्यास मिळेनात, तेव्हां तो पळून गेला.

१५६७ सालीं २००० मूर्तिभंजकांचे राईराई एवढे तुकडे करण्यांत आले. लवकरच आल्वा नेदर्लंडमध्यें आला. त्यानें ``संकटकालीन सभा’’ बोलाविली. तिला लोकांनीं ``रक्ततृष्णेची सभा’’ असें नांव दिलें. या सभेचें काम म्हणजे न्याय देण्याचा फार्स करणें हें होतें. लोकांनां धरून आणून त्यांना शिक्षा ठोठवावयाची हा या सभेचा मुख्य उद्देश होता. यावेळीं असंख्य लोक इंग्लंड आणि जर्मनी देशांत पळून गेले. आरेंजच्या राजाची मालमत्ता सरकारजमा करण्यांत आली व त्याला बंडखोर म्हणून ठरविण्यांत आलें. लौकरच त्याचा मुलगा फिलिफ विल्यम यास माद्रिड येथें पळवून नेण्यांत आलें. इकडे विल्यमनें फ्रेंच सैन्य उभारलें व त्याच्या भावानें फ्रीसलंडवर स्वारी केली. हेलीजरली येथें त्यानें स्पेनच्या सैन्याचा पराभव केला. परंतु आल्वा यानें लुईची लौकरच अगदीं दाणादाण उडवली. १५६८ त एग्मांट व हूर्न यांचा शिरच्छेद करण्यांत आला.

१५६९ त लढाईचा खर्च भागविण्यासाठी आल्वानें मोठमोठे कर लादले व ते तो जबरीनें वसूल करूं लागला. इकडे विल्यम आणि लुई यांनीं पुन्हां दुसर्‍यांदा उठावणी करण्याची तयारी चालविली होतीच. १५६९ या वर्षी आरेंजच्या विल्यमनें स्पेनच्या व्यापारी गलबतांवर छापा घालण्याचा मनसुबा केला. त्यानें दर्यावर नुसता कहर उडवून दिला. रोमन कॅथोलिक भट किंवा इतर लोक त्याच्या हातीं लागतांच त्यानें त्यांचा अतोनात छळ केला. याप्रमाणें त्यानें हळू हळू शहरें घेण्यास सुरुवात केली. आरेंजला मिळालेल्या या जयामुळें चोहोंकडे बंडे व्हावयास लागलीं, व तीन महिन्यांत एक अमस्टरडॅम खेरीजकरून सर्व हॉलंड बंडखोरांच्या हातीं लागलें.

इकडे नासूच्या लुईने मॉन्स शहरास वेढा देऊन तें घेतलें. तेव्हां एक भले मोठें स्पेनचें सैन्य तेथें जाऊन त्यानें लुईला मॉन्समध्यें कोंडलें. त्याला मदत करण्याकरितां विल्यम हा एक एक शहर जिंकीत जिंकीत पुढें निघाला. इतक्यांत त्याला बार्थेलोम्यू येथील कत्तलीचें वृत्त कळलें. त्यानें मॉन्सचा वेढा उठविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांत त्याला अपयश आलें. तेव्हां मॉन्स स्पेनच्या सैन्याच्या हातीं लागलें. यामुळें आरेंज डरला नाहीं. सर्व हॉलंडदेशानें त्याला आपला मुख्य अधिकारी म्हणून म्हटलें आरेंज यानें आपलें कायमचें राहण्याचें ठिकाण म्हणून म्हटलें आरेंज यानें आपलें कायमचें राहण्याचें ठिकाण डेल्फ्ट हें शहर केलें. आल्वाच्या मुलानें झुटफेन शहर घेतलें व नार्डनच्या लोकांची अत्यंत निर्दयपणें कत्तल उडविली. नार्डनच्या कत्तलीस इतिहासकालीन जुलमी गोष्टींच्या शिरोभागी बसविण्यास कांहींच हरकत नाहीं.

हारलेम शहराचा वेढा हा नेदर्लंडच्या इतिहासांत फार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणें अत्कमारचाहि वेढा फार प्रसिद्ध आहे. लोकांनीं समुद्राचा बांध फोडला तेव्हां आल्वाचा मुलगा डॉन फ्रेडरिक यास एकदम मागें पाय काढावा लागला. १५७३ त आल्वाच्या आरमाराचा पराभव करण्यांत आला. १५७३ त आल्वानें त्रासून राजीनामा दिला. त्याच्या नंतर डॉनलुई रिक्वेसेनस हा गव्हर्नर जनरल होऊन आला. १५७४ त स्पॅनिश लोकांचें मिडलबर्ग हें शहर गेलें. पुढें मार्चमध्यें निज्मवेजन येथें नासूच्या लुईचा पराभव झाला व यांत तो मारला गेला. १५७४ त लीडनचा वेढा परतविण्यांत आला. या जयानिमित्त लेडनला एक विश्वविद्यापीठाची स्थापना झाली. विल्यमला १५७५ वर्ष फार त्रासदायक गेलें परंतु १५७६ या वर्षी रेक्वेसेनस हा मरण पावला. याच वर्षी हॉलंड व झीलंड या देशांचा एक संघ बनिवण्यांत आला. विल्यमकडे या देशांतील सैन्याचें सेनापतित्व देण्यांत आलें. १५७६ त बॅलून आणि स्पॅनिश सैन्यांत बंड होऊन झीलंडचा बचाव झाला. या बंडास ``स्पॅनिश फ्यूरी’’ असें म्हणतात. ब्रूसेल्स येथें तह होऊन त्या तहान्वयें कॅथोलिक आणि प्रॉटेस्टंट लोकांस समान रीतीनें वागविण्यांत यावें, स्पेनचा राजा हा कायद्याच्या दृष्टीनें राजा मानण्यांत यावा, व आरेंज यास हॉलंड व झीलंडचा गव्हर्नर नेमावें असें ठरलें. मध्यंतरी फिलीफ बादशहानें आस्ट्रियाच्या डॉनजॉन यास नेदरलँड्चा गव्हर्नर जनरल नेमलें. घएंट येथील तहाच्या अटी त्यानें मान्य केल्याशिवाय त्याचा हुकूम मानावयाचा नाहीं असा राजमंडळानें आग्रह धरिला. याच सुमारास ``युनिअन ऑफ ब्रूसेल्स’’ या तहान्वयें विल्यमची बाजू फार बळकट झाली. यामुळें डॉनजॉनला घेंटच्या तहाच्या अटी मान्य करणें भाग पडलें. सन १५७७ मध्यें ``कायमची राजाज्ञा’’ काढण्यांत आली व याप्रमाणें हॉलंड आणि झीलंडचें मुख्याधिकारीपद आरेंजकडेच ठेवण्यांत आलें. परंतु, आरेंजसारख्या धूर्त राजकारणकुशलास यांतील डाव उमगला, व त्यानें ही आज्ञा हॉलंड व झीलंडमध्यें प्रसिद्ध करण्याचें नाकारलें.

डॉनजॉन पहिल्या मेस ब्रुसेल्समध्यें शिरला. परंतु त्याच्या हातीं काहींच सत्ता नव्हती. त्यानें सत्ता संपादण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेर त्यास बुसेल्स सोडून जावें लागलें. तेव्हां ब्रुसेल्समध्यें आरेंजनें प्रवेश करून ब्रुसेल्स, अँटवर्प व घेंट येथील स्पॅनिश सैन्य त्यानें घालवून लावलें. त्याचा ब्रुसेल्समध्यें फार सत्कार झाला व याप्रमाणें सर्व नेदलँड्चा तो पुढारी बनला.

उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील प्रॉटेस्टंट आणि कॅथोलिक यांच्यामधील वैमनस्य फार खोलवर रुजलें होतें, व त्याप्रमाणें डच आणि बेल्जम हीं दोन राष्ट्रें कालाच्या ओघाबरोबर वहात चाललीं होतं. ६ ऑक्टोबरला कॅथोलिक लोकांनीं गुप्तपणें बादशहाचा भाऊ आर्चड्यूक मॅथिआस यास ब्रुसेल्स येथें बोलावून आणलें. आरेंजच्या मनांत त्याचा सत्कार करून आपलें कार्य साधावें असें होतें. कारण मॅथिआस नुसता राजा करून आपल्या हाती सर्व राजसूत्रें ठेवावींत असा त्याचा इरादा होता.

परंतु ह्यावेळीं फिलिफचें धाबें दणाणलें. त्यानें अलेक्झांडर फारनीजबरोबर २० हजार सैन्य देऊन त्यांस डॉनजॉनच्या मदतीस धाडलें. १५७८ या वर्षी डॉनजाननें नेदर्लंडच्या लोकांचा नामूर येथें पराभव केला. यावेळी अँज्यूच्या ड्यूकनें चाल करून मॉन्स शहर घेतलें. याच वेळीं ज कासिमीर हा जर्मन सैन्य घेऊन नेदर्लंडमध्यें घुसला. या आणीबाणीच्या प्रसंगीं आरेंजची राजकारणपटु बुद्धिमत्ता अत्यंत विशदपणें चमकूं लागलीं. त्यानें अँज्यूला नेदर्लंडच्या स्वातंत्र्याचा कैवारी अशी बहुमानास्पद पदवी दिली. इकडे एलिझाबेथ राणी, हेनरी नॅव्हारे, जॉन कासीमीर याच्याबरोबर राष्ट्रीय कार्यास मदत देण्याप्रीत्यर्थ त्यानें बोलणें सुरू केलें. इतक्यांत डॉनजॉन हा ऑक्टोबर महिन्यांत मरण पावला. तेव्हां फिलिफ बादशाहानें आलेक्झांडर फारनीज यास डॉनजॉनच्या जागीं नेमलें. हा अत्यंत शूर आणि राजकार्यधुरंधर होता. त्यानें हां हां म्हणता कॅथालिक लोकांचें मन राजपक्षाकडे वळविलें. कॅथोलिक लोकांनां स्वदेशीय प्रॉटेस्टंट लोकांचा जुलूम सहन होईना. त्यांनां परकी अंमल परवडला. याप्रमाणें त्यांनी ब्रुसेल्सच्या सभेतर्फे राजाविषयीची आपली पूर्ण राजनिष्ठा व्यक्त केली. इकडे उत्तरेकडील हॉलंड, झीलंड, युट्रेच, गेल्डरलंड, झुटफेन यांनीं युट्रेचला सभा बोलावून तींत पुढील गोष्टी ठरविल्या. यायोगें उत्तरेकडील प्रांत हे जणूं एकच प्रांत आहेत असे एकत्रित बांधले गेले. परकी सत्तेला वित्त आणि प्राण यांची आहुती देऊन घालवून लावावयाचें, व धर्माच्या बाबतींत पूर्ण मोकळीक ठेवावयाची असा या सभेंत ठराव पास झाला. विल्यमच्या मनांत सतराहि प्रांतांचें एकीकरण व्हावें असें होतें परंतु ही गोष्ट आतां अशक्य होती. यापुढील इतिहास हा हॉलंड आणि बेल्जम या वेगवेगळ्या देशांचा असल्यामुळें तो त्या नांवाखाली पहा.

   

खंड १६ : धम्मपद - नेपाळ  

 

 

 

  धरमजयगड
  धरमपुर
  धर्मकीर्ति
  धर्मपुरी
  धर्म व धर्मशास्त्र
  धर्मशिला
  धर्मसूत्रें
  धर्मावरम्
  धर्मोत्तर
  धवलधार
  धाकड
  धागा
  धाडि
  धाडी
  धातकी
  धातु
  धातुकाम
  धातुविद्या
  धांधलपुर-सुदाम्रा
  धानुक जात
  धानोरें
  धापेवाडा
  धाबळाघोसी
  धाबळाधीर
  धामण
  धामपूर
  धामलेज
  धाम्रा
  धायटे
  धार
  धारण
  धारणी
  धारवाड
  धारापुरस्
  धारी
  धारीवाल
  धारूर
  धार्मिक उत्सव
  धावडशी
  धावडा
  धावरें
  धासा
  धिनोधार
  धिलवान
  धीमान
  धुंड
  धुनिया
  धुब्री
  धुमनर
  धुमाळ
  धुरवई
  धुराडें
  धुलखेड
  धुंसर
  धुळप
  धुळें
  धूप
  धूमकेतु
  धृष्टद्युग्न
  धेड
  धेंडा
  धेनकानाल संस्थान
  धोडप किल्ला
  धोडान
  धोडिया
  धोंड्या वाघ
  धोतरा
  धोत्रिय
  धोबी
  धोरहरा
  धोराजी
  धोलपूर
  धोला
  धोलाद्रि
  धोली ऊर्फ ढोली जात
  धोलेरवा
  धोलेरा
  धोल्का
  धौम
  धौली
  ध्यान
  ध्रागध्रा
  ध्राफा
  ध्रुव
  ध्रुवीभवन
  ध्रोल
  ध्वनिलेखक यंत्र
  ध्वनिशास्त्र
 
  नकुर तहशील
  नकुल
  नंके
  नकोदर
  नॅक्सास
  नगर
  नगरकर्नूळ
  नगरकोट
  नगरखेडें
  नगरदेवळे
  नगरधन
  नगरपारकर
  नगरमबेट
  नगररचनाशास्त्र
  नगरहार
  नगरी
  नगारची
  नगारा
  नगीना
  नगेसिया
  नंजनगुड
  नजफखान
  नंजराज
  नंजराजपट्टण
  नजीब उद्दौला
  नजीबाबाद, तहशील
  नझन
  नटमौक
  नटराज
  नटोग्यी
  नॅंडि
  नडिया जिल्हा
  नडियाद
  नडियाल
  नतीर
  नत्र
  नत्राम्ल
  नथियागली
  नथुभाई, सर मंगळदास
  नंद
  नंद उर्फ तिरुनलैपोवर
  नंदकुमार
  नंदगड
  नंदन
  नंदप्रभंजन
  नंद भाषा
  नंदलाल मेडलोई, चौधरीराव
  नंदवंश
  नंदादेवी
  नंदिकेश्वर
  नंदिगाम
  नंदिग्राम
  नंदी
  नंदीकोतकूर
  नंदीखेडें
  नदीगांव
  नंदीदुर्ग
  नदुवत्तम
  नंदुरबार, तालुका
  नदौन इस्टेट
  नंद्यल
  नद्या व नाले
  ननसरी जमीनदारी
  नॅन्टि्स
  नन्न्यभट्ट
  नन्निलम
  नॅन्सी
  नपुटा
  नंबियसन
  नंबुद्रि
  नमूचि
  नम्माळवार
  नम्हकोक
  नयागढ संस्थान
  नरक
  नरकासुर
  नरखेड
  नरगुंद
  नरनाळा
  नरनौला
  नरमेध
  नरवर, जिल्हा
  नरवल
  नरवाण
  नरसपट्टण
  नरसपुर
  नरसरावपेठ
  नरसापुर
  नरसिंगगढ संस्थान
  नरसिंगदेव बुंदेला
  नरसिंगपूर
  नरसिंगपूर, नीरा
  नरसिंगपूर संस्थान
  नरसिंह
  नरसिंह ठक्कुर
  नरसिंहसरस्वती
  नरसी मेहता
  नरसोबाची वाडी
  नरहरितीर्थ
  नरहरि मोरेश्वर देशपांडे
  नरहरि सोनार
  नरेगळ
  नरेंद्र
  नरैळ
  नरोद
  नर्मदानदी
  नल
  नलकूबर
  नलगोंडा
  नलदुर्ग
  नलहाती
  नलिया
  नल्लमलियास
  नवखंडें
  नवग्रह
  नवद्वीप
  नवनाग
  नवनिधी
  नवरत्नें
  नवरस
  नवरात्र
  नवरोज
  नवलगड
  नवलगुंद
  नवलाख उंबरे
  नवली
  नवविधाभक्ति
  नवशाहरो उबौरो
  नवशाहारो फिरोझ
  नवसरी
  नवसागर
  नवाडा
  नवानगर
  नवापूर
  नबाबगंज
  नवाबगंज शहर
  नशीरउद्दीन कबाचा
  नष्कि
  नसरत
  नसीराबाद
  नहपान क्षहरात व घराणें
  नहाल
  नहुष
  नळगंगा नदी
  नक्षत्रपद्धति व तारकापुंज
  नाइक
  नाईलनदी
  नाक
  नाकाचे रोग
  नाग
  नाग जात
  नाग टेंकड्या
  नागपंथ
  नागपूर
  नागपूर जिल्हा
  नागपूरकर भोंसले
  नागभट
  नागमणि
  नागरिक
  नागर्त
  नागली
  नागवर्मा
  नागवेल
  नांगाम
  नागार्जुन
  नागासाकी
  नांगुनेरी
  नागेरकोइल
  नागेली, कार्ल विल्हेम व्हॉन
  नागेश भिंगारकर
  नागोजीभट्ट
  नागोजी माने
  नागोद
  नागौर
  नांग्वान
  नाची
  नाझरेथ
  नाझारेथ
  नाझीरा
  नाट
  नाटकगृहें
  नाटेकर, बाळकोबा
  नाट्यशास्त्र
  नाडगांवडा-नाडगौडा
  नाडीव्रणरोग
  नाडोर
  नाणकशास्त्र
  नाणेंघाट
  नांत
  नाताळ
  नातू, बाळाजी नारायण
  नातेंपुतें
  नाथद्वार
  नाथपंथ
  नाथमुनि
  नांदगांव
  नांदगांव संस्थान
  नांदगिरी किल्ला
  नादिरशहा
  नांदुरा
  नांदेड, जिल्हा
  नांदोद
  नादोल
  नानक
  नानपारा
  नाना फडणवीस
  नानासाहेब
  नानकिंग
  नाभा
  नामकई
  नाभादास
  नाभनिदिष्ठ
  नामकरण
  नामक्कल
  नामदेव
  नामदेव शिंपी
  नामशूद्र
  नामूर
  नायकनहट्टी
  नायक राजे (मदुरेचे)
  नायगाराफाल्स शहर
  नायगांव रेबई
  नायगेरिया
  नायडस
  नायडू
  नायर
  नायसिआ
  नायिका व नायक
  नार
  नारद
  नारळ
  नारायण
  नारायणगंज
  नारायणगड
  नारायणगढ
  नारायणगांव
  नारायणपूर
  नारायणपेठ
  नारायणराव बल्लाळ पेशवे
  नारायणसार
  नारू
  नारो आप्पाजी तुळशीबागवाले
  नारो त्र्यंबक हणमंते
  नारोपंत चक्रदेव
  नारोराम मंत्री
  नारोवाल
  नारो शंकर
  नार्थाक्लिफ, लॉर्ड
  नॉर्थबुक, लॉर्ड
  नॉर्द्याम्टन
  नॉर्वें
  नार्वेकर वैश्य
  नालतवाड
  नालागड
  नावडा
  नावा
  नाशिक
  नासत्य
  नासापुटपार्श्वग्रंथि
  नासिन उद्दीन, तूसी ख्वाजा
  नासिरखुश्रु
  नासीरजंग
  नॉस्ट थॉमस
  नास्तिक्यवाद
  नास्मिथ, जम्स
  नाहन (सिरमूर)
  निआम-निआम
  निआमति
  निआस
  निओबिअम्
  निकल
  निकाराग्वा
  निकी
  निकोबार
  निकोमेडिया
  निकोलस
  निकोसिया
  निंगपो
  निघासन
  निजामअल्ली
  निजामउल्मुल्क
  निजामशाही, अहमदनगरची
  निझामत-इ-जनुब
  निझामत-इ-मध्रीब
  निझामत-इ-मश्रिक
  निझामत इ-शिमाल
  निझामपट्टम
  निझामाबाद
  निझामी
  निझ्निनोव्ह गोरॉ़ड
  निडगुंडी
  निडशिंगी
  नित्शे, फ्रेडरिक
  निद्रापस्मार
  निनेव्हे
  निनोमिय सोन्टोकु
  निपाणी
  निप्पुर
  निफाड
  निंब
  निंबहेर, जिल्हा
  निबार्क
  निंबाळकर
  निबें
  निमराण
  निमि
  नियामतखान
  निरगुन्डा
  निरंजनमाधव
  निरंजनस्वामी
  निरा कालवा
  निराजी रावजी
  निराशावाद
  निरुत्क
  निर्णायक
  निर्मलसाधु
  निर्मळ
  निर्वाण
  निलंग
  निलफामारी
  निलिलीन
  निलीय
  निवडुंग
  निवृत्तिनाथ
  निश
  निशापुर
  निशोत्तर
  निषाद
  निसर्गवाद
  निसिवस
  निहाल
  निळारी
  निळो मोरेश्वर
  निळो सोनदेव
  नीग्रो
  नीतिशास्त्र
  नीपर नदी
  नीबुहर, कारस्टेन
  नीमच
  नीरो
  नील
  नीलकंठ दीक्षित
  नीलकंठशास्त्री थत्ते
  नीलकलमी
  नीलगिरी
  नीलगिरीवरील लोक
  नीलगिरी संस्थान
  नीलमणि
  नीलरक्तपित्त
  नीलांबरशर्मा
  नीस्टर नदी
  नीळ
  नीळकंठ धर्मपूरकर
  नीळल
  नुझवीद
  नुनगर
  नुनिया लुनिया
  नुर्स
  नुवरएलिया
  नूरजहान
  नूरपूर
  नूरमहाल
  नूरुद्दीन महसूद
  नूशेरवान अदल
  नूह
  नृत्य
  नृसिंह
  नेगापट्टम्
  नेताजी पालकर
  नत्ति
  नेत्रकोणा
  नेत्ररोग
  नेदर्लंड
  नेपल्स
  नेपाळ

 

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .