प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ - बडोदें

नेमाड जिल्हा– (१) इन्दूर संस्थानांतील अगदीं दक्षिणेकडील एक जिल्हा. नर्मदेच्या दोन्ही तीरांवर हा जिल्हा वसलेला असून याचें क्षेत्रफळ ३८७१ चौ.मै. व लोकसंख्या (१९११) ३४८४५०. ह्या जिल्ह्यांत एकंदर ४ शहरें व १२७० खेडीं आहेत. नर्मदेच्या प्रदेशांतील जमीन फार सुपीक आहे. इतर भागांत सातपुड्याचा डोंगराळ प्रदेश आहे. १६ व्या शतकांत येथील जंगलांत रानटी हत्ती बरेच सांपडत असत.

उत्तरेकडून दक्षिण हिदुस्थानांत प्रवास करणारांस याच जिल्ह्यांतून जाणार्‍या मार्गाचा अवलंब करावा लागत असे. तिसर्‍या शतकांत येथें हैहय राजे रहात असून माहिष्मती (महेश्वर) ही त्यांची राजधानी होती. ९ व्या शतकांत माळव्याचे परमार येथें रहात असत, असें ऊन, हरसूद, सिधान, आणि देवला येथें असलेल्या जैनधर्मीय व इतर देवलयांवरून दिसून येतें. १३ व्या शतकांत मुसुलमान आले तेव्हांपासून हा जिल्हा कमीअधिक प्रमाणानें दिल्लीच्या छत्राखालीं राहिला. स. १४०१ पासून हा जिल्हा माहूच्या मुसुलमान राजांच्या ताब्यांत गेला व १५३१ सालीं गुजराथच्या बहादुरशहाच्या ताब्यांत गेला व नंतर १५३४ सालीं हुमायूनाच्या ताब्यांत गेला. अकबरानें जेव्हां माळवा घेतला तेव्हां १५६२ सालीं हा जिल्हा  त्याच्याकडे गेला व ह्याचा माळव्याच्या सुभ्यांत समावेश करण्यांत आला. ह्या जिल्ह्याच्या बर्‍याचशा भागाचा बिजागड सरकारांत समावेश होत असून मुख्य ठाणें जलालाबाद येथें आहे. विजागडचा किल्ला विजा नांवाच्या गाली नायकानें १३ व्या शतकांत बांधला अशी आख्यायिका आहे. औरंगझेबाचे कारकीर्दीत नेमाड जिल्ह्याचा औरंगाबादच्या सुभ्यांत प्रवेश होत असे. १७ व्या शतकाच्या अखेरीस मराठ्यांनीं ह्या जिल्ह्यांत प्रवेश केला. १६९० सालीं त्यांनीं धरमपुरी घेतलें, पण पेशव्यांच्या सत्तेचा ह्या प्रदेशावर सन १७४० व १७५५ च्या मध्यें जम बसला. मराठ्यांच्या अमदानींत ह्या प्रदेशाचें सर्व वैभव नष्ट झालें. सन १७६४ आणि १७८८ च्या दरम्यान हा जिल्हा होळकर, शिंदे व धारचे पवार ह्यांच्या ताब्यांत जाऊन वांटणी करण्यांत आलीं व सन १८०० व १८१८ च्या दरम्यान तर मराठे व पेंढारी लोकांच्या लुटालुटीस व अंदाधुंदीस हा जिल्हा बळी पडला. १८२३ सालीं ग्वाल्हेर येथें जो तह झाला त्यांत नेमाड जिल्ह्याचा शिंद्यांकडे असलेला बहुतेक भाग ब्रिटिश अमलाखालीं आला. १८५५ सालीं ह्या जिल्ह्याची अर्धी लोकसंख्या कमी झाली होती. मुख्य व्यवस्था इंदूरच्या रेसिडेन्टच्या देखरेखीखाली आहे. १८६१ सालीं हा जिल्हा पूर्णपणें ब्रिटिशांच्या ताब्यांत आला व १८६४ सालीं ह्या जिल्ह्याचा मध्य प्रदेशांत समावेश करण्यांत आला होता पण १८६७ सालीं होळकरांस दक्षिणेंतील कांहीं जमिनीच्या बदलीं मोबदला म्हणून हा परत देण्यांत आला. हा जिल्हा एका सुभ्याच्या हाताखालीं आहे. ह्या जिल्ह्याचे एकंदर ११ परगणे केले आहेत.

(२) मध्यप्रांत. नर्मदा विभागाचा एक जिल्हा. हा खानदेश व मध्यहिंदुस्थानांतील संस्थानांच्या लगतचा, नर्मदेच्या खोर्‍याच्या व सातपुड्याच्या डोंगरसपाटीच्या अगदीं पश्चिमेकडील कांहींसा डोंगराळ व कांहींसा सपाट असा प्रदेश आहे. हा जिल्हा म्हणजे पूर्वींच्या ‘प्रान्त नेमाड’चा एक लहानसा भाग आहे. नर्मदा नदी दूरपर्यंत याच्या उत्तर सीमेवरून वहाते. नर्मदा नदीला पुनासा येथें एक ४० फूट उंचीचा धबधबा असून येथून १२ मैलांवर मांधाता बेट आहे. अबना व सुकता नद्यांचा प्रदेश फार सुपीक आहे. दक्षिणेकडे सातपुड्याच्या पहाडाची मुख्य ओळ असून येथें ‘असिरगड’ आहे. ह्या भागांतून तापी नदी वहात असून जवळच बर्‍हाणपूर आहे. नर्मदेच्या कांठचा थोडासा प्रदेश सोडून सर्व जमीन खडकाळ आहे. लागवड केलेली पिकाऊ जमीन सोडून सर्वत्र जंगल आहे. ह्या भागांत तिरवाडीचें गवत उगवत असून त्यापासून तेल काढतात. यांत वाघ, चित्ते, सांबर, काळवीट व जंगली कुत्रेहि आढळतात. हवा निरोगी आहे. उन्हाळ्यांत उष्णता फार भासते.  पाऊस सरासरी ३२ इंच असतो. जरी इतर जिल्ह्यांत मानानें पाऊस फार कमी पडतो तरी पण कापूस व ज्वारीच्या पिकास तो फार फायदेशीर असतो.

इतिहास.– याचा व इंदुरी नेमाडचा इतिहास सामान्यतः एकच आहे, व त्यामुळें तो येथें स्वतंत्रपणें देण्याचें कारण नाहीं.

खांडवा येथें पूर्वी जैन लोक पुष्कळ रहात असत. बर्‍हाणपूर येथें १६ व्या शतकांत बांधलेल्या दोन मशिदी आहेत. पैकीं एकींत कोरलेले दगड बसविले असून मशीद फारच सुंदर आहे. मांधाना येथें एक शिवलिंग आहे. आणि तेथेंहि वेगळ्या वेगळ्या वेळी बांधलेलीं पुष्कळ देवळें आहेत. क्षेत्रफळ ४२२७ चौ.मै. व लोकसंख्या (१९२१) ३९६५५४. यांत दोन गांवें (खांडवा व बर्‍हाणपूर)  व १०१९ खेडीं आहेत. जिल्ह्याचा बराचसा भाग लागवडीच्या अभावीं पडीत आहे. शेकडा ८६ लोक हिंदू आहेत. बर्‍हाणपूर येथें मुसुलमानांची संख्या बरीच आहे.

भाषा.– खेडवळ लोक नेमाडी भाषा बोलतात. भिल्ल लोकांची भाषा हिंदी व गुजराथी ह्या दोन भाषांची भेसळ आहे. बर्‍हाणपूर तहशिलींत कांहीं लोक खानदेशी-मराठी भाषा बोलतात. मुसुलमान उर्दू भाषा बोलत असून कोरकू लोक कोरकू भाषाच बोलतात. कोरकू लोक व मध्यहिंदुस्थानांतील भिल्ल लोक पहाडी प्रदेशांत रहातात. उत्तर हिंदुस्थानचे रजपूत, मुसुलमान व गुजर लोक खांडव्याच्या सपाटीच्या प्रदेशांत रहातात.

लोक.– रजपूत, ब्राम्हण, बनिया, कुणबी व गुजर ह्या मुख्य ज्ञाती होत. ब्राम्हण ज्ञातीचे नागर व नार्मदेव असे दोन पोटविभाग आहेत. नागरी ब्राम्हण हे ग्रामपुरोहित, कुळकर्णी, पाटील किंवा पाठशाळाशिक्षक असतात. व नार्मदेव हे नर्मदातटाकीं रहाणारे ब्राम्हण होत. गुजर आणि कुणबी हे लोक विशेषतः शेतकीकडे लक्ष घालतात. भिलाल लोक अतिशय बेइमान व दारुडे लोक आहेत. भिल्ल लोक इस्लामी धर्माचे आहेंत असे दाखवितात. कोरकू लोक मात्र कांहींसे सुधारलेले आहेत. शेंकडा ६७ लोक शेतकीवर उपजीविका करतात.

नद्यांच्या कांठच्या प्रदेशांत चांगल्यापैकीं काळी जमीन आहे. डोंगरसपाटीवर व उच्च प्रदेशांतील तपकीरी रंगाची जमीन आहे. त्या जमीनींत पावसाळ्यांमध्येंच पीक निघूं शकतें. ज्वारी व कापूस हीं येथील प्रमुख पिकें होत. तंट्याभिल्ल नांवाच्या प्रसिद्ध डाकूला पकडण्याच्या कामांत मदत केल्यावरून कांहीं लोकांस नियमितकालपर्यंत कांहीं खेडीं दिलीं आहेत. साडेपांचशें चौ. मैलांहून अधिक जमीन रयतवारी पद्धतीवर कांहीं जमीन ‘मालिक मकनुजा’ आहे व कांहीं ‘सीरहक्काची’ आहे. १९५१ चौ.मै. जमीन जंगलमय आहे.

शेती.– नर्मदाकांठच्या काळ्या जमीनींत गहूं वगैरे पेरतात. चणा, तांदूळ, तीळ, व कांहीं जमिनींत सरकारच्या परवानगीनें गांजा पिकवितात. सध्या कापसाचें पीक जास्त प्रमाणावर होऊं लागलें आहे. बर्‍हाणपूर तहसिलींत तर कापूस इतका पेरतात कीं ज्वारीचें पीक देखील पुरेसें काढीत नाहींत. वसंतऋतूंतील पिकाला पाटाचें पाणी देण्याची चाल आहे. ही पद्धत मध्यप्रान्तांत इतरत्र कोठेंहि नाहीं. मध्यप्रांतांत पिकाला विहीरीचें पाणी देतात. अंदाजे १७०६ चौरस मैल जंगल राखून ठेवलेलें आहे. तापीच्या खोर्‍यांतील जंगल लागवडीकरितां तोडावयाचें आहे. नर्मदेच्या पहाडांतील जंगलांत त्याचप्रमाणें तापीच्या वरील खोर्‍यांतील जंगलांत किंमतवान सागवानी इमारती लांकूड होतें. उत्तर व दक्षिण पहाडांतील लोक गुरें पोसण्याचा धंदा करितात. वर्‍हाड व खानदेशांतील कापसाच्या कारखान्याकरितां जळाऊ लांकूड जातें. चांदवड, बरवई, व छोटातवा नदीच्या भागांत लोखंड धातू सांपडते. व बर्‍हाणपूरजवळ चुनखडी सांपडते.

व्यापार.– शेतकीकडील लोक सोडून इतर लोक व्यापारी मालाची नेआण करण्यांत गुतंलेले आढळतात. खांडवा व इतर मुख्ख खेड्यांत जाडें-भरडें कापड तयार होतें. बर्‍हाणपूरला रेशमी कापड विणतात व सोनेरी व रुपेरी लेसहि तयार करतात. बर्‍हाणपूरला काचेच्या हंड्या होतात. ह्या जिल्ह्यांत बरेच कापूस दाबण्याचे कारखाने आहेत. खांडवा येथें एक तेलाची गिरणी असून एक इमारती लांकडाची जंगी वखार आहे. कच्चा कापूस, सरकी, तीळ, ज्वारी हा माल मुख्यत्वें करून बहेर पाठविला जातो. कापसाचा व्यापार मुसुलमान भाटिया लोकांच्या हातांत आहे. ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वेची लाईन या जिल्ह्यांतून जाते. बर्‍हाणपूर व खांडवा हीं जोन मोठीं स्टेशनें याच लाईनवर आहेत. येथून इन्दूरकडेहि एक छोटी लाईन जाते.
    
दुष्काळ.— सन १८०३ सालीं ह्या जिल्ह्यात मोठा दुष्काळ पडला होता. त्याला ‘ महाकाल ’ असें म्हणतात. दुसरा दुष्काळ १८४५ सालीं पाऊसपाण्याच्या अभावी पडला.या वर्षी तीन लाख रुपये सार्‍याची माफी देण्यांत आली होती. १८९७ सालचा दुष्काळ कांहीं मोठासा जाचला नाहीं. कारण १८९५ सालीं पाऊसपाणी चांगले पडून कापसाचें पीक उत्तमपैकीं आलें होतें. या जिल्ह्याचा कारभार मध्यप्रांतांतील इतर जिल्ह्याप्रमाणेंच आहे.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .