प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग सतरावा: नेपाळ - बडोदें   

पथ्यापथ्यविचार- पथ्य म्हणजे (शरीरास) हितकर व अपथ्य म्हणजे अहितकारक हा अर्थ दृष्टीसमोर ठेवून आहारांत येणार्‍या पदार्थांचा विचार या लेखांत सामान्यत: आधुनिक समजुतीप्रमाणें केलेला आहे. जुन्या समजुतीप्रमाणें अमुख पदार्थ वातुळ व तमुक पदार्थ पित्तकर असें मोघम विधान न करतां अन्नाचे (१) नत्रयुक्तपौष्टिक, (२) पिष्टमय, (३) वसामय, व (४) क्षारयुक्त, असे जे प्रकार अन्न या सदराखालीं वर्णिलेले आहेत त्यांपैकीं नानाविध रुग्णस्थितींत व शैशव, वार्धक्य, गर्भिणी इत्यादि शारीरिक अवस्थांत कोणते पदार्थ इष्ट व कोणते अनिष्ट याचें विवेचन त्या त्या स्थळीं बहुतेक केलेलें आहेच तथापि सामान्यत: या विषयाचें आणखी थोडें विवेचन केल्यानें तो सुबोध होऊन त्यांत अद्याप न आलेलीं अंगें समाविष्ट करतां येतील. अन्नाचें शरीरांतील मुख्य कार्य म्हणजे त्याच्या पचनानें (ज्वलनानें) शरीरांत उष्णता, चैतन्य व शक्ति उत्पन्न होते. तसेंच अन्नामुळें शरीराची रोज होणारी झीज भरून येते, व त्यामुळें शरीरांतील पाचक रस व इतर उपयुक्त प्रवाही पदार्थ आणि रचना निरोगी व कार्यक्षम स्थितींत राहतात. वरील सर्व प्रकारच्या अन्नांमध्यें न पचणारे असे चोथट, तंतुमय व जड पदार्थ असतात त्यांची विष्ठा बनते. ज्या अन्नांत हे टाकाऊ पदार्थ अधिक सांपडतात ते पैशाच्या दृष्टीनेंहि प्राय: स्वस्त असतात. मांसादींच्या अर्कामध्यें व रसामध्यें उत्तेजक व रुचीस दीपन करण्याचे गुण आहेत. स्निग्ध अगर वसामय पदार्थ व पिष्टमय पदार्थ हेहि नायट्रोजनयुक्त पदार्थांप्रमाणें शरीरांत उष्णता, चैतन्य व शक्ति उत्पन्न करतात व यांचा फाजील पुरवठा झाल्यास तो शरीरांत मेदोरूपानें रहातो. प्राण्यास व मुनष्यास बंद कोठडींत कोंडून त्याच्या श्वासाबरोबर आंत जाणारी शुद्ध हवा व बाहेर येणारी अशुद्ध हवा, त्याचे मलमूत्रादि सर्व मल व त्यानें खाल्लेलें अन्न या दोहोंच्या आय व व्ययाविषयीं नाना प्रकारचे हजारों प्रयोग केले आहेत व हिशोब बसविले आहेत.

नानाविध व्यवसाय व धंदे करणार्‍या, उपाशी व काम करीत असणार्‍या लोकांवर हजारों प्रयोग करून कोणत्या स्थितींत कोणता आहार मानवतो यांचीं प्रमाणें शोधून काढलीं आहेत. तसेंच कोणत्या अन्नापासून किती उष्णता मिळूं शकते या तत्त्वावर नाना धंद्यांतील लोकांचा आहार ठरवतां येतो. बौद्धिक कामें करणें हा शक्तीचा व्ययच असल्यामुळें अशा व्यवसायी लोकांनां युक्त आहार कोणता व नाना प्रकारच्या अन्नांत वर सांगितलेल्या चार प्रकारच्या सत्वांचें शेंकडा प्रमाण किती याचीं पुष्कळच कोष्टकें उपलब्ध आहेत; तीं सर्व देणें शक्य नसल्यामुळें कांहीं पुढें दिलीं आहेत.

विविध अन्नांतील सत्वांश
अन्नाचा प्रकार नत्रयुक्तपदार्थप्रोटीन शें. स्निग्धवसामय शें. पिष्टपदार्थ शें.
मांस ९८ ९८ ...
मासे ९६ ९७ ...
कोंबडी, बदकें ९६ ९७ ...
अंडी ९७ ९८ ...
दूध, लोणी ९७ ९६ ९८
केवळ मांसाहार ९७ ९७ ९८
बटाटे ७३ ... ९८
मुळे, नवलकोल, इ. ७२ ... ९७
कोबी वगैरे ... ... ८३
द्विदलधान्यें, डाळी ७८ ९० ९५
ओट धान्याचें पीठ ७८ ... ९७
मका ८० ... ९९
गिरणीची कणीक ८३ ... ९३
घरीं दळलेली कणीक ७५ ... ९२
पाव ८८ ... ९८
तांदुळ ७६ ... ९१
कोंड्यासकट भाजलेला पाव ८२ ... ९४
तांदुळ ७६ ... ९१
फळें, खारिक, खजूर इ. ८० ८६ ९६
साखर, पिष्ट पदार्थ ... ... ९८
केवळ शाकाहार ८५ ९० ९७
मिश्र (शाक व मांस) आहार ९२ ९५ ९७


वरील कोष्टकावरून प्रोटीन (औजसद्रव्य) स्निग्ध व पिष्ट पदार्थाच्या प्रमाणाचें वैचित्र्य दिसून येतें. एकंदरीनें मांसामध्यें प्रोटीन व स्निग्धांचे व शाकपदार्थांत पिष्टाचें आधिक्य असतें. खवा, साय व मलईमध्यें प्रोटीन व स्निग्ध यांचे प्रमाण मोठें आहे. पण कोणत्याहि पदार्थांत ही पौष्टिक सत्त्वें अधिक प्रमाणांत कोष्टकांत दिसलीं तरी त्या पदार्थाचा पचनास हलकेपणा अगर जडपणाचा विचार कर्तव्य आहे.

उदा.- साय ही पचनास जड आहे. सर्व धान्यांत पिष्ट पदार्थ विपुल (२/३ ते ३/४ या प्रमाणांत) असतो व तो पौष्टिक आहे. कपाशी, करडई, भुइमूग, ऑलिव्ह फळें यांपासून विपुल गोडें तेल निघतें. खजूर खारिकांदिमध्यें प्रोटीन व स्निग्ध पदार्थ बरेच असतात; फळांत शर्करा बहुत असते. पालेभाजांत पौष्टिक व चैतन्योत्पादक गुण नसतात. तरी अतिउपयोगी क्षार व अ‍ॅसिडें असल्यामुळें रक्ताच्या व इतर रचनांच्या आरोग्यासाठीं त्या अवश्य आहेत. आहारांतील पदार्थांत चारी प्रकारच्या सत्त्वांपैकीं एखादें कमी प्रमाणांत असल्यास त्याचें पौष्टिक कार्य दुसर्‍या प्रकारचें सत्त्वान्न कांहीं मर्यादेपर्यंत करूं शकतें. आहारांत कमतरता पडल्यास (उदा.-उपवासामध्यें) शरीरांतील नायट्रोजनयुक्त व वसामय रचनांची झीज होऊन शरीरव्यापार चालतात व अशी शिल्लक वसा वगैरे पदार्थ शरीरांत असतात त्यांच्या जोरावर कमी अधिक श्रम, दुखणीं, उपवास, चिंता इत्यादि आपत्तींमध्यें अल्पहारावर प्राणी राहूं शकतो. बुद्धिवर्धक अन्न कोणतें याचा नक्की शोध लागला नाहीं. तथापि मत्स्याहारामध्यें फॉस्फरस अधिक म्हणून त्यांत व बदामांत वगैरे हा धर्म असल्याची समजूत आहे पण ती निराधार आहे. अन्न हें सर्पण आहे व त्याचें शक्तींत रूपांतर होतें हा उष्णताविषयक नियम प्राण्यांसहि लागू आहे. नवीन व आपोआप शक्ति प्राण्यांत अन्नाशिवाय येणें शक्य नाहीं; व या सर्पणाच्या हिशोबाच्या मानानेंच चैतन्य व शक्ति प्राण्यांत प्रगट होते. तथापि अन्नांतील चोथट भाग, जो उष्णता उत्पन्न करीत नाहीं तो प्रयोगाच्या हिशोबांत वगळावा लागतो. एक क्यालरी म्हणजे एक किलोग्राम पाणी एक सॅटिग्रेडपर्यंत तपासण्यास जी उष्णता लागते तीस माप समजून त्या मापानें हरएक तर्‍हेचें अन्न प्राणवायूंत जाळण्यास किती उष्णता लागते हें प्रयोगानें पाहिलें आहे. हे प्रयोग अगदींच पूर्णपणे प्रमाणभूत नसले तरी बरेच विश्वसनीय आहेत. प्रोटीन अन्न, पिष्टमय अन्न व स्निग्धान्नाचा एकेक ग्राम जाळण्यास अनुक्रमें ४.१, ४.१५ आणि ९.४० क्यालरी उष्णता लागते असा ठोकळ हिशोब आहे. खालील कोष्टकांत या रीतीनें नाना प्रकारच्या अन्नांचें पृथक्करण व ज्वलनशक्ती दर्शविल्या आहेत.

अन्नाचे प्रकार, त्यांतील द्रव्यें व ज्वलनशक्ति.
अन्नाचे प्रकार चोथा पाणी प्रोटीन स्निग्ध पिष्टान्न खनिज ज्वलनशक्ति
बदाम, अक्रोड वगैरे फोडून खाण्याचीं फळें ४५-५८ २.७ ११.५ ३० ९.५ १.१ १३००-१५००
स्ट्रॉबेरी, संत्रीं, द्राक्षें, केळीं, सफरचंद, टोम्याटो इ. २५-३५ ४५-५५ .८ .४ १४ .४ २९५
बटाटे २० ६२ १.८ .१ १४.७ .८ २००-२९५
कोबी, नवलकोल, कालीफ्लावर १५-२० ७० १.३ .१ ७.७ .९ १६०
घेवडे, वाटाणे १०-१२ १२ २२.५ १.८ ५९ ३.५ १५३०
पिठी-पीठ-स्टार्च ... ... ... ... ९० ... १६८०
साखर ... १२.६ २२.५ १.८ ५९.६ ३.५ १५२०
बिस्किटें ... ६.८ ९.७ १२.१ ६९.७ १.७ १९२५
गिरणीच्या पिठाचा पाव ... ३५.३ ९.२ १.३ ५३.१ १.१ १२००
गिरणीच पीठ ... १२ ११.४ ७५.१ .५ १६३५
तांदूळ ... १२.३ ८० .३ ७९ .४ १६२०
मका (पीठ) ... १२.५ ९२ १९ ७५.४ १० १६३५
ओट ... ७.७ १६.७ ७.३ ६६.२ २.१ १८००
दूध (सायरहित) ... ९०-९५ ३.४ .३ ५.१ .७ १६५
दूध (तापवलेलें) ... ८७ ३.३ ४.० ५.७ .७ ३१०
खवा, साय, मलई ... ३४.२ २५.९ ३३.७ २.४ ३.८ १८८५
लोणी व डुकराची चरबी ... ११ १.० ८५ ... ३० ३४१ व ३५५५
कालवें, नाना तर्‍हेचे मासे ३०-४४ ४०.२ १६ .४ ... १८.५ ३००-९००
अंडीं ११.२ ६५.५ १३.१ ९.३ ... .९ ६३५
बदकें १७.६ ३८.५ १३.४ २९.८ ... .७ १४७५
विलायती कोंबडा (टर्की) २२.७ ४२.४ १६.१ १८.४ ... .८ १०६०
कोंबडीचें पिलू २५.९ ४७.१ १३.७ १२.३ ... .७ ७६५
डुकराच्या मांसाचे (खारवलेले) स्थानपरत्वें प्रकार १३-१९ ४८ १३.५ २५.९ ... ६.८ १३००-१६००
मेंढीच्या मांसाचे (स्थानापरत्वें) प्रकार १६-१८ ५१ १५ १४.५ ... .८ १४००-१७००
वांसराच्या मांसाचे नाना (स्थानापरत्वें) प्रकार १६-२१ ५७.५ १६.५ ... .९ ६२५-७४५
म्हैस व गोमांसाचे (स्थानपरत्वें) प्रकार १६-२० ५२-५६ १५-१६ १७-२१ ... .८ १०२५-११३५

हे प्रयोग यूरोप, अमेरिका व जपानांतील स्त्री, पुरुष, मुलें, सैन्य व आरमारांतील शिपाई, ऑफिसर, मजूर, तांदूळ कांडणारे, लांकूडफोडे व धोंडफोडे, पैलवान, कैदी, कसबी, कारागीर, चांभार, शिंपी, विद्यार्थी, व्यापारी, वैद्यक शिकणारे विद्यार्थी, डॉक्टर, म्हातारे बैठें काम करणारे वगैरे सर्व दर्जाच्या लोकांवर केले आहेत. समान स्थितींतील स्त्रीपेक्षां पुरुषाचा आहार अधिक असतो व मुलांपेक्षा स्त्रियांचा आहार अधिक. तसेंच बैठेंकाम करणार्‍यापेक्षां अंगमेहनत करणारा अधिक खातो. साधारण मेहनत करणारा पुरुष हा मूलभूत प्रमाण कल्पिलें तर जास्त मेहनम करणारा त्याच्या १.२ पट खातो. तसेंच त्याच्या .९ पट १६ वर्षांचा मुलगा अगर बैठेंकाम करणारा पुरुष; १३ वर्षांचा मुलगा व १५ वर्षांच्या मुलीचा आहार .८ पट; अशक्त बाई व १२ वर्षांचा मुलगा अगर १३ वर्षांच्या मुलीचा आहार .७ पट; १०-११ वर्षांचा मुलगा अगर मुलीचा आहार .६ पट; सहा ते नऊ वर्षांचें मूल आणि २ ते ५ वर्षांचें मूल यांचा आहार अनुक्रमें .५ व .४ पट व त्याखालील वयांत .३ आहार असतो. हे हिशोब भूमितीच्या सिद्धांताप्रमाणें बिनचूक आहेत असें मानीत नाहींत. पण ते विश्वसनीय व विचारार्ह आहेत.

आतां कोणी किती अन्न खावें हें कोष्टकावरून ठरवितां येईल; परंतु ज्याच्या कोठ्याला जें अन्न अनुभवानें पचतें व मानवतें तेंच त्याचे पथ्यकर होय. दूध, अंडीं, मांस, गहूं हीं व असले पदार्थ पौष्टिक व पथ्यकर खरे, परंतु निरोगी असणार्‍या कित्येक व्यक्तींनां ते पचत व मानवत नाहींत. म्हणून ''एकास जें पथ्यकर तें दुसर्‍यास विषमय होय,'' ही सार्थ म्हण पडली आहे. या कामीं दुराग्रह व ठाम नियम बसवितां येत नाहीं, व रुचि आणि व्यक्तिवैचित्र्य हेंच कारण मानून त्या व्यक्तीस पथ्यकर आहार दिला पाहिजे. आतां एवढें खरें कीं अशी लहरीरुचींच्या व्यक्तींची संख्या मोठी नसल्यामुळें वरील कोष्टकांत पौष्टिक व पथ्यकर जे पदार्थ दिले आहेत त्यांचे गुणधर्म बहुतेक लोकांपुरते खरे मानून चालण्यास कांहीं हरकत नाहीं. मात्र हीं कोष्टकें एकेक व्यक्तीचा आहार ठरविण्यापेक्षां सैन्य, आरमार, तुरुंगशाळा इत्यादींतील व्यक्तिसमूहांचे आहार ठरविण्यास विशेष उपयुक्त आहेत.

अन्नास शिजवणें वगैरे संस्कार करण्यानें तें पथ्यकर बनतें. कारण पुष्कळ प्रकारचें जें अन्न त्याच्या स्वाभाविक म्हणजे न शिजवलेल्या अगर भाजलेल्या स्थितींत भक्षिलें असतां पौष्टिक व पथ्यकर एरवीं झालें नसतें तें भाजल्यानें अगर शिजविल्यानेंच पचनास योग्य होतें; आपणास अनुभवहि असाच येतो कीं उष्णतेनें धान्य मांसादींचें स्वरूप पार बदलून अन्न चर्वण व विविध पचनरसांच्या संस्कारास अनुकूल स्थितींत तयार होतें व त्याचा उग्र वास व स्वरूप मावळून तें दिसण्यांत अधिक सुंदर व खाण्यास रुचकर बनतें व त्याच्या स्वादिष्ट वासानेंच घ्राणेंदिय उद्दीपित होऊन तोंडांत लाळ सुटून मनुष्य मिटक्या मारतो व त्यामुळें जठररसादि पाचक रस उद्दीपित होतात; व ह्या गोष्टी पूर्ण अन्नपचनास आवश्यक आहेत. दुसरा शिजवण्याचा उपयोग हा आहे कीं, दिसण्यांत शुद्ध असे जे हिरव्या स्थितींतींल अन्नांत स्वाभाविक प्राणिज व उद्भिज्ज जंतू व सूक्ष्म कृमी असतात ते अन्न शिजतांना मृत झाल्यामुळें आरोग्यवृद्धि होते. मांसादि अन्न व बिनमांसाचें अन्न हें स्वभावत: या जंतूंमुळें लवकर नासण्यासारखें असल्यामुळें त्याचें सांठवण, जपणूक, व शिजवणें यांत अत्यंत निष्ठापूर्वक स्वच्छता ठेवली पाहिजे. मनुष्यास ती स्वच्छता जर पाहिजे असेल तर जें आपण खातों त्यांत आपल्या आरोग्यासाठीं व मनास निर्मळ वाटावें म्हणूनहि अत्यंत दक्षता अगोदर ठेवली पाहिजे. त्यानंतर शारीरिक व स्त्रीची, घरादाराची व गांवाची, आणि देशाची स्वच्छता होय असेंहि म्हणण्यास हरकत नाहीं. खाण्याच्या जिनसांत किडे, कृमी सांपडतात व नवे उत्पन्न होतात ते न कंटाळतां निवडले पाहिजेत. घाणेरड्या जागेंत उघड्यावर अन्न, धान्य, फळें, मीठ, भाज्या, इत्यादि पदार्थ ठेवतां कामा नये, घाणेरड्या भांड्यांत अन्न वाढूं नये व घाणेरड्या माणसांकडून अगर घाणेरड्या जागेंत स्वयंपाक करूं नये. याविषयींचे सर्व नियम व आचार पाळणें श्रेयस्कर आहे.

अन्नाच्या स्वस्ताई व महर्गतेचा विचार करून पथ्यकर कोणतें हेंहि कळलें पाहिजे. जें स्वस्त तें उत्तम ही व्यावहारिक म्हण अन्नाच्या बाबतींत जरा दृष्टीआड केली पाहिजे. जे खाण्याचे पदार्थ दिसण्यांत सुंदर, स्वादिष्ट व खर्चानें महाग ते तेवढे चांगले असाहि अर्थ नाहीं. अन्नाचा महागपणा त्याच्या पथ्यकर गुणावर नसतो तर तो जिभेस चवदार व गिर्‍हाईकांच्या त्यावर उड्या असल्या म्हणजे तो महागतो, व म्हणून अमुक प्रकारचें धान्य, फळें, भाजी, अगर मांस व मासे महाग आहेत म्हणून ते पथ्यकर व पौष्टिक आहेतच असें मानूं नये. प्रोटीन हें पथ्यकर सत्त्व, मांसांत व शाकाहारांतहि असतें परंतु दोन्ही प्रकारचें अन्न खाणार्‍यांचा अनुभव असा आहे कीं मांसान्न पचनास हलकें असून चवीस विशेष लज्जतदार असतें, व म्हणून या दृष्टीनें विचार केल्यास समान वजनाच्या दोन्ही प्रकारच्या अन्नांपैकीं मांसान्नास अंमळ किंमत जास्त द्यावी लागली तरी पोषणाच्या दृष्टीनें तें स्वस्त व शहाणपणाचें असें मानणें चूक नाहीं. परंतु हा रुचीचा व आवडीनावडीचा प्रश्न आहे. जें अन्न केवळ लज्जतदार आहे व पौष्टिक धर्म मात्र ज्यांत मध्यम आहेत असें अन्न जास्त पैसे देऊन खाणें हें अंगावर दागिने घालण्याप्रमाणें चैनीची गोष्ट होय व ती ऐपतदारांनीं वाटल्यास करावी, पण ती अन्नाच्या काटकसरीच्या दृष्टीनें अयोग्य आहे. जें आरोग्यवर्धक, स्वस्त, स्वच्छ व पौष्टिक तेंच उत्तम व स्वस्त अन्न असें मानून चालावें, किंमतीची बाजू लक्षांत ठेवून निरनिराळ्या अन्नांचें महत्त्व दर्शविणारें कोष्टक खालीं दिलें आहे. तें कांहीसें मार्गदर्शक आहे पण त्यांत चुकीचा संभव आहे हें विसरूं नये.

निरनिराळ्या अन्नांचें महत्त्वदर्शक कोष्टक.
बारा आण्यांस विकत मिळणारे पदार्थ
अन्नाचे प्रकार दर रत्तलीकिंमत सर्व प्रकारचेंअन्न, रत्तल. एकंदर पौष्टिक द्रव्यें. अन्नज्वलनशक्ति(क्यालरी)
प्रोटीन स्निधान्न पिष्टान्न
साखर ४३ ६.८ ... ... ६.८ १२७६०
शेंगा, घेवडे वगैरे ४२ ४.० १.०५ .१० ३.४७ ८९६०
बटाटे ४२ १५.० .२५ .०२ ३.६० ५६०५
तांदूळ ४३ ५.५ .४५ .०२ ५.२७ १०७९५
ओटधान्य (पीठ) ... ... १.११ .५४ ५.५४ १४८३५
कणीक ४२ ५.६४ .७२ .०७ ६.०१ १२११०
पाव ४२ १०.६७ .७६ .१३ ५.५७ १२४२१
खवा  ४८ १.५० .६० .७७ .०४ २८६५
अंडीं (१२ आणे डझनप्रमाणें) ४८ १.०० .१९ .१३ ... ६३५
लोणी ४१२ .६७ .०१ .५४ ... २३२०
साय काढलेलें दूध ४६ ८.० .४० .०३ .६१ २०८५
निरसें दूध ४८ ६.० .१९ .२३ .३० १९१५
कॉड मासा ... ३.० .३४ .०१ ... ७१०
डुकराचें मांस ४७ १.७१ .०३ १.४० ... ६०२५
मेंढीचें मांस (मटण) ४९ १.३३ .२० .२० ... १२४५
म्हशीचें व गाईचें  ४९ १.२० .१९ .२० ... १३६०


याशिवाय कांहीं विशेष परिस्थितींत असलेल्या व्यक्तिसमूहांतील दर एक व्यक्तींस देण्यास योग्य अशा आहाराचा विचार केला पाहिजे. तुरुंगांतील कैदी, धर्मार्थ भोजनालयें (दुष्काळ वगैरे आपत्तींतील) तसेंच सुधारलेल्या देशांत भिकार्‍यास भीक मागूं न देतां त्यास बंदिशाळेंत ठेवून त्यास काम करावयास लावून जेवूं घालतात; व अशक्त, वृद्ध, दुबळे, अनाथ, पोरके यांसहि सार्वजनिक खर्चानें जेवूं घालतात. त्यांनां पथ्यकर असा आहार निवडतांना ही गोष्ट लक्षांत ठेवावयाची कीं यापैकीं कांहींनां केवळ प्राणधारणेसच पुरेल एवढ्या बेताचें साधे अन्न द्यावयाचें; हेतु हा कीं, साध्याऐवजीं पुरेसें व लज्जतदार अन्न दिल्यास आळशी व ढोंगी लोकांस अनाथपणाचें सोंग आणण्यास मोह पडूं नये, अगर तुरुंगांत खाणें पुरेसें असतें म्हणून गुन्हा करून तेथें जावें अशी इच्छा होऊं नये अशाच प्रकारचें तें साधें व मोह न पाडणारें कांजी, पेज, भाकरी असें अन्न असतें. तुरुंगांत ज्याची चौकशी व्हावयाची आहे त्यांनां (जे वरून अन्न आणवीत नाहींत अशांनां) व थोड्या शिक्षेच्या कैद्यांनां अशा प्रकारचेंच अन्न देतात. तसेंच जे कैदी तुरुंगाची शिस्त मोडण्याचा गुन्हा करतात त्यांस शिक्षा म्हणून नुसत्या कांजीवर अगर नुसती भाकर व पाणी अशा अन्नावर ठेवतात, अधिक मुदतीचे कैदी तेथील कायम रहिवासी समजून त्यांच्याकडून जशीं कमी अगर अधिक सक्तमजुरीचीं कामें करून घ्यावयाचीं असतील त्याप्रमाणें साधें व मनांत न भरण्यासारखें परंतु मुबलक व पौष्टिक अन्न त्यास मिळतें. कांहीं सुधारलेल्या देशांत त्यास मजुरीचे पैसे मिळत असल्यामुळें सरकारी अन्नाखेरीज त्यास हवें असल्यास स्वत:च्या खर्चानें चहा, कॉफी, अधिक दूध, तंबाखू, विड्या वगैरे पदार्थ ठराविक दिवशीं सरकारी मक्तेदाराच्या तुरुंगांतील दुकानांत त्यास विकत घेतां येतात. त्यामुळें श्रम करून मनाप्रमाणें जिनसा मिळवण्यास व यामुळें आपलें शील सुधारण्यास त्यास संधि मिळते. ही पद्धति या देशांतील तुरुंगांत नसल्यास ती रोग्यास पथ्यकारक म्हणून अनुकरणीय आहे. हें खाणें देतांना स्त्री, पुरुष, वृद्ध, मुलें व आजारी असा फरक करून त्याप्रमाणें अन्न दिलें जातें व रोजचे दिवस आणि रविवार व थोडे सणाचे दिवस यांतील अन्नामध्यें शक्य तोंपर्यंत इष्ट बदल केला जातो. सैन्य व आरमारांतील शिपायांनां भरपूर अन्न त्यांच्या कामाप्रमाणें व कोष्टकांतील प्रमाणबद्ध रीतीनें दिलें जातें व अडचणीच्या वेळीं वाळवलेलीं फळें, भाज्या व डब्यांतील दूध, मांस व मासे, लोणी व तूप पुरविलें जातें.

   

खंड १७ : नेपाळ - बडोदे  

 

 

 

  नेपोलियन
  नेब्रास्का
  नेमाजी शिंदे
  नेमाड जिल्हा
  नेमावर
  नेयगी
  नेर
  नेलमंगल
  नेलोर जिल्हा
  नेल्लीकुप्पम
  नेल्सन, व्हायकौंट होरेशिओ
  नेवाडा
  नेवासें, तालुका
  नेसर्गी
  नेस्टोरियन पंथ
  नैनवा
  नैनीताल
  नैमिषारण्य
  नैरोबी
  नैहाती
  नोंगख्लाव
  नोंगस्टोइन
  नोंगस्पंग
  नोबिलि, रॉबर्ट डी
  नोबिलि, लिओपोल्डो
  नोबेल, ऑलफ्रेड बर्नहार्ड
  नोबोसोफो
  नोलकोल
  नोविबझार
  नोहर
  नोहा
  नोळंबवाडी
  नौकानयन
  नौखाली
  नौगांव
  नौरंगपूर
  नौशहर
  नौशेरा, तहशील
  न्याय
  न्यायपद्धति
  न्यासा
  न्युन
  न्युमिडिया
  न्यूअर्क
  न्यूकॅसल
  न्यू जर्सी
  न्यूझीलंड
  न्यूटन, सर ऐझाक
  न्यूफाउंडलंड
  न्यूबिआ
  न्यूमन, कार्डिंनल
  न्यूमार्केट
  न्यू मेक्सिको
  न्यरेबर्ग
  न्यू हॅम्पशायर
  न्यू हेवन
  न्यौंग्लेबिन
  न्हावी
 
  प-आन
  पंका
  पकोक्कू, जिल्हा
  पंगतारा
  पगन
  पंगमी
  पंच
  पंचजन
  पचघा
  पंचभद्रा
  पंचमढी
  पंचमहाल
  पंचमहाशब्द
  पंचांग
  पंचाल
  पंजाब
  पटंचरु
  पंटनव
  पटल किंवा निरनकोट
  पटवर्धन, गंगाधरशास्त्री
  पटवर्धन घराणें
  पटवर्धन, पांडुरंग नरसिंह
  पटवेकरी
  पटुआखली
  पटेल-पाटील
  पटेलिया
  पटौंडी संस्थान
  पट्टण
  पट्टदकल
  पट्टा
  पट्टिकोंडा
  पट्टी, तहशील
  पठाण
  पठाणकोट
  पठारी संस्थान
  पडदा
  पडवळ
  पडवा
  पंडित, शंकर पांडुरंग
  पंडितराव
  पंडु
  पंडूआ
  पडौंग
  पंढरपूर
  पणि
  पतंग
  पतंजलि
  पतियाळा
  पत्तुकोट्टई
  पथेंग्यी
  पथ्यापथ्यविचार
  पदार्थविज्ञानशास्त्र
  पदुआ
  पद्मगुप्त
  पद्मनाभपुरम्
  पद्मपुराण
  पद्मिनी
  पद्रोणा
  पनवेल
  पनामा
  पनामा कालवा
  पन्ना, संस्थान
  पन्हाळा
  पंप
  पपनस
  पपया
  पंपा सरोवर
  पॅंफिलिआ
  पॅफ्लॅगोनियन लोक
  पबना, जिल्हा
  पयागले
  पयोष्णी अथवा पूर्णा नदी
  परकाल
  परजा
  परडा जमीनदारी
  परतवाडा
  परधाम
  पॅरॅफिन
  परभणी, जिल्हा
  परमगुडी
  परमानंद चक्रवर्ती
  परमार घराणें
  परमेश्वर
  परलकोट जमीनदारी
  परवर
  परवूर
  परशुराम
  परशुरामभाऊ पटवर्धन
  परसगड किल्ला
  परसा भागवत
  परसुर
  परळी
  परळी वैद्यनाथ
  पॅराग्वे
  परांतिज
  पराया
  पराशर
  परिक्रमणकंपवायु
  परिंडा
  पॅरिस
  परिहार वंश
  परीक्षित
  परुषाम्ल
  परेंडा
  परोपनिषदी
  पर्क्विन, सर विल्यम हेनरी
  पर्गामम
  पर्गी
  पर्थ
  पर्लकिमेदी संस्थान
  पर्शु
  पर्सिस
  पर्सेपोलिस
  पलनाद
  पलमनेर
  पलव
  पलवल
  पलाद
  पलामऊ
  पलाली
  पॅलेर्मो
  पॅलेस्टाईन
  पलौंग
  पॅल्माइरा
  पल्लडम
  पल्लव घराणें
  पवनगड
  पवनी
  पवायान
  पवार घराणें
  पशुवैद्यक
  पसारगडी
  पहरा
  पहलवी
  पळस
  पळसगड जमीनदारी
  पळसगांव जमीनदारी
  पळासनी
  पळासविहीर
  पक्षितीर्थ
  पक्षी
  पाइनगंगा
  पाईनघाट
  पाईक
  पाऊस
  पाकपट्टन
  पाकौर खेडें
  पाखाल
  पॉगेनडार्फ, जोहान ख्रिश्चिअन
  पाच
  पांचकळशी
  पांचगणी
  पांचरात्र
  पांचाल
  पाचोरा
  पाटडी
  पाटण
  पाटणा संस्थान
  पाटणा, जिल्हा
  पाटलावडी
  पाटलीपुत्र
  पाँटस
  पाटोड
  पॉस्ट्डॅम
  पांडव
  पांडवगड
  पाँडिचेरी
  पांडु
  पांडुरोग
  पांढरकवडा
  पांढुर्णा
  पाणघोडा
  पाणतीर
  पाणबुडे
  पाणिनि
  पाणिहाटी
  पाणी
  पाणी देणें
  पाण्डुवंश
  पाण्डय
  पातन किंवा ऊर्ध्वपातन
  पातुर
  पाथरघांट
  पाथरवट
  पाथरी
  पादांगुलिक्षत
  पादांगुष्ठ वातरोग
  पाद्रा
  पानगल
  पानरोटी
  पानविभ्रम व पानासक्ति
  पानसे घराणें
  पानिपत
  पानिपतचें युद्ध
  पापनाशम्
  पाँपी
  पापीरस
  पापुअन लोक
  पांबन
  पामरस्टन, लॉर्ड
  पामिदि
  पामीर
  पायथॅगोरस
  पायरोल्यूसाइट
  पारघाट
  पारद
  पारधी
  पारनेर
  पारमार्थिक कर्म
  पारशी
  पारसनाथ
  पारसनीस घराणें
  पारिजात
  पारियात्र
  पारी घराणें
  पारोन
  पारोळें
  पार्डी
  पार्थिआ
  पार्नेल, चार्लस स्टुअर्ट
  पार्मा
  पार्लमेंट
  पार्वती
  पार्वतीपुरम्
  पार्सोली
  पाल
  पालक
  पालकोंडा
  पालकोल्लू
  पाल, ख्रिस्तोदास
  पालखेडा, जमीनदारी
  पालघाट
  पालदेव
  पालनपूर
  पालनी
  पालम
  पालमकोट्टा
  पालमपूर
  पालमिरास शिखर
  पाल राजे, बंगालचे
  पाललहरा
  पालाश
  पालिठाणा
  पालियाद
  पाली
  पाले
  पालेज
  पाल्कची सामुद्रधुनी
  पावटा
  पावागड
  पावित्र्य
  पावूगड
  पाशुपतदर्शन
  पाश्चूर, लुई
  पाषाणचुंबक
  पासली
  पासी
  पाळोन्चा
  पाळोन्चा संस्थान
  पिकांचे रोग
  पिकें
  पिंगळे
  पिचब्लेंड
  पिंजारी
  पिंजौर
  पिट, विल्यम
  पिटर दि ग्रेट
  पिटरमारिट्झबर्ग
  पिट्सबर्ग
  पिठोरो
  पिंडदादनखान
  पिंडीघेब
  पितृपूजा
  पिन्स्क
  पिपलियानगर
  पिपलोदा
  पिंपळगांव राजा
  पिंपळनेर
  पिंपळी
  पिपीलिकाभक्षक
  पिरली
  पिरामिड
  पिराव
  पिरिनीज
  पि-हो
  पिलिभित
  पिलोषण प्रांत
  पिशाच व पिशाचपूजा
  पिशुलोस
  पिसा
  पिसिडिया
  पिस्ता
  पिस्तुल
  पीठापुरम्
  पीतज्वर
  पीताम्ल
  पुकेट
  पुंगनूरु
  पुंड्र देश
  पुणतांबें
  पुणें
  पुत्तलिकाम्ल अथवा पिपीलिकाम्ल
  पुत्तुर
  पुदीना
  पुदुकोट्टई
  पुनर्जन्म
  पुन्नाट
  पुरणपूर
  पुरंदर
  पुरंदर किल्ला
  पुरंदरे घराणें
  पुराणें
  पुराव्याचा कायदा
  पुरी, जिल्हा
  पुरू
  पुरुकुत्स
  पुरुषोत्तमपूर
  पुरुरवा
  पुर्वा
  पुलगांव
  पुलयन
  पुलस्त्य
  पुलिकन
  पुलिकन सरोवर
  पुलिंद
  पुलिबेंडला
  पुली
  पुष्कर
  पुष्कलावती
  पुसद
  पुंसवन
  पुसा
  पूतना
  पुनचचें राज्य
  पूनामल्ली
  पूर्णय्या
  पूर्णा
  पूर्वआफ्रिका
  पूर्वघाट
  पृथु
  पृथ्वी
  पृथ्वीराज चव्हाण
  पृथ्वीराज रासा
  पेकिंग
  पेगू
  पेगू सित्तंग कालवा
  पेटके व लेखनादि स्नायुस्तंभत्वरोग
  पेटंट
  पेटलाद
  पेठ
  पेठापूर
  पेठे
  पेंड
  पेड्डापुरम्
  पेंढारी
  पेढ्या आणि पत
  पेण
  पेनांग
  पेनुकोंडा
  पेन्नर
  पेन्शन
  पेन्सिली
  पेपरमिंट
  पेपिन, डेनिस
  पेप्सीन
  पेंबा
  पेरंबलूर
  पेरामारिबो
  पेरॉन
  पेरिक्लीस
  पेरिंथस
  पेरिपॅटेटिक्स
  पेरिम
  पेरियाकुलम्
  पेरू
  पेरें
  पेशवे
  पेशावर
  पेस्टालोझी, जोहान हीनरिच
  पैगाह इस्टेटी
  पैठण
  पै-मुरदा
  पैल
  पैलगांव
  पैलाणी
  पो नदी
  पोकरन
  पोखरलेली विहीर
  पोंग
  पोटंगी
  पोटय्या
  पोटशूळ
  पोटेगांव जमीनदारी
  पोटोसी
  पोत्ती मल्याळ
  पोदनूर
  पोदिली
  पोनेरी
  पोन्नगयून
  पोन्नानी
  पोप अलेक्झांडर
  पोपट
  पोपसत्ता
  पोरबंदर
  पोराहाट
  पोर्ट ऑ प्रिन्स
  पोर्ट ऑर्थर
  पोर्ट ब्लेअर
  पोर्ट मेहॉन
  पोर्ट सय्यद
  पोर्टोनोव्हो
  पोर्टो रिको
  पोर्ट्समाऊथ
  पोर्तुगाल
  पोर्तुगीज वाड्मय
  पोलंड
  पोल लोकांचें वाड्मय
  पोलवरम्
  पोलोनारुवा
  पोवाडे
  पोसेन
  पोष्ट
  पौक
  पौकटाऊ
  पौंग
  पौंगडे
  पौंगबिन
  पौचा
  पौंड
  पौंड्रवर्धन
  पौत्तलिन
  पौरोहित्य
  पौर्णिमा
  पौला
  प्यापल्लि
  प्रकाश
  प्रकाशलेखन
  प्रकाशव्यतिकरण व प्रकाशविकृति
  प्रकाशशोषण
  प्रतापगड
  प्रतापसिंह छत्रपति
  प्रतापसिंह महाराणा
  प्रतिज्वरिन
  प्रतिनिधि
  प्रतीहार
  प्रत्यक्षप्रमाणवाद
  प्रथमिन
  प्रदररोग
  प्रद्युम्न
  प्रभास
  प्रभु
  प्रभु-पदवी
  प्रभोत्सर्जक
  प्रमीला
  प्रयाग
  प्रल्हाद
  प्रल्हाद शिवाजी बडवे
  प्रवर
  प्रवर्तक वेष्टण
  प्रसूतिविज्ञान
  प्रसेन
  प्रसेनजित
  प्रस्थानत्रयी
  प्रज्ञापारमिता
  प्राउट
  प्राऊस्ट
  प्राग
  प्राग्ज्योतिषपूर
  प्राचेतस
  प्रॉटेस्टंट पंथ
  प्राण
  प्राणिदीकरण किंवा ज्वलन
  प्राणिदें
  प्राणोज्ज ज्योत
  प्राणिपूजासंप्रदाय
  प्राणिशास्त्र
  प्राप्तीवरील कर
  प्रायश्चित्त
  प्रायोज्जिदें

  प्रॉव्हिडन्स

  प्रिटोरिया
  प्रिग्हीकौन्सिल व कॅबिनेट
  प्रीस्टले, जोसेफ
  प्रूढाँ, पेरी जोसेफ
  प्रेत व प्रेतसंस्कार
  प्रेम
  प्रेमपूर
  प्रेसबर्ग
  प्रेस्टन
  प्रोटॅगोरॅस
  प्रोदत्तूर
  प्रोम
  प्रोस्टेटपिंडाचे व्याधी
  प्लव
  प्लवप्रतिन
  प्लवरंजनी
  प्लातिन
  प्लासी
  प्लिनी, थोरला
  प्लिनी, धाकटा
  प्लिमौथ
  प्लूटो
  प्लेग
  प्लेटो
 
  फकीर
  फगवार
  फडके, गंगाधरशास्त्री
  फडके, हरिपंत
  फडणवीस
  फणस
  फत्तेखर्डा
  फत्तेगड
  फत्तेजंग
  फत्तेपूर
  फत्तेपूर शिक्री
  फत्तेसिंह भोसले
  फत्तेहाबाद
  फरीदकोट
  फरीदपूर
  फरुकनगर
  फरुखाबाद
  फर्कोडे
  फर्ग्यूसन, जेम्स
  फर्डिनंड
  फलटण संस्थान
  फलिया
  फलुस
  फलोदी
  फॅशोडा
  फाझिल्का
  फायलो
  फारशी वाड्मय
  फारीनहैट, गाब्रियल डानिअल
  फारुकी राजे
  फालकर्क
  फालमथ
  फॉसेट हेनरी
  फाहिआन
  फिजी
  फिनिशिया
  फिन्लंड
  फिन्सबरी
  फिरदौसी
  फिरोझपूर
  फिरोझाबाद
  फिलाडोल्फया
  फिलिप
  फिलिपाईन बेटें
  फिलिप्पी
  फिलौर
  फुकनळी
  फुकोक
  फुचौ
  फुफ्फुसदाह
  फुफ्फुसविस्तृति
  फुफ्फुसावरणदाह
  फुलकियन संस्थानें
  फुल निझामत
  फुलपुर
  फुला
  फेझ
  फेनी
  फेरिष्ता
  फेलिंग
  फैजपूर
  फैजाबाद
  फोरियर, फॅंक्वॉ चार्लस मेरी
  फोर्ट सन्डेमन
  फोर्ट सेन्ट डेव्हिड
  फौजदारी कायदा
  फ्यूसेल तेल
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-ओडर
  फ्रॅंकफोर्ट-ऑन-मेन
  फ्रॅंकलिन, बेंजामिन
  फ्रान्स
  फ्रिजिआ
  फ्रीटाऊन
  फ्रेंच-इंडिया
  फ्रेंच इंडो-चीन
  फ्रेंच-कांगो
  फ्रेंच वेस्ट आफ्रिका
  फ्रेडरिक दि ग्रेट
  फ्रेडरिकस्टॅड
  फ्रेसनेल, आगस्टिन् जीन
  फ्रोइबेल, फ्रीड्रिच विइलहेल्म आगष्ट
  फ्रौन्हाफर, जोसेफ व्हान
  फ्लॉरिडा
  फ्लॉरेन्स
  फ्लारेस
  फ्लीट, जॉन फेथफुल
  फ्लेमिश वाड्मय
 
  बकरगंज
  बंकापूर
  बकासुर
  बकिंगहॅम
  बंकिमचंद्र चतर्जी
  बॅक्ट्रिया
  बक्सार
  बख्तबुलंद
  बगदाद
  बंगनपल्ले
  बंगळूर
  बंगाल इलाखा
  बंगाली वाड्मय
  बघात
  बचनाग
  बजरबट्टू
  बजाणा
  बजानिया
  बजेट
  बटकागड
  बटवा
  बटवाल
  बटाटे
  बटेव्हिया
  बडनेरा
  बडवानी
  बडिशोप
  बडोदें

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .