प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद 
               
हुगळी, जि ल्हा.- बंगाल, बरद्वान भागांतील जिल्हा. हावरा जिल्हा वगळला तर या जिल्ह्याचें क्षेत्रफळ ११९१ चौरस मैल आहे. या जिल्ह्यांत मुख्य नद्या तीन आहेत; हुगळी, दामोदर व रूपनारायण या तीन नद्यांच्या योगानें जो गाळ वाहून येतो त्यामुळें या नद्यांची पात्रें वर येत चाललीं आहेत. व आसपासच्या प्रदेशापेक्षां जास्त उंच होत आहेत. या नद्यांच्या दरम्यान पुष्कळ दलदलीचे प्रदेश उत्पन्न झाले आहेत. या जिल्ह्याचा बहुतेक भाग सपाट असून ठिकठिकाणी दलदलीच्या जागीं रान माजलें आहे. बऱ्याच ठिकाणीं पिंपळ, वड, बांबू, केळीं यांचीं झाडें आहेत. शिवाय खजुराचीं झाडें व ताडीचीं झाडेंहि बरींच आहेत. येथील हावा कोंदट, सर्द आहे. दर वर्षी अदमासें पाऊस ५० इंच पडतो. इतिहास.-या जिल्ह्यांत इतिहाससंस्मरणीय अशीं पुष्कळ स्थळें आहेत. इतकेंच नव्हें तर हुगळी नदीतीरावरील प्रत्येक गांवाशीं इतिहासाचा कांहींतरी संबंध येतो. उदा. सातगांव सुलभ नौकानयनामुळें हुगळी शहराला महत्त्व येऊन पोर्तुगीज लोक येथें येऊन राहिले. पुढें इंग्लिश लोकांनीं आपली व्यापाराची पेढी येथेंच स्थापन केली व याच ठिकाणी त्यांचा व मुसुलमान लोकांचा प्रथम तंटा सुरू झाला. याचा परिणाम असा झाला कीं, इंग्रजांनीं हुगळी शहर सोडून देऊन कलकत्ता शहर हें १६९० सालीं मुख्य ठिकाण केलें. पुढें फ्रेंच लोकांनीं चंद्रनगर येथें, डच लोकांनीं चिनसुरा येथें व डॅनिश लोकांनीं सिरामपूर येथें आपल्या वखारी स्थापिल्या. १७५९ साली वरद्वान, मिदनापूर व चितागांग ही मीरकासीमनें ईस्ट इंडिया कंपनीला सैन्याच्या खर्चाकरितां म्हणून दिलीं. १८१९ सालीं हुगळी हा एक निराळा जिल्हा झाला. लो क व स्ती.-या जिल्ह्याची लोकसंख्या  १९२१ सालीं १०८०१४२ होती. येथें नेहमी बाहेरून फार लोक येतात. म्हणून लोकसंख्या वाढतेशी दिसते. लोक बाहेरून येण्याचें कारण येथें गिरण्या फार आहेत. व इतर उद्योगधंद्यांचें हें माहेरघर आहे. या जिल्ह्यांतील मुख्य शहरें म्हणजे हुगळी, चिनसुरा, सिरामपूर, भद्रेश्वर, उत्तरपाडा, बैघबाटी, बंसबारीया हीं होत. येथील देशी भाषा म्हणजे मध्य बंगाली होय. व एकंदर लोकांपैकी  हिंदु लोक शेंकडा ८२ व मुसुलमान शेंकडा १७.६ आहेत. येथें अनेक जातीचे लोक आहेत. बागडी, कैवर्त ब्राह्मण, सद्वोपन, गोपभूत या जाती मुख्य आहेत. लोकसंख्येपैकीं शें. ५४ शेतकीवर उपजीविका करतात. शे त की.-येथील जमीन पुळणीची असल्यामुळें सुपीक आहे व येथें तांदूळ चांगला पिकतो. दामोदर नदीच्या पश्र्चिम तीराजवळच्या जमिनींत तांदूळ होत नाहीं. पण हिंवाळयांतील पिकें होतात व ती महत्त्वाची असतात. या जिल्ह्यांत मुख्य पिकें तांदूळ, ऊंस, ताग, विड्याची पानें, बटाटे, कोबी इ. भाजीपाला. व्या पा र व द ळ ण व ळ ण.-कंपनीसरकारच्या पहिल्या अमदानींत कापूस व रेशीम यांचें कापड बऱ्याच प्रमाणांत होत असे. अजून सुद्धां हे धंदे जरी खालावले असले तरी ते महत्वाचे आहेत. व या कापडास बाजारांत किंमत फार येतें. सिरामपूर येथें रेशमी कापड्याला रंग देऊन व त्यावर ठसे उठवून तें कापड विकतात. सूत विणून कापड तयार करण्याचे कारखाने सिरामपुर, शिवाय हरिपाल व खन्यान या ठिकाणी आहेत. तागाचें कापड व संबाडीच्या दोऱ्या व गोणपाटाचें कापड  ही छात्रशंकरपूर, नवग्राम व खालसिनी या ठिकाणीं तयार होतात. कपाशीचें व मोहरीचें तेल येथें काढतात. बंसबारिया व कामारपारू येंथें पितळेची व कांश्याचीं भांडीं बरीच तयार होतात. चंद्रनगर येथें जणूं काय सुतार लोकांची एक वसाहत आहे. व ते नेहमीं कलकत्यांतील दुकानांत ठेवण्याकरितां लांकडी माल तयार करतात. व गोघाट ठाण्यांत टेंबुरणीच्या लांकडाचा बनलेला माल ताबडतोब कलकत्त्यांत व इतर आसपासच्या जिल्ह्यांत खपतो. मायापूर, बंडीपूर, माग्रा वगैरे ठिकाणी टोपल्या तयार होतात. व सिरामपूर, बंडीपूर, आक्री वगैरे ठिकाणीं उत्तम चट्या होतात. येथील निर्गत माल म्हणजे उत्तम तांदूळ, कडधान्य, रेशीम, नीळ, ताग, अंबाडीचा दोर, कापसाचें कापड, गोणपटाचीं पोतीं, बिटा, कौलें व भाजीपाला या जिनसा होत; व आयात माल म्हणजे मध्यम प्रतीचा तांदूळ, विलायती माल, कापसाचे पिळे व सूत, मीठ, तंबाखू, कोळसा, राकेल, तूप, मसाला व इमारतीचें लांकूड वगैरे माल होय. या जिल्ह्यांत रेल्वे पुष्कळ आहेत. ईस्ट इंडियन रेल्वे व याची तारकेश्वर नांवाची शाखा. हुगळी नदीवरील जुबिली पुलाला जाणाऱ्या नैहाती शाखेमुळें ईस्टर्न बंगाल स्टेट रेल्वेशीं दळणवळण आहे. त्याचप्रमाणें या जिल्ह्यांत हौरा शीखाला स्टीम व ट्रामवे व हौरा-आमटा लाइट रेल्वे याहि आहेत. राज्यकारभाराच्या सोयीकरतां या जिल्ह्याचें तीन भाग आहेत. व त्या भागांची मुख्य ठिकाणें चिनसुरा, सिरामपूर व आरामबाग हीं होत. सिरामपूर, उत्तरपाडा यांसारख्या ८ शहरी म्युनिसिपालिट्या असून शिवाय स्थानिक राज्यकारभार डिस्ट्रिक्ट बोर्ड व युनियन कमिट्या पाहतात. या जिल्ह्यांत शिक्षितांचें प्रमाण शेंकडा १०.६ होतें. जिल्ह्यांत इतर जिल्ह्याच्या मानानें सुशिक्षित स्त्रियांचें प्रमाण जास्त आहे. सार्वजनिक व खाजगी शिक्षणसंस्था बऱ्याच आहेत. पो ट वि भा ग.-हुगळी जिल्ह्यांतील पोटविभाग. क्षेत्रफळ ८४२ चौरस मैल. लोकसंख्या (१९०१) ३०८७१५. ह्या भागांत बहुतेक जमीन पुळणीची असून सपाट आहे. व ठिकठिकाणी नद्या व दलदलीचे खोल भाग आहेत. ह्या पोटविभागांत हुगळी चिनसुरा, व बंसबारिया हीं शहरें व ९४२ खेडीं आहेत. माग्रा हें व्यापाराचें महत्त्वाचें ठिकाण आहे. श ह र.-जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. नदीच्या उजव्या तीरावर हें आहे. सातगांव बंदर खालावल्यावर पोर्तुगीज लोकांनीं १५३७ सालीं हे स्थापन केलें. हुगळी तुरुंगाजवळ जुन्या किल्ल्याचें अवशेष आढळतात. पोर्तुगीज लोक चांचेगिरीच्या योगानें फार त्रास देऊ लागल्यामुळें शहाजनहान बादशहानें एक मोंगल सैन्याची तुकडी पोर्तुगीज लोकांविरुद्ध त्या ठिकाणीं पाठविली व हुगळी शहर बादशाही बंदर केलें. पुढें १६५१ सालीं ईस्ट इंडिया कंपनीस हुगळी येथें वखार स्थापन करण्यास परवानगी मिळाली. १६८६ सालीं इंग्रज लोक व बंगालचा सुभेदार ह्याचा प्रथमच खटला उडून इंग्रजांनी हुगळी शहर सोडून कलकत्ता हें मुख्य ठाणें केलें. हें शहर बरद्वान जिल्ह्याचें काहीं दिवस मुख्य ठिकाण होतें; पण हल्लीं येथील लोकवस्ती कमी होत चालली आहे. येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली आहे. न दी.-ही नदी व्यापारी दृष्टया अत्यंत महत्त्वाची असून गंगेचें पाणी हिच्या मुखानें बंगालच्या उपसागरास मिळतें ह्या नदीला तीन नद्यांचे पाणी मिळतें व त्या नद्या म्हणजे भागीरथी, नालंगी व माताभांग या होत. ह्या हुगळी नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो तें ठिकाण महत्त्वाचें आहे. कारण तें ठिकाण अंतर्गत व्यापारास फार सोयीचें आहे. ह्या नदीला भरती जोराची असते. विशेषत: ही भरती उन्हाळयांत जोराची असते. व ह्या भरतीमुळें येणारें पाणी सबंध वर्षांत जेवढें इतर नद्यांचें पाणी ह्या नदीला मिळतें त्याच्या दुप्पट असतें. ह्या भरतीच्या पाण्याचा दुहेरी उपयोग आहे. एक उपयोग असा आहे कीं, वरून वाहात आलेल्या पुळणीची चोहोंकडे वाटणीं होते व दुसरा उपयोग म्हटला म्हणजे ह्या पाण्यामुळें जलमार्गानें जाण्यायेण्यास चांगली सोय होते.  ह्या नदीबद्दल कलकत्याजवळ असलेल्या लोकांना भय वाटतें तें असे  कीं हुगळी नदीची माती वर येत जाऊन कलकत्ता बंदर जहाजांना निरुपयोगी होईल. आणि यासाठीं शास्त्रीय पहाणी करणारी मंडळी नेमली गेली असून त्यांचें काम नदीच्या मुखशीं जमलेल्या वाळूची किंवा मातीच्या बांधाची पाहणी करणें हें असतें. हे लोक दररोज मायापूर व जेम्स आणि मेरी बांध यांची तपासणी करून त्यांचे नकाशे काढून त्याबद्दलची माहिती कलकत्त्यास पाठवितात व ही माहिती खलाशांस फार उपयोगाची असते. ह्या नदीला नैहाती येथें खांबासारखा (कंसाकृति) पल्लेदार कमान असलेला एक सुरेख पूल आहे. ह्या पुलाच्या योगानें ईस्ट इंडिया रेल्वे व ईस्टर्न बंगाल स्टेट रेल्वे आणि कलकत्त्यातींल गोद्या यांचा संबंध दृढ झाला आहे. ह्या नदीचें बरेच लहान लहान कालवे काढल्यामुळें ह्या कालव्यांच्या योगानें व्यापार बराच चालतो . ह्या नदीच्या तीरावर कलकत्ता, नैहाती, हौरा, शांतीपूर वगैरे बरीच शहरें वसलीं आहेत. नदीवरील वनश्री अनेक प्रकारची व मनोरम आहे.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .