प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद

हुंडणावळ- हुंडणावळीचे दोन प्रकार आहेत; एक आंतरराष्ट्रीय हुंडणावळ व दुसरा एकाच देशांतील भिन्न शहरांमधील हुंडणावळ. यांपैकीं पहिला अतिशय महत्त्वाचा असल्यामुळें त्याचें विवेचन प्रथम करूं एका देशानें दुसऱ्या देशाचें ॠण फेडण्याकरितां जी साधनें निर्माण केलीं जातात. त्यांस हुंड्या किंवा 'बिलस ऑफ एक्सचेंज'' अशीं संज्ञा आहे. व या हुंडयांचा जो दर असतो त्याला हुंडणावळ असें म्हणतात; व या साधनांची व्यवस्थित रचना करून आंतरराष्ट्रीय ॠण फेडण्याच्या पद्धतीस ''हुंडण्यावळीची पद्धति'' असें म्हणतात.

इंग्लंड व फ्रान्स या दोन देशांमध्यें ९०० पौंड किंमतीच्या दोन वस्तूंची अदलाबदल झाली अशी कल्पना करूं. या वस्तू  मद्य व लोकरीचें कापड या आहेत असें समजूं अ या फ्रान्समधील व्यापाऱ्यानें कापड मागविलें व इंग्लंड मधील ड या व्यापाऱ्यानें तें निर्गत केलें त्याचप्रमाणें व या फ्रेंच व्यापाऱ्यानें क या इंग्रज व्यापाऱ्याला मद्य निर्गत केलें असें मानूं आतां हुंडयांची पद्धति नसल्यास अ व्यापाऱ्यास १००० पौंड व्यापाऱ्यास पाठवावे लागतील; त्याचप्रमाणें क व्यापाऱ्यास व व्यापाऱ्याच्या नांवें १०० पौंडांच्या किंमतीचे फ्रँक  पाठवावे लागतील. या व्यवहारांत परदेशची नाणीं पैदा करणें व ती पार्सलने पाठविणें या दोहोंचे श्रम व खर्च दोन्ही देशांतील व्यापाऱ्यांस करावे लागतील. असें न करतां फ्रान्समध्येंच अ नेंबला फ्रँक देणें व  क नें ड ला इंग्लंडमध्यें पौंड देणें हें जास्त सुकर होईल. असें करण्याकरितां  व नें क च्या पेढीवर हुंडी लिहावी; ती अ नें खरेदी करून ड कडे लिफाफ्यांत घालून पाठवावी; नंतर ड नें ती घेऊन क च्या दुकानावर पाठवावी; ही व्यवस्था अमलांत आली. या व्यवस्थेनें दुसऱ्या देशांत पैसे न पाठवितां दोन्ही ॠणें कशीं फिटलीं जातात हें पुढील आकृतीत दाखविलें आहे.

फ्रान्स इंग्लंड
अ 
इंग्रजी माल (कापड) आयात करणारा फ्रेंच माल (मद्य) निर्गत करणारा फ्रेंच माल (मद्य) आयात करणारा इंग्रजी माल (कापड) निर्गत करणारा
अ हा हुंडी विकत घेऊन ड कडे पाठवितो. ब हुंडी लिहितो क हुंडीचे पैसे देतो ड हुंडी दाखवून पटवितो

   
आतां क्वचित असेंहि होईल की व हुंडी लिहिण्याऐवजीं ड हा इंग्रजी व्यापारी हुंडी लिहील व पैसे फ्रान्स मध्यें  अ हा देईल. परंतु दोन्ही उदाहरणांत तत्त्व एकच असल्यामुळें या दुसऱ्या तऱ्हेचा स्वतंत्र विचार करण्याची जरूर नाही.  सामान्यत: इंग्लंड देश हुंड्या लिहिण्याऐवजी हुंड्याचे पैसे देण्याचा व्यवहार जास्त करतो. कारण तेथील बँकिंगची पद्धति अतिशय पूर्णतेस गेली असल्यामुळें बहुतेक व्यापारी इंग्लंड येथील पेढ्यांवर हुंडी लिहिणें पसंत करतात. यामुळें हुंड्यांचा दर हा लंडनशिवाय इतर शहरांत ठरला जातो. कारण हुंडयांचे ग्राहक व विकणारे तेथें असतात. लंडन येथील बँकांचा त्या दरावर कांहीं ताबा नसतो.
हुंड्याचे वाढते व कमी होणारे दर समजण्याकरतां हुंड्यांना मध्यबिंदु हा फार महत्त्वाचा आहे. यास ''पार ऑफ एक्सचेंज '' असें म्हणतात. हा मध्यबिंदु दोन एकाच धातूच्या नाण्यांमध्ये ठरला जातो व एका देशाच्या अमुक नाण्यांत दुसऱ्या देशाच्या अमुक नाण्यांमध्यें जितकें शुद्ध सोनें आहे, तितकेंच आहे असें सिद्ध झालें म्हणजे हा मध्यबिंदु त्या दोहोंच्या समीकरणाच्या रूपांत दर्शित करतात.  उदाहरणार्थ; १ पौंड = ४.८६ डॉलर; याचा अर्थ असा की, एका पौंडात जितकें शुद्ध सोनें असतें तितकेंच तंतोतंत ४.८६ डॉलरांमध्यें असतें. हें सोनें किती असतें हें प्रत्येक देशांत कायद्यानें ठरविलेंलें असतें. त्याचप्रमाणें १ पौंड  २५.२२ फ्रँक असा अर्थ समजावा. रुपयाचें नाणें वापरणाऱ्या देशामध्यें व सोन्याचें नाणें वापरणाऱ्या देशामध्यें हुंडणावळींचा मध्यबिंदु असूं शकत नाहीं. त्यांच्यामंधील हुंडणावळ सोनें व रुपें यांच्या किंमतीमध्ये जो दररोज फरक होतो त्यावर अवलंबून राहील व तिला स्थिर असें स्वरूप कधींच येणार नाहीं. या मध्यबिंदूस ''टांकसाळींचा मध्यबिंदु'' अशी संज्ञा आहे. कारण टांकसाळींत नाणें कसें पाडावयाचें या कायद्यानुसार हा बिंदू ठरलेला असतो.

आतां प्रत्यक्ष अनुभवांत असें दिसतें कीं, हुंडणावळ या मध्यबिंदूस चिकटून कधींच नसते; ती किंचिंत वर अथवा खाली अशी असते व हुंडणावळीचे दर आठवडयांत बदलत असतात. हे कसे बदलतात व त्याची कारणें काय हें या पद्धतीतील महत्त्वाचें विवेचन आहे.  समजा, कीं इंग्लंडकडून फ्रान्समधून १ कोटी पौंडांचा माल घेतला; व फ्रान्सनें इंग्लंडकडून तितक्याच किंमतीचा माल घेतला आतां फ्रांन्समधील निर्गत करणारे व्यापारी एक कोटी पौंडांच्या हुंड्या लिहितील; व आयात माल तितकाच असल्यामुळें आयात करणाऱ्या फ्रेंच व्यापाऱ्यांनां तितक्या हुंड्याची गरजहि लागेल. कारण त्यांना  एक कोटी पौंड इंग्रजी व्यापाऱ्यांनां द्यावयाचे आहेत. अशा वेळी एक पौंडांच्या हुंडीस फ्रान्सांत २५.२२ फ्रँकच पडतील. म्हणजे मध्यबिंदुस्थानची हुंडणावळ प्रस्थापित होईल. परंतु हें उदाहरण काल्पनिक आहे. दोन्ही देशांमधील व्यापार इतका तंतोतंत जमणार कसा? वस्तुत: भिन्न किंमतीच्या मालाची आयात-निर्गत होते. जसें असल्यामुळें काय होतें तें पाहिलें पाहिजे. जर फ्रान्सची इंग्रजी मालाची निर्गत दीड कोटी पौंडाची असेल तर ग्राहक जास्त असल्यामुळें एक कोटीच्या हुंड्या विकत घेण्याविषयी चढाओढ सुरू होईल, कारण हुंडीच्या द्वारें इंग्रजी व्यापाराचें ॠण न फेडल्यास त्याकडे पोस्टांतून सॉव्हरिन पाठवावे लागतील व हें काम खर्चाचे व त्रासाचें असतें. यामुळें हुंडणावळीचा भाव वर चढतो व मध्यबिंदूच्या किंमतीपेक्षां जास्त किंमत हुंडीला द्यावी लागते. वरील उदाहरणांत १ पौंडाच्या हुंडीला अशा वेळी २५.२२ फ्रँकपेक्षा  अधिक फ्रँक द्यावे लागतील. उलट पक्षी आयात १ कोटीची असून निर्गत दीड कोटी पौंडांची असल्यास हुंड्या जास्त होऊन त्याकरितां मागणी कमी असल्यामुळें २५.२२ फ्रँक पेक्षा कमीं किंमतीस हुंडी विकण्यास फ्रेंच निर्गत करणारें व्यापारी कबूल होतील. जर हुंडी विकत मिळाली नाही तर फ्रेंच व्यांपाऱ्यांना बँकांपासून लंडनवर ड्रॅफ्ट म्हणजे बँकेची मनीऑर्डर घ्यावा लागेल. त्यामुळें ड्रॅफ्ट विकत घेण्याकरितां जो खर्च पडे त्यापेक्षां जास्त पलीकडे हुंडणावळ जाऊं शकणार नाहीं. तथापि ड्रॅफ्ट विकत घेण्यापूर्वी दुसरा  एक मार्ग त्याला शक्य असतो तो हा कीं, लंडनची हुंडी विकत न घेतां रोम, बर्लिन या शहरांवरची हुंडी २५.३२ फ्रँकला विकत घेऊन ती लंडन येंथें पाठविली असतां जर एक पौंड मिळेल तर कोणताहि व्यापारी लंडनवरील हुंडीला २५.३२ फ्रँक पेक्षां जास्त पैसे देणार नाहीं. परंतु अशी बिलें जसजशी कमी होत जातील तसतसा हा मार्ग स्वीकारणें अधिक खर्चाचें होईल व लंडनवरील हुंडीचा दर पुन्हां चढूं लागेल. चढतां चढतां तो इतका वर जाईल कीं हुंडी विकत घेण्यापेक्षां सोनें विकत घेऊन विमा उतरून तें लंडनला पाठविणें अधिक स्वस्त पडेल. त्यावेळेस हुंड्या विकत घेण्याचें बंद पडेल. समजा की, एक पौंड लंडन येथें पाठविण्यास एक दशांश फ्रँक = १० खर्च येतो; हे २५.२२ मध्ये मिळविल्यास एकंदर खर्च २५.३२ फ्रँक झाला; असें असल्यामुळें २५.३२ फ्रँकपेक्षां लंडनवरील हुंडीची किंमत पॅरिसमध्यें जास्त कधींहि राहणार नाहीं. त्याचप्रमाणें हुंडणावळीचा भाव कमी झाल्यास कोणताहि व्यापारी हुंडीबद्दल २५.२२ -.१० = २५.१२ फ्रँकपेक्षां कमी घेण्यास तयार होणार नाहीं. कारण अशा वेळीं तो आपल्या रिणकोस सोनें पाठविण्यास सांगेल व त्याचा  खर्च वजा करून सुद्धां त्याला २५.१२ फ्रँक राहतील. हे जे दोन बिंदू आहेत त्यांचे स्थान २५.३२ आणि २५.१२ असें मुकरर  झालें. हे बिंदू सोनें पाठविण्याच्या खर्चावरून निश्र्चित केल्यामुळें यांस सुवर्णबिंदु असें म्हणतात. हुंडणावर या दोन मर्यादांच्या पलीकडे कधीहि जाऊं शकत नाहीं. कारण या मर्यादांचे उल्लंघन केल्यास, लोक सोनें पाठवूं लागतात व हुंडयांचा व्यवहारच बंद पडतो.

यावरून एक गोष्ट सिद्ध होते ती ही की, आंतरराष्ट्रीय देवघेवीचे इतर मार्ग कांहीहि असले  तरी खात्रीचा व रामबाण लागू पडणारा मार्ग म्हणजे सोनें पाठविणें हा होय. इतर वस्तू पाठविल्यास कोणी घेईल किंवा न घेईल परंतु सोनें पाठविल्यास कोणीहि घेणार नाही असें होत नाहीं; निदान ज्या देशांत टांकसाळ खुली असते तेथील सरकार नेहमीं सोनें घेऊन त्या देशांतील नाणी देण्यास कायद्यानें बांधलेलें असतें. उदाहरणार्थ इंग्लंडांत २॥ तोळे अथवा एक औस सोनें दिल्यास ३ पौंड १७ शि. १० १/२ पेन्स देण्याची कायद्यानें व्यवस्था केली आहे व टांकसाळ खुली असल्यामुळें वाटेल ती व्यक्ती अथवा संस्था सोनें देऊन साव्हरिन घेऊं शकतें. त्याचप्रमाणें जर्मनींत सोने दिल्यास तेथील टांकसाळींत नाणीं मिळूं शकतात. एका देशांत सोनें घेऊन दुसऱ्या देशांत पाठविल्यामुळें जो हुंडणावळीचा दर होतो त्याला निर्गतसुवर्ण बिंदू असें म्हणतात व दुसऱ्या देशांत सोनें घेऊन तें आपल्या देशांत आणविलें म्हणजे जो दर होतो त्याला आयातसुवर्णबिंदू असें म्हणतात. वरील उदाहरणांत २५.३५ फ्रँक हा निर्गतसुवर्णबिंदु आहे व २५.१२ फ्रँक हा आयात सुवर्णबिंदु आहे. देशांतील आयात निर्गत मालामपेक्षां जास्त असल्यास हुंडयांची मागणी जास्त होते व निर्यातसुवर्णबिंदूजवळ हुंडणावळीचा दर जातो. असें होणें देशाच्या दृष्टीनें अनिष्ट असल्यामुळें अशा अवस्थेस 'प्रतिकूल व्यापार' असें म्हणण्याचा प्रघात पडला आहे. याच्या उलट निर्गत माल जास्त असल्यास त्यास 'अनुकूल व्यापार ' अशी संज्ञा देतात व अशा प्रसंगी हुंडणावळ 'आयात सुवर्ण बिंदूजवळ असतें.
हुंडणावळीच्या व्यवहाराची कल्पना देण्याकरितां लंडन मधील एका दलालाच्या यादींतील (महायुद्धाच्या पूर्वी) कांहीं दर पुढें दिले आहेत --

देशनाम  मुदत किंमत स्पष्टीकरण
ॲमस्टरडॅम दर्शनी १२-१ ५/८ गिल्डर व स्टारव्हर १ पौंडास
पॅरिस दर्शनी २५-२२ १/२ फ्रँक व सांतीम
पॅरिस ३ महिने २५-३७ १/२ १ पौंडास
बर्लिन ३ महिने २०-५१ मार्क व पेनी १ पौंडास
पीटर्सबर्ग ३ महिने २२ १११/१८ पेन्स १ रूबलास
व्हिएन्ना ३ महिने ११-९२ १/२ फ्लॅरिन व क्रूझर पौंडास
मॅड्रिड ३ महिने -४१ ५/८ पेन्स १ पीसोऐवजी
नेपल्स ३ महिने २६-१२ १/२ लीर व सेंटेसिमि पौंडास
लिस्बन ३ महिने ४० पेन्स १ मिलरीज ऐवजीं
कलकत्ता ३ महिने १६ पेन्स १ रुपयास
न्यू यॉर्क दर्शनी ४९ पेन्स १ डॉलरास

                  
बहुतेक देशांतील हुंडणावळीचे दर आपल्या स्वत:च्या नाण्यामध्ये दिलेले असतात. परंतु लंडनमधील दर कांही इंग्लंडच्या नाण्यांत दिलेले असतात व कांहीं परकीय नाण्यांत दिलेले असतात. त्यामुळें नवशिक्यास पुष्कळ घोटाळा पडतो. ही स्थिति सुधारण्याविषयीं प्रयत्न चालू आहेत. ठराविक पद्धति स्वीकारल्याशिवाय हुंडणावळ वर गेली अथवा खालीं गेली हे शब्द निरर्थक होतील. उदाहरणार्थ एका पौंडास जास्त फ्रँक द्यावे लागल्यास हुंडणावळ वर गेली असें म्हणतात; परंतु हाच दर एका फ्रँफ्रँकास अमुक पेन्स असा लिहिल्यास खाली गेला असें म्हणावें लागेल. व एका रुपयास अठरा पेन्स दर झाला असतां आपण हुंडणावळ वर गेली असें म्हणतों; पण हाच पौंडास अमुक रुपये असा दर लिहिल्यास १ पौंड  = १३ १/३ रुपये असें झाल्यानें हुडणावळ खाली गेली असें म्हणावें लागेल. या कारणाकरिता हुंडणावणीचें दर लिहिण्यांत एक पद्धत सवत्र अंमलांत येणे आवश्यक आहे. अशी पद्धति अंमलांत येईपर्यंत 'अनुकूल' , 'प्रतिकूल', 'डिसकाउंट' इत्यादि शब्द फार सावधगिरीनें वापरले पाहिजेत. सामान्यत: असें असतें कीं, पैसा विपुल व व्याजाचा दर लहान असला म्हणजे बँकाच्या गंगाजळी भरलेल्या असतात. व हुंडणावळ खालच्या सुवर्णबिंदूजवळ असते; त्यामुळें त्या देशाच्या नाण्याची किमंती इतर देशांतील नाण्यांच्या तुलनेनें कमी झालेली असते व याच कारणाकरितां हुंडावळ खाली गेली असतां तीस अनुकूल अशी संज्ञा देतात. मुदतीच्या हुंडामध्यें व्याजाचा प्रश्र्न  फार महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणें ज्या पेढीवर हुंडी लिहिलेली असेल तिची पत हाहि महत्त्वाचा विचार असतो. कारण तीन महिने मुदतीची हुंडी असल्यास व त्या पेढीचें मध्यंतरी दिवाळें निघाल्यास हुंडी विकत घेणाराचें नुकसान होईल. यामुळें मुदतीच्या हुंडीचा दर येणेप्रमाणें ठरला जातो:-दर्शनी हुंडीचा दर अधिक ३ महिन्यांचें व्याज, ज्या शहरावर हुंडी असेल तेथील दराप्रमाणें  + परदेशांतील स्टँप लावण्याचा खर्च + धोक्याबद्दलचा फायदा = मुदतीच्या हुंडीचा दर. यामुळें व्याजाचा दर वाढल्यास मुदतीच्या हुंडीची किंमतहि जास्त होतो. याच कारणाकरितां परकीय व्यापारी एखाद्या देशावरील मुदीतीच्या हुंडीला व्याज, स्टँप व धोक्याचा फायदा यांची रक्कम वजा करून कमी किंमत देईल. उदाहरणार्थ, न्यूयॉर्क येथील व्यापाऱ्यास लंडन येथें जिचे पैसे मिळतील अशी मुदतीची खरेदी करावयाची असल्यास तो असा हिशोब करील:-१०० पौंडाची हुंडी = ४८६ डॉलर -- ७.२९ डॉलर (६ टक्यांप्रमाणें ३ महिन्यांचे व्याज) - .२५ डॉलर (स्टँप) -२५ डॉलर धोक्याबद्दल :: ४७८.२१; कारण कमी डॉलर दिल्याशिवाय तीन महिन्यांनी मिळणाऱ्या रकमेची व्याजाची किंमत योग्य होणार नाही. म्हणूनच व्याजाचा दर पुढें कमी होण्याचा संभव असल्यास परदेशांतील व्यापारी मुदतीच्या हुंड्या घेण्यास विशेष उत्सुक असतात.

आतां ज्या अंगांमुळें भिन्न देशांमधील देणें घेणें नेहमी बदलत असतें त्याचा विचार केला पाहिजे. पहिलें अंग म्हणजे आयात व निर्गत माल. या कारणामुळें प्रत्येक देशात दुसऱ्या देशाचें ॠण होतें. बहुतेक परकीय हुंड्या निर्गत मालाच्या  आधारावर काढलेल्या असतात. हिंदुस्थानांतून ५० रुपयांचे गहूं पाठविल्याबरोबर पाठविणारास ते जितक्या पौंडांस विकण्याचें ठरविलें असेल तितक्याच पौंडांचीं हुंडी लिहिण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याचप्रमाणें मालाच्या वाहतुकीबद्दल एका देशानें दुसऱ्या देशाचें देणें असल्यास त्यायोगें ॠण उत्पन्न होऊन त्याचाहि हुंडणावळीवर परिणाम होतो. याशिवाय दुसऱ्या देशांतील सिक्युरिटी व रेल्वे इत्यादिकांचे भाग खरेदी करणें याचाहि हुंड्यांच्या भावावर परिणाम होतो. कारण त्याबद्दलची किंमत विक्री करणऱ्या देशास द्यावी लागते. यानंतर कर्ज काढणें; पेढ्यांसंबंधी कामें करण्याबद्दलचें कमिशन व दुसऱ्या देशांतील बँकांत पैसे ठेवणें इत्यादि गोष्टींचा हुंडयांशी संबंध येतो. कारण हुंड्या विकत घेणें हा परदेशांत पैसे पाठविण्याचा अतिशय स्वल्प असा मार्ग आहे. एकंदरींत असें म्हणतां येईल कीं, एकां देशास दुसऱ्याचें ॠण झालें कीं त्याचा हुंडणावळीशीं संबंध येतो व हुंडणावळीचा दर हा अशा सर्व ॠणांचें समुच्चयिक कार्य असतें. कोणत्याहि देशानें इंग्लंडांत कर्ज काढलें कीं, हुंडणावळ इंग्लंडच्या विरुद्ध होते. कारण माल आयात केला असतां जसे पैसे द्यावे लागतात तसेच या कर्जामुळें द्यावे लागतात. एका दृष्टीनें असें म्हणतां येईल कीं, हुंडणावळीपुरता धनको देश तात्पुरता ॠणको बनतो. यानंतर कांही वेळानें व्याज लागू झालें कीं तो देश पुन्हां  धनको होतो व त्यावेळीं हुंडणावळ त्या देशास अनुकूल अशी होते. त्याचप्रमाणें दुसऱ्या देशाबद्दल लंडननें पैसे देण्याचें कबूल केल्यास हुंडणावळ इंग्लंडच्या विरुद्ध होते. उदाहरणार्थ, जर्मन व्यापाऱ्यांनी न्यूयॉर्क येथून कापूस मागविल्यास ते पुष्कळ वेळां धनकोस, बर्लिनवर हुंडी लिहिण्याऐवजीं लंडनवर हुंडी लिहिण्यास सांगतात. व नंतर ते त्याऐवजी लंडन येथील बॅकाकडे पैसे पाठवितात. याचे फळ असें होतें कीं, अमेरिकेशीं हुंडणावळ लंडनच्याविरूद्ध होते व जर्मन हुंडणावळ इंग्लंडास अनुकूल होऊन जर्मनीस प्रतिकूल होते. आणखी एक बारीकशी बाबत हुंडणावळीवर परिणामकारक होते. ती प्रवाशांचा खर्च ही होय परकीय प्रवासी एखाद्या देशांत तीन-चार महिने सतत राहिल्यास त्यांच्या खर्चाची रक्कम त्यांच्या देशांतील बँकांनां ते जेथें राहतात. त्या देशांतील बँकांना द्यावी लागते व तिचा हुंडणावळीवर बराच परिणाम होऊन अर्थात त्या देशास अनुकूल असा दर होतो. इटली देशास प्रवाशांपासून दरसाल अदमासें २ कोटी पौंड फायदा होतो.

हुंडणावळीच्या दराचा व देशांतील व्याजाच्या दराचा फार निकट संबंध असतो तो असा हुंडणावळ प्रतिकूल झाली म्हणजे देशांतून सोनें बाहेर पाठवावें लागतें. हें सोनें बाहेर गेल्यामुळें प्रत्येक बँकेची गंगाजळी (अथवा 'रिझर्व्ह') कमी होते. त्यामुळें त्या आधारावर रचलेली चेक व नोटा याची इमारत कमकुवत होऊन कागदी चलन कमी करणें भाग पडतें, त्यामुळें बँकांजवळ लोकांनां देण्यास पैसा कमी राहतो व त्यांनां व्याजाचा दर वाढवावा लागतो. याशिवाय प्रतिकूल हुंडणावळीस जागेवर आणण्याकरितां आणखी एक उपाय बँकांस-विशेषत: मध्यवर्ती बँकेस-योजणें भाग पडतें. तो उपाय म्हणजे कटमित्तीचा दर वाढविणें हा होय.  हा दर वाढविण्याचा परिणाम असा होतो की, दुस-या देशांतील बॅकांजवळ  त्या देशांत पटविण्याच्या ज्या हुंड्या असतात. त्यांचे टमित्तीचा कापून रोख पैसे करण्याऐवजीं त्या तशाच राहूं देतात; कारण जास्त दरानें कटमित्ती कापली असतां रोख रक्कम कमी वसूल होते. त्यामुळें या मार्गानें देशाबाहेर जाणाऱ्या पैशास विरोध होऊन तो पैसा त्याच देशांत राहतो. शिवाय व्याजाचा दर वाढल्यामुळें लोक बँकांपासून कर्ज कमी घेऊं लागतात व सट्टेबाजीस आळा बसतो; तसेंच ठेवीचा दर जास्त झाल्यामुळें लोकांजवळील नाणें व नोटा पुन्हां परत बँकाजवळ येतात. असें झाल्यानें व्याजाचा दर व कट मित्तीचा दर पुन्हां पूर्वपदावर येऊन लंडनवरील हुंड्या विकत घेणें फायदेशीर होतें व त्यामुळें हुंडणावळीचा दर वाढून तो अनुकूल होते. उदाहरणार्थ, पॅरिस येथील हुंडणावळ २५.१२ फ्रँक अशी झाल्यास हुंडी विकण्याऐवजीं आपल्या रिणकोस साव्हरिन पाठविण्याविषयीं  पॅरिस येथील धनको मागणी करील. याच वेळेस लंडन येथील कटमित्तीचा दर शेंकडा ६ केल्यास १०० पौंडांच्या ३ महिने मुदतीच्या हुंडीबद्दल रोख किंमत ९८ १/२ पौंड मिळेल. त्यापेक्षां ती हुंडी जवळ ठेवून तीन महिन्यांनीं ती पटविल्यास ग्राहकांस पुरे १०० पौंड मिळून शेंकडा  ६ व्याज मिळेल. या फायद्याकरतां पॅरिसमधील बँकर व रिणको हुंड्या घेऊन त्या लंडन येथील आपल्या बँकेजवळ ठेवणें पसंत करतील व अनेक लोकांनीं हुंड्या विकत घेतल्यास हुंडणावळ पुन्हां मध्यबिंदूवर येईल. हाच दर शेंकडा ३ असता तर हुंडीबद्दल ९९ १/२ पौंड आल्याकारणानें ती कटमित्तीनें वटवून रोख रक्कम करून ती रिणकोच्या बँकेनें पॅरिस येथे पाठविली असती व त्यामुळें लंडनमधील सोनें आणखी कमी झालें  असतें. वरील सर्व विवेचन हुंडणावळ अनुकूल असतांहि लागू पडतें; इतकेंच कीं सर्व कार्ये याच्या उलट होतात म्हणजे देशांत सोनें येतें यामुळें नोटा व कागदी चलन जास्त वाढते; व्याजाचा दर कमी होतो व कटमित्तीचा दरहि कमी होतो; यामुळें परकीय बँका त्या देशावरील हुंडयांची ताबडतोब रोखी करितात.

आतापर्यंत जें वर्णन केलें तें ज्या देशांत एकच धातूचें नाणें असतें त्याच्याविषयींच खरें आहे. आतां ज्या देशांत सोन्याचें किंवा रुप्याचें नाणें नांवालाच असून बहुतेक चलन नोटांचें असतें अशा देशांनीं हुंडणावळ कशी निश्र्चित होते हें ठरविलें पाहिजे. नोटांच्या चलनाचें एक तत्त्व असें आहे कीं, ज्या नोटाचें परिवर्तन नाण्यांत होतें त्या नोटांची किंमत कमी होत नाहीं; फक्त एकंदर नोटा व्यापारास आवश्यक इतक्या प्रमाणांत पाहिजेत. परंतु नोट अपरिवर्तनीय झाल्यास म्हणजे तिच्या ऐवजीं नाणीं सरकार देत नसल्यास मात्र नोटांची किंमत किती खाली जाईल याची कल्पना नाहीं. समजा कीं, हिंदुस्थानांत १८० कोटींच्या ऐवजीं १८०० कोटी रुपयांच्या नोटा काढल्या व त्यांबद्दल रुपये देण्याचें बंद केलें, तर एक हजार रुपयांच्या नोटांची किंमत अदमासें शंभर रुपये होईल. असें झाल्यास १ पौंड = १५ रु. याच्या ऐवजीं १ पौंड =    १५० रु. अशी हुंडणावळ बनेल. कोणत्याहि सरकारास एकदां नोटांची संख्या वाढविण्याची संवय लागली म्हणजे ती अनावर होते  व सरकारी बजेटांतील तूट जास्त नोटा काढून भरून काढण्याचें नेहमींचें धोरण होऊन बसतें. महायुद्धांत अशा तऱ्हेनें बेसुमार नोटा जर्मनी, फ्रान्स, इटली इत्यादि सर्व देशांनी काढल्यामुळें त्यांच्या हुंडणावळीवर झालेला परिणाम आपण नुकताच पाहिलेला आहे. अशी स्थिति झाली म्हणजे हुंडणावळींत भयंकर क्रांति होऊन दर अतिशय प्रतिकूल होतो. त्याचप्रमाणें वर वर्णन केलेली सुवणर्बिंदूची मर्यादा हुंडणावळ ठेवीत नाहीं. कारण सुवर्णच नसल्यामुळें सुवणर्बिंदू राहणेंच शक्य नसतें. अशा हुंडणावळीच्या दरांत सामान्य कारणांचे कार्य कोणतें व नोटा जास्त काढल्यामुळें होणारें कार्य कोणतें हें ठरविणें कठिण असतें. परंतु नोटांच्या आधिक्यामुळें हुंडणावळ किती खाली गेली हें त्याच देशांतील सोन्याच्या नाण्यांची किंमत नोटांशीं कोणत्या प्रमाणांत आहे हें पाहून सांगतां येतें. उदाहरणार्थ इंग्लंडांत १० पौंडांची नोट दिल्यास रोक ५ साव्हरिन मिळतील तर असें समजावें कीं २:१ हें नोटांच्या अवनतीचें माप आहे. असें झाल्यास फ्रान्स व इंग्लंडमधील हुंडणावळ मध्यबिंदूची २५.२२ फ्रँक = २ पौंड (कागदी) अशी किंमत होईल. आतां हुंडणावळ २५.२२ फ्रँक = १.७५ पौंड अशी झाल्यास व्यापारी कारणामुळें हात फरक झाला आहे असें निश्र्चिक अनुमान होतें. कारण इतर देशांत माल विकून जी किंमत नाण्यांत मिळेल तिच्या ऐवजीं त्या देशांतील नोटा जास्त मिळतील. यामुळें शेतकरी व खाणीचे मालक यांनां हुंडणावळ खाली जाण्यानें आनंद होतो. परंतु आयात मालाच्या व्यापाऱ्यांचें नुकसान होतें. कारण नोटांच्या ऐवजीं परदेशांत पाठविण्याकरितां हुंडी घेतल्यास अधिक नोटा द्याव्या लागतात. त्याचप्रमाणें हुंडणावळ खालीं जाण्यापूर्वी ज्यांनीं पुष्कळ मुदतीनें माल उधार दिला असेल त्याचें नुकसान होते. त्याचप्रमाणें गरीब मजुरांचें नुकसान होतें, कारण त्यांना अवाचेसवा किंमत (नोटांत) देऊन निर्वाहाच्या वस्तू द्याव्या लागतात. अशीं हुंडणावळीची अवनति काहीं काळ राहिली म्हणजे निर्गत जास्ती होते व आयात कमी होते. त्यामुळें हुंडणावळ पुन्हां उलट खाऊन अनुकूल होऊं लागते. कागदीं चलनाच्या हुंडणावळीची महायुद्धाच्या पूर्वीची प्रसिद्ध उदाहरणें ब्राझिल, रशिया व इटली हीं होत. एका देशांत सोन्याचें नाणें असून दुस-या एका देशांत रुप्याचें नाणे असल्यास रुपें व सोनं यांच्या किंमतीत जें गुणोत्तर असतें तेच त्या हुंडणाबळीचा मुख्य घटक असतें.  उदाहरणार्थ, रुपया व पौंड यांमधील हुंडणावळ एका पौंडांतील सोनें विकून त्याची चांदी विकत घेऊन टांकसाळींत रुपये पाडल्यास जितके रुपये मिळतील तितकी होईल.  परंतु दोन्ही देशांत टांकसाळ खुली असल्यास हा नियम लागू पडतो; एका देशांत टांकसाळ बंद असल्यास हुंडणावळीचा निश्र्चित दर सांगतां येत नाहीं. टांकसाळ खुली नसल्यास रुप्याच्या अथवा सोन्याच्या नाण्यांवर दर अवलंबून न राहतां दोन्ही देशांतील एकंदर चलनाच्या संख्येवर अवलंबून राहील. उदाहरणार्थ, १८९३ नंतर हिंदुस्थानांत खुली टांकसाळ नसल्यामुळें रुपये व नोटा मिळून जें एकंदर चलन होतें त्यावर पौंड व रुपया यांची हुंडणावळ अवलंबून असतें.

नोटा जास्त झाल्यास हुंडणावळ प्रतिकूल होते व कमी केल्यास हुंडणावळ अनुकूल होते, परंतु एका देशांत टांकसाळ खुली नसेल व दुसऱ्या देशांत खुली असेल तर सुवर्णबिंदूची मर्यादा येथेंहि अस्तित्वांत येतें. उदाहरणार्थ, दहा डॉलरचें सोन्याचें नाणें दिलें असतां जर २८ रुपयांची हुंडी न्यूयॉर्क येथें मिळेल व हें नाणेंच हिंदुस्थानांत पाठविलें असतां त्यातील सोनें ३० रुपयांस विकलें जाईल तर हुंडी घेण्याऐवजी नाणें पाठविणेंच फायदेशीर होईल; म्हणून हुंडीचा भाव ३० रुपयांच्या खालीं जाणार नाही व ही सुवर्णबिंदूची मर्यादा होईल. आतां हा बिंदू सोन्याच्या किमंतीवर अवलंबून असल्यामुळें सोनें महाग झाल्यास हा बिंदू ३२ किंवा ३५ रुपयांपर्यंत वर चढेल; अर्थात तो अस्थिर बिंदू राहणार यांत संशय नाहीं. एकंदरीनें पहातां सुवर्णचलनाच्या देशांत व चांदीचें नाणें मुख्य आहे अशा देशांमध्यें स्थिर हुंडणावळीचा दर असणें शक्य नाहीं. सोन्याच्या व चांदीच्या भावांप्रमाणें तो नेहमीं बदलत राहील.

मध्ययुगांत हिंदुस्थानांत अनेक नाणीं प्रचलित होतीं व शेंकडों राज्यें होती त्यामुळें हुंडणावळीचा प्रश्र्न  उद्भवत नसे. ईस्ट इंडिया कंपनीस रोख पैसे देऊन माल विकत घ्यावा लागे व हे पैसे, चांदी किंवा सोनें देऊन पैदा करावे लागत. १८३५ सालीं कंपनीचें राज्य विस्तृत झाल्यामुळें त्यांनीं रुपया हें मुख्य हें नाणें केलें. तेव्हांपासून १८९३ पर्यंत हुंडणावळ चांदीच्या भावावर अवलंबून असे. १८७५ पर्यंत साधारणपणें १ पौंड नऊ दहा रुपयांबरोबर असे. १८७५ पासून चादीं स्वस्त झाल्यामुळें एक पौंड हा बारा, चौदा व सोळा रुपयांपर्यंत वाढला. यामुळें होमचार्जेसकरितां जास्त रुपये द्यावे लागून ते किती द्यावे लागतील याचाहि अंदाज लागेनासा झाला. या अनिश्र्चित हुंडणावळीमुळें व्यापारासहि सट्टयाचे स्वरूप येऊं लागलें. १८९३ सालीं टांकसाळ बंद करून हुंडणावळ सरकारनें १ रू. १६ पेन्स या बिंदूवर स्थिर करून टाकलीं; तेव्हांपासून महायुद्दांच्या सुरवातीपर्यंत ती स्थिर होती. ही स्थिर ठेवण्याकरितां सरकारनें असें केलें कीं, इंग्लंडमध्यें १६ पेन्स दिले असतां भारतमंत्री यानें एक रुपया हिंदुस्थानांत द्यावा; त्याचप्रमाणें हिंदुस्थानांत एक रुपया दिला असतां भारतमंत्री यानें एक पौंड इंग्लंडमध्यें द्यावा. असें झाल्यानें दोन रुपयांची किंमत अधिक होणें शक्य नाहीं; त्याचप्रमाणें कमी होणेहि शक्य नाहीं. कारण बँकांनी कमी पेन्स दिल्यास भारतमंत्री सोळा पेन्स देण्यास तयार होतो.

यानंतर महायुद्धांत नोटा अतिशय चलनांत आल्यामुळें व चांदी अति महाग झाल्यामुळें ही हुंडणावळ अस्थिर झाली. एक रुपया पाडण्यास १८-२० आणे खर्च आल्यामुळें त्याची किंमती १६ पेन्स अथवा १६ आणें घेणें नुकसानीचें झालें. यामुळें सरकारनें हुंड्याचा भाव इंग्लंडांत १८ पेन्स केला. याच वेळी सोनें व रुपे  हिंदुस्थानांत येण्याची बंदी केल्यामुळें हुंडणावळीचा दर अधिकाधिक वाढत जाऊन २० पेन्स, २२ पेन्स, २४ पेन्स द्यावे या क्रमाने तो २८ पेन्सपर्यत गेला.  एका रुपयास २८ पेन्स द्यावे लागल्यामुळें एक्सचेंज बँकां हिंदुस्थानांत कोणासहि रुपये घेऊन पौंडाचे ड्रॅफ्ट देईनात. त्यामुळें सरकारनें उलट हुंड्या विकण्यास सुरुवात केली. या सर्व आपत्तीचा विचार करण्याकरितां सरकारनें एक कमिटी नेमिली. तिनें १ पौंड = १० रुपये दर करावा असें ठाम मत दिलें व त्याप्रमाणें सरकारनें ताबडतोब कायदा केला. परंतु १९२० मध्यें उलट हुंड्या विकण्याचें बंद केल्यावर हुंडणावळीचा दर पुन्हां खाली आला तो १४ पेन्सांवर आला. यानंतर हा भाव १६ पेन्सांपर्यंत जाऊन १९२४ च्या मध्याच्या सुमारास १८ पेन्सपर्यंत पोंचला. तेव्हांपासून दोन वर्षे हा भाव त्या बिंदूवर स्थिर आहे; परंतु हा निसर्गत. स्थिर नसून कृत्रिम रीतीनें नोटांचें चलन कमी करून फडणिसांनी स्थिर केला असें बहुतेक हिंदी अर्थशास्त्राज्ञांचे मत आहे. सध्याच्या काळीं हा भाव १८ पेन्स या बिंदूवर स्थिर करावा असें हिल्टन यंग कमिशननें आपलें मत दर्शविलें आहे; याच अनुसरून सरकारतर्फे सर बेसिल ब्लँकेट यांनी एक कायद्याचा मसुदा असेंब्लीत आणला होता परंतु तो १९२७ च्या जानेवारीपर्यंत तहकूब करावा असा ठराव पास झाला. वस्तुत: अशी स्थिति आहे कीं, सुवर्णचलन केल्यास हुंडणावळीचा प्रश्र्नच  उद्भवणार नाहीं, कारण टांकसाळीचा मध्यबिंदू आपोआप प्रस्थापित होईल व इंग्लंड, जर्मनी अथवा युनायटेड स्टेट्स यांमध्यें अशी नैसर्गिक हुंडणावळ ठरली जाते तशी इंग्लंड व हिंदुस्थान यामध्यें ठरली जाईल. परंतु कांहीं तर सबबीवर सुवर्णचलन फेंटाळून लावण्याचा इंग्लंडनें निश्र्चय केला आहे असें दिसतें. कृत्रिम पद्धतीनें हुंडणावळ स्थिर ठेवतां येते याविषयीं वाद नाहीं. परंतु त्या कार्याकरितां इतकी घोंटाळ्याची व हिंदुस्थानाच्या हितास अनिष्ट अशा तऱ्हेची चलनपद्धति अमलांत आणावर लागते कीं, त्यापेक्षां हुंडणावळ जरी अस्थिर राहिली तरी हरकत नाहीं असें वाटतें. शिवाय रुप्याचा भाव कमी-अधिक झाल्यास ही चलनपद्धति गडबडून जाते हें गेल्या दहा वर्षांत निदर्शनास आलें आहे. असें असूनही पुन्हा रुपया हेंच मुख्य चलन ठेवण्याचें या शेवटल्या कमिशननें ठरविले आहे हें स्वार्थ व अविचार याचें द्योतक आहे. हीच पद्धति चालू राहिल्यास हिंदुस्थानचें अपरिमित नुकसान होईल अशी बऱ्याच हिंदी अर्थशास्त्रज्ञांची खात्री आहे.

आतांपर्यंत आंतरराष्ट्रीय हुंडणावळीचा विचार केला. आतां देशांतील व्यापारी हुंड्यासंबंधानें विशिष्ट उपपत्ति आहे किंवा काय हें पाहूं. व्यापारी हुंडी एकाच राज्यांतील भिन्न ठिकाणीं प्रसृत असल्यामुळें तेथें भिन्न चलनांमुळें उत्पन्न होणारा घोंटावा व आयात-निर्गत वगैरेनीं होणारे फेरबदल ह्याचा प्रश्र्न  नसतो. त्यामुळें हें प्रकरण परकीय हुंड्याच्या तुलनेनें अगदीच साधें असतें. एका गांवीं शंभर रुपये अथवा पौंड दिल्यास तितकेच रुपये दुसऱ्या गावी मिळावयाचें अशा स्वरूपाची ही हुंडी असते. तिचें कार्य तंतोतंत डांकखात्याच्या 'मनीऑर्डर' प्रमाणें असतें ही सोव करण्याबद्दल अर्थातच पेढीवाला कांहींतरी मागतो; कारण सर्व ठिकाणी विपुल पैसा हुंड्याच्या व्यापार करणारास ठेवावा लागतो. हें कमिशन डांकेच्या मनीऑर्डरच्या कमिशनपेक्षां कमी असतें. कारण असें नसल्यास मनीऑर्डरचा आश्रय प्रत्येक इसम करील. शिवाय नोटा लिफाफ्यांत घालून विमा उतरून पाठविण्याचा मार्ग शक्य असल्यानें त्यास जितका शेंकडा खर्च येतो त्यापेक्षां हें कमिशन कमी असावें लागतें. हा खर्च अदमासें शेंकडा अर्धा टक्का इतका असतो. त्यामुळें देशी हुंडीचा दर अदमासें शेंकडा १/४ किंवा शेंकडा  १/८  इतका असतो. इंग्लंडांत अशा हुंडीस ड्रॅफ्ट असें म्हणतात. ही हुंडी मुदतीची असल्यास तितक्या मुदतीनें प्रचलित दराप्रमाणे  व्याज कापून तिची किंमत ठरते. हुंडी दाखविल्यानंतर तिचा स्वीकार केला जातो व ज्या पेढीवर हुंडी असते तिचा मनुष्य हुंडी दाखविणाराच्या घरीं पैसे आणून भरतो, म्हणजे ती हुंडी निकामा झाली. आपणा  स्वत:स पैसे नको असल्यास ती हुंडी आपणांस विकतां येते, परंतु मागें सही करून अमक्यास द्यावी असे शब्द लिहावे लागतात. एवंढ देशीं हुंडीचा बहुतेक व्यवहार देशी चेकच्या धर्तीवर असतो. त्याचप्रमाणें कायद्याच्या दृष्टीनें हुंडी ही परराष्ट्रीय हुंडीप्रमाणें एका हातांतून दुसऱ्या हातात जाण्यास लायक असा रोखा या स्वरुपाची समजली जाते. यावरून असें दिसून येईल कीं, देशी हुंडी ही आंतरराष्ट्रीय हुंडीहून अगदीं भिन्न स्वरूपाच असते. तथापि आंतला व्यापार अति मोठ्या प्रमाणावर असल्यास मोठ्या क्षेत्रफळाच्या देशांत हुंडयांचा व्यवहार फार महत्त्वाचा असतो. याकरितां बँका व पेढ्या विपुल असल्याशिवाय देशांतील भिन्न प्रांतांमधील व्यापार व्यवस्थित चालणार नाही. या बाबातीत हल्लींची स्थिति हिंदुस्थानांत फार असमाधानकारक आहे, देशांच्या मानानें पेढ्याची संख्या फार कमी आहे व चेकचा प्रसार अगदींच अल्प प्रमाणांत आहे. ही स्थिति सुधारण्याविषयी जोरानें प्रयत्न केला पाहिजे व या प्रयत्नांत सरकारनेंहि पुष्कळ मदत केली पाहिजे. (लेखक व्ही. एन. गोडबोले.)

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .