प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग एकविसावा : सांचिन - ज्ञेयवाद  
              
हुशंगाबाद.जिल्हा.- मध्यप्रांत, नर्मदा प्रातांतील जिल्हा. त्याच्या उत्तरेस भोपाळ व इंदूर संस्थानें; पूर्वेस नरसिंगपूर; पश्र्चिमेस माड व दक्षिणेस छिंदवाडा, बैतूल व वऱ्हाड हे भाग आहेत. या जिल्हयांतला नर्मदेच्या बाजूस असलेला मुलुख काळीभोर व सुपील अशा जमिनीचा आहे. या जिल्ह्याच्या दक्षिणेस सातपुडा पर्वताच्या रांगा पसरल्या आहेत. ह्या जिल्ह्यांत सरकारी जंगले दक्षिण सरहद्दीवर डोंगरावर व पश्र्चिम बाजूकडे नदी तीराच्या बाजूनें दिसून येतात. शुद्ध सागवानीं लांकूड नदीच्या बाजूनें पुळण असलेल्या सपाट जमिनीवर व डोंगराच्या बाजूनें तांबड्या दगडाच्या जमीनीवर आढळतें. ह्या जंगलांत शिकारहि मुबलक मिळते. गवा, वाघ, चित्ते, सामान्य हरिण व काळवीट वगैरें जनावरें त्यांतून पुष्कळ आहेत. हुशंगाबाद शहरी दर वर्षी पाऊस ५० इंच पडतो. व इताकच पाऊस सपाट जमिनीवर पडतो. ह्या जिल्ह्यांत दुष्काळ फारसा ठाऊक नाहीं. उन्हाळयांत हवा कडक असून कोरडी असते. इतिहास.-ह्या जिल्ह्याबद्दल पूर्वीची माहिती, मराठे लोकांनीं ह्या जिल्ह्यावर स्वारी करीपर्यंत फारशी उपलब्ध नाहीं. हुशंकाबाद शहरास हें नांव माळव्याचा सुलतान होशंगशहा घोरी (१४०५ ते १४३४) याच्या नांवावरून पडलें. ह्या जिल्ह्याचा पूर्वभाग मुसुलमानांच्या हातीं कधीहि गेला नाहीं, कारण त्याचें महत्त्व त्या लोकांनां कधीहि वाटलें नाहीं. मोंगल बादशाहीस उतरती कळा लागल्यावर हा जिल्हा पुन्हां गोंड राज्यांच्या ताब्यांत गेला. सुमारें १७२० मध्यें भोपाळच्या मुसुलमानी घरण्याचा मूळपुरुष दोस्तमहंमद यानें ह्या प्रांतावर स्वारी केली व पुढें १७४२ साली बाळाजी बाजीराव पेशवा मंडलावर हल्ला करण्याकरितां जात असतांना त्यानें इंडिया परगणा घेतला. नंतर रघोजी भोंसलें ह्यानें ह्या मुलुखावर स्वारी करून भोपाळच्या राज्याचा भाग सोडून बाकीचा मुलुख पादाक्रांत केला; पण लवकरच भोंसलें सरकार व भोपाळचें नबाब यांत तंटे सुरू झाले. १८१७ सालीं नागपूरच्या राज्यापैकीं हल्लींच्या जिल्ह्याचा भाग व १८४४ सालीं हर्दा-हंडिया भाग शिदे सरकारकडून घेऊन हा जिल्हा बनला. लो क व स्ती.-जिल्ह्याची लोकसंख्या (१९२१) ४४५७३३. या जिल्ह्यांत हर्दा, हुशंगाबाद, सिवनी, मालव, सोहागपूर, इटारसी, व पचमडी अशीं सहा शहरें आहेत. येथले बहुतेक लोक पश्र्चिमहिंदीची एक शाखा जी बुंदेली भाषा ती बोलतात. पण हर्दा जिल्ह्यांतील भाषेचें राजपुतान्यांतील माळवी भाषेशीं बरेंच साम्य आहे. या जिल्ह्यांत गोंड, कोरकू, रजपूत, गुजर, रघुवंशी जाट, ब्राह्मण वगैरे बऱ्याच जाती आहेत. शेंकडा ६१ लोक शेतीवर निर्वाह करतात. शे त की.-जिल्ह्यांत मुख्य जमीन म्हणजे सुपीक, काळी, पुळणाची, चिकण मातीची होय. या जिल्ह्यांत हर्दा व सिवनी-माळवा या तहशिलींतील जमीन अत्यंत सुपीक आहे व सोहागपूर येथील कांहीं भाग वगळून बाकी सर्व भागांतील जमीन अगदी निकृष्ट आहे. येथील मुख्य पीक गव्हाचें आहे. या जिल्ह्यांत बहुतेक जमीन हल्लीं लागवडींत आहे. काहीं काहीं वेळा लोक गुरांनां चारा मिळावा म्हणून मुद्दाम जमीन पडिक ठेवतात. कपाशीची लागवड येथें जोरानें सुरू झाली आहे. जिल्ह्यांत खनिज संपत्ति फारशी नाहीं; चांगला तांबडा व पांढरा इमारतीचा दगड येथें हुशंगाबाद शहरी सांपडतो. व्या पा र व द ळ ण व ळ ण.-या जिल्ह्यांत लोक जें कापड वापरतात तें बहुतेक येथेंच तयार होतें व तें सोभापूर व सोहागपूर येथें विशेषत: तयार होतें. या सोहागपूर शहरीं पूर्वी टसर रेशीम तयार होत असतें; पण हल्लीं हा धंदा बसत चालला आहे. तरी पण येथें कापडास रंग देण्याचा धंदा जोरांत चालतो. हुशंगाबाद, इंडिया व बाबई येथें पितळेची कामें व टिमुरणी येथें आडकित्ते उत्तम तयार होतात. या जिल्ह्यांतून गहूं, तीळ, लिंबोणी, व कापूस हे जिन्नस बाहेर पाठविले जातात. व येथील राजाबोरारी व बोरी येथील सागवानी लांकूड फार प्रसिद्ध असल्यामुळें तें येथून बाहेर जातें.या जिल्ह्यांतून जी. आय. पी. रेल्वे जाते. व इटारसी येथून इंडियन मिडलंड रेल्वेची शाखा उत्तरेकडे हुशंगाबद शहरावरून जाते. मुख्य व्यापारी रस्ते म्हणजे इटारसी-बैतूल रस्ता, हर्दा-हंडिया रस्ता, हर्दा-बैतूल रस्ता, पिपरिया-छिंदवाडा रस्ता, व पिपरिया-संदवालिया रस्ता हे होत.  शिक्षणाच्या बाबतींत हा जिल्हा सर्व मध्यप्रांतांत ५ वा आहे. शेंकडा ४.६ लोक (८.८ पुरुष व ०.३ बायका) साक्षर आहेत. त ह शी ल.--हुशंगाबाद जिल्ह्यांतील तहशील. क्षेत्रफळ ७७४ चौरस मैल. लोकसंख्या (१९२१) १२८११६६. या तहशिलींत दोन शहरें आहेत; एक हुशंगाबाद व दुसरें इटारसी, शिवाय ३१२ खेडीं आहेत. या तहशिलींत दोन प्रकारची जमीन आहे; उत्तरेस नर्मदाथडी असून तिच्यामध्यें काळीभोर जमीन असून महादेव पर्वतापासून उतार लागतो व तो नर्मदानदीपर्यंत टिकतो. दक्षिणेस बोरधा पठार आहे. व त्यावर लहान लहान डोंगर असून जमीन रेताड आहे. श ह र.--हें शहर नर्मदा नदीच्या दक्षिण तीरावर फारच सुरेख रीतीनें वसले आहे. या शहराची लोकसंख्या १९०१ सालीं सुमारें १५००० होती.  ती पांच हजारांवर येऊन ठेपली. १८०९ सालीं मराठे लोकांनीं हें शहर घेतलें व १८१७ सालीं तें त्यांच्याकडून इंग्रज लोकांनी घेतले.  येथें १८६९ सालीं म्युनिसिपालिटी स्थापन झाली. या ठिकाणीं पितळेचीं भांडी व हातीं धरण्याच्या काठ्या चांगल्या तयार होतात. येथें सरकारी हायस्कुलें, सरकारी शेत, दवाखाने वगैरे सार्वजनिक संस्था बऱ्याच आहेत.

   

खंड २१ : साचिन - ज्ञेयवाद  

 

 

 

  सातारा
  सादाबाद
  सादी
  सानंद तालुका
  साबण
  साबरमती नदी
  साबाथ
  साबूदाणा
  सांभर
  सांभर सरोवर
  सामवेद
  सायणाचार्य
  सायप्रस बेट
  सायरिनी
  सारंगड संस्थान
  सारंगपूर
  सारण
  सारस्वत
  सारानाथ
  सार्वराष्ट्रीय कायदा
  सालवीन
  सालूर
  सालेम
  सालोन
  साल्व्हाडोर
  सावंतवाडी संस्थान
  सावर्णि
  सावित्री
  साष्टी
  सासवड
  साहित्यशास्त्र
  साळी
  सिंकोना
  सिक्कीम
  सिंगापूर
  सिंगू
  सिंघभूम
  सिजविक
  सिंजहोरो
  सिथिआ
  सिंद
  सिंध
  सिंधसरहद्द
  सिंधु
  सिंधुनद
  सिद्धपूर
  सिनसिनॅटी
  सिन्नर
  सिरसा
  सिरसी
  सिराजगंज
  सिरोही
  सिलहट
  सिलोन
  सिसवी
  सिसिरो, मार्कस टिलियस
  सिंह
  सिंहगड
  सीएरालिओनी
  सीता
  सीतापूर
  सीतामऊ संस्थान
  सीरिया
  सील
  सुएझ
  सुकेत संस्थान
  सुग्रीव
  सुतार
  सुंथ
  सुंदरवन
  सुदान
  सुदास
  सुंदोपसुंद
  सुपारी
  सुपे
  सुफी
  सुब्रह्मण्य अय्यर डॉ एस्
  सुभद्रा
  सुमात्रा
  सुमेर
  सुरगाण
  सुरगुजा
  सुरजमल्ल
  सुरत
  सुरापान
  सुराष्ट्र
  सुलतानपूर
  सुलेमानपर्यंत
  सुश्रुत
  सुसर
  सुसा
  सूतिकाज्वर
  सूर घराणें
  सूरदास
  सूर्य
  सूर्यमाला
  सूक्ष्मदर्शक यंत्र
  सूक्ष्मसंचयन
  सेखोजी आंगरे
  सेंगर उर्फ सैंगर राजवंश
  सेंट पीटर्स बर्ग
  सेंट लुसिआ
  सेंट-सायमन,क्लॉड हेनरी
  सेंद्रक
  सेन राजे
  सेनवी
  सेनीगाल
  सेरामठ
  सेलीबीझ
  सेल्युशिआ
  सेवुल
  सेव्हॅस्टोपोल
  सैन्य
  सैलाना संस्थान
  सोंड
  सोडा
  सोंडूर
  सोनपूर
  सोनपूर संस्थान
  सोनार
  सोप्पार
  सोफिया
  सोम
  सोमदेव
  सोमनाथ
  सोमालीलॅंड
  सोमेश्वर
  सोरा
  सोलापूर
  सोहावल
  सौंदत्ती
  सौदॅम्पटन
  सौंदर्यशास्त्र
  स्कंदपुराण
  स्कॉटलंड
  स्कुटारी
  स्कौट (स्काउट)
  स्टटगार्टं
  स्टॉक होम
  स्ट्रॉबेरी-इष्टापुरी
  स्ट्रायबर्ग
  स्तंभ
  स्त्रीधन
  स्थलजलचर
  स्थानेश्वर
  स्थापत्यशास्त्र
  स्थापत्यशास्त्र (भाग २)
  स्थापत्यशास्त्र (भाग ३)
  स्थितिगतिशास्त्र
  स्पंज
  स्पर्शास्पर्शविचार
  स्पार्टा
  स्पिनोझा
  स्पेन
  स्पेन्सर, हर्बर्ट
  स्फुर
  स्मर्ना
  स्मिथ, अॅडॅम
  स्वाझीलंड
  स्वात संस्थान
  स्वानसी
  स्वामीनारायणपंथ
  स्वार्थवाद
  स्वित्झर्लंड
  स्वीडन
 
  हंगु
  हंगेरी
  हॅझलिट, विल्यम
  हझारा जिल्हा
  हझाराबाग जिल्हा
  हडगल्ली
  हंडिया
  हणमंते, रघुनाथ नारायण
  हत्ती
  हंथवड्डी
  हथवाराज
  हनगळ
  हनमकोंडा
  हंबीरराव मोहिते
  हमदान
  हमीरपूर
  हर
  हरणई
  हरदोई
  हरद्वार
  हरपनहळ्ळी
  हरभरा
  हरसूद
  हरिआना
  हंरिपंत फडके
  हरिपूर
  हरिश्चंद्र
  हरिहर
  हर्दा
  हर्ष
  हलवाई
  हलायुध
  हवेली
  हव्यक ब्राह्मण
  हंस
  हंसदास (राज)
  हसन
  हसनपूर
  हंसी
  हस्तिदंत
  हस्तिनापूर
  हळद
  हळवा
  हळशी
  हळ्ळेबिड
  हाँगकाँग
  हाजीपूर
  हाटा
  हाटिया
  हाटेंटाट
  हाडें
  हायॉर्न नॅथेनील
  हाथ्रस
  हानोइ
  हागोव्हर
  हापुर
  हाफीजाबाद
  हॉफ्मान
  हॉब्ज
  हाम्बर्ग
  हाल
  हॉलंड
  हावेरी
  हाळेपाईक
  हिंगणघाट
  हिंगूळ
  हिंगोली
  हिंग्लज
  हिंदुपूर
  हिंदूकुश
  हिंदोल
  हिब्रू वाड्मय
  हिंमतबहादूर गोसावी
  हिमालयपर्वत
  हिरडा
  हिरण्यकशिपु
  हिरात
  हिरे
  हिलटिप्पेरा
  हिशेबपद्धति
  हिस्सार
  हुएनत्संग
  हुकेरी
  हुगळी
  हुंडणावळ
  हुनगुंद
  हुबळी
  हुमायून
  हुशंगाबाद
  हुश्यारपुर
  हुण
  हेग
  हेगेल
  हेंझाडा
  हेनरी राजे
  हेबळी
  हेमाद्रि अथवा हेमाडपंत
  हेलिओपोलिस
  हेल्महेल्ट्झ, हर्मन
  हैदरअल्ली
  हैदराबाद
  हैहय राजे
  होंडुरस
  होनावर
  होमर
  होयसळ राजे
  होरेस
  होलिया
  होसुर
  होस्पेट
  होळकर
  हौरा
  ह्यूगो, व्हिक्टर
  ह्यूम
 
  क्ष
  क्षत्रप
  क्षत्रिय
  क्षयरोग
  क्षिप्रा
  क्षीरस्वामी
  क्षेमंकर
  क्षेमराज
  क्षेमीश्वर
  क्षेमेंद्र
  ज्ञ
  ज्ञानकोश
  ज्ञानराज
  ज्ञानेश्वरी
  ज्ञेयवाद

 

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .